MPSC Main 2016 Preparation राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 तयारी

राज्‍यसेवा मुख्‍य परीक्षा तयारी

# नुकतीच राज्‍यसेवा पूर्व परीक्षा पार पडली. सप्टेंबरच्या शेवटी मुख्‍य परीक्षा होत आहे. परीक्षेला आणखी 05 महिन्‍याचा कालावधी आहे. म्‍हणजे साधारणतः 150 दिवस आहेत.कट ऑफ किती लागेल ते सांगता नाही येणार परंतु ज्यांचा स्कोर 140+ आहे त्यांनी जोमाने तयारीला लागावे.

# मुख्‍य परीक्षेतील मराठी व इंग्रजी या विषयावर आयोगाचे कोणताही नवीन निर्णय आलेला नसल्‍यामुळे जुन्‍याच स्‍वरूपाच्‍या अभ्‍यासानुसार तयारी करा.

# मुख्‍य परीक्षेत एकुण 06 पेपर असतात. मराठी, इंग्रजी, सामान्‍य अध्‍ययन-1, सामान्‍य अध्‍ययन-2, सामान्‍य अध्‍ययन-3, सामान्‍य अध्‍ययन-4.

# एकुण 800 गुणांची मुख्‍य परीक्षा असते. सामान्‍य अध्‍ययनाचे चारही पेपर हे वस्‍तुनिष्‍ठ स्‍वरूपाचे असतात. यामध्‍ये चार पर्यायांपैकी योग्‍य असा एक पर्याय निवडावयाचा असतो. सामान्‍य अध्‍ययनाचे पेपर प्रत्‍येकी 150 गुणांचे असतात. प्रत्‍येक बरोबर उत्‍तराला 01 गुण मिळतात तर चुकीच्‍या उत्‍तराला 0.33 गुण वजा होतात.

# मुख्‍य प‍रीक्षेचा अभ्‍यासक्रम हा व्‍यवस्थितपणे defined केलेला आहे. हा विशेषीकृत अभ्‍यास आहे. याचा दर्जा हा पदवी एवढाच आहे. काही उपविषयांची पुनरावृत्‍ती झालेली आपल्‍याला पाहायला आढळते. परंतु प्रत्‍येक उपविषयाचा संदर्भ हा वेगवेगळा आहे.
उदाहरणार्थ – शिक्षण हा विषय चारही पेपरमध्‍ये आहे. परंतु प्रत्‍येकातील आशय वेगवेगळा आहे.
i). इतिहासामध्‍ये आतापर्यंतची शिक्षणाची वाटचाल पाहिली जाते.
ii). संविधानामध्‍ये त्‍याची राज्‍यघटनेतील तरतूद, समाजातील कमकुवत घटकांची शैक्षणिक प्रगती संदर्भातील आकडेवारी
iii). मानव संसाधन विषयात – शिक्षणाचे प्रसार करणा-या संस्‍था, शिक्षणाचे मानवी संसाधनातील महत्‍त्‍व, विविध प्रकारचे शैक्षणिक शिक्षण
iv). अर्थशास्‍त्रामध्‍ये – शिक्षणासाठी आर्थिक तरतुदी, शैक्षणिक कर याबाबतीत प्रश्‍न विचारले जातात.

त्‍यामुळे प्रत्‍येक विषयानुसार त्‍याचा वेगवेगळा अभ्‍यास करायला हवा.

· या प‍रीक्षेत 140 बाकी आहेत तर 120 दिवस आपण पूर्ण अभ्‍यास संपविण्‍यासाठी घेऊ तर शेवटचे 20 दिवस revision साठी घेऊ.

# मराठी व इंग्रजी याचा दररोज सराव करावा. यामध्‍ये दर 08 दिवसाला एखादा निबंध लिहीण्‍याचा प्रयत्‍न करावा आणि वर्तमानपत्रातील एखादा लेख घेऊन त्‍याचे भाषांतर दोन्‍ही भाषेत करावे. मराठी व इंगजीचे मार्क हेच तुमच्‍या यशात सर्वात महत्‍त्‍वाचे असल्‍याने त्‍याची चांगली तयारी करा. परीक्षेला एक महिना बाकी असताना तयारी करेन, असा attitude ठेवू नका आणि दररोज ठराविक वेळ काढा.

# सामान्‍य अध्‍ययनाच्‍या 4 पेपरमध्‍ये प्रत्‍येक पेपरमध्‍ये 02 विषय समाविष्‍ट आहेत जसे की, पहिल्‍या पेपरमध्‍ये इतिहास आणि भुगोल-कृषी हे दोन विषय आहेत. अशाप्रकारे एकुण 08 विषय अभ्‍यासायचे आहेत. 120 दिवसाचे नियोजन केले तर प्रत्‍येक विषयाला 15 दिवस मिळतात. काही विषयाला कमी दिवस लागतील तर काही विषयाला जास्‍त दिवस लागतील. अशाप्रकारे तुमचे अभ्‍यासाचे नियोजन करा.

# प्रत्येक विषयात 10 ते 15 उपविषय आहेत. साधारणतः प्रत्येक उपविषयला 1 दिवस मिळतो,त्या उपविषयचे सखोल अभ्यास त्या दिवशी करायचा.प्रथम अभ्यासक्रम पहायचा,त्या टॉपिकवर आतापर्यंत कोणते प्रश्न विचारले ते पाहायचे,त्यासाठी analysis चे पुस्तक घ्या.
1)प्रत्येक टॉपिकला एक रॅफेरन्स पुस्तक घ्या.आणी आपण जी उपविषय घेतला आहे तेवढाच भाग त्यातून वाचावा.रॅफेरन्स पुस्तके वेगवेगळी असू शकतात.जसे कि,इतिहासाला-ग्रोव्हर,भूगोलासाठी सवदी,राज्यव्यवस्थेसाठी तुकाराम जाधव,HRD-HR साठी कोळंबे,अर्थशास्त्रसाठी देसले आदी.
2)त्यानंतर त्या टॉपिकवर आधारित शालेय पाठ्यपुस्तकातून आणि NCERT पुस्तकातून भाग वाचावा.उदाहरणार्थ-महाराष्ट्रातील समाजसुधारक असा पेपर 1 मध्ये टॉपिक आहे तर 11वी च्या इतिहासाच्या पुस्तकातून समाजसुधारक वाचावे.
३)त्यानंतर जर तो टॉपिक चालू घडामोडी संदर्भात असेल तर त्यावर आधारित चालू घडामोडी वाचाव्या आणि त्याच्या नोट्स काढाव्यात
4)जर त्या टॉपिक बद्दल शासनाच्या विविध प्रकाशनात असेल तर तेथून त्याचे वाचन करावे उदा.India yearbook,economic survey,लोकराज्य,विविध संकेतस्थळे इत्यादी
5)त्यानंतर त्या टॉपिक वर आधारित प्रश्न सोडवायचे.
6)त्या टॉपिक ची revision त्याच दिवशी करायची.
7)मी तयार केलेले त्या टॉपिकवर जर ऑडिओ नोट्स असतील तर जरूर ऐका.

# प्रत्‍येक पेपरच्‍या अभ्‍यासक्रमाच्‍या वरती आयोगाने एक टीप दिली आहे.
“उमेदवारांनी नमुद केलेल्‍या विषयातील/उपविषयातील अद्ययावत व चालु घडामोडींचा अभ्‍यास करणे अपेक्षीत आहे.”
याप्रमाणे प्रत्‍येक topic ला चालु घडामोडींचा अभ्‍यास करायला हवा.

उदा. – पेपर 4 मधील महाराष्‍ट्राच्‍या बेरोजगारीबाबत जर अद्ययावत आकडेवारी आली असेल तर त्‍यावर प्रश्‍न विचारले जातील.

·         माझ्या मते एक-एक विषय complete करून पुढे जायला हवे. म्‍हणजेच इतिहास विषय संपला की भुगोल अशाप्रकारे करावा. कारण त्‍यामुळे अभ्‍यासाची लिंक राहते. जर कंटाळवाणे वाटले तर मराठी, इंग्रजी, चालु घडामोडी यांचा अभ्‍यास करावा.आणखी आपण जे वाचले आहे त्यावर आधारित प्रश्न वाचा.

·       
#  मुख्‍य परीक्षेचा अभ्‍यास हा अतिशय interesting आहे. त्‍यामुळे आपल्‍याला खुप काही नवीन माहिती मिळते. मागील प्रश्‍नपत्रिकांचे अवलोकन केले असता सर्व अभ्‍यासक्रम पूर्ण करण्‍यावर भर द्या. त्‍याचबरोबर बारीकसारीक माहिती टिपण करत जा.

·       
#  ही परीक्षा वस्‍तुनिष्‍ठ स्‍वरूपाची असल्‍याने जेवढे जमतील तेवढे जास्‍त MCQ सोडविण्‍याचा सराव करा. यासाठी विविध दर्जेदार पुस्‍तके, विविध classes चे प्रश्‍नपत्रिका सोडवा.

·       
#  दररोज अभ्‍यासाची सुरूवात करताना चारही पेपरचा अभ्‍यासक्रम नित्‍यनियमनाने वाचा. परीक्षेत नुसता अभ्‍यासक्रम पाठ असला तरी 30 ते 40 गुणांचा फायदा होतो.दररोज सकाळी अभ्यासाला सुरवात करताना syllabus पहा.सर्व syllabus पाठ व्हायला हवे.जेणेकरून कोणतेही चालू घडामोडीचे आर्टिकल वाचले कि,लक्षात यायला हवे कि ते syllabus मधील कोणत्या टॉपिक मधील आहे ते समजते.           

·        
# माझ्या वेबसाईटवर(mpscsimplified.com) विविध राज्‍यसेवा 2015 परीक्षेत उत्‍तीर्ण झालेल्‍या अधिका-यांच्‍या मार्गदर्शनपर मुलाखती काळजीपूर्वक वाचा. त्‍यांनी सांगितलेले बारकावे नक्‍कीच तुम्‍हाला उपयोगी पडतील.

1)अतुल कानडे यांची मुलाखत
2) रोहिणी नऱ्हे यांची मुलाखत 3)मेघा ढोले यांची मुलाखत
4)विशाल नाईकवाडे यांची मुलाखत
·      
#   ज्‍या विषयाला जास्‍त गुण आहेत त्‍यांना विशेष लक्ष द्या.
उदा. – पहिल्‍या पेपरमध्‍ये इतिहास, भुगोल व कृषी हे विषय आहेत. इतिहासावर आतापर्यंत साधारणतः 60 प्रश्‍न विचारले जातात. परंतु भुगोल व कृषीला 90 प्रश्‍न विचारले जातात. साहजिकच भुगोल व कृषीला जास्‍त वेळ द्यायला हवा.     

# अभ्यासाचा आवका खूप मोठा आहे म्हणून घाबरून जाऊ नका.मागील चार वर्षाच्या पेपरचे analysis करा.प्रश्न विचारण्याची पद्धत पहा.आतापर्यंत संदिग्धता असलेले ,आकडेवारी, factual आधारवर जास्त प्रश्न विचारले गेले आहेत.

मागच्या वर्षी जर सामान्य अध्ययन विषयाला मार्क कमी आले असतील तर आपण कोणते प्रश्न चुकलो आहे,आपण ज्या प्रश्नांची तयारी केली नव्हती,ते प्रश्न attempt केले का? असे प्रश्न attempt करून फायदा झाला कि तोटा हे तपासून पहा.आणि त्यानुसार एक stratergy तयार करा.

# काही महत्वपूर्ण मुद्दे
1)कोणताही उपविषय अभ्यासायचा सोडू नका.
2)अभ्यासाचा जास्त बोझ घेऊ नका.अभ्यासाचा आनंद लुटा.
3)जे टॉपिक पुस्तकात उपलब्ध नसतील त्यांचा इंटरनेटवर शोध घ्या,परंतु माहिती ऑथेंटिक असावी.
4)4-5 जणांचा ग्रुप तयार करून विषय-उपविषय वाटून घ्या.आणि दररोज 1-2 तास एकत्र त्या विषयावर सवांद करा.आणि त्यातून नवीन माहिती मिळावी याची काळजी घ्या.
5)प्रत्येक विषयासाठी स्वतन्त्र नोटबुक तयार करा.आणि त्या विषयाची माहिती तेथेच टिपण करा.या सर्व नोटबुक सतत सोबत ठेवा,जेणेकरून महिती लिहता येईल.मी एकूण 4 नोटबुक तयार केल्या होत्या.
6)फेसबुक आणि व्हाट्सऍपचा वापर कमी ठेवा. जर whatsapp group असेल तर जे नॉन सिरीयस उमेदवार आहेत त्यांना काढून अभ्यासाचे वातावरण ग्रुप मध्ये ठेवा.
7)कोणतेही अवघड प्रश्न विचारून इतरांना demoralise करू नका.
8)आपण काय वाचले हे इतरांना सांगा.लक्षात असू द्या दुसऱ्याला सांगितल्यावर ज्ञानात वाढ होते.
9)प्रत्येक विषयाला 1 किंवा 2 संदर्भ पुस्तके वापरा.

तुम्हा सर्वाना राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा💐👍

 डॉ.अजित थोरबोले
 उपजिल्हाधिकारी,नांदेड

MPSCsimplified.com

34 comments

 1. sheetal shirsath

  the above instructions are very helpful and much needed..and this is gonna help me a lot as i am going to prepare for mains study for coming 2018 mpsc exam.
  thank you so much ajit sir

 2. Plz sir which book I should refer for ancient history and medieval history in marathi for better understanding

 3. Vishwajeet Patil

  Sir tumhi marathi ani english che tumhala mains la expected watatayt ase subject suchavu shakal ka? jenekarun tya subjectwr study krun amhala practice karta yeil
  kinva nibandh kasa lihava tyabaddal kahi tips dilya ani kahi demo nibandh dile tri chalel.

 4. Respected sir
  sir, your blog is very useful for me. I regularly use it. It helps me a lot. I am studying from rural area but I can get quality guidance because of you sir. thank you so much sir.

 5. sir can nursing student apply for mpsc state service exam?

 6. श्री. अजित थोरबोले सर …..आडनावाला अनुसरून केलेलं हे तुमच कार्य समाजातील कष्टाळू व होतकरू विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडेल. थोड राज्यसेवा २०१७ विषयी सांगा …प्लांनिंग….धन्यवाद …

 7. vikas nanabhau dahije

  2017 rajesevachi planing sanga sir

 8. rameshwar gadhave

  thanks sir its really encouraging for us

 9. sir rajyaseva 2017 sathiche planing sanga

 10. Gajanan parihar

  thanks sir

 11. sir plz give the question paper set…subject wise

 12. sneha bharati anand pawar

  Sir whr will i get 11th & 12th agriculture book???

 13. sneha bharati anand pawar

  PLZ DO TELL WHILE REFERIN gov site what we hv to refr fr exam???
  like e.g; soil health card or scheme???
  ya case madhe wts useful fr exam???

 14. Thank you sir!

 15. Rakesh Meshram

  Thnks sir

 16. Gopal D Bhelonde

  Thanks sir for giving useful info..

 17. Thank you sir

 18. Thanks Sir… Very helpful tips

 19. pls make available the english version of this site

 20. Strikant Misal

  Sir,
  You are doing very well job for struggler students.
  Test sir

 21. Sachin wakhure

  Thank you sir.. It is extremely helpful for each and everyone of us….

 22. rohit vinayak bhosale

  thank you sir.

 23. Thnks..sir

 24. Thank you so much sir…. it will help my study.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat