मे २०१८ महत्वाच्या चालू घडामोडी May 2018 current affair

स्टरलाइट कॉपर प्रकल्प 

 • तामिळनाडूतील तुतिकोरीन येथील वेदांत समूहाच्या स्टरलाइट कॉपर या कंपनीचा तांबेनिर्मिती प्रकल्प बंद करण्याचे आदेश तेथील राज्य सरकारने दिले असून याचा फटका देशभरातील 800 लघु व मध्यम उद्योगांना बसणार आहे.
 • वेदांत उद्योग समुहातील ‘स्टरलाइट कॉपर’ नावाच्या कंपनीचा तुतिकोरीन येथील तांबेनिर्मिती प्रकल्प कायमचा बंद करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत.
 • तसेच या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख टन तांबेनिर्मिती व्हायची. देशभरात दरवर्षी 10 लाख टन तांबेनिर्मिती होते. म्हणजेच देशातील तांब्याच्या उत्पादनात तुतिकोरीन प्रकल्पाचा वाटा 40 टक्के इतका होता.
 • भारतात तांबेनिर्मितीमध्ये हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी कंपनी), हिंदाल्को आणि स्टरलाइट या तीन कंपन्या आघाडीवर आहेत. यातील ‘हिंदुस्तान कॉपर‘मधून दरवर्षी 99 हजार 500 टन तांबेनिर्मिती होते.

भारतीय रेल्वे सुरक्षा प्रचार मोहिमेत  अमिताभ बच्चन

 • रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने रुळ न ओलांडण्याचा भाग महत्त्वाचा ठरतो. तसेच, रेल्वे परिसरातील स्वच्छतेचाही भाग लक्षात घेउन मध्य रेल्वेने जनजागृतीसाठी ‘एक सफर रेल के साथ’ मोहीम राबवली आहे.
 • रेल्वे रुळ न ओलांडणे आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी मध्य रेल्वेने कलाकारांचं सहाय्य घेतले आहे. ‘एक सफर रेल के साथ’ या सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देणाऱ्या मोहिमेचे दूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.

सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा

दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे

 • दिल्ली ते मेरठ या 9 किमी एक्सप्रेसवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
 • यातील 6 किमी मोदी यांनी रोड शोही केला. यावेळी हजारो नागरिकांनी मोदांच्या रोड शो ला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. उद्धाटनापुर्वी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींना सादरीकरणाद्वारे संपुर्ण प्रकल्पाची माहिती दिली.
 • 8.36 किमी लांबीच्या एक्सप्रेसवेसाठी 841.50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
 • निजामुद्दीन ब्रिज पासून सुरू होणाऱ्या रस्त्यावर दिल्ली-उत्तर प्रदेश हद्दीपर्यंत 14 लेन आहेत. हा देशातील पहिला असा राष्ट्रीय महामार्ग आहे जिथे प्रदुषण कमी होणार आहे. एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला 2.5 मीटर लांबीचे सायकल ट्रॅकही बनविण्यात आले आहेत.

ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे

 • तसेच यानंतर 135 किलोमीटर अंतराचा ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते करण्यात आले. या एक्सप्रेसवेसाठी तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
 • या एक्सप्रेसवेमुळे हरियाणा मधील कुंडली आणि पलवलचे अंतर चार तासांवरून केवळ 72 मिनीटांवर आले आहे.

भारताने राजस्थान येथील पोखरण येथे 1974 साली पहिली अणुचाचणी घेतली. त्यानंतर तेथेच 11 आणि 13 मे 1998 रोजी पाच अणुचाचण्या घेतल्या. त्यात हायड्रोजन बॉम्बचाही समावेश होता. त्यानंतर मात्र चाचण्या बंद करण्याचे भारताने जाहीर केले.


चेन्नई सुपरकिंग्ज तिसऱ्यांदा आयपीएल विजेता संघ

 • मुंबईच्या वानखेडे मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साथीने, चेन्नई सुपरकिंग्जने आपण आयपीएलमधले सर्वात प्रसिद्ध संघ का आहोत याची जाणीव सर्वांना करुन दिली आहे.
 • सलामीवीर शेन वॉटसनचे नाबाद आक्रमक शतक आणि त्याला  अंतिम सामन्यात चेन्नईने b8 गडी राखून पराभव केला.
 •  आयपीएल सीझनच्या अकरावा आणि आता पर्यंत तिसर्‍यांदा विजेता संघ ठरले.

  राजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर :

  • राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत असल्याचा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने पाच वर्षांपूर्वी दिला असताना निवडणूक आयोगाने मात्र विसंगत भूमिका घेतली आहे.
  • राजकीय पक्ष ‘आरटीआय‘ कक्षेत येत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने माहिती अधिकाराखालील अर्जावर निर्णय देताना केला.
  • भाजप, कॉंग्रेस, बसप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माकप आणि समाजवादी पक्ष या सहा राष्ट्रीय पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे किती देणगी मिळाली
  • ‘माहिती अधिकार अर्जाद्वारे मागवलेली माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. ही माहिती राजकीय पक्षांशी संबंधित असून, हे पक्ष आरटीआयच्या कक्षेत नाहीत.

   सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा

   बी डीव्हिलियर्सचे अविश्वसनीय विक्रम :

   •  एबीने 23 मे रोजी निवृत्ती जाहीर केली
   • एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम डीव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलेय. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यामध्ये सगळ्यात जलद शतक व सगळ्यात जलद दीडशतक झळकावण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. एबीडीने 31 चेंडूंमध्ये शतक तर 64 चेंडूंमध्ये दीडशतक झळकावण्याचा विक्रम केलेला आहे.
   • केवळ टी-20 व एकदिवसीयच नाही तर कसोटी फॉरमॅटमध्येही एबीडीने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे.
   • तसेच त्याने 278 नाबादची खेळी केली आहे.  साउथ अफ्रिकन क्रिकेटर ऑफ दी इयर हा मानाचा पुरस्कार एबीडीने 2014 व 2015 अशा दोन वेळा पटकावला आहे.

    केंद्र सरकारची ‘आयुष्यमान भारत’ योजना :

    • केंद्र सरकराच्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत  केंद्र सरकार या कुटुंबांना आजारी पडल्यास प्रतिकुटुंब पाच लाख रूपयांपर्यंत मदत करणार आहे.
    • मात्र सध्या ही योजना प्राथमिक पातळीवर असून लाभार्थी असणा-या कुटुंबांची पडताळणी ग्रामसभामधून त्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू आहे.
    • केंद्र सरकार शहरी व ग्रामिण भागातील दारिद्र रेषेखालील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी ही आरोग्य विमा योजऩा सुरू करणार आहे.
    • या योजणेतून एका लाभार्थी कटुंबाला आजारी पडल्यास पाच लाख रूपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. ही आरोग्य विमा योजऩा केंद्र सरकारची असून केवळ आजारी पडल्यानंतर दवाखाण्यातील बिलापोटी ही आर्थिक मदत संबधित कुटुंबांना मिळणार आहे.

लाभार्थी हे 2011 साली झालेल्या जणगणनेतून निवडण्यात आली आहेत. या लाभार्थींचे संकलन सध्या आरोग्यविभाग मार्फत जिल्ह्यात सुरू आहे.


मणिपूरमधील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ

 • मणिपूरमधील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या वटहुकुमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 23 मे रोजी मंजुरी दिली.
 • इंफाळमध्ये (पश्चिम) क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक संसदेमध्ये प्रलंबित असल्याचे सांगत केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाची माहिती दिली.

  समुद्रमार्गे विश्वभ्रमंती करुन भारतात परतल्या तारिणी :

  • भारतीय नौदलात कार्यरत असणाऱ्या सहा महिला अधिकारी संपूर्ण जगाची भ्रमंती केल्यानंतर अखेर मायदेशी परतल्या आहेत.
  • जवळपास आठ महिन्यांहून जास्त काळ समुद्राच्या मार्गाने संपूर्ण जगाला प्रदक्षिणा मारणारं ‘आयएनएसव्ही तारिणी’चे महिला दल गोव्यात दाखल झाले आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली.
  • लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशीच्या नेतृत्त्वाखाली या धाडसी महिला अधिकाऱ्यांच्या गटाने हे आवाहन पेलले होते. साधारण 254 दिवसांसाठीच्या या प्रवासात त्यांनी 26 हजार समुद्र मैलांचे अंतर कापले. या अद्वितीय कामगिरीबद्दल रक्षामंत्री निर्मला सीतारामन आणि नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी गोव्यात या सहा महिला अधिकाऱ्याचे स्वागत केले.

 

सोलापूर महापालिका व चीनमधील शिझियाझाँग या दोन शहरामध्ये भगिनी शहरे कराr

  • तब्बल दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोलापूर महापालिका व चीनमधील शिझियाझाँग या दोन शहरामध्ये भगिनी शहरे करारावर शिक्कामोर्तब झाले. महापौर शोभा बनशेट्टी व शिझियाझाँग शहराचे महापौर डेन पेरीयन यांनी करारावर स्वाक्षरी केली.
  • सोलापूर आणि शिझियाझुयँग या दोन शहरामध्ये 2005 साली भगिनी शहर करार संमत झालेला आहे. तथापि, यामध्ये फारशी प्रगती झालेली नव्हती. शिझियाझुयँग या शहरात 16 मे 2018 रोजी चीन व भारत या देशामध्ये करार झाला.
  • येथील महापौरांनी सोलापूरातून वौद्यकीय व इतर शिक्षण घेण्यासाठी आपल्या शहरातून विद्यार्थी पाठवा, आम्ही त्यांना शिक्षण देऊ तसेच औद्योगिक विकासासाठी वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री व टेक्नॉलॉजी देणे आणि सोलापूरात त्यांच्या खर्चातून एखादे हॉस्पिटल दत्तक घेऊन त्याचा विकास करुन सेवा देता येईल याबद्दल परवानगी मागितली.
  • एक महान चिकित्सक डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्यामुळे या दोन शहरांचे बंध जुळले आहेत. डॉ. कोटणीस यांनी त्यांचे जीवन मानवतेच्या सेवेसाठी वाहिले आहे. तथापि, त्यांनी केलेले कार्य आजही चीनमधील लोकांमध्ये जिवंत आहे आणि चीनमधील लोक आणि चीन सरकारला डॉ. कोटणीस यांच्या मानवतावादी कार्याबद्दल नितांत आदर आहे.

   सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


  ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

  • भारताने 21 मे रोजी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी केली. क्षेपणास्त्राचा कार्यअवधी 10 ते 15 वर्षे वाढवणे हा या चाचणीमागचा मुख्य उद्धेश होता. भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमातून हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले आहे.
  • डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या (डीआरडीओ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या किनारपट्टीवर चांदीपूर येथील एकीकृत चाचणी केंद्रातून (आयटीआर) मोबाइल लाँचरवरून सकाळी सुमारे 10.44 वाजता क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

   काश्मीरच्या खोऱ्यात किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीज जन्मली

   • निसर्गाबरोबरच प्रतिकूल सामाजिक स्थिती, दहशतवादाचे सावट आणि सैन्याच्या घडामोडी आदी सर्व परिस्थितीवर मात करीतकाश्मीरच्या खोऱ्यात किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीज जन्मली आहे.
   • श्रीनगरपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरेझमध्ये किशनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाच्या माध्यमातून बंडीपुरा जिल्ह्यतील मंत्रीगाम गावात हा वैशिष्टय़पूर्ण जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
   • नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशनच्या (एनएचपीसी) या महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक प्रकल्पाचे काम हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने (एचसीसी) इतर भागीदारांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.
   • श्रीनगरपासून 80 किलोमीटर अंतरावर मंत्रीगाममध्ये जलविद्युत प्रकल्प आहे, तर तेथून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर किशनगंगा धरण उभारण्यात आले आहे. धरणातून जलविद्युत प्रकल्पापर्यंत तयार करण्यात आलेला बोगदा हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे.

    श्री संत तुकाराम महाराज संतपीठ अध्यक्षपदी विजय भटकर :

    • श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या प्रस्तावित संत तुकाराम महाराज संतपीठासाठी प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकरयांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची मार्गदर्शक समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतः मंजूरी दिलीआहे.
    • तसेच ही समिती संतपीठाचा बृहत आराखडा, अभ्यासक्रम, अस्थापनेची रचना, वर्गपध्दती व इतर अनुषंगीक कामांच्या विषयी मार्गदर्शन करणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
    • पंढरपूर मंदिरे अधिनियमा मध्ये संत तुकाराम महाराज संतपीठ स्थापन करण्या विषयीची तरतूद आहे.

     प्रिन्स हॅरी मेगन यांचा शाई विवाह थाटात :

     • ब्रिटनचे राजपुत्र हॅरी (वय 33) हे 19 मे ओझी हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मर्केलशी (वय 36) विवाहबद्ध झाले. विंडसर कॅसलमधील सेंट जॉर्जस चॅपल चर्चमध्ये पार पडलेल्या या समारंभाला सहाशे पाहुणे उपस्थित होते.
     • कॅंटरबरीच्या आर्चबिशपनी या दोघांनाही पती-पत्नी घोषित . महाराणी ऐलिझाबेथ द्वितीय यांच्यासह प्रिन्स फिलीप आणि राजपरिवारातील अन्य सदस्यदेखील या सोहळ्याला उपस्थित होते.
     • सामान्य लंडनवासीयांना हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहता यावा म्हणून मुख्य रस्त्यांवर स्क्रिन्स लावण्यात आले होते. या समारंभाला मेगनची जवळची मैत्रिण अभिनेत्री प्रियांका चोप्रासह जॉर्ज आणि अमल क्‍लुने, डेव्हिड आणि व्हिक्‍टोरिया बेकहॅम आणि सर एल्टॉन जॉन देखील उपस्थित होते.

      सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


      बारामतीमध्ये क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मंजूर :

      • पंचक्रोशीतील नागरिकांच्या सोयीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने बारामती, अकोला, अमरावती, चंद्रपूर व सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मंजूर केले आहे.
      • परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या संदर्भात मोलाची मदत केली असून, सुप्रिया सुळे यांच्या मार्फत गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु व्हावे या साठी पाठपुरावा सुरु होता. आता परराष्ट्र मंत्रालयाने देशभरात 289 ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रात वरील पाच ठिकाणी ही कार्यालय सुरु होणार आहेत.

       मुक्तिनाथ मंदिराला भेट देणारे मोदी पहिले परदेशी नेते :

       • नेपाळच्या प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. हे मंदिर बौद्ध व हिंदुधर्मीयांसाठी सारखेच पवित्र क्षेत्र आहे. या मंदिरात प्रार्थना करणारे मोदी हे पहिलेच जागतिक नेते ठरले आहेत.
       • तसेच मोदी यांनी बागमती नदीच्या तीरावरील पशुपतिनाथ मंदिरातही भेट दिली. पशुपतिनाथ मंदिर हे नेपाळमधील सर्वात जुने शिवमंदिर आहे. पशुपतिनाथ मंदिरात भेट दिल्यानंतर मोदी यांनी अभ्यागतपुस्तिकेत स्वाक्षरी केली.
       • मुक्तिनाथ मंदिर हे 12172 फूट उंचीवर असून, ते भारत व नेपाळ यांच्यातील मोठा सांस्कृतिक दुवा आहे. या मंदिरात मानवी आकाराची विष्णूची सोन्याची मूर्ती आहे.

केंद्र सरकारतर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षण स्पर्धेत बृहन्मुंबई महापालिकेला देशातील सर्वांत स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मिळाला.

       • नागपूर, परभणी व सासवडसह राज्यातील आठ शहरांनी विविध गटांत पारितोषिके पटकाविली.
       • राष्ट्रीय पातळीवर हागणदारीमुक्ती व कचरा व्यवस्थापनात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यांत महाराष्ट्राने झारखंड पाठोपाठ व छत्तीसगडला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकाविला.
       • राष्ट्रीय पातळीवरील अव्वल तीन स्वच्छ शहरांत इंदूर व भोपाळ या मध्य प्रदेशातील दोन शहरांनी पहिले दोन क्रमांक पटकाविले, तर चंडीगड तिसऱ्या क्रमांकावर आले.
       • तसेच एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांत पश्‍चिम विभागांत अंकलेश्‍वर वगळता चारपैकी पाचगणी, सासवड व शेंदूरजनाघाट (जि. अमरावती) ही राज्यातील तीन शहरे विजेती ठरली आहेत. केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप पुरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण-2018 स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या 52 शहरांची नावे जाहीर केली.

        आयसीसी अध्यक्षपदी पुन्हा शशांक मनोहर यांची निवड :

        • आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.

        • रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा व्लादिमीर पुतिन :

         • रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन (वय 65) यांचा चौथ्यांदा शपथविधी झाला असून त्यांची दोन दशकांची सत्ता आणखी सहा वर्षे राहणार आहे.
         • 1999 पासून पुतिन सत्तेवर असून ते जोसेफ स्टालिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले नेते ठरले आहेत. मार्चमधील निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पुतिन यांनी एकूण 77 टक्के मते जिंकली होती, पण या निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर बंदी घातली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले असून त्यांच्यासमोवर अनेक जटिल आंतरराष्ट्रीय पेच आहेत.
         • ‘रशियाच्या वर्तमान व भविष्यासाठी सर्व काही करण्याकरिताच माझे आयुष्य आहे व ते मी माझे कर्तव्य समजतो’ असे पुतिन यांनी सांगितले. 2016 साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.

      लोहगाव विमानतळ देशात तिसरे :

      • प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्‍क्‍यांनी प्रवासी संख्या वाढली आहे.
      • तसेच कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे.

       कांदळी ही राज्यातील पहिली ऑनलाईन ग्रामसभा :

       • कांदळी (ता.जुन्नर) येथे 1 मे रोजी राज्यातील पहिली ऑन लाईन ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
       • यावेळी सभेच्या विषय पत्रिकेतील 24 विषयांवर 250 हून अधिक नागरिकांनी ऑनलाईन संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सरपंच विक्रम भोर यांनी सांगितले.
       • ऑनलाईन ग्रामसभेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शरद सोनवणे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, तहसिलदार किरण काकडे तसेच आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

        आता फ्लिपकार्टचा 77 टक्के हिस्सा वॉलमार्टचा :

        • भारतातली ई-कॉमर्समधली सगळ्यात मोठी कंपनी फ्लिपकार्ट अमेरिकी जायंट कंपनी वॉलमार्ट हिला 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलर्सना (सुमारे एक लाख कोटी रुपये) विकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
        •  वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी व्यक्त केली आहे.
        • फ्लिपकार्टचे सहसंस्थापक व ग्रुप सीईओ बिन्नी बन्सल यांनी सांगितले की, ‘भारतामध्ये गुंतवणूक येणं प्रचंड महत्त्वाचं आहे. रिटेल क्षेत्रामधल्या पुढील काळात येऊ घातलेल्या लाटेमध्ये स्वार होण्यासाठी मोठ्या प्रमणावर येणाऱ्या गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’

         जगातील टॉप प्रदुषित शहरात भारतातील शहरांचा समावेश :

         • विश्व आरोग्य संघटना (WHO) ने जगातील 15 सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी खेदाची बाब ही की या यादीतील 14 शहरे ही भारतातील आहे. ज्यात कानपुर टॉपवरवाराणसी तिसऱ्या स्थानावर आणि पटना पाचव्या स्थानावर आहे.
         • देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदुषणाचे तर भरपुर चर्चे असतात. या यादीत दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. प्रदुषित शहरांची ही यादी 2016 ची आहे.
         • 2.5 पीएम (फाइन पर्टिकु्लर मीटर) लक्षात घेता 100 देशातील 4000 शहरांच्या संशोधनानंतर हे आकडे समोर आले आहेत.
         • 2010 मध्ये WHO ने प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली तेव्हा दिल्ली अग्रस्थानी होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानातील पेशावर व रावळपिंडी ही शहरे होती. यावेळी अग्रस्थानी पाकिस्तान आणि चीनच्या कोणत्याच शहरांचा समावेश नाही.

      सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat