नोकरीच्या संधी 25 एप्रिल 2016

0
572

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये अधिकारी पदाच्या ३ जागा
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये चीफ लॉ ऑफिसर (१ जागा), सीनि. डेप्यू. चीफ मेडिकल ऑफिसर (रेडिओलॉजी) (१ जागा), सीनि. डेप्‍यू. चीफ मेडिकल ऑफिसर (पॅथॉलॉजी व बॅक्टेरिओलॉजी) (१ जागा) या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मे, २०१६ आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात अग्निशामक पदाची भरती (९ जागा)
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात अग्निशामक (वर्ग-३) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ मे २०१६ आहे. अर्जाचा नमुना व अधिक माहिती www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये कॉन्स्टेबल / ट्रेड्समनची भरती – २०१६
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलामध्ये कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समन (१३७ जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ मे २०१६ तर उत्तर-पूर्व भागातील रहिवाशांसाठी १६ मे २०१६ आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदाच्या ५६७ जागा
सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या भरतीकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे २०१५ आहे. अधिक माहिती https://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल/ट्रेड्समनच्या १२४ जागा
सेंट्रल इंडस्ट्रिअल सिक्युरिटी फोर्समध्ये कॉन्स्टेबल/ट्रेड्समन पदाच्या १२४ जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ मे २०१६ आहे. अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY