ग्रामीण भागातील अतिशय खडतर प्रयत्नांती यशस्वी झालेले तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची मुलाखत

9
5306
Print Friendly, PDF & Email

ग्रामीण भागातून अतिशय खडतर प्रयत्नांती यशस्वी झालेले तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची मुलाखत

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
विशाल अरुण नाईकवाडे
2. कोणत्या पदी निवड झालीतहसिलदार (वर्ग-अ)
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंPN006207
4.वय29
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .4
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हाउंदरगाव , तालुका-माढा , जिल्हा-सोलापूर
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभवजून 2015 पासून मंत्रालयात पर्यावरण विभागात सहायक कक्ष अधिकारी (ASO)या पदावर कार्यरत.
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयशUPSC मुख्य परीक्षा दिली परंतु मुलाखती साठी पात्र नाही
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .1.तहसिलदार
2. उपमुख्य कार्यकारी अधिकारी
3. ACST
(उपलब्ध पदांनुसार )
13.१०वी ला किती टक्के मार्क78.13% (दि मॉडेल विविधांगी प्रशाला,माळीनगर)
14. १२ वी ला किती टक्के मार्क66% ( संत महात्मा बसवेश्वर कॉलेज, लातूर)
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेB.Sc (Agri)- 79.50 % (2004-08)
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
परभणी कृषी महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे काCertificate Course In Right to Information Act, 2005 at YASHADA
18.छंद अथवा अंवातर कौशल्येवाचन
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमीवडील- शेतकरी
मोठा भाऊ - डॉक्टर
आई- गृहिणी
कौटुंबिक व्यवसाय- शेती
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?मराठवाडा कृषी विद्यापीठात स्पर्धा परीक्षा क्षेत्राशी खरी ओळख झाली...दरम्यान च्या काळात बरेच सिनियर्स अधिकारी झाले. त्यामुळे आपोआपच ओढा या क्षेत्राकडे वाढला गेला.
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?ही गोष्ट खरी आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अभ्यासात सातत्य राहत नाही. अश्या काळात प्रेरणादायी पुस्तके वाचणे, पुण्यासारख्या ठिकाणी दररोज खूप विविधांगी कार्यक्रम होत असतात ते अटेंड करणे, चांगले चित्रपट, नाटक पाहणे, ट्रेक करणे या गोष्टी तुमच्या ज्ञानात तर भर घालतीलच तसेच तुम्हाला परत जोमाने अभ्यास करण्यास प्रवृत्त करतील.
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?मागील तिन्ही वेळा मुलाखतीत कमी मार्क्स मिळाले, त्यामुळे मुलाखतीच्या सरावावर, मॉक interview, ग्रुप डिस्कशन वर जास्त भर दिला.
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?एक ठराविक काळ अभ्यास केल्यास अभ्यासात पण एक साचलेपण येतं. त्यामुळे जुने विद्यार्थी नोकरी सांभाळून 4-5 तास जरी वेळ मिळाला तरी चांगले मार्क्स मिळवू शकतात ( मुंबईत प्रवासमुळं हा कालावधी कमी होतो ). नोकरी करत असताना रजा ऍडजस्ट करून, weekends ला जोडून रजा घेऊन, एकाच परीक्षेची तयारी करणारे पार्टनर्स घेऊन,ग्रुप चर्चा, प्रवासात ऑनलाइन अभ्यास करून वेळेचा सदुपयोग करता येईल असे मला वाटते.
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रियाआयोगाच्या प्रश्नपत्रिकेवर बरेच जण टीका करत आहेत.परंतु प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न हे भोवतालचे जग उघड्या डोळ्याने पाहणारे , त्याचं सूक्ष्म निरीक्षण करणारे यांच्या दृष्टीने सकारात्मक होते .बुद्धीचा चांगला कस लावणारे होते. Passage हे बहुतांशी विवेकवादावर, धर्मनिरपेक्षता, समाजवाद यावर होते.
तसेच अशी प्रश्नपत्रिका नोकरी करून अभ्यास करणार्यांसाठी फायद्याची होती( कारण पुस्तकातील प्रश्न मर्यादित होते)
25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?नाही
26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?पेपर 1 GS- 90
पेपर 2 Csat- 52
27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?मराठी -66
इंग्रजी- 52
पेपर 1- 55
पेपर 2- 68
पेपर 3- 48
पेपर 4- 53
मुलाखत- 58
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?प्रत्येक पेपर साठी कोर बेसिक बुक्स ठरवून सर्वप्रथम जास्तीत जास्त syllabus कव्हर करण्याचा प्रयत्न केला. विषयवार stratregy तयार करतो आहे नंतर share करेन.
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?सुरवातीला जे कन्फर्म माहिती असलेले प्रश्न सोडवले, संधिग्ध प्रश्न शेवटच्या राऊंड मध्ये intuitive guess ने सोडवले.
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?दररोज सकाळी फिरायला जाणे आणि थोडा व्यायाम केला त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती सोबतच मनाची तंदुरुस्ती सुद्धा साध्य झाली आणि कार्यक्षता वाढली.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?सिल्याबस ( आणि जुने पेपर्स) सोबत ठेवा,
सिनियर्स सोबत प्रत्येक टप्यावर चर्चा करा,
सातत्य ठेवा,
सकारात्मक रहा,
'Keep the main thing main'
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?खूप फायदा झाला.सर्वांना सर्वकाळ सर्वच गोष्टी माहित असू शकत नाहीत.
मुख्य परीक्षेसाठी मुख्यतः HRD पेपर साठी खूप फायदा झाला. डेडिकेटेड व्हाट्सअँप ग्रुप चा पण फायदा झाला.
PIB
Mrunal Blog
Insights of india
Gk today
Mpsc toppers
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?20 दिवस
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?हो स्वतःच्या हस्तलिखित शॉर्ट नोट्स, चार्टस, नीमोनिकस, तयार केल्या होत्या. त्याचा revisions ला खूप फायदा झाला. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असल्यामुळं स्वतःच्या नोट्स बनविण्यावर भर द्यावा.
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?ग्रुप डिस्कशन वर जास्त भर दिला, विषय वाटून घेतले आणि ज्याचा जो स्ट्रॉंग पॉईंट असेल त्याच्याकडून तो समजावून घेतला.
36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स पेपर आणि लोकराज्य, ज्ञानदीप अकादमी, unique अकादमी ची मासिके
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?मॉक दिले होते.. मॉक आणि प्रत्यक्ष मुलाखत पॅटर्न सारखा असतो प्रश्न वेगवेगळे असले तरी...मॉक तुम्हाला बोलके करतो, तुमची भीती मारली जाते, मॅनर्स शिकवले जातात ,काही classes चालू घडामोडी च्या नोट्स पुरवतात त्याचा फायदा होतो.
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?श्री. काळे सर
39.मुलाखत किती वेळ चालली ?साधारण 20 मिनिटे.
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?मुलाखत खूप कोऑर्डिअल झाली. शिक्षण कृषीत झाल्यामुळे महाराष्ट्र आणि एकूणच भारतातील कृषी समस्या, दुष्काळ, वॉटरशेड management, GM क्रॉप्स, विद्यापीठातील संशोधन, पर्यावरण विभागातील कामकाज, यावर बरेच प्रश्न विचारले.
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?काहीप्रमाणात.
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?प्लॅन B चा कधी विचारच केला नाही.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?परीक्षेत काही प्रश्न मुद्दामहून वेळखाऊ, स्पीड ब्रेकर टाईप, विचारले जातात अश्या प्रश्नात जास्त वेळ न घालावणे हेच शहाणपण. आत्तापर्यंत च्या निरीक्षणानुसार परीक्षेत एकूण गुणांच्या 40-45 % गुण हे उत्तीर्ण होण्यासाठी पुरेशे ठरतात.
तुमच्या यशातील भागीदार?यशातील भागीदार- आजवरच्या प्रवासातील संस्था (ज्ञानप्रबोधिनी, ज्ञानदीप), शहरे (परभणी,पुणे, दिल्ली) मित्र-मैत्रिणी, मार्गदर्शक (डॉ विवेक कुलकर्णी, महेश शिंदे, अनिरुद्ध ढगे) , आणि मोठा भाऊ डॉ विकास नाईकवाडे आणि आईवडील

9 COMMENTS

  1. Its so inspirational work sir its so helpful to rural area students like mi myself Bhimrao Y. Nikumbe from Nandurbar sir pls join my mobile no to our whatts up group 8806773409

LEAVE A REPLY