विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा शेवटचा महिना काय करायला हवे? काय नको?

17
3788
Print Friendly, PDF & Email

विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा शेवटचा महिना काय करायला हवे? काय नको?

                          -डॉ. अजित प्रकाश थोरबोले

१९ जून २०१६ रोजी होणाऱ्या परीक्षेला १ महिना राहिला आहे.अभ्यासबरोबर strategy ला खुप महत्त्व प्राप्त  झाले आहे. पुढील १ महिना काय करायला पाहिजे आणि काय करायला नको या दोन विषयांतर्गत हा लेख आहे.

# काय करायला नको ?

– परिक्षा जवळ येते तसे येणारे टेंशन घ्यायला नको .

– कोणताही विषय ऑप्शन ला टाकायला नको थोडे का होईना त्याची तयारी करायला हवी , काही विषयावर तुम्ही जास्त focusकरु शकता .

– मी पास होईल की नाही ?हा विचार मनात येऊ देऊ नका ( हा विचार सतत येणार असेल तर नककीच याचे उत्तर शेवटी नकारात्मक असेल )

-शेवटच्या १५ दिवसात कोणतेही test paper देऊ नका.कारण त्यामधील कमी आलेल्या score मुळे आत्मविश्वास कमी होतो.

– स्वतःची इतराबरोबर तुलना करायला नको.
i ) माझा अभ्यास त्याच्यापेक्षा / तिच्यापेक्षा खूप कमी आहे .
ii ) मला इतरापेक्षा Test मध्ये खूप कमी मार्कस आहेत .
iii ) इतर जण interview पर्यत पोहचलेत ,मी तर प्रथमच परिक्षा देत आहे.
iv)माझे गणित,इंग्रजी इतरापेक्षा चांगले नाही.

– मुख्य परिक्षेला अजून वेळ आहे परंतु मला मुख्य परिक्षा जमेल का? हे विचार करणे सोडून दयायला हवे .

– Newspaper वाचणे बंद केले तरी चालेल.मागील १ वर्षातील चालु घडामोडींची चांगली तयारी करा.

– मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.cut off किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू.चांगला performance कसा देता येईल याचा विचार करा.

– चालू  घडामोडी शिवाय नविन कोणतेही पुस्तक वाचनासाठी घेऊ नका.अगोदरचेच वाचलेले पुस्तक चांगले करा.

– कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका ( स्पर्धा परिक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे )

– सोशल मिडीयावर  गणित  बुध्दीमत्ता याचा अभ्यास करण्याचे टाळा ,वेळ खूप वाया जातो. काही जण व्हाटस अप ग्रुप वर वर काही चुकीचे उदाहरणे टाकतात आणि सोडवायला सांगतात त्याला काही पर्यायही दिलेले  नसतात यामुळे खूप वेळ वाया जातो.

काही महत्वपूर्ण लेख(MPSCsimplified.com varil)
1)PSI,STI,ASSISTANT-पुस्तक सुची

2)लोकराज्य मासिक नोव्हेंबर २०१५(highlighted)

3)महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ highlight स्वरुपात

4)PSI,STI ASST प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PSI STI ASSISTANT PREVIOUS QUESTIONS PAPER

  * काय करायला हवे

-नेहमी सकारात्मक विचार करून सतत अभ्यासाच्या तयारीच्या प्रक्रियेत राहणे यामध्ये विषयानुसार प्रश्न सोडवने , एकमेंकाशी भेटल्यानंतर केवळ अभ्यासाचा संवाद साधणे , आपण काय अभ्यास केला त्याचे सतत मनन चिंतन करणे, Audio’s, video’s पाहणे.

– आपले प्रयत्न शेवटपर्यत आत्मविश्वासपूर्वक १०० % परिक्षा संपेपर्यत प्रयत्न करावेत

– शेवटच्या काही दिवसात प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस देवून त्याची रिव्हीजन करावी, तुम्ही काढलेले short मधील नोटस या ठिकाणी उपयोगी  पडतात .

– परिक्षेपर्यत मन स्थिर रहाण्यासाठी meditation आणि jogging चालू ठेवावे त्यामुळे सकारात्मक भाव जागृत ठेवता येतात , परिक्षेत या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो शेवटच्या काही दिवसात आपल्याला सतत भिती वाटत असते ही भिती नष्ट करण्यासाठी हे उपयोगी पडते.

– सकारात्मक , तुमच्या बद्दल चांगले मत असणारे मित्रच तुमच्या परिक्षेचा या शेवटच्या दिवसात सोबत रहातील याची दक्षता घ्या . नकारात्मक विचार करणारे , निंदा करणारे लोक यांचे विचार विश्व मर्यादित असते ते कधीही आयुष्यात यशस्वी झालेले नसतात. इतराना योग्य मार्गावरून परावृत्त करण्याचे प्रयत्न  करत असतात, आपण  का अपयशी झालो?याचे परिक्षण करण्याऐवजी कितीही अभ्यास केला तरी मिळत  नाही . नशिब असेल तरच तू पास होऊ शकतोस? अशा विचार करणार्या लोकापासून दूर रहा .

– पेपर मध्ये भरपूर प्रश्न हे आपण वाचलेल्या पैकी नसतात , परंतु हे कमीधिक परिस्थितीही सर्वाचीच असते आपण जो अभ्यास करतो तो आपला आत्मविश्वास आणि क्षमता वाढविण्यासाठी करत असतो .तुम्ही  आजपर्यत केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षा hall मध्ये तुम्हाला दिलासा देत असतो.

-शेवटच्या महिन्यात Revision कशी करावी
परिक्षे अगोदर केलेल्या अभ्यासाची Revision महत्त्वाची आहे Revision नाही केली तर अगोदरचा केलेला Study न केल्यासारखा आहे . Revision करताना खालील  गोष्टी विचारात घ्या
१- Notes काढल्या असतील तर त्याचा वापर करा .
2- Revision करताना प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस या प्रमाणे नियोजन करा
3- Revision करताना  चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता चा दररोज अभ्यास करा
४- शेवटच्या ४ते ५ दिवस अगोदर सर्व विषयाची Revision संपायला हवी.नंतर दुसरी Revision सुरु करा.यामध्ये प्रत्येक विषयाला १ दिवस मिळेल.
५-   कोणतेही नविन पुस्तक वाचायला नका घेऊ.अगोदर ज्या पुस्तकातुन अभ्यास केला आहे त्याचीच revision करा.समजा नविन पुस्तकात एखादा विषय चांगला दिला आहे म्हणुन ते पुस्तक घेऊ नका.एकाच पुस्तकातुन revison करा.
६.साधरणत: 1 जून ते 5 जून  दरम्यान revision सुरू व्हायला हवी.
७.Revision करताना कधीकधि आपण काही तरी नविनच वाचत आहे असा विचार मनात येतो.असा आला तरी tension घ्यायाचे नाही.ही एक common गोष्ट  आहे.सर्वांच्या बाबतीत असे घडते,याला कोणी अपवाद नाही.आपण वाचलेलयापॆकी सर्वच आठवत नसते.be confident about your preparation.आणि विसरणे हा माणसाचा एक गुणधर्म आहे.एखादी गोष्ट खुप दिवस recall नाही केली तर विसरते.

–India Economic  survey 2015-16 पूर्ण वाचण्याची आवश्यकता नाही..त्याची संक्षिप्त notes वाचा.

–महाराष्ट्र आर्थिक पाहणी  करा.(२०१५-१६) खालील लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2015-2016 highlight स्वरूपात

ALL THE BEST

@ सर्वांना  खुप साऱ्या शुभेच्छा .. All the Best

17 COMMENTS

 1. Thank u sir nice job…..
  आपनासारीखे करिती तात्काळ नहीं काळवेळ जयालागी
  Suggest something about Upsc….

 2. thanks alot sir.
  sir maze backlog rahilet magzines che plz suggest if e-copy of that magzines available.or ata kahi option ahe ka tya month che current issues prepare karanysathi?

 3. STI pre exam sathi Eco ani science sathi Question bank kontya author ch changla aahe?
  Excluding Previous question papers
  Please reply
  Its urgent

LEAVE A REPLY