महाराष्ट्र वनसेवा परीक्षेतून RFO म्हणून निवड झालेल्या विद्या अवद्युतराव यांची मुलाखत

महाराष्ट्र वनसेवा परीक्षेतून RFO म्हणून निवड झालेल्या विद्या अवद्युतराव यांची मुलाखत

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
विद्या जालिंदर अवधुतराव
2. कोणत्या पदी निवड झालीवनपरिक्षेत्र अधिकारी (RFO)
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंMB013117
4.वय26
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .1 वेळा
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हामाढा, तालुका माढा , जिल्हा सोलापूर
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभवनाही
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयशUPSC 2013 मुख्य परीक्षा, MPSC 2013,2014,2015 मुख्य परीक्षा MPSC २०१५ मुलाखत
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?UPSC साठी चाणक्य मंडल परिवार व ज्ञानप्रबोधिनी पुणे, MPSC चा स्वतः अभ्यास केला , Mock मुलाखती स्टडी सर्कल व ज्ञानदीप अकॅडमी पुणे येथे दिल्या
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता . * वनसेवेचा पसंतीक्रम
१) ACF
2) RFO
* नागरीसेवेचा पसंतीक्रम
१) DC
२) ACST
३) Tahasildaar
४) Dy. CEO
५) Dy. SP
13.१०वी ला किती टक्के मार्क75%
14. १२ वी ला किती टक्के मार्क67%
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेPhysics विषयातून पदवी ७०% मार्क्स
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
महाविद्यालयीन शिक्षण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून घेतले
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे का * २०१५ साली B.Ed
18.छंद अथवा अंवातर कौशल्येवाचनाची व शिकवण्याची आवड , भारतीय निवडणूक आयोगाच्या SVEEP कार्यक्रमात सहभाग
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमीआई जिल्हा परिषद हायस्कूल माढा येथे परिचारिका असुन बहीण M.Lib. व भाऊ शिक्षक आहे.
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?प्रशसनाबद्दलच्या काही चांगल्या तर काही वाईट अनुभवामधुन प्रशासनात येण्याचा निर्णय घेतला. समाजासाठी काम करण्याची इच्छा तसेच या क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोणत्याही वशिलेबाजीची अथवा भ्रष्टाचार करण्याची गरज नाही हे माहिती होते म्हणून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?पूर्व परीक्षाच्या यशामुळे आत्मविश्वास निर्माण व्हायचा कि आपण नक्कीच यश मिळवू शकतो आणि अभ्यासात सातत्य टिकून राहायचे..MPSC/UPSC is a long journey त्यामुळे ध्येय साध्य होइपर्यंत चालत राहणे म्हणजेच सातत्य टिकवून ठेवणे याला पर्याय नाही असे मला वाटते.
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?पहिल्या दोन प्रयत्नात syllabus पुर्ण न समजावून घेणे, प्रश्नपत्रिकाच्या analysis चा अभाव या गोष्टी अपयशास कारणीभूत ठरल्या. या प्रयत्नात संपूर्ण syllabus cover करण्याचा प्रयत्न केला , मागील प्रश्नपत्रिकांचे analysis , खास Mpsc साठी तयार करण्यात आलेले study material चा वापर , ग्रूप डिस्कशन यावर भर दिला.
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?नोकरी नाही केली.
24. वनसेवा परीक्षा इतर परिक्षापेक्षा कशी वेगळी आहे? १) जर तुम्हाला पर्यावरणाबद्दल , वनस्पती - पशुपक्षी यांविषयी सहानुभूती असेल, पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा असेल तर वनसेवा हे नक्कीच करिअर चा चांगला पर्याय ठरु शकतो.
२) प्रक्टीकल विचार केला तर इतर परीक्षांच्या तुलनेत compitision कमी आहे.
३) syllabus मर्यादित आहे
25. वनसेवा मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?टेस्ट सीरीज लावली नव्हती.
26. तुमचे वनसेवा पूर्व परिक्षा २०१५मधील विषयांचे गुण सांगू शकाल ?वनसेवा पूर्व परीक्षा
गुण- 35
27. वनसेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?मुख्य परीक्षा गुण
GS- 46
Nature conservation- 58
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?मुख्य परीक्षेचा syllabus रोज सकाळी वाचत, विषयानुसार वेळेचे नियोजन,Mpsc नागरीसेवेच्य अभ्यासातुन GS चा अभ्यास होत होता दुसऱ्या पेपर साठी दिवसातील ठरावीक वेळ दिला. पुस्तकसूची साठी
http://www.mpscsimplified.com/2016/04/maharashtra-forest-exam-booklist ही लिंक पाहा.लिंक
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ? 3 rounds (A,B,C) मध्ये प्रश्नपत्रिका सोडविली .
A round मध्ये ज्याची उत्तरे खात्रीपूर्वक माहिती आहेत असे प्रश्न
B round मधे ५०-५० म्हणजे दोन्ही पैकी एक उत्तर आहे असे वाटत असलेले
C round मध्ये risk घेउन थोडाफार logic लाऊन सोडविले. जे पूर्णपणे माहिती नाहीत ते सोडवले नाहीत.
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?वाचन, ध्यान,घरच्यांशी संवाद साधणे, मित्रमैत्रिनीं सोबत चर्चा करणे.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?१) Learnability - प्रत्येक गोष्टीतुन - यश असो कि अपयश , चांगला अनुभव असो कि वाईट- कालच्यापेक्षा आज नविन काहीतरी शिकण्याची इच्छा सतत असावी.
२) Enjoy the process - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आपल्याला ' माणूस ' म्हणून समृद्ध करनारा आहे , त्यामुळे त्याचा आनंद घ्या.
३) Visualisation- आपल्याला जे बनायचे आहे ते आपण बनलो आहोत हे visualise करण्याची सवय लाऊन घ्यावी . परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याचे visualisation कऱा , त्याचा नक्कीच उपयोग होइल.
४) आत्मविश्वास
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?इंटरनेटचा खुप फायदा झाला. मुख्य परीक्षेसाठी तसेच मुलाखतीसाठी govt. website चा उपयोग केला .
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?15 दिवस
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?काही हस्तलिखित तर बहुतांश पुस्तकमधे highlight केलेल्या होत्या.
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?Agri शी संबंधित topic जे समजण्यास अवघड होते ते Agriculture background असलेल्या मैत्रिणीकडून समजाऊन घेतले.

36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?चालू घडामोडीसाठी रोजचा लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस, ज्ञानदीप अकादमी चे मासिक.
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?3 सराव मुलाखती दिल्या होत्या. प्रत्यक्ष आणि सराव मुलाखतीत बायोडेटा वरील प्रश्न common होते. बरेचसे प्रश्न वेगळे होते. सराव मुलाखतीत body language, communication skill , विचरलेल्या प्रश्नाचे योग्य interpretation यावर workout केलें . सराव मुलाखती चा फायदा झाला.
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?श्री.मोरे सर
39.मुलाखत किती वेळ चालली ?25 मिनिटे
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?मुलाखतीची सुरुवात बायोडेटा वरून झाली मग syllabus वर आधारित काही प्रश्न विचारले आणि काही current- opinion based प्रश्न विचारण्यात आले.
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?20% अपेक्षित तर 80 % अनपेक्षित होते .
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?2014 ला अभ्यासदौऱ्या साठ ला गेलो असतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ति म्हणजे left wing extremism मुळे तिथल्या शाळामधे शिक्षकांची कमतरता. त्यामुळे प्लान B म्हणून मी २०१४-१५ ला B.Ed. केले. जर स्पर्धा परीक्षेतुन निवड झाली नसती तर तेथील आदिवासी भागात जाऊन मुलाना शिकवण्याचे कम केले असते.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?परीक्षेतील प्रश्नांना 'react' होण्यापेक्षा ' response ' देणे गरजेचे आहे आणि काही प्रश्न हे sullabus च्या बाहेरचे असले तरी common sense वापरून आपण ते सोडवू शकतो . त्यामुळे जेवढे आपल्या हातात आहेत तेवढे प्रयत्न केले तरी पुरेसे आहेत. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यावर चर्चा करुन वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही.नेहमी सकारात्मक रहा.
Mpscsimlified.com websiteचा तुम्हाला नक्कीच फायदा होइल ..All the best.
आपल्या यशातील भागीदारआई , सर्व कुटुंबीय , शिक्षक आणि मित्रमैत्रिणी

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat