STI पूर्व परीक्षा नियोजन

2
4252
Print Friendly, PDF & Email
STI पुर्व परीक्षा नियोजन / परीक्षेची तयारी
#विद्यार्थी  मित्रानो नुकतीच STI  परीक्षेसाठीची जाहिरात आयोगाने प्रसिध्द केली. त्यानुसार दि. 19 जून 2016 रोजी परीक्षा होणार आहे. म्हणजेच अजुन 140 दिवसांचा कालावधी तुमच्याकडे अभ्यासासाठी आहे.
#सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या परिक्षेत केवळ 62 पदे भरली जाणार आहेत म्हणून नाराज होऊ नका. पूर्व परीक्षेच्या निकालानंतर  निश्चितच या पदांच्या संख्येत वाढ होईल ( कृपया किती जागा वाढतील असे प्रश्न विचारून स्वतःचा व दुसऱ्याचा वेळ वाया घालवू नका.)
#STI च्या पूर्व परीक्षेच्या आभ्यासक्रमात सामान्य क्षमता चाचणी नावाचा 100 प्रश्नसंख्या असलेला 1 तास आवधी असलेला , वस्तुनिष्ठ प्रकारचा पदवी दर्जा पेपर असतो.
#या पेपरमध्ये चालु घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भुगोल, अर्थव्यवस्था, सामान्य  विज्ञान , बुध्दीमापन चाचणी व अंकगणित या विषयांचा समावेश होतो.म्हणजेच एकूण 7 विषय यात समाविष्ठ आहेत.
# आतापर्यत प्रत्येक विषयावर 10 ते 15 च्या दरम्यान प्रश्न विचारले गेले आहेत. 
# TIMETABLE–140 दिवसाचा कालावधी घेतला तर. आपण त्यातील शेवटचे 20 दिवस Revision  साठी देऊ. 120 दिवस आपणास study साठी मिळतात. 7 विषयापैकी बुध्दीमव गणित आणि चालु घडामोडी यांचा दररोज आभ्यास करायचा.राहिलेले 5 विषय हे एक एक विषय संपवायचे यासाठी 120 दिवस तुम्ही अभ्यासासाठी  देेऊ शकता. 20 ते 25 दिवस तुम्ही एका विषयासाठी देऊ शकता त्यातील कोणत्याही क्रमाने तुम्ही विषय अभ्यासाला घेऊ शकता परंतु अर्थशास्त्र हा विषय सर्वात शेवटी घ्या.कारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवीन अर्थसंकल्प सादर केला जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची 2015-16 आर्थिक पाहणी पण येणार आहे. त्यामुळे त्याची अद्यावत माहिती तुम्हाला माहित असायला हवी
#जो विषय तुम्हाला अवघड वाटतो त्याला जास्त वेळ तुम्ही देऊ शकता. अशाप्रकारे स्वतःचे अभ्यासाचे  timetable  तयार करा आणि तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही  timepass कमी करून प्रामाणिकपणे अभ्यास केला की timetable बरोबर  follow  होते हे लक्षात घ्या. प्रत्येक विषयासाठी केवळ एकच  reference  पुस्तक घ्या. 
#गणित, बुध्दीमत्ता आणि चालु घडामोडी या विषायाचा दृओज अभ्यास करा. आपल्याला जो गणिताचा भाग अवघड जातो तो जास्त चांगला करण्याचा प्रयत्न करा अजून परीक्षेस खूप दिवस बाकी आहेत. त्यामुळे कोणताही भाग  option  ला टाकू नका. भरपूर मेहनत करा. कमीत कमी वेळात अचूक प्रश्नांची उत्तरे काढण्याकरिता भरपूर सराव करा. (गणित, बुध्दीमत्ता आता सर्वत परीक्षांकरिता असल्याने त्याची चांगलीच तयारी करा. बॅकिंगच्या परीक्षांकरिताही    उपयोगी पडत असल्याने त्याची चांगलीच तयारी करा. बॅकिंगच्या परीक्षांकरिता याचा तुम्हाला नक्कीच फायदा होते. आणि पुढील काही वर्षे बॅकिंगच्या खुप जागा भरल्या जाणार आहेत याची उमेदवारांना कल्पना असावी. )
#इतिहास या विषयात महाराष्ट्र तसेच भारताच्या इतिहासाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे दोन्हीचा अभ्यास करा. प्रश्नांची काठिण्यपातळी बऱ्यापैकी असल्याने काळजीपूर्वक  factual माहितीचे वाचन करा. सर्वच माहिती पाठ होत नसते. परंतु ठराविक घडामोडी लक्षात असायला हव्यात या विषयासाठी प्रश्नांचा खूप सराव करा. प्रत्येक  topic वर कोणते प्रश्न विचारले गेलेत ते पहा. 
#भुगोल विषयात पाठ्यपुस्तकांचा चांगला वापर करा. नकाशे ठराविक आकडेवारी तोंडपाठ  व्हायला हवी. भारत व महाराष्ट्र या दोघांचा अभ्यास महत्वाचा आहे. यातील काही संकल्पना अवघड जातात. तर त्या संकल्पनाच्या थोडक्यात notes कढा. प्रश्नांचा सराव करा. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता त्यावेळेस वाचतना मनातल्या मनात  प्रश्न तयार करायचे  जेणेकरून परीक्षेत mcq टी उत्तरे  काढताना सोपे जातेय.
#अर्थव्यवस्था विषयाताली मुलभुत संकल्पना प्रथम चांगल्या करा म्हणजे तो विषय सोपा जाईल जसे की, राष्ट्रीय उत्पन्न, रेपो रेट चलनवाढ सारख्या संकल्पना, अद्यावत अकडेवारी माहित असायला हव्यात जशा की, सद्याचा सेवा कराचा दर किती आहे? 
#विज्ञान विषया बाबत्या भिती मनातून काढून टाका. शालेय पाठ्यपुस्तकातूनच खूप प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्यावर जास्त भर द्या.
#विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या ही वाचनाची शर्यत नाही, जो आपण आभ्यास कराल तो शांत पणे एकाग्रपणे करा सध्याच्या जगात ‘Smart Work’ ला खुप महत्व आहे. ही परीक्षा तुमच्या गुणवत्तेची कसोटी आहे.
#शॉर्ट मध्ये नोटस्  काढा परंतु नोटसमध्ये जी माहीती तुंम्हाला आगोदरच माहीती आहे. ती नोटस् मध्ये नसायला हवी.त्याच प्रमाणे आभ्यासक्रम व मगील प्रश्नपत्रीका यांचा संदर्भा नुसारच तुमच्या नोटस् असायला हव्यात.‍
#येथून पुढे दररोज 6-7 तास सरासरी अभ्यास केला तरी अभ्यास पुर्ण होऊ शकतो.
# नोकरदांराकरिता-तुम्ही कोणती नोकरी करत असाल आणि जर तुम्हाला दिवसातून 3-4 तासच जर अभ्यासाला मिळत असतील तो वेळही पुरे   सा ठरेल परंतु सुट्टीच्या दिवशी मात्र जास्त अभ्यास करा. 
#ज्या गोष्टीपासून तुमच्या अभ्यासातून लक्ष भरकटू शकते अशा पासून दुर रहा. उदा- मोबाईल , टिव्ही
आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. आत्मविश्वास पूर्वक प्रयत्न करा स्वतःवर ठेवलेला विश्वास कधिही तुम्हाला नकारात्म विचार करू देणार नाही.
# मला खात्री आहे की ज्या अर्थी तुम्ही स्पर्धेचे क्षेत्र निवडले आहे त्या आर्थी तुमचे आयुष्यात चांगलेच होणार आहे. 
#सोशल मेडियाचा वापर कमी करा. Authentic sources मधुनच अभ्यास करा.State board पुस्तके यांचा वापर जास्त करा.
#रात्री झोपताना आपण आई-वडिलांच्या कष्टाला जागलो का ?  हे नेहमी स्वतःला विचारा आपल्या आई-वडिलांचे कष्ट वाया जावू देवू नका. पण माझी एक विनंती आहे. जर तुमच्याने होत नसेल तर दुसऱ्या पर्यायाचा पण विचार करा. 
#नेहमी सकारात्मक विचार करा आपल्याकडे असलेला वेळ हा  quality  कामासाठी द्या. मी माझ्या busy schedule मधून तुमच्यासाठी हा लेख लिहीत आहे तरी माझा हा वेळ कामी लागावा हि सदिच्छा !
@तुम्हा सर्वांना तुमच्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 
माझे आणखी काही लेख
        
   आपलाच मित्र ,
  डॉ. अजित प्रकाश थोरबोले
     परि. उपजिल्हाधिकारी


मला add करा तुमच्या whats app group मध्ये 9423035088
@या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी 

2 COMMENTS

LEAVE A REPLY