Mpsc study and short cut

5
9503
Print Friendly, PDF & Email

एमपीएससी/युपीएससी ची तयारी करताना:

मिञहो,

स्पर्धा परीक्षेची तयारी करून यशस्वी होणे ही थोडीशी अवघड बाब असली तरी ती अशक्य मात्र अजिबात नाही.

विविध प्रकारच्या विषयावरील विविध बाबींचा अभ्यास करावा लागतो.

अभ्यासक्रमाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे तयारी करणे कठीण जाते.

अशा वेळी काही मार्गदर्शक अभ्यास करणे व लक्षात ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या कल्पना सुचवितात.

उदा. महाराष्ट्रातील जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी.

अग

कमल

उठ

रस

चहा

भजे

बनव इ

वैगरे
अशा प्रकारे लक्षात ठेवणे म्हणजे स्वतःला गोंधळात टाकणे.

त्यापेक्षा राज्य -विभाग -जिल्हा

असे आपण नकाशा पाहून नीट लक्षात घेऊन वाचले तर आपला वर्गीकरण व विश्लेषणात्मक विकास होत जातो.

हे फक्त एका बाबीचे उदाहरण आहे.

इतरही अनेक गोष्टी आहेत.

त्यामुळे कधीही shortcut च्या भानगडीत पडू नये.

उलट प्रत्येक विषयाचा नीटपणे समजून घेऊन अभ्यास केला, तर असे लक्षात येते की, सर्व विषयातील अनेक संकल्पना किंवा बाबींचा परस्परांशी सहसबंध आहे.

त्यामुळे एका विषयावरील सखोल अभ्यासाचा फायदा दुसर्‍या विषयासाठी होतो.

उदा.

भौतिक शास्त्रातील- तापमान, वहन, अभिसरण व उत्सर्जन, दाब, उष्णता, बाष्पीभवन, संघनन, वितलन, या संकल्पना स्पष्ट माहिती असल्यास भुगोलातील हवामानाचा अभ्यास सोपा जातो.

मराठी व इंग्रजी चे व्याकरण 90% एकसारखे आहे.

रसायनशास्ञातील मूलद्रव्ये -संयुगे -मिश्रणे ही व्याकरणातील साधे-संयुक्त-मिश्र वाक्य याप्रमाणेच आहे.

त्यामुळे अगोदर विषय सविस्तरपणे समजून घेतला तर एकसारखे अनेक धागेदोरे हाती येतील व अशा रीतीने केलेला अभ्यास आपल्याला जीवनभर साथ देईल.

जो आपल्याला निवड झालेल्या क्षेञात काम करताना पदोपदी उपयोगी पडेल.
शेवटी लक्षात ठेवा, shortcut चा वापर करून मिळवलेले यश, मान, सन्मान हा short period साठीच असतो.
“काबिल बनो, कामयाबी अपने आप पीछे आयेगी”

सुरेश घोळवे

तहसीलदार,नांदेड

5 COMMENTS

LEAVE A REPLY