Simplified Story स्वतःचे मूल्यमापन

#Simplified_story

एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो,

मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ?
फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे.
मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना.
फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे.
मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन.
फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात).
तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर…
मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद
दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ?
मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते.

— कोणीही जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले.
–आपली स्पर्धा स्वतःशीच
–सतत स्वतःला तयार करा
–आपल्या चुका मान्य करून त्यावर काम करा
–कालचा मी आणि आजचा मी याचे मूल्यमापन सतत करत रहा

@mpscsimplified

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat