महाराष्ट्रात राज्यसेवा परीक्षा २०१५ च्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्या श्री.अतुल कानडे यांची विद्यार्थ्यांना मार्ग्दर्षानापर मुलाखत

महाराष्ट्रात राज्यसेवा परीक्षा २०१५ च्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्या श्री.अतुल कानडे यांची विद्यार्थ्यांना मार्ग्दर्षानापर मुलाखत

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
अतुल अनिल कानडे
2. कोणत्या पदी निवड झालीअधीक्षक राज्य उत्मदान शुल्क
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंPN001304
4.वय25 वर्षे ( 5 मे 1991 जन्मतारीख)
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या . राज्यसेवा सलग तीन वेळा 2013,2014,2015 दिली
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी [ 11,12 वी- science, BE (comp)]
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हा अहमदनगर शहर, ता. अहमदनगर जिल्हा अहमदनगर
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभव
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयश i) STI-2014 मध्य राज्यात 30 वा क्रमांक
ii) UPSC prelim 2015 passed But did not Appear for mains
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?i)ज्ञानदीप ॲकेडमी येथे 2013 राज्यसेवा (मुख्य) साठी 1 महिन्याचा crash course
ii)Mocks – 2014 मुलाखतीसाठी – चाणक्य व युनिक राज्यसेवा येथे, 2015 मुलाखतीसाठी study circle येथे
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता ..i. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क
ii. पोलीस उपअधीक्षक
iii. तहसिलदार
iv. Dy CEO
v. ACST
13.१०वी ला किती टक्के मार्क 92.66 %
14. १२ वी ला किती टक्के मार्क12 वी 78.33 %
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेपदवी – BE (Computer Engg) – 63 ℅
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, 2012 मध्ये पदवी पूर्ण
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे का
18.छंद अथवा अंवातर कौशल्ये Parallel Cinema पहाणे (Art Movies)
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमी मध्यमवर्गीय कुटुंब – वडिल मी 10 वी ला असताना त्यांचे निधन झाले नंतर आईनेच सांभाळ केला. मोठा भाऊ आहे तो सध्या snack centre चा व्यवसाय करतोय.
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याविषयी निर्णय Degree च्या शेवटच्या दिड वर्षात निश्चित होत गेला. स्टील फ्रेम, नाव विजयपथ ही पुस्तके वाचनात आली तसेच श्री. धर्माधिकारी सरांची व्याख्यानमाला व नंतर काही भाषणे ऐकली ,त्यातून जे अकर्षण झाले व नंतर शोध घेत गेलो तसा निर्णय पक्का केला. IT क्षेत्रापेक्षाही या क्षेत्रात कामाचे समाधान, व्यापक स्तरावर काम करायला मिळणे व स्थिरता अधिक असल्याने निर्णय घेतला.
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?अनिश्चितता हे स्पर्धा परिक्षेच्या सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र mpsc च्या परीक्षामध्ये एक फायदा असा आहे की परिक्षेच्या तिसऱ्या दिवसांनतर तुम्हाला तुमची Relative Position Answer Key मुळे कळते. त्यामुळे पुढच्या 4-5 महिन्यातील नियोजन करता येते. सात्यताविषयी सांगायचे म्हटले तर पूर्व परीक्षा first हा मंत्र मी सांगेल.पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय mains च्या अभ्यासाला सुरवात होत नाही. Mains चा अभ्यास सुरवात होत नाही. Mains चा अभ्यास खूप व्यापक आहे. मी सलग 3 वेळा mains ला होतो. त्यामुळे अभ्यासातील सात्यता कायम राहिली. जरी prelim झाली नाही तरी विद्यार्थ्यांनी दरम्यानच्या काळात आपण mains ला आहोत अशा विचाराने mains चा संपुर्ण अभ्यास करून घ्यावा. त्यामुळे prelim पास झाल्यावर यशाची शक्यता वाढते.मुख्य परीक्षेतील अपयशाचा विचार न करता जिद्दीने परत परीक्षेची तयारी करत राहिलो.
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?पहिल्या प्रयत्नात मी mains पर्यत पोहोचले. दुसऱ्या प्रयत्नात म्हणजे 2014 राज्यसेवा परीक्षेत interview पर्यंत पोहोचलो मात्र मुलाखतीत 58 गुण मिळाले व cut off पेक्षा 19 गुण कमी होते. अपयश येण्यामागे syllabus व मागील प्रश्नपत्रिकांचे योग्य विश्लेषण न करणे या गोष्टी कारणीभुत होत्या. नंतर 2015 च्या मुख्य परीक्षेत या दोन घटकावर सर्वाधिक भर दिला. Syllabus च्या कोणत्या घटकावर भर द्यावा याचे Analysis केले जेणेकरून marks वाढवता येतील. तसेच Resources मध्येही योग्य बदल केले व जास्तीत जास्त अधिकृत संदर्भ वापरले (ex – Eco Survey, Year Book, Govt. Website )याचाही फायदा झाला. Interview साठी Profile च्या प्रत्येक घटकाची तयारी केली व 66 गुण मिळाले.
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रियाPAPER – I i.e. GS ला कुठलीही चौकट उरलेली नाहीये. त्यामुळे माझ्या मते विद्यार्थ्यांनी Science , Polity घटकावर सर्वाधिक भर द्यावा.
CSAT is the key to crack prelims म्हणून GS पेक्षाही हा घटक prelims crack कऱण्यात मदत करेल. यावर्षी मात्र Reasoning & Aptitude ची काठिण्यापातळी वाढलेली होती.
25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ? Test series लावली नाही.
26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ? पेपर 1 – 72
पेपर 2 – 70
27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ? पेपर 1- 51
पेपर 2- 83
पेपर 3– 45
पेपर 4- 64
मराठी – 65
English – 65
interview – 66
28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?a)सर्वात पहिले इतिहास विषय घेतला व नोटस्‌ काढून नंतर Revise करत राहिलो कारण या विषयात घटना , व्यक्ती, चळवळी इ. चा समावेश असल्याने Revision महत्वाची म्हणून सुरवातीला घतेला.
b)खरतर Geography व Agri या Sections ला अधिक वेळ द्यायला हवा होता . कारण technical subjects असल्याने कमी वेळात जास्त Output देऊ शकतात.
c)पेपर 2 च्या अभ्यासासाठी जास्तीत English Resources वापरले (उदा. Laxmikant, Kashyap, websites इ. ) तसेच या पेपरमधील कायदे व्यवस्थित समजून घेतले. कायद्यामध्ये जवळपास सर्व गुण मिळाले हा पेपर अभ्यासाला व समजायला सोपा
d)पेपर 4 हा आवडणारा विषय होता. या पेपरचा अभ्यास तसा रोजचा होता . कारण वर्तमानपत्रात रोज काही ना काही syllabus शी Related बातमी असतेच. एकदा पूर्ण अभ्यास झाल्यावर newspaper सोबत syllabus चे connection करता आले. Mrunal.org वरील video चा फायदा झाला कारण Graphics च्या माध्यामातून विषय चांगला समजला.
e)General – syllabus च्या प्रत्येक topic चा अभ्यास झाल्यावर ‘ ज्ञानदीप ’ च्या प्रश्नपत्रिका विश्लेषण पुस्तकातील प्रश्न पाहून घेतले. प्रत्या धर्तीवर आता कुठले प्रश्न येऊ शकतील हे पाहिले. प्रश्न कसे बनवतात हे एकदा समजले की तुम्ही स्वतःच प्रश्न बनवू शकता. तसेच topic वाचून झाल्यावर संबंधित ministry ची website पाहायचे त्यामुळे Current Event सोबत syllabus topics ला Update ठेवता आले.
f)Self Analysis व योग्य Material चा वापर यामुळे तसेच कमी वेळेत जास्त marks देणारे points वर भर दिल्याने GS चा Score चांगला आला.
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?मुख्य परीक्षेत 150 प्रश्न व 120 मिनीटे असे गणित असते. मात्र Attempt किती करायचाय हे मी आधी कधीच ठरवले नाही. मात्र माहित नसलेले प्रश्न Attempt केले नाहीत. Elimination is the best strategy for MCQ type Exams.Mpsc च्या परीक्षेत प्रश्न बनविण्याचा एक साचा आहे. उदा. योजनेच्या वर्षात बदल करणे, आकडेवारीच्या प्रमाणात बदल करणे, फक्त केवळ अशा शब्दांचा विधानात वापर करणे इ. मी खात्री असलेले प्रश्नच Attempt केले. माझा पेपरनुसार. Attempt – p1-105,p2-132,p3-106,4-112. माझ्या मते कमीतकमी 100 Questions Attempt व्हायला हवेत. संदिग्धता ओळखता यायला हवी. प्रश्नांच्या नेमक्या कोणत्या घटकात चुकीचे नांव, आकडेवारी इ. दिलेले आहे ते ओळखल्यास प्रश्न सोडविणे सोपे होते.
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?अभ्यासाच्या प्रक्रियेचा आनंद घेतला रूक्ष व कंटाळवाणा अभ्यास करण्यापेक्षा जिवंतपण आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या आवतीभोवती अभ्यासाशी संबंधित खूप गोष्टी असतात. त्यामुळे फक्त पुस्तकांत अभ्यास करण्याऐवजी डोळे उघडे ठेवून केला. उदा. कृषी प्रदर्शन असेल तेथे गेलो, विविध शासकीय कार्यालयास जाऊन तेथील व्यवस्था पाहून आलो. NGO च्या Camp मध्ये सहभागी झालो. ( मेळघाट येथे धटक मोहिम) समांतर चित्रपट पाहिले जे की अभ्यासाच्या विविध घटकांशी तसेच एकूणच भारतीय समाजजीवनाशी निगडीक आहेत. इ. या गोष्टीमुळे अभ्यासाला कंटाळा आला नाही व मनही स्थिर राहिले.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?लवकर निर्णय पक्का करा. पदवीच्या शेवटच्या वर्षातच अभ्यास सुरू करा अभ्यासाला सुरवात केल्यावर आपल्याला कोणत्या परिक्षा Focus करायच्या आहेत ते ठरवा. MPSC व UPSC परीक्षांचा pattern वेगळा आहे. MPSC ते UPSC हा प्रवास तुलनेने सोपा आहे. मात्र UPSC ते MPSC हा उलट प्रवास अवघड आहे. मी ठरवले होते की लवकरात लवकर MPSC तून क्लास 1 चे पद मिळवायचे. 25 वर्षाच्या आत ते मिळालेही व त्यामुळे आता पूर्णवेळ UPSC ची तयारी करता येईल.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात patience महत्वाचा आहे. त्यामुळे अपयश येईल व वेळ लागेल हे ध्यानात असू द्या. स्वतः समोर Targets set करा व त्यासाठी झोकून देऊन अभ्यास करा.
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कारण मी जास्तीस जास्त Govt. Website वरून Anthenticate Updated Material चा वापर केला. हे वाचण्याचा फायदा म्हणजे MPSC चे पेपर बनवताना Govt. Documents चा वापर करतात असे मला आढळून आले. आणि ते वाचलेले असल्याने Attempt किती करावा हे ठरवता येते कारण प्रश्न सोडवताना वाचलेल्या संदर्भातून प्रश्न असल्याने खात्रीपूर्वक सोजवता येतात. तसेच Govt. Document वाचायची सवय लागल्याने प्रशासकीय कारकिर्दीतही फायदा होईल.
काही Topics Graphics , Images यांचा वापर करून चांगल्या पद्धतीने समजावून घेता येतात. उदा. Remote sensing, IRNSS, Water Management इ.
वापरलेल्या Websites –
Maharashtra.gov.in (यावर शासनाचे विभाग)
Topic शी संबंधित असलेल्या ministry ची website (mhrd, commerce ministry etc.)
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?मुख्य परिक्षेपूर्वी साधारण 25 दिवस आधी Revision सुरू केली मात्र जो topic वाचलाय तो पुन्हा 15-20 दिवसात कमी वेळात वाचला जाईल याची काळजी घेतली. कारण आकडेवारी सारख्या घटकांना Revision ची गरज असते.
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?Notes काढल्याचाफायदा म्हणजे ज्या घटकासाठी आज तुम्ही 1 तास खर्च करता तोच घटक Revision च्या वेळशी 10 मिनीटात वाचून होता.
Notes काढताना कल्पकतेचा वापर करा.
Graphical पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करा.
उदा. मी constitution चे sources असे मांडले
(Britain) – Parliamentary form of govt.
(Canada) – Strong Centre
(Ireland) – DPSP
(USA) – Fundamental Rights
(South Africa) – Amendment Method
(Australia) – Joint Sitting)
त्यामुळे स्वतःच्या Notes बनवा व त्या कल्पक पध्दतीने बनवा
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?अवघड विषय – PAPER 3 , PAPER 4
हे विषय अवघड वाटतात कारण आपण वाचतो एक आणि पेपरला प्रश्न येतात दुसरेच, मात्र यावेळी मी HRD चा अभ्यास खूप चांगला करूनही marks तुलनेने कमी आले. Paper झाल्यानंतर पाहिले असता लक्षात आले की, multiple options च्या प्रश्नामध्ये 2 विधाने खात्रीपूर्वक माहित असायची तिसऱ्या विधानामुळे उत्तर चुकायचे किंवा 2 विधानांच्या प्रश्नात 1 खात्रीपूर्वक माहित असायचे दुसऱ्याबद्दल खात्री नसायची असे प्रश्न चुकले त्यामुळे हे Tackle करता आले तर HRD तही score चांगला येऊ शकतो.
HRD च्या तयारीत India Year Book वापरले आवश्यक आहे. कारण बरेचसे Topic त्यात cover केले आहेत.
पेपर 4 मला कधीच अवघड वाटला नाही. कारण मला या विषयाची आवड होती. Concepts समजून घेतल्या तर हा विषय सोपा आहे कारण Concept समजली की आकडेवारीचे प्रमाण आपोआप लक्षात यायला लागते. तसेच mrunal patel यांचे video पाहिल्याने concepts पक्या व्हायला मदत झाली. या विषयाचा अभ्यास करताना वर्तमान पत्रातील अर्थविषक पान महत्वाचे आहे. कारण रोज updates असतात उदा. Repo Rate, FDI limits, Fiscal Consolidation, Taxation Policies etc. Resources ची list मी माझ्या facebook Account वर Upload केली आहे. काही points विशिष्ट पुस्तकातून वाचल्यास फायदा होतो.

36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?चालु घडामोडीवर आधारित प्रश्नांसाठी Newspaper, एक चांगले Magazine (युनिक/परिक्रमा किंवा newspapers) आणि Govt. Websites चा वापर महत्वाचा आहे. Newspaper वाचताना syllabus शी बातम्या Connect करता आल्या पाहिजेत उदा. पर्यटन धोरण, FDI धोरण जाहिर होते. त्यावेळी त्याची syllabus शी link घालायला हवी. तसेच Topic वाचल्यावर ministry च्या websites वर जाऊन नवीन काही updates असतील तर ते राहून घ्यावेत. योजनांच्या अद्यावत स्थितीसाठी pib.nic.in ही वेबसाईट उत्तम
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?सर्वप्रथम form भरताना काळजी घ्यावी. कारण पॅनेलसमोर आपण जो form भरतो तोच असतो. त्यामुळे आपली ओळख म्हणजे आपला fom.
मुलाखतीची तयारी फक्त mains झाल्यावर करण्यापेक्षा तो या संपुर्ण प्रक्रियेचाच भाग बनवा म्हणजे तुमच्या personality मध्ये ते येऊ द्या. जे तुम्ही Form भरताना लिहीताच उदा. Hobby, Extra Activities इ. गोष्टीवर नेहमी भर देत रहा.
Mains नंतर मुलाखतीची तयारी करताना सर्वप्रथम Form सोबत असू द्या. त्यातील एकेका घटकाची बारकाईने व संपूर्ण माहिती गोळा करा. जिल्हा, तालुका याची ऐतिहासिक – राजकिय- आर्थिक – सामाजिक – भौगोलिक माहिती मिळवा. कारण बहुतेकदा मुलाखतीची सुरूवात यो गोष्टीपासून होते.
मुलाखतीविषयी आयोगाच्या काय अपेक्षा आहेत हे Genral Instruction या File मध्ये 3.9 या अंतर्गत दिले आहे ते एकदा वाचा व त्या आधारावर तयारी करा.
MOCK
मी 2014 च्या Interview साठी चाणक्य मंडळ व युनिक येथे MOCK दिले होते व 2015 साठी Study Circle येथे दिला.
MOCK Interview च्या निश्चितच फायदा होतो. कारण काय चुका होतात हे कळते व मुख्य मुलाखतीस त्या टाळता येतात.
MOCK Interview आणि प्रत्यक्ष मुलाखत या साम्यही असू शकते किंवा फरक ही. 2014 च्या वेळेस फरक होता तर 2015 च्या वेळी साम्य. Study Circle मध्ये मला जे प्रश्न Mock मध्ये विचारले त्यातले बरेचशे प्रश्न मुख्य मुलाखतीतही विचारले गेले.
माझे वैयक्तिक मत हे आहे की, MOCK Interview अवश्य द्यावेत. पण काही ठराविक ठिकाणी
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?श्री पटेल सर
39.मुलाखत किती वेळ चालली ?साधारण 15 मिनीटे
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?राज्यसेवा 2015 Interview
नाव – अतुल अनिल कानडे
Panel – श्री. पटेल सर वेळ – 13 ते 14 मिनीटे

चेअरमन –
प्रश्न 1 – तुम्ही मुळचे अहनगरचे आहात. मग पुण्यात अभ्यास करा का ? नगरला facilities नाहीत का आभ्यासासाठी ?
प्रश्न 2 – सध्या Local Bodies ला वरून बरेच funds येतात. विविध योजनांसाठीही वित्तीय तरतूद असते. त्याप्रमाणे मग भ्रष्टाचार होतो. मग लोकप्रतिनिधी (जे सही करतात) त्यांच्यासाठी शिक्षणाची अट असावी का?
प्रश्न 3 – (मी नाही म्हणलो . साक्षर असावेत परंतु विशिष्ट शिक्षण पाथलीची अट नसावी असे म्हणालो) आपण जर RTE कायदा आणला आहे तरी पण शिक्षणाची अट नको का ?
प्रश्न 4 - शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा मतदान कमी होते शहरामध्ये सुशिक्षित लोक असुनही मतदान करत नाही यावर काय करता येईल ( मी voting day आठवड्याच्या मध्यभागी ठेवावा असे म्हणालो कारण जोडून आलेल्या सुट्यामुळे लोक इतर कामांना किंवा पर्यटनाला preference देतात) अजुन काही करता येईल का. (मी SVEEP बद्दल सांगितले) SVEEP चे Features सांगा
प्रश्न 5 - तुमच्या Degree मध्ये BE (IT/Comp Engg/Comp. Science Engg) असे पर्याय आहेत यापैकी तुम्ही काय केलय IT आणि Comp. Engineering मध्ये काय फरक आहे?
प्रश्न 6 - पुण्यात साखळीचोरीच्या घटना वाढल्या आआहेत यावर काय उपाय करता येतील.
प्रश्न 7 – तुम्ही कोणत्या camp मध्ये काम केले आहे.(माझ्या Extra Activities मध्ये Camp बद्दल उल्लेख होता.) काय समस्या आहेत मेळघाटच्या.

प्रश्न 8 - 1. मेळघाटमधील मुख्य समस्या कोणती ?
2. कुपोषण कसे मोजले तुम्ही?
3. स्त्रियांच्या आरोग्याच्या काय समस्या आहेत?
4. हिमोग्लोबीन किती हवे?
5. तुम्हाला किती स्त्रिया आढळल्या हिमोग्लोबीन कमतरता असलेल्या?
6. तुम्ही मला मेळघाटमध्ये Local Level ला काय उपाययोजना करता येतील ते सांगा
7. Ethical Hacking म्हणजे काय (Being BE(com) Engineer)

Member 2
आता Parliament चे कोणते Session चालू आहे.
काय असते Budget Session मध्ये
Finance Bill काय असते.

चेअरमन (पुन्हा शेवटी)
तुम्ही मागच्या वेळीही Interview ला होता. कुठे कमी पडलात? मागच्या वेळी किती marks होते Interview ला ?
Preference काय दिलेत तुम्ही (माझा पहिला Preference SP, Excise होता. )
का दिलात हा पहिला Preference?
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?मुलाखतीसाठी जे प्रश्न Expect केले होते त्यापैकी बरेच प्रश्न विचारले गेले. मुख्य म्हणजे Form मधील माहितीवर आधारीत प्रश्न आले. उदा. माझी Extra Activity म्हणजे NGO च्या Camps मध्ये सहभाग अशी होती. मी मेळघाटमध्ये camp 10 दिवस केलेला असल्याने त्यावर आधारित 10 ते 15 प्रश्न विचारले गेले व मी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याने चांगले मार्कस्‌ मिळाले.
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ? मागच्या Attempt च्या वेळी 19 गुणांनी संधी हुकल्याने तेव्हाच ठरवले की झालेल्या चुका दुरूस्त करून पहिल्या 10 ते 15 मध्येच यायचे ठरवल्यानुसार अभ्यास केला व अनपेक्षित असे यश मिळाले. वयाच्या योग्य टप्प्यावर set केलेले targets पूर्ण झाल्याने Plan B बनवायचा प्रश्नच माझ्यासमोर आला नाही. STI म्हणूनही निवड झालीच होती. आणि जरी माझी निवड झालीच नसती तर शिक्षणासारख्या क्षेत्रात सामाजिक कार्य केले असते.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?150 पैकी 10 प्रश्न दरवेळी असे असतातच. खर तर असे प्रश्न SKIP करणे उत्तम कारण Sometimes skipping is the best attempt आणि हे प्रश्न जवळपास कुणालाच येत नाहीत त्यामुळे त्यात स्पर्धा नसतेच. आपले strong topics आणखी strong करा आणि marks आपोआप वाढतील
आयोगावर टिका करण्यात अजिबात वेळ घालवू नका . शिवाय MPSC इतकी पारदर्शकता इतर कोठेही नाही.
43.तुमच्या यशातील भागीदार कुटुंब/मित्र/शिक्षकवडिल गेल्यानंतर सर्व सांभाळणारी आई हिलाच मी या यशाचे मुख्य श्रेय देतो. तसेच वेळोवेळी मदत करणारे मामा यांचाही मी ऋणी आहे.
अभ्यासात मदत करणारे मित्र विशेषतः सागर दळवी याचाही आभारी आहे.
माझ्‌या प्रत्येक सुखदुखात सहभागी असणारा तसेच वैचारिक कक्षा व सामाजिक जाणीवा रुंदावण्यात महत्वाचा वाटा असलेला मित्र रोहीत वाघमारे याचाही या यशात महत्वाचा सहभाग आहे.

17 comments

 1. Aniket Pralhad Patil

  is it requirement of joining classes

 2. BHAGAWAN MARUTI NISAL

  Thanks Thanks sir

 3. Thanx sir ….best part of interview is sir has provided point to point reference book

 4. Gavhane Gorkashnath

  pratham apale abhinandan aapan mazya jilyatil aahat ya peksha mote pad milava

 5. Please sir, give mpsc main five months strategy.

 6. khupch chan sir…i hope tumchya margdarshanamule mala Yashacha yogya rasta sapdel..

 7. संजय महादेव पारधी

  धन्यवाद सर! या इंटरव्ह्यू मुळे नवीन माहिती माझ्या समोर आली.

 8. thank u sir,
  u r interview gives inspiration to us.

 9. Thank u……tumchya interview ni study chi disha samjtye….

 10. Great interview sir…
  & thanks sir

 11. thnk u ajit sir

 12. Very nice. Detail explain. One more

 13. धन्यवाद सर ! अजून असे काही मुलाखतपर लेख प्रकाशित व्हावेत !

 14. Very Great interview sir..

 15. Thnq sir!!

 16. Great interview

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat