State services exam 2017

राज्यसेवा परीक्षा 2017

राज्यसेवा परीक्षा 2017 Time table आले आहे..आता अभ्यास करायला एक दिशा मिळेल..जो पुढील दिवसाचे योग्य नियोजन करेल..त्याला याचा नक्की फायदा होईल..राज्यसेवा परीक्षा 2 एप्रिल ला होणार असल्याने sti पूर्व परीक्षेनंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल..sti पूर्व परीक्षेतील 60% भाग हा राज्यसेवा पूर्व परिक्षेला आहे..त्यामुळे अगोदर दिलेल्या अभ्यास नियोजनाप्रमाणे तुमचा अभ्यास चालू ठेवा..csat चा अभ्यास daily करा…पर्यावरण आणि अर्थशास्त्र आणि राज्यघटना चे काही नवीन टॉपिक तुम्ही sti पूर्व परीक्षेनंतर करा..राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास आता नका करू..hr,hrd हे विषय पूर्व परीक्षेनंतर केले तरी चालतील यामध्ये मुख्यतः चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे आता अभ्यास करून जास्त फायदा होणार नाही..पूर्व परीक्षेनंतर 160 दिवस मुख्य अभ्यासाला मिळतात..जर तुमचा काहीही अभ्यास मुख्य परीक्षेचा झाला नसेल तर घाबरू नका..त्या वेळात आरामात अभ्यास कव्हर होऊ शकतो..त्याचबरोबर मुख्य परीक्षेला जवळजवळ 40% भाग हा पूर्व परीक्षेतील syllabus मध्ये आहे..जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याचा दररोज अभ्यास करा..कोणताही विषय optionla नका ठेऊ..अजून भरपूर वेळ आहे..सर्व कव्हर करू शकता..दररोज केलेल्या अभ्यासाची त्याच दिवशी revision करा(9pm rule–रात्री 9 नंतर कोणताही नवीन टॉपिक  वाचायचा नाही दिवसभर केलेल्या अभ्यासाची revision करायची..दररोज आपण काय अभ्यास करणार आहोत याची सकाळीच तयारी करायची आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करायचा..त्यामध्ये किती pages वाचणार असे नसावे तर syllabus चा किती भाग पूर्ण करणार असे नियोजन असावे..आपण केलेला अभ्यास फावल्या वेळेत आपल्या मित्राला सांगणे आपण काय अभ्यास केला ते..सांगितल्यामुळे अभ्यास आणखी पक्का होतो..अभ्यास सुरू करताना आजपर्यंत कसे प्रश्न विचारले गेले ते पाहावे आणि अभ्यास करताना मनातल्या मानत प्रश्न तयार करावेत त्याचबरोबर जो भाग लक्षात राहणार नाही अथवा महत्वाचा वाटतो त्याच्या शॉर्ट मध्ये नोट्स काढा..वाचताना घाई करू नका..शांतपणे समजून उमजून वाचा..एखादा कन्सेप्ट समजत नसेल तर आपल्या ज्याला चांगली त्या विषयावर पकड आहे त्यांना विचारा..त्यावर अधाररीत प्रश्न कोणत्याही मार्केटमधील प्रश्नसंच मधून सोडवा..आपण मागील परीक्षेत का fail झालो याची कारणे शोधा आणि ती एका डायरी मध्ये लिहा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा..अभ्यासासाठी छोटासा ग्रुप तयार करा..एकमेकांना नोट्स शेअर करा..खूप वेगवेगळ्या पुस्तकसूची आणि अभ्यासाच्या strategy मुळे गोंधळून जाऊ नका.कोणतेही तुम्हाला योग्य वाटेल ती वापरा.हि परीक्षा पास होण्याचा कोणताही एक विशिष्ट मार्ग नाही.वेगवेगळ्या मार्गाने यशस्वी होता येते.कोणतापण एक चांगला मार्ग निवडा.कोणतेही पुस्तकसूची वापरा.भरमसाठ पुस्तके खरेदी करू नका.कोणतेही एकच चांगले पुस्तक करा.हि परीक्षा पुस्तकांची परीक्षा नाही.आपण जे वाचले आहे त्यावर confident राहावा.खाली मी मोबाईल चा वापर कसा करता येईल ते लिहले आहे ते बघा तुम्हला जमले तर use करा…किती तास अभ्यास केला यापेक्षा किती तो अभ्यास आत्मसात झाला यावर भर द्या..भरपूर प्रश्न हे शालेय पुस्तके,इकॉनॉमिक सर्व्हे, लोकराज्य मासिके,शासनाच्या वेबसाईट्स यावर आधारित असतात.त्यांचा चांगला अभ्यास करा…लक्षात घ्या हि तुमची आत्मविश्वासाची परीक्षा आहे..जे उमेदवार upsc आणि mpsc या दोघांचा अभ्यास करतात त्यांनी कोणत्यातरी एक परीक्षा द्यावी कारण दोघांचा अभ्यासक्रम,अभ्यास approach आणि परिक्षपद्धती मध्ये फरक आहे..जर तुम्ही upsc चा अभ्यास  सुरु केला नसेल तर mpsc द्या आणि जर तुमचा optional विषयाचा अभ्यास चांगला पूर्ण होत आला असेल तर  upsc करा..जे लोक नोकरी करत असतील त्यांना दिवसातून 5 ते 6 तास अभ्यास suffucient राहील….आणखी   या क्षेत्रात  नव्याने येणाऱ्या उमेदवारांनी जर तुमचा खरंच इंटरेस्ट असेल तर तयारी करा.competition खूप वाढले आहे आणि जागा त्या प्रमाणात कमी आहेत.अनिश्चितीता वाढली आहे..तुमचे आवडते क्षेत्र निवडा(कोणी सांगितले म्हणून अथवा कोणतातरी जाहिरात,विडिओ पाहून या क्षेत्रात येऊ नका)

राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तकसूची

https://www.mpscsimplified.com/state-service-prelim-booklist/

मोबाईलचा वापर कसा करावा

मी अभ्यास करताना मोबाईल चा वापर केला होता.समजा मी जर 11 वीचे इतिहासाचे पुस्तक वाचत आहे.तर पुस्तकातील syllabus wise अभ्यास करून सर्व पुस्तकातील महत्वाचा भाग underline केले.त्यानंतर प्रत्येक पानावरील underline केलेल्या पानाचे फोटो काढले.असे एकत्र समजा 100 फोटो झाले.त्याचा एक फोल्डर तयार केला आणि त्याला 11th history असे नाव दिले आणि त्यामध्ये ते सर्व 100 फोटो transfer केले.त्यानंतर समजा मी ग्रोव्हर पुस्तक वाचले आणि त्यामध्ये अशाच प्रकारे फोटो काढून फोल्डर तयार केला आणि त्याला ग्रोव्हर असे नाव दिले.आता हे दोन्ही फोल्डर मी इतिहास नावाचा एक फोल्डर तयार करून त्यात ट्रान्सफर केले.असे प्रत्येक विषयाचे फोल्डर तयार झाले आणि माझ्या मोबाइल मध्ये 3000 पेक्षा जास्त फोटोस झाले.मग मी व्हाट्सअप्प अथवा फेसबुक यांचा वापर करण्याऐवजी मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा,हे फोटो पाहायचो आणि वारंवार revision करायचो त्यामुळे माझ्या खूप वेळा revision झाल्या.त्यामुळे माझे परीक्षेत कधीही confusion झाले नाही.असा प्रयत्न तुम्ही करा.तुम्हाला निश्चित फायदा होईल.

त्याचबरोबर मी google keep या अँप वरती काही factual माहिती नेट वरून कॉपी पेस्ट केली होती.त्यासाठी वेगवेगळ्या website वापरल्या जशा gktoday, mrunal, pib, gov websites etc.आणि ती माहिती हि परीक्षेला उपयोगी पडली.

चालू घडामोडी अभ्यास कसा करावा

चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा?

Csat चा अभ्यास कसा करावा

Home

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2015-16

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2015-2016 highlight स्वरूपात

ऑडिओ नोट्स

https://www.Telegram.me/simplified_audio

Sti अभ्यास नियोजन आणि पुस्तकसूची

https://www.mpscsimplified.com/sti-exam-2016/

Mpsc simplified चा टेलिग्राम चॅनेल

https://www.Telegram.me/mpsc_simplfied

Mpsc सिम्पलिफाइड फेसबुक page

https://m.facebook.com/story.php?story_fbid=406528769736380&id=100011377820951

All the best

अजित प्रकाश थोरबोले

उपजिल्हाधिकारी

2 comments

  1. नमस्कार सर,आपण दिलेल्या प्रत्येक माहितीचा खुप उपयोग होतो.महत्त्वाचे म्हणजे आपण आम्हाला conscious राहण्यास on time मदत करता याचा फार उपयोग होतो…पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat