RFO पदी निवड झालेल्या सागर मगर यांची वनसेवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर मुलाखत

RFO पदी निवड झालेल्या सागर मगर यांची वनसेवा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर मुलाखत

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
सागर विलास मगर
2. कोणत्या पदी निवड झालीवनपरिक्षेत्र अधिकारी (RFO)
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंMB002068
4.वय27
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .2 वेळा
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हाअकलूज, तालुका- माळशिरस, जिल्हा- सोलापूर
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभवजुलै २०१३ ते ऑगस्ट २०१४ या कालावधीत ICICI Bank Solapur येथे Development Officer (SHG) या पदावर कार्यरत
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयशराज्य व केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारया सर्व स्पर्धा परिक्षा दिल्या परंतु कोणत्याच मुख्य परिक्षा साठी पाञ नाही.
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?नाही. परंतु जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे असताना अजित थोरबोले सर, राहुल कर्डिले सर, गणेश महाडिक सर,सचिन पाटिल सर, फ्रान्सिस सर, संदिप सुर्यवंशी सर,रंगनाथ नायकडे सर,गणेश पाटोळे सर,संतोष सर,अनिरुद्ध ढगे सर,भालचंद्र यादव व मिञ चंद्रकात पटने आदिंचे विषेश मार्गदर्शन लाभले.

महेश शिंदे सर व आनंद पाटिल सर याच्याकडे मॉक मुलाखती दिल्या.तसेच मनोहर भोळे सर व IFS ईश्वर जरांडे सरांचे मुलाखती संबंधीचे मार्गदर्शन खूप उपयोगी पडले.
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .-१.सहाय्यक वनसंरक्षक
२. वनपरिक्षेञ अधिकारी
उपलब्ध पदांनुसार
13.१०वी ला किती टक्के मार्क आणि कुठून?७०.४०%( महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,अकलूज)
14. १२ वी ला किती टक्के मार्क आणि कुठून?६९.००%( सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज)
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेB.Sc (Agri)- ७६.३० % (२००७-२०११) (कृषी महाविद्यालय, बारामती)
16.
पदवीत्युर शिक्षण
MSc Agri ( Agronomy) (२०११-२०१३) कृषी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून.
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे काहो.Certificate Course in ABM.
18.छंद अथवा अंवातर कौशल्येAgriculture & Allied Activities.
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमीवडील- मयत
आई- गृहिणी
भाऊ- २ (लहान)
कौटुंबिक व्यवसाय- शेती
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?- कृषी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी खरी ओळख झाली...दरम्यान च्या काळात बरेच सिनियर्स अधिकारी झाले.त्यांच्या सतत च्या मार्गदर्शनामुळे आपोआपच ओढा या क्षेत्राकडे वाढला गेला.जर नोकरी करायचीच आहे तर ती स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातूनच करू या विचारातून स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?- ही गोष्ट खरी आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अभ्यासात सातत्य राहत नाही. अश्या काळात चागल्या
( positive thinking) मिञांची सोबत, प्रेरणादायी पुस्तकांचे वाचण,चांगले कार्यक्रम अटेंड करणे, चांगले चित्रपट, नाटक पाहणे, ट्रेक करणे या गोष्टी तुमच्या ज्ञानात तर भर घालतीलच तसेच तुम्हाला परत जोमाने अभ्यास करण्यास प्रवृत्त करतील.
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?- MSc Agri व नोकरी करत असताना अभ्यासाला हवा तेवढा वेळ देता नव्हता.म्हणून नोकरी सोडून पुर्ण वेळ अभ्यासाला दिला.
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?- नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ न राखता अल्याने मी नोकरी च्या वेळी पुर्ण वेळ नोकरी व नोकरी सोडल्यानंतर पुर्ण वेळ अभ्यासाचा पर्याय स्वीकारला.
24. वनसेवा परीक्षा इतर परिक्षापेक्षा कशी वेगळी आहे?- हो. वनसेवा परीक्षा इतर परिक्षापेक्षा थोडीशी वेगळी आहे, कारण या परिक्षेत तुम्हाला विषया संबंधित माहिती सोबतच पेपर २ साठी Conceptual Study करावा लागतो.
25. वनसेवा मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?- हो. वनसेवा मुख्य परिक्षेची तयारी करताना महेश शिंदे सरांच्या Dyandeep Academy मार्फत घेण्यात आलेली Test series लावली होती व सोबतच IFS ईश्वर जरांडे सरांचे मार्गदर्शन देखील लाभले.
26. तुमचे वनसेवा पूर्व परिक्षा २०१५मधील विषयांचे गुण सांगू शकाल ?वनसेवा पूर्व परीक्षा
गुण-25
27. वनसेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?मुख्य परीक्षा गुण
GS- 90
Nature conservation- 112
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?- मुख्य परिक्षेची तयारी करताना पेपर १ मधील प्रत्येक उपघटकाचा गुणांचा Input- Output Ratio पाहून अभ्यासाला वेळ दिला आणि पेपर २ साठी Conceptual Clearity व Test Series वर भर दिला. प्रत्येक पेपर साठी कोर बेसिक बुक्स ठरवून सर्वप्रथम जास्तीत जास्त syllabus कव्हर करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पेपर साठी पुस्तकसूची यापुर्वीच सांगितलेली आहे.
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?- सुरवातीला जे कन्फर्म माहिती असलेले प्रश्न सोडवले, संधिग्ध प्रश्न शेवटच्या राऊंड मध्ये intuitive guess ने सोडवले. दोन्ही पेपर चा Attempt Average राहील काळजी घेतली.
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?- दररोज सकाळी थोडा व्यायाम करणे,संध्याकाळी फिरायला जाणे व झोपण्यापुर्वी Meditation करणे त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती सोबतच मनाची तंदुरुस्ती सुद्धा साध्य झाली आणि कार्यक्षता वाढली.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?-स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारने स्वतःची धेय्य आगोदरच ठरवली पाहिजेत.मला कुठे थाबायचे आहे हे माहित असायला हव.२-३ वर्ष प्रयत्न करून देखील अपयश आले तर ते पचवण्याची मानसिक तयारी देखील तितकीच गरजेची आहे.पहिली १-२ वर्ष अभ्यास परिपुर्ण कसा होईल याकडे लक्ष्य दिले पाहिजे.एकदा अभ्यासात Saturation आल्यानंतर जास्त अभ्यासाची गरज राहत नाही.तसेच प्रत्येकाने आपला Plan B तयार असू द्यावा.नवीन उमेदवारांनी खालील गोष्टी काळजीपुर्वक कराव्यात
- 4 स
सिल्याबस ( आणि जुने पेपर्स) सोबत ठेवा,
सिनियर्स सोबत प्रत्येक टप्यावर चर्चा करा,
सातत्य ठेवा,
सकारात्मक रहा.
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?- अभ्यासात इंटरनेटचा खूप फायदा झाला कारण सर्वांना सर्वकाळ सर्वच गोष्टी माहित असू शकत नाहीत.
मुख्य परीक्षेच्या पेपर २ मी मुख्यतः
mahaforest. nic.in
Ifs.nic.in
tnau.nic.in
India tribes
iucn red data book

या वेबसाईटचा वापर केला.
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?- १० दिवस
(पेपर १ साठी ५ दिवस व पेपर २ साठी ५ दिवस)
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?-हो स्वतःच्या हस्तलिखित शॉर्ट नोट्स, चार्टस तयार केले होते.त्याचा revisions ला खूप फायदा झाला. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असल्यामुळं स्वतःच्या नोट्स बनविण्यावर भर द्यावा. परंतु त्या थोडक्यात असाव्यात.
पुर्ण विषयाच्या नोट्स काढण्याऐवजी जी माहिती लक्ष्यात ठेवण्यास अवघड वाटते अशाच नोट्स काढाव्यात व त्याची सतत उजळणी करावी.
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?- ग्रुप डिस्कशन वर जास्त भर दिला, विषय वाटून घेतले आणि ज्याचा जो स्ट्रॉंग पॉईंट असेल त्याच्याकडून तो समजावून घेतला.स्वतःचे SWOT Analysis करून अभ्यास केला.
36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स पेपर आणि लोकराज्य, ज्ञानदीप अकादमी, unique अकादमी च्या मासिकातून अभ्यासक्रमाशी Related topics ची तयारी केली.
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?- मॉक दिले होते.मॉक आणि प्रत्यक्ष मुलाखत पॅटर्न सारखा असतो प्रश्न वेगवेगळे असले तरी,मॉक तुम्हाला बोलके करतो, तुमची भीती मारली जाते, मॅनर्स शिकवले जातात यातून तुमचा Confidence build up व्होतो.काही classes चालू घडामोडी च्या नोट्स पुरवतात त्याचा फायदा होतो.
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?- श्री. काळे सर
39.मुलाखत किती वेळ चालली ?25 मिनिटे
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?- शिक्षण कृषीत झाल्यामुळे Msc च्या Thesis संबधित प्रश्न, Agronomy मधील मुलभूत संकल्पना, महाराष्ट्र आणि एकूणच भारतातील कृषी समस्या, दुष्काळ कारणे व उपाय, Watershed management, कृषी विद्यापीठातील संशोधन व विस्तार, सोलापूर जिल्हा शी संबंधीत वन व पर्यावरण विभागातील प्रश्न, भूगोल व राज्यशाञ या विषयातील चालू घडामोडीशी संबधित प्रश्न विचारले गेले.
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?-काहीप्रमाणात
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?- हो.जर या परिक्षेतून selection झाले नसते तर MSc (Agri) च्या base वरती नोकरी करत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचा Plan B तयार केला होता.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?- स्पर्धा परिक्षेच्या पुर्व परिक्षेचा मुख्य उद्देश उमेदवार वगळणे हाच असतो म्हणून परीक्षेत काही प्रश्न मुद्दामहून वेळखाऊ, स्पीड ब्रेकर टाईप, विचारले जातात अश्या प्रश्नात जास्त वेळ न घालावणे हेच शहाणपण. आत्तापर्यंत च्या निरीक्षणानुसार असे दिसून येते कि, परीक्षेत एकूण गुणांच्या 40-45 % गुण हे उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशे ठरतात.त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अंदाज करत वेळ घालवण्यपेक्षा अभ्यासावर अधिक लक्ष्य केंद्रित करावे व नेहमी सकारात्मक विचाराने येणारया परिक्षेला सामोरे जावे.
आपल्या यशातील भागीदारआई , सर्व कुटुंबीय , शिक्षक आणि मित्रमैत्रिणी

4 comments

  1. Good Interview. Its Important for All Aspirants.

  2. Bharti Arjun Gujar

    Excellent…

  3. Vaibhav Ranjane

    congrats, Which books you Had Used For Studies, kindly Send Name.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat