पोलीस उपअधीक्षक पदी निवड झालेल्या धंनजय पाटील यांची मुलाखत

पोलीस उपअधीक्षक पदी निवड झालेल्या धंनजय पाटील यांची मुलाखत

 

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
धनंजय हरिदास पाटील
2. कोणत्या पदी निवड झालीDysp/ACP
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंPN005251
4.वय25
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .3
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हाअकोले खुर्द ,तालुका-माढा ,जिल्हा-सोलापूर
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभव
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयश२०१४ चा mpsc च्या निकालामध्ये नायब तहसीलदार भेटली होती. मी Extension घेतले होते.
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?कुठेही commercial क्लास लावला नव्हता ...
पण सतिश पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला
मॉक मुलाखती मी खालील ठिकाणी दिले ..
१)सतीश पाटील सर
२)रंजन कोळंबे सर
३)लक्ष्य academy ,विजेता अकॅडेमी,unique अकॅडेमी,जिथे उपलब्ध होते तिथे दिले
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .1)DySP/ACP
2)Sp(excise)
3)Tehsildar
4)DyCEO
5)ACST
13.१०वी ला किती टक्के मार्क86%
14. १२ वी ला किती टक्के मार्क82.67%
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेbsc(Agriculture),79.2%
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
College of agriculture,pune 2008-2012
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे कानाही
18.छंद अथवा अंवातर कौशल्येमी तबला ,पखवाज यासारखी सगळी वाद्ये वाजवतो. अभिनयाच्या वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्या होत्या
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमीमी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे ,वडील शेतकरी आहेत .वडिलांचं शिक्षण खुप अस झालेलं नाही .
त्यांना त्यांच्या गरीब परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही . इतिहासापासून आतापर्यंत आमच्या पाटील कुटुंबातला पहिला Graduate आहे ,गावातला पहिला कलास १ ऑफिसर आहें हे सांगायला मला अभिमान वाटतो
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?मी लहान असतांना आमच्या शाळेमध्ये एक तहसिलदार आले होते ..
त्यांच्या मुळे मी त्यावेळीच ठरवलं होत कि मी पण असा अधिकारी होणार
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?स्पर्धा परिक्षा एकदम सोप्या परीक्षा आहेत ,अवघड आहें ते आपल तरुण वय ...त्या विध्यार्थ्या मध्ये
शिस्त,सातत्य ,चिकाटी ,जिद्द ,मेहनत करण्याची तयारी हवी .ही जर पंचसूत्री लक्ष्यात ठेवली तर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?मी mpsc चे ३ attempt दिले ,पहिल्या मुख्य परीक्षेला मी पूर्व परीक्षेचा निकल येई परेंत अभ्यास केला नाही
निकालाची वाट पाहत राहिलो ,त्या मुळे उरलेल्या दिवसांमध्ये माझा नीट अभ्यास झाला नाही ,
पण ती चूक मी सुधारली ...निकालाची वाट न पाहता अभ्यास सुरु केला आणि
पुढील २ परीक्षांमध्ये २०१४ ला नायब तहसिलदार ,
व २०१५ ला DySp/ACP पदी नियुक्ती झाली.
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रियापेपर असेच येणार ....
विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावे
25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?क्लास च्या approch मध्ये आणि mpsc mains च्या approch मधे फरक असतो.
26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?GS 1---84
GS 2---83
27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?GS 1--62
GS 2---56
GS 3--58
GS 4--61
Marathi- 61
English -54
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?question paper ,syllabus नेहमी बरोबर ठेऊन अभ्यास करावा
प्रत्येक विषय किती गुणांना आहे पाहून त्याला वेळ द्यावा
उदाहरणार्थ भूगोलाचे 8०-१०० प्रश्न असतात तर इतिहासाचे ४०-६० दरम्यान प्रश्न असतात म्हणून भूगोलाला इतिहासापेक्षा जास्त वेळ दिला पाहिजे
अशी strategy इतर विषयातह ..
ठेवावी
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?attempt १२०- १३० च्या पुढे नसावा ,Logical Guess कसे करायचे या बद्दल लवकरच Youtube वर Video upload करणार आहे तो सर्वांनी पाहावा.
(आम्ही त्याची लिंक उपलब्ध करून देऊ)
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?अस काही करायची गरज पडली नाही जे आवडत ते करा.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?websites and Internet चा अभ्यासामध्ये तारतम्य ठेवून आवश्यक तेवढाच वापर करावा.
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?शेवटचा १ महिन्यात दुसरी व तिसरी revision व्हायला हवी.
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?मी स्वताच्या हस्तलिखित notes काढल्या होत्या.
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?शेवटच्या महिन्यात current afffair magzines वाचली होती ..
दररोज current affairs साठी जास्त वेळ देऊ नये
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?वेगवेगळ्या ठिकाणी mock दयावे ,
आरश्यात पाहून बोलण्याची practice करावी
तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?2015)kale sir
2014)More sir
39.मुलाखत किती वेळ चालली ?2015)20 minutes
2014)25 minutes
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?माझी मुलखात काळे सरांकडे होती .दुपार नंतर माझा पहिला interview होता .
आत गेल्या गेल्या काळे सर यांनी विचारलं
1)नायब तहसिलदार आहात ,नायब तहसिलदार बददल कार्ये सांगा ??
मी १-२ कार्ये सांगितली त्यावरून त्यांना वाटल की मी जोiकेलेलं नसाव .त्यांनी विचारल की तुम्ही extension घेतलं होत काय ??
मी होय सांगताच त्यांनी नायब तहसीलदार वरचे प्रश्न स्किप केले
पुढील काही प्रश्न मला विचारले घेले
२)मराठवाड्यातला दुष्काळ दुर करण्यासाठी उपाय सुचवा
३)ऊस शेतीवर बंदी घालायला हवी का ?( माझा जिल्हा सोलपुर असल्या मुळे हा प्रश्न )
4)तुमच्या भागासाठी alternative crop सुचवा
5)Dry land farming म्हणजे काय ??
तिथे पशुपालन कसे होईल?
6)agro processing चा scope सांगा ??
processing केलेले product सांगा
७)शेतकरी आत्महत्या वर उपाय सांगा
८) माझी hobby acting and instrument playing होती त्याच्यावर प्रश्न आले
अक्टिंग madhe काय काय role केले ??
पुरुषोत्तम स्पर्धे बददल विचारल ,
monoacting fame लक्ष्मन देशपांडे यांचा बददल विचारल
९) रेल्वे budget बददल बोला ?
१०) महाराष्ट्रासाठी रेल्वे budget मध्ये काय काय तरतुदी आहेत ?
११) सोलपुर साठी काय काय तरतुदी आहेत ?
१२) शेवटचा प्रश्न जो मला सर्वात महत्वाचा वाटला
की तुमचे प्रशसनतले रोल मोडेल सांगा ??
मी: माझे रोल मॉडेल हे व्यक्ती नसून त्यांची कामे आहेत
१३)कामे सांगा ?
1)zero pendency -चंद्रकांत दळवी सर
२)प्लास्टिक मुक्त दापोली -रामदास कोकरे सर
३) मोहल्ला कमिटी -सुरेश खोपडे सर
४)२ लाख विध्यार्थ्यांना तंबाखू न खाण्याची शप्पत दिली - मल्लिनाथ कलशेट्टी सर
14)Thank you
अश्या पद्दतीने मुलखात झाली.
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?काही प्रश्न expected होतें ,काही प्रश्न unexpected होते तिथे गोंधळून न जाता उत्तरे देणे हे महत्त्वाचे आहे.
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?काही B Plan डोक्यात नव्हता
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?प्रत्येकाने आपापल्या अभ्यासावर concentrate कराव ,prelims ला प्रश्न असेंच असणार आहेत ,प्रश्न पत्रिकेच्या स्वरूपावर व आयोगाच्या कार्यापद्दतीवर टीका करत वेळ न घालवता असेही प्रश्न कसे सोडवता येतील याच्यावर विचार करवा.
44.आपल्या यशात मोलाचा वाटा कोणाचा?५ एप्रिल रोजी maharstara public service commission चा निकाल लागला आणि
माझी पोलिस उप अधीक्षक
(DySP/ACP ) पदी निवड झाली त्या निमित्ताने....!!

परीस आणि कल्पवृक्ष

शाळेत असताना परीस आणि कल्पवृक्षाच्या गोष्टी ऐेकल्या होत्या, त्यावेळेस या सर्व गोष्टी म्हणजे भाकड कथा वाटल्या होत्या.पण आज विश्वास बसत आहे की या गोष्टी असतात. आपण कल्पवृक्षाच्या छायेत बसावं आणि हव ते मागावे.आणि ती गोष्ट लगेचच समोर यावी...असंच काहीसं माझ्या बाबतीत होत असे..मी वडिलांना काही मागावे आणि ते मला मिळाले नाही असे कधी झाले नाही..मध्यंतरी आर्थिक परिस्थिती हलाखिची झाली होती..तरीही मला कधीच पैशाची अडचण येऊ दिली नाही ते नेहमीच मी मागेल त्या पेक्षा हजार रुपये जास्तच पाठवत असत,माझ्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून स्वतःची तब्येत ठीक नाव्हती तरीही ते मला त्या बद्दल सांगायचे टाळत आणि माझ्या आयुष्यातला परिस म्हणजे माझे गुरु ,मार्गदर्शक सतीश पाटील सर .परिसामध्ये दगडाला सोने करण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे
ह्या सतीश नावाच्या परिसाच्या सहवासात माझ्या आयुष्याचे सोने झाले. सतिश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाशिवाय ही पोस्ट भेटन शक्य नव्हत ....सरांचे आभार मानावे तेवढे थोडे आहे. मला मिळालेल्या यशामध्ये माझे जन्म दाते आई वडिल आणि घरापासून दूर असताना माझा आई - वडिलांसारखा सारखा सांभाळ करणारे सतिश पाटील सर आणि सौ लता सतिश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे.

त्याचबरोबर निलेश माळी सर, अभीजीत सावंत सर(Abhijeet Sawant) , किरण देसले सर( Kiran Desale) , हर्षवर्धन मुंडले, माझे मित्र विठ्ठल,सुजय, सागर जाधव, रघु(Raghuveer Sarje) ,सोमा(Someshwar Nanasaheb Navale),अमोल कोकटेAmol Amale ,अमोल आमले ,सतिश देवकाते,विनोद राऊत, प्रथमेश तानवडे ,सचिन धस, महावीर ,कुणाल, अमित, कृष्णा ,भालचंद्र,अनंत ,जीवन दगडे ,उमेश स्वामीे,गिरीश जतकर सर्व ज्युनियर आणि सिनियर फयाज मुलाणी सर Fayaj Mulani , प्रमॊद कुदळे सर,प्रसाद मेनकुदळे सर ,संजय खरात सर , मयूर शिंदे सर ,सुशिल शिंदे सर ,पुष्पराज देशमुख सर तसेंच कृष्णा भोकरे सर , विक्रांत मोरे सर आणि माझे सर्व कृषी मित्र आणि संपूर्ण SPACE कुटुंब , माझा लहान भाऊ Adv रणजीत पाटील, शहाजी पाटील व माझे इतर बंधू आणि संपुर्ण पाटील परिवार तसेच अकोले खुर्द गावाचे ग्रामस्त यांनी जे मला भरभरून प्रेम दिल याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे ...!
आपले आशीर्वाद सदैव माझ्याबरोबर राहू द्यावे हि ईश्वर चरणी प्रार्थना ...

3 comments

  1. Gavhane Gorkashnath

    Ethich thambu naka IPS bana

  2. Grear efforts …Dhananjay sir is inspiration for students like us…

  3. Thank you sir ! tumchya mulakhat vachun Aatmavishwas vadhala me suddha MPSC cha study karat aahe. thank you again and Best Luck sir.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat