MPSC Mains Exam 2018 last Month Preparation

 1. शेवटचे महिन्याचे नियोजन
  • मुख्य परीक्षेला जेमतेम 1 महिना राहिला आहे.prepration काळातील अतिशय महत्वाची phase आहे.या काळातील अभ्यास आणि आत्मविश्वास तुम्हाला पोस्ट मिळवून देतो.
  • बऱ्यापैकी तुमचा स्टडी पूर्ण झाला आहे आणि शेवटचे तुमचे revision चे दिवस आहेस आस गृहीत धरून पुढील प्रमाणे नियोजन करावे.
  • या परीक्षेत मराठी ,इंग्रजी,सामान्य अध्ययन चे चार पेपर द्यायचे आहेत.
  • मराठी आणि इंग्रजी ची दररोज तयारी परीक्षेपर्यंत करायची आहे आणि त्यामध्ये व्याकरण,निंबद्ध आणि भाषांतर याची तयारी करायला हवी.परिक्षेपूर्वी एकूण मराठी आणि इंग्रजीचे किमान प्रत्येकी 2-2 निंबध लिहायला हवेत.त्याचबरोबर भाषांतर साठी कोणतेही newspaper मधील वेगवेगळे विषय घेऊन सराव करायला हवा.
  • शेवटच्या दिवसात शक्यतो नवीन कोणतेही पुस्तक वाचायला घेऊ नका जे अगोदर वाचले आहे तेच परत परत वाचा.आपण ज्या नोट्स काढल्या आहेत त्याच करा.नवीन पुस्तक वाचणार असाल तर चालू घडामोडिवर आधारित प्रश्न विचारले जाणारे विषयासाठी नवीन पुस्तक वाचले तरी चालेल.जसे की,HRD, HR, Economics
  • शेवटच्या दिवसात आपण जो अभ्यास केला आहे त्याची revision त्याच दिवशी करा.जो अभ्यास केला आहे त्यावर आधारित जेवढे जास्त प्रश्न सोडवता येईल तेवढे सोडवा.येथून पुढे दररोज 300-400 प्रश्न सोडवावेत.
  • काही विषयात हमखास चांगले मार्क्स पडतात त्यावर जास्त भर द्या.माझ्या मते आतापर्यंतच्यापरिक्षेनुसार भूगोल,कायदे,राज्यशास्त्र चा पारंपरिक भाग,मानवी हक्क,अर्थशास्त्र या विषयाकडे त्या दृष्टीने पाहता येईल.इतिहासाचे कितीही अभ्यास केला तरी खुप सारे प्रश्न न वाचलेल्या पैकीच असतात.त्यामुळे कमी वेळ दिला तारी चालेल.विज्ञान मध्ये अवकाश शास्त्र,आपत्ती व्यवस्थापन वर प्रश्न सोपे असतात.
  • प्रत्येक विषयाला आपल्या नियोजनाप्रमाने दिवस द्या.प्रत्येक विषयाला साधारणता: 4 दिवस या प्रमाणे नियोजन करा.आपले कोणते पॉईंट्स वाचायचे राहिले आहेत ते प्रथम पहा.आणि अगोदर कोणता विषय revision ला घ्यायचा ते तुम्ही ठरवा.
  • सोबत चालू घडामोडीचे कोणतेही एक पुस्तक आणि मागील 7 ते 8 महिन्याचे चालू घडामोडी कोणतेही मासिक सोबत ठेवा.समजा तुम्ही पेपर 1 मधील पर्यवरण टॉपिक वाचत असाल तर लागलीच यातुन पर्यावरण या भागावरील चालू घडामोडी लेख वाचन करा.आणि त्याच्या नोट्स काढा.असे सर्व विषयासाठी करावे.
 • काय करायला नको ?
  • परिक्षा जवळ येते तसे येणारे टेंशन घ्यायला नको .
  • कोणताही विषय ऑप्शन ला टाकायला नको थोडे का होईना त्याची तयारी करायला हवी , काही विषयावर तुम्ही जास्त focusकरु शकता .
  • मी पास होईल की नाही ?हा विचार मनात येऊ देऊ नका ( हा विचार सतत येणार असेल तर नककीच याचे उत्तर शेवटी नकारात्मक असेल )
  • शेवटच्या १५ दिवसात कोणतेही test paper देऊ नका.कारण त्यामधील कमी आलेल्या score मुळे आत्मविश्वास कमी होतो.
  • स्वतःची इतराबरोबर तुलना करायला नको.
   • i ) माझा अभ्यास त्याच्यापेक्षा / तिच्यापेक्षा खूप कमी आहे .
   • ii ) मला इतरापेक्षा Test मध्ये खूप कमी मार्कस आहेत .
   • iii ) इतर जण interview पर्यत पोहचलेत ,मी तर प्रथमच परिक्षा देत आहे.
   • iv)माझे इंग्रजी इतरापेक्षा चांगले नाही.
  • मुख्य परिक्षेला अजून वेळ आहे परंतु मला मुख्य परिक्षा जमेल का? हे विचार करणे सोडून दयायला हवे .
  • Newspaper वाचणे बंद केले तरी चालेल.मागील १ वर्षातील चालु घडामोडींची चांगली तयारी करा.
  • मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.cut off किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू.चांगला performance कसा देता येईल याचा विचार करा.
  • कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका ( स्पर्धा परिक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे )
 • काय करायला हवे
  • नेहमी सकारात्मक विचार करून सतत अभ्यासाच्या तयारीच्या प्रक्रियेत राहणे यामध्ये विषयानुसार प्रश्न सोडवने , एकमेंकाशी भेटल्यानंतर केवळ अभ्यासाचा संवाद साधणे , आपण काय अभ्यास केला त्याचे सतत मनन चिंतन करणे, Audio’s, video’s पाहणे.
  • आपले प्रयत्न शेवटपर्यत आत्मविश्वासपूर्वक १०० % परिक्षा संपेपर्यत प्रयत्न करावेत
  • शेवटच्या काही दिवसात प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस देवून त्याची रिव्हीजन करावी, तुम्ही काढलेले short मधील नोटस या ठिकाणी उपयोगी पडतात .
  • परिक्षेपर्यत मन स्थिर रहाण्यासाठी meditation आणि jogging चालू ठेवावे त्यामुळे सकारात्मक भाव जागृत ठेवता येतात , परिक्षेत या गोष्टीचा खूप चांगला फायदा होतो शेवटच्या काही दिवसात आपल्याला सतत भिती वाटत असते ही भिती नष्ट करण्यासाठी हे उपयोगी पडते.
  • सकारात्मक , तुमच्या बद्दल चांगले मत असणारे मित्रच तुमच्या परिक्षेचा या शेवटच्या दिवसात सोबत रहातील याची दक्षता घ्या . नकारात्मक विचार करणारे , निंदा करणारे लोक यांचे विचार विश्व मर्यादित असते ते कधीही आयुष्यात यशस्वी झालेले नसतात. इतराना योग्य मार्गावरून परावृत्त करण्याचे प्रयत्न करत असतात, आपण का अपयशी झालो?याचे परिक्षण करण्याऐवजी कितीही अभ्यास केला तरी मिळत नाही . नशिब असेल तरच तू पास होऊ शकतोस? अशा विचार करणार्या लोकापासून दूर रहा .
  • पेपर मध्ये भरपूर प्रश्न हे आपण वाचलेल्या पैकी नसतात , परंतु हे कमीधिक परिस्थितीही सर्वाचीच असते आपण जो अभ्यास करतो तो आपला आत्मविश्वास आणि क्षमता वाढविण्यासाठी करत असतो .तुम्ही आजपर्यत केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षा hall मध्ये तुम्हाला दिलासा देत असतो.
  • शेवटच्या महिन्यात Revision कशी करावी
   • परिक्षे अगोदर केलेल्या अभ्यासाची Revision महत्त्वाची आहे Revision नाही केली तर अगोदरचा केलेला Study न केल्यासारखा आहे . Revision करताना खालील गोष्टी विचारात घ्या

१- Notes काढल्या असतील तर त्याचा वापर करा .

2- Revision करताना प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस या प्रमाणे नियोजन करा

3- Revision करताना चालू घडामोडीचा दररोज अभ्यास करा

४- शेवटच्या ४ते ५ दिवस अगोदर सर्व विषयाची Revision संपायला हवी.नंतर दुसरी Revision सुरु करा.यामध्ये प्रत्येक विषयाला १ दिवस मिळेल.

५- कोणतेही नविन पुस्तक वाचायला नका घेऊ.अगोदर ज्या पुस्तकातुन अभ्यास केला आहे त्याचीच revision करा.समजा नविन पुस्तकात एखादा विषय चांगला दिला आहे म्हणुन ते पुस्तक घेऊ नका.एकाच पुस्तकातुन revison करा.

६.साधरणत: 1 August ते 5 august दरम्यान revision सुरू व्हायला हवी.

७.Revision करताना कधीकधि आपण काही तरी नविनच वाचत आहे असा विचार मनात येतो.असा आला तरी tension घ्यायाचे नाही.ही एक common गोष्ट आहे.सर्वांच्या बाबतीत असे घडते,याला कोणी अपवाद नाही.आपण वाचलेलयापॆकी सर्वच आठवत नसते.be confident about your preparation.आणि विसरणे हा माणसाचा एक गुणधर्म आहे.एखादी गोष्ट खुप दिवस recall नाही केली तर विसरते.

  • India Economic survey 2017-18 पूर्ण वाचण्याची आवश्यकता नाही..त्याची संक्षिप्त notes वाचा.सिम्प्लिफाइड डायरी अंक 6 मध्ये उपलब्ध

@ सर्वांना खुप साऱ्या शुभेच्छा .. All the Best👍

डॉ.अजित थोरबोले

उपजिल्हाधिकारी

8 comments

 1. Jitendra chaudhari

  Thanks sir.

 2. Nice information sir

 3. Cream strategy ….Thank….

 4. Ur suggestion is really significant.

 5. BHAGAWAN MARUTI NISAL

  CHHAN APRATIM

 6. दत्तात्रय भिसे

  धन्यवाद सर !!

 7. Nice sir

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat