STI परीक्षेत राज्यात १२ वा आलेला सुमित फावडे याची मुलाखत

प्रश्न उत्तरे
 नाव सुमित सुधाकर फावडे
  पद STI (2016) Rank – 12
बैठक क्रमांक MB00L08L
किती वेळ्या मुख्य परिक्षा दिल्या PSI – 14 , 17
Forest – 14, 17
राज्यसेवा – 2017
शाळेतील माध्यम मराठी
मुख्य गाव लातूर
यशाचे श्रेय कोणाला द्याल ? माझे वडील, आई ज्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला व Encourage करत राहिले. माझा भाऊ जो
माझ्यापेक्षा वयाने लहान आहे व मोठी स्वप्न पाहण्याची प्रेरणा देतो तसेच माझे मित्र ज्यांनी मला
बऱ्याच वेळा मदतीचा हात दिला होता. या सर्वांना मी यशाचे श्रेय देईन.
इंटरनेटचा वापर किती वेळा केला २० ते ३० मिनीटे
शिक्षण १० वी – 80.00 %
१२ वी – 64.00 %
पदवी :- BE (E&TC)
स्वत:बद्दल परिचय १० वी पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागातच झाले तर
११ वी व १२ वी लातूर येथून पूर्ण
वडिल शेती सांभाळतात, आई शासकिय सेवेत
ANM या पदावर कार्यरत आहे.
मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? अभ्यास नियमित केला पण जास्तीत जास्त भर पुस्तके वाचण्यावर दिला व आयोगाच्या
प्रश्नपत्रिकांचा अभ्यास किंवा विश्लेषण केलेच नाही
फक्त राज्यसेवेचाच अभ्यास करायचा म्हणून इतर परिक्षांकडे दुर्लक्ष केले.
या प्रयत्नात यश मिळण्यासाठी काय प्रयत्न केले ? प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण जास्तीत जास्त प्रश्न सोडविले तसेच मराठी व इंग्रजी विषयाचा अभ्यास
पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पध्दतीने केला. मुख्य परिक्षेसाठी मिळालेल्या चार महिन्याच्या वेळेचे
काटेकोर नियोजन केले होते त्यामुळे सर्व विषयांना योग्य न्याय देता आला.
मुख्य परिक्षेसाठी Test Series लावली होती का ? आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकासोडवण्यावरच जास्त भर दिला त्यामुळे TestSeries लावली नाही.
STI मुख्य परिक्षेचे दोन्ही विषयातील गुण सांगू शकाल का ? Paper 1 – 72
Paper 2 – 66
मराठी व इंग्रजी विषयाची कशी तयारी केली. ? मराठीसाठी मो.रा. वाळंबे सरांचे पुस्तक वापरले. आयोगाच्या जिल्हा निवड समितीच्या परिक्षा
होत असतात. (सरळसेवा) त्या प्रश्नपत्रिकासुध्दा सोडवल्या होत्या. (प्रश्नपत्रिका संच उपलब्ध आहे)
इंग्रजी साठी पाल अँन्ड सुरी हे पुस्तक वापरले, शिवाय परिक्षेच्या आधी Class लावला होता.
मुख्य परिक्षेची तयारी करतांना कोणती Strategy ठेवली होती ? विषयानुसार सांगितले तरी
चालेल.
इतिहास, भूगोल व राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास पूर्व परिक्षेच्या वेळीच बऱ्यापैकी पूर्ण झाला
होता. त्या परिक्षेच्या आधी Revise केले.
चालू घडामोडींसाठी रोज दोन तासस दिले होते ज्यात मी दोन मासिकांचा अभ्यास करत होतो
शिवाय चालू घडामोडींचे Discussion करायचो.
मराठी, इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांवर जास्तीत जास्त भर दिला.
संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकाचा अभ्यास करण्यासाठी Internet चा उपयोग केा होता.
शेवटच्या महिन्यात रोज एक प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवली.
मुख्य परिक्षेत वस्तुनिष्ट प्रश्नपत्रिकेत संदिग्धता असते अशा संदिग्ध प्रश्नांची उत्तरे देतांना काय
काळजी घेतली ?
असे प्रश्न सोडवतांना यापूर्वी चुका झाल्या होत्या. त्या टाळण्यासाठी यापूर्वी संपूर्ण प्रश्न काळजीपूर्वक
वाचला पहिला पर्याय बरोबर दिसत असला तरी सुध्दा इतर तीन चुकीचे पर्यायही वाचले
त्यामुळे Elimination Method अधिक चांगल्या प्रकारे वापरता आली.
मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस आधी Revision ला सुरुवात केली ? पंधरा दिवस आधी Revision सुरु केले. त्यात मी Revision चे तीन Cycles पूर्ण केले होते.
Revision साठी स्वत:च्या नोट्स काढल्या का ? त्या हस्तांतरीत होत्या का Electronic होत्या ? अतिशय कमी प्रमाणतच नोट्स काढल्या होत्या काही Factural Data आणि काही असे Fopics जे
वाचूनही लक्ष्यात राहत नव्हते. स्वत:चे Notes स्वरुपात लिहून काढले.
मुख्य परिक्षेत काही विषय / घटक अवघड असतात त्याची तयारी कशी केली ? काही उपघटक क्लिष्ट आहेतच जसे लोकसंख्या, दारिद्रय, बेरोजगारी इ. या उपघटकाचा
विश्लेषणात्मक उभ्यास करुन गटचर्चा केली होती. तसेच अशा Topics च्या Notes काढून बऱ्याच
वेळा Revise केल्या.

 

अभ्यास करतांना कोणत्या अडचणी येतात ? काय उपाय सुचवाल ? अभ्यास करतांना अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत असतातच जसे अभ्यासात कधी-कधी मनच
रमत नाही तर कधी अचानक आपली निवड होईल की नाही याची भिती वाटायला लागते.
अशावेळी मन शांत ठेवून स्वत:वर विश्वास ठेवावा. बऱ्याच वेळा काही आर्थिक अडचणी समस्या
सुध्दा असतात. अशा प्रकारचा सामाजिक दणव सुध्दा असतो. पण अशा सर्व अडचणींवर आपण मात
केलीच पाहिजे, कारण या सर्व अडचणी स्पर्धा परिक्षेचाच एक भाग असतात.
संदर्भग्रंथाची निवड कशी केली ? संदर्भग्रंथाची निवड करताना Seniors चे Guidance घेतले होते एकावेळी एकापेक्षा अधिक
संदर्भग्रंथ वापरावे लागले.
तसेच MPSC Simplified या Blog वर परिक्षा व विषयानुसार पुस्तकांची यादी उपलब्ध आहे.
याचा खूप उपयोग झाला.
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या तयारीला येत आहेत काहीजण आकर्षण तर काही जण
इतरही करतात म्हणून येतात. त्यांना काय सांगाल ?
केवळ शासकिय सेवेच्या आकर्षणापोटी किंवा इतरही कुणी करतय म्हणून या क्षेत्रात येण्याचा निर्णय
घेणे हे निश्चितच योग्य नाही. हा निर्णय आपला स्वत:चा असावा.
या स्पर्धेत उतरण्याआधीच आपली अगदी नियमित अभ्यास करण्याची कष्ट घेण्याची तयारी असावी.
अपयश आलेच तर धडा घेवून परत एकदा जोमाने अभ्यास करावा. योग्य मार्गदर्शकाची तसेच
संदर्भग्रंथाची निवड करावी. आवश्यक असेल तरच खाजगी Class लावावा, पण तो लावण्याआधी
जी कुणी मुल तिथुन शिकली असतील त्यांचा विचार घ्यावा.
जिद्द, मेहनत घेण्याची तयारी आणि अगदी नियमित असा अभ्यास असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी
व्हाल.
जर तुमचे Selection झाले नसते तर तुम्ही Plan B तयार केला होता का ? Plan B किती
महत्वाचा आहे ?

हो माझा Plan B तयार होता Engineering Graduate असल्यामुळे खाजगी कंपनीत JOB
मिळविणे हाच माझा दुसरा पर्याय होता.
जागांची कमी संख्या, उमेदवारांची मोठी संख्या तसेच काही प्रमाणात असणारी अनिश्चितता
विचारात घेता Plan B असणे उत्तमच आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात द्यावे की परिक्षा म्हणजे सर्वस्व

नाही. जीवनातील अनेक परिक्षांपैकी ही एक परिक्षा आहे. जर समजा यश गाठता आलेच नाही तर
आपल्या Plan B मध्ये सुध्दा तेवढ्याच आनंदाने Career करण्याची तयारी ठेवता येते.

पुण्यात अभ्यास केला होता का ? काय फायदा होतो ? हो मी पुण्यात अभ्यास केला होता फायदा एवढाच होतो की सतत स्पर्धा परिक्षेच्या वातावरणात
असल्याने आपले aim डोळ्यापुढे राहते तसेच विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांचे अनुभव
आपल्याला अनुभवी ठरु शकतात.
पण सध्या स्पर्धा परिक्षांबाबत समाजात जागरुकता वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ
सर्व जिल्ह्यात अभ्यासिका स्थापन होत आहेत. Study Material सुध्दा उपलब्ध होत आहे. त्यामुळे
पुण्यात अभ्यास केल्यानेच यश मिळण्याची शक्यता असते असे मला वाटत नाही.
परिक्षेत काही प्रश्नांबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते. तुम्ही त्यांना काय सांगाल ? नक्कीच काही प्रश्न हे Objectionable असतात पण आपण आयोगावर टिका करण्यात वेळ वाया
घालवू नये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षा पध्दतीत ठेवलेली पारदर्शकता आपल्याला ज्ञान
आहेच. त्यामुळे आपण आयोगावर विश्वास ठेवावा व आपले काम आहे कि अभ्यास करणे, ते आपण
करावे.
पूर्वपरिक्षेचा अभ्यास कसा केला ? आयोगाच्या गतवर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले. चालू घडामोडी, राज्यघटना, भूगोल, इतिहास
या विषयांवर जास्त भर दिला होता.
स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे. सुरुवात जोरात होते मात्र सातत्य राहत
नाही. तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ? विद्यार्थ्यांना काय सांगाल ?
स्पर्धा परिक्षा देण्याचे ठरविल्यानंतर विद्यार्थ्यांनी अनिश्चिततेचा विचारच करु नये. अभ्यासात खंड
तेव्हाच पडतो जेव्हा कधी यश हुककावणी देते विद्यार्थ्यांनी जेव्हा यशस्वी उमेदवारांशी चर्चा
करावी. तसेच अभ्यास करण्याची स्वत:ची पध्दत बदलून पहावी. मी सुध्दा हेच केले होते.
Class लावले का  मुख्य परिक्षेआधी Objective English चा Class केला
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat