MPSC Main-Marathi Translation for practice

खालील उताऱ्याचे मराठी मध्ये भाषन्तर करा


Every Government in our country has laid stress on education and every Government has made efforts for it in its own way. It is true that for a long time our focus has been on setting up educational institutions, expanding the system of education, building schools, building colleges, recruiting teachers, ensuring maximum attendance of children. So priority has been given in a way to the spread of education. This was necessary. But today more than expanding education what is necessary is to improve the quality of education. We have already done a lot towards expanding education. Now we will have to focus on quality education. We will have to shift our priority from literacy campaign to good education. Till now we concentrated on the outlay for education. The time has come to focus on the outcome of it. Till now the stress has been on how many are attending school. From now onward, more than schooling, we will have to lay stress on learning. Till now we have heard the echo of the mantra of Enrolment! Enrolment! Enrolment! But now we will have to turn our attention to providing good education, worthy education to children who have made it to schools. You must have seen the Budget of the present government. An effort is being made to provide quality education. But it is true we still have a long way to go. If we, 125 crore Indians, resolve, we can cover that distance. Sharmila ji has rightly said that we do need to bring reforms for quality education.


हे भाषणतार मला टेलिग्राम ग्रुप वर माझ्या 9423035088 या नंबर वर पाठवा.

प्ले स्टोर मधून telegram हे अँप download करा

त्याची लिंक——–TELEGRAM APP

Search मध्ये जाऊन mpsc_simplified टाका. एक चॅनेल ओपन होईल .त्याची खाली join असा option येईल त्याला क्लिक करा तुम्ही त्या चॅनेल चे सदस्य झालात

2 comments

 1. अनिल भरीतकर

  नावनोंदणीऐवजी पटनोंदणी हा शब्द योग्य राहिल….णु

 2. मेघा माने

  Swiss:
  आपल्या देशात आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारने शिक्षणावर विशेष भर दिला आहे. आणि प्रत्येक सरकारने आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न केले आहेत.
  हे खरे आहे की, जास्तीतजास्त शैक्षणिक संस्था उभारणे, शिक्षण प्रणालीचा विस्तार, नवीन शाळा-महाविद्यालये उभारणे, शिक्षकांची नियुक्ती करणे, जास्तीतजास्त विद्यार्थ्याची उपस्थिती सुनिश्चित करणे यावर त्यांचा फोकस राहिला. त्यामुळे या मार्गाद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्यावर भर दिला गेला. आणि हे आवश्यक होते.

  पण सद्यस्थितीत, शिक्षण विस्तारापेक्षा जास्त शिक्षणाचा दर्जा सुधारणे जास्त आवश्यक आहे. यापूर्वी शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने खूप कार्य झाले आहे. आता आपणाला शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आता आपल्याला आपली प्राथमिकता साक्षरता मोहिमेकडून दर्जेदार शिक्षणाकडे वळवावी लागेल. शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची वेळ आता आली आहे. विद्यार्थ्याच्या केवळ उपस्थितीपेक्षा त्यांच्या शिकण्यावर आपल्याला जास्त भर दयावा लागेल.

  आतापर्यत आपण “नावनोंदणी सुरू आहे” हेच सर्वत्र ऐकत आलो आहोत. जिथे तिथे नावनोंदणी, नावनोंदणी ! पण आता आपल्याला शाळांमध्ये मुलांना दर्जेदार, मुल्याधारित शिक्षण मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्याच्या सरकारने अर्थसंकल्पात याबाबत तशी तरतूद केली आहे, हे आपण पाहिले असेलच. सर्वाना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण हे ही सत्य आहे की, यासाठी थोडा काळ जाईल. पण जर आपण सर्व 125 कोटी भारतीयांनी ठरविले तर आपण मिळून हे वेळेचे अंतर कमी करू शकतो. शर्मिलाजी अगदी बरोबर म्हणाल्या की गुणवत्ताधारित सुधारित शिक्षण आणणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat