आई वडिलांचे मेहनतीची जाणीव ठेवली -अतुल आवटे (STI-राज्यात पंचविसावा)

0
1453
Print Friendly, PDF & Email
प्रश्न उत्तरे
 नाव आवटे अतुल सिद्धेश्वर
  पद STI (2016) Rank – २५
बैठक क्रमांक MB001170
किती वेळ्या मुख्य परिक्षा दिल्या
शाळेतील माध्यम मराठी
मुख्य गाव सौन्दे ता.करमाळा जि.सोलापूर
यशाचे श्रेय कोणाला द्याल ? माझे कुटुंबीय आणि सतत पॉसिटीव्ह विचार ठेवणारे सर्व मित्र
इंटरनेटचा वापर किती वेळा केला आणि कशासाठी केला अर्धा ते एक तास

चालुघडामोडी आणि अर्थशास्त्र या साठी थोडा वापर केला. पुस्तकावरच भर दिला.

शिक्षण १०वी ला किती टक्के मार्क 81.46
* १२ वी ला किती टक्के मार्क Arts 79.50
* पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळाले
English 64%* महाविद्यालय कुठून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
* कोणत्या वर्षी 2012
पदवीत्युर शिक्षण नाही
* आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे का नाही डि एड
स्वत:बद्दल परिचयकुटुंबातील आईवडील शेती करतात आणि त्यांचे कोणतेही शिक्षण झालेले नाही. कुटुंबातील आईवडील शेती करतात आणि त्यांचे कोणतेही शिक्षण झालेले नाही.
मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? पेपर 2 मध्ये कमी मार्क यायचे
या प्रयत्नात यश मिळण्यासाठी काय प्रयत्न केले ? पेपर 2 मध्ये सुधारणा केल्या तसेच पेपर 1 मध्ये चांगले मार्क मिळाले.
मुख्य परिक्षेसाठी Test Series लावली होती का ? कोणतीही नाही
STI मुख्य परिक्षेचे दोन्ही विषयातील गुण सांगू शकाल का ? Paper 1=76
Paper 2=60
मराठी व इंग्रजी विषयाची कशी तयारी केली. ? थोडीच पुस्तके परात्परात वाचली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे किशोर लवटे सरांचे मराठी इंग्लिश प्रश्नसंच हे पुस्तक प्रत्येक घटकांतर प्रश्न बघण्यासाठी वापरले त्यावरून प्रश्नांचा अंदाज आला
मुख्य परिक्षेची तयारी करतांना कोणती Strategy ठेवली होती ? विषयानुसार सांगितले तरी
चालेल.
पेपर 1 मध्ये जास्त मार्क मिळवणे
पेपर 2 मध्ये अर्थशास्त्रवर फोकस ठेवणे राज्यशास्त्र भूगोल या सोप्या विषयात चांगले मार्क मिळवणे
प्रत्येक घटकानंतर लगेच लवटे सरांच्या पुस्तकातून मागील वर्षातील प्रश्न पाहणे याचा खूप फायदा झाला
मुख्य परिक्षेत वस्तुनिष्ट प्रश्नपत्रिकेत संदिग्धता असते अशा संदिग्ध प्रश्नांची उत्तरे देतांना काय
काळजी घेतली ?
पहिल्या राऊंडवेळी अशा प्रश्नावर वेळ न घालवता स्कीप करून नंतर सोडवणे
मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस आधी Revision ला सुरुवात केली ? 10 ते 12 दिवस.
शेवटच्या 5 दिवसात फक्त अर्थशास्त्र आणि मराठी इंग्लिश
Revision साठी स्वत:च्या नोट्स काढल्या का ? त्या हस्तांतरीत होत्या का Electronic होत्या ? मराठी इंग्लिश आणि अर्थशास्त्र च्या हस्तलिखित नोट्स पण थोडक्यात
मुख्य परिक्षेत काही विषय / घटक अवघड असतात त्याची तयारी कशी केली ? पुन्हा पुन्हा रिव्हिजन.

 

अभ्यास करतांना कोणत्या अडचणी येतात ? काय उपाय सुचवाल ? सातत्य टिकवणे खूप गरजेचे आहे
संदर्भग्रंथाची निवड कशी केली ? आपल्या वेबसाइटशी मी खूप दिवसापासून संपर्कात आहे
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी स्पर्धा परिक्षेच्या तयारीला येत आहेत काहीजण आकर्षण तर काही जण
इतरही करतात म्हणून येतात. त्यांना काय सांगाल ?
सेल्फ मोटीवेटेड असणे गरजेचे आहे कारण या क्षेत्रात यशाची खूप अनिश्चितता आहे
जर तुमचे Selection झाले नसते तर तुम्ही Plan B तयार केला होता का ? Plan B किती
महत्वाचा आहे ?
शिक्षक म्हणून काम करत आहे.
B plan खूप महत्वाचा आहे कारण या क्षेत्रातून यश मिळणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे.
पुण्यात अभ्यास केला होता का ? काय फायदा होतो ? मी संपूर्ण तयारी वेल्हे या गावात राहून (तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी)केली. पुण्यातील मित्रांच्या कायम संपर्कात राहिलो. वेल्हे हा अतिशय दुर्गम तालुका आहे.
परिक्षेत काही प्रश्नांबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते. तुम्ही त्यांना काय सांगाल ? नक्कीच काही प्रश्न हे Objectionable असतात पण आपण आयोगावर टिका करण्यात वेळ वाया
घालवू नये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिक्षा पध्दतीत ठेवलेली पारदर्शकता आपल्याला ज्ञान
आहेच. त्यामुळे आपण आयोगावर विश्वास ठेवावा व आपले काम आहे कि अभ्यास करणे, ते आपण
करावे.
पूर्वपरिक्षेचा अभ्यास कसा केला ? राज्यसेवा आणि sti पूर्व एकत्रच केले एकच संदर्भपुस्तके वापरली
स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे. सुरुवात जोरात होते मात्र सातत्य राहत
नाही. तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ? विद्यार्थ्यांना काय सांगाल ?
अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही याबाबत काय सांगाल ?
सराव आणि सातत्य आवश्यक आहे कारण आज स्पर्धा खूप टोकाची आहे
Class लावले का नाही
 स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?  12 वि नंतर प्रशासकीय क्षेत्रात काम करावे असे वाटायला लागले विशेषतः ग्रामीण भागात

LEAVE A REPLY