जून २०१८ महत्वाच्या चालू घडामोडी june 2018 current affair

1.कोयना धरणात पाणी साठविण्याची क्षमता 105.25

टीएमसी आहे. धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे केले जाते. पश्‍चिमेकडील टप्पा 1 ते 4 मधून वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित आहे.

2.वैशाली पवार ठरल्या ‘मिसेस इंडिया 2018’च्या मानकरी :

 • मूळची सांगलीकर आणि कर्नाटकची सून झालेल्या वैशालीची नुकतीच नवी दिल्लीतील ‘मिसेस इंडिया‘ स्पर्धेसाठी निवड झाली होती. ‘मिसेस कर्नाटक रॉयल क्वीन‘ स्पर्धेतील विजेतेपदाचा अनुभव वैशालींच्या पाठीशी होता.

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


3.नील ध्वज मानक प्रकल्पात राज्यातील बंदरांचा समावेश :

 • देशातील तेरा बंदरे नील ध्वज प्रमाणन मानकानुसार (ब्लू फ्लॅग स्टँडर्डस) नुसार विकसित केली जाणार असून त्यामुळे पर्यटकांना जास्त आनंददायी अनुभव घेता येणार आहे.
 • या तेरा बंदरात महाराष्ट्रातील चिवलाभोगवे या दोन बंदरांचा समावेश करण्यात आला आहे.
 • या शिवाय गोवा, पुडुचेरी,दमण व दीव, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार येथील प्रत्येकी एकेका बेटाचा ब्लू फ्लॅग बीच म्हणून विकास केला जाणार आहे. ओदिशातील कोणार्क किनाऱ्यावरील चंद्रभागा बंदराला 5 जूनला पर्यावरण दिनी गौरवण्यात येणार आहे. या बंदराने ब्लू फ्लॅग बीच निकष पूर्ण केले आहेत. ही सगळी बंदरे भारतातच नव्हे तर आशियातील पहिली असणार आहेत.
 • सोसायटी फॉर इंटिग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने भारतीय बंदरे विकसित केली जातात. या बंदरांना पर्यावरण व पर्यटन विषयक तेहतीस निकष पूर्ण करावे लागणार आहेत.
 • ब्लू फ्लॅग बीच मानके 1985 मध्ये कोपनहेगनच्या फाऊंडेशन फॉर एनव्हरॉनमेंटल एज्युकेशन या संस्थेने त्यार केली आहेत. यात मत्स्य अधिवास सुरक्षित करतानाच प्रदूषणाला आळा घालणे, पर्यटक सुविधांना प्राधान्य देणे हे निकष महत्त्वाचे आहेत.

4.बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-5 चे यशस्वी प्रक्षेपण :

 • ओदिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नि 5 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस्त्रे वाहून नेता येऊ शकतात. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5 हजार किमी इतकी असून ते डॉ. अब्दुल कलाम बेटावरून लाँच करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे.
 • हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरून मारा करू शकते. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या पॅड 4 वरून हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले. अग्नि 5 ची ही सहावी चाचणी ठरली. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने अपेक्षित अंतर गाठले.
 • सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या अग्नि 5 च्या तुलनेत सर्वाधिक आधुनिक आहे. हे नेव्हिगेशन आणि दिशा दर्शक, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नवीन तंत्रज्ञानांनी युक्त आहे. हायस्पीड कॉम्प्युटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअरबरोबर रोबस्टच्या साहाय्याने क्षेपणास्त्राचे यशस्वी लाँचिंग होण्यास मदत झाली.

5.माहिती अधिकार प्रथम अपिलासाठी शुल्क आकारणी :

 • माहिती अधिकाराअंतर्गत प्रथम अपील दाखल करताना शुल्क आकारण्याची तरतूद नसताना महाराष्ट्र शासन मात्र असे शुल्क आकारत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातूनच पुढे आली आहे.
 • केंद्राच्या माहितीचा अधिकार 2005 अंतर्गत प्रथम अपील दाखल करताना कुठलेही शुल्क आकारण्याची तरतूद नाही. या कायद्यात दिलेल्या अधिकाराचा वापर करीत केंद्र शासनाने 2012 साली काही नियम तयार केले, पण या नियमात सुद्धा शुल्क आकारण्याची तरतूद नाही.
 • विशेष म्हणजे, कायद्यातील तरतुदीनुसार कलम 2728 अन्वये काही बदल करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत, पण हे कलम केवळ आरटीआय कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी नियम तयार करण्याचे अधिकार प्रदान करत.

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


6.रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात वाढ :

 • रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात बदल करत पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता आरबीआयने रेपो रेट 6 टक्क्यांवरून पाव टक्क्याने वाढवत 6.25 टक्‍क्‍यांवर आणला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर देखील 0.25 टक्क्याने वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे. साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या चार पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते.
 • अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनातील वाढत्या किंमतींनी महागाईचा आगडोंब उसळल्याने आरबीआयवरील दबाव वाढला होता. महागाईची चिंता लागून राहिलेल्या “आरबीआय”च्या पतधोरण समितीची व्दैमासिक बैठक मुंबईत सुरू होती. आता रेपो दरवाढ झाल्याने कर्जे महागणार असून मासिक हप्त्याचा जादा भार कर्जदाराला सोसावा लागण्याची शक्यता आहे.
 • गेल्या महिनाभरात बहुतांश बॅंकांनी ठेवी आणि कर्जदरात वाढ केली होती. त्यामुळे आता आरबीआयने रेपोदर वाढवल्याने कर्जाचा दर आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. एप्रिलमधील पतधोरणाच्या बैठकीत डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि मायकल डी पात्रा या दोन सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजुने कौल दिला होता. यंदा प्रथमच पतधोरण समितीची बैठक तीन दिवस चालली.

7.जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूंपैकी विराट एक :

 • भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा फोर्ब्ज मासिकानुसार ‘जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं’पैकी एक आहे. या यादीत तो 83व्या क्रमांकावर आहे.
 • भारतीय खेळाडूंपैकी फक्त कोहलीच या यादीत समाविष्ट आहे. 2.4 कोटी अमेरिकन डॉलर कमावणारा विराट हा फोर्ब्जच्या संकेतस्थळानुसार केवळ एकटा भारतीय खेळाडू आहे. विशेष बाब म्हणजे ‘जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं’च्या ‘टॉप 100यादीत एकाही महिला खेळाडूचे नाव नाही.
 • यावेळी फोर्ब्ज संकेतस्थळावर वेगवेगळ्या 11 खेळांमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात 100 पैकी 40 फुटबॉल खेळाडू आहेत. बेसबॉलमधील 14 खेळाडु, सॉसरमधील 9 खेळाडु, गॉल्फमधील 5 खेळाडु,बॉक्सिंगटेनिसमधील प्रत्येकी 4 खेळाडु, रेसिंगमधील 3 खेळाडु असे ‘टॉप 100 खेळाडु समाविष्ट आहेत.
 • महिला खेळाडुंपैकी ली ना, मारिया शारापोआ व सेरेना विल्यम्स या ‘टॉप 100‘च्या यादीत असायच्या, पण ली 2014 मध्ये निवृत्त झाली. तर मारिया शारापोवावर खेळण्याची बंदी असल्याने तीही या यादीत समाविष्ट नाही.

8.NRI लग्नाची 48 तासात नोंदणी होणे आवश्यक :

 • भारतात एखाद्या तरुणीचे एनआरआय पुरुषासोबत लग्न झाल्यास 48 तासात नोंदणी झाली पाहिजे असा आदेश मनेका गांधीयांच्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
 • सध्या भारतात लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाहीये. कायदा आयोगाच्या अहवालात लग्नाची नोंदणी करण्यासाठी 30 दिवसांचं बंधन असलं पाहिजे, त्यानंतर प्रत्येक दिवसामागे पाच रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.
 • एनआरआय लग्नाची नोंदणी 48 तासात झाली पाहिजे, अन्यथा पासपोर्ट किंवा व्हिसा मिळणार नाही‘, असं मनेका गांधींनी सांगितलं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, महिला आणि बालविकास मंत्रालयाने रजिस्ट्रारना अशा लग्नांची माहिती पुरवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरुन सेंट्रल डेटाबेसदेखील अपडेट राहिल.

9.‘दलित’ शब्द वापरण्यावर केंद्र सरकारची बंदी :

 • शासकीय कामकाजामध्ये ‘दलित‘ शब्दाचा वापर न करता अनुसूचित जातीअनुसूचित जमाती असा शब्दप्रयोग करावा, अशी अधिसूचना केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने 15 मार्च 2018 ला प्रसिद्ध केली
 • केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व भारतीय प्रेस कौन्सिलने प्रसार माध्यमांमध्येही या शब्दाचा वापर करू नये, यासाठी उपाययोजना करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.
 • या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झका हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यावेळी वरील आदेश दिले. सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी ही याचिका दाखल केली होती.
 • एका विशिष्ट समुदायासाठी होणारा ‘दलित’ शब्दप्रयोग असंवैधानिक आहे. या शब्द वापराला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता.
 • शासकीय, परिपत्रके, अधिसूचना आणि विविध शासकीय दस्तावेजांमध्ये हा शब्द वापरला जातो. हे संविधानाच्या अनुच्छेद 14, 15, 16, 17, 19, 31 आणि 341 चे उल्लंघन आहे. अनुसूचित जाती आयोगानेही याला विरोध केला आहे.

10.रविवारची साप्ताहिक सुटीला 128 वर्षे पूर्ण :

 • सत्यशोधक विचारांच्या मुशीतून घडलेले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्क आणि न्यायासाठी सातत्याने लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला.
 • रविवारची सुटी देण्यास त्यांनी ब्रिटिश सरकार आणि गिरणीमालकांना भाग पाडले. 10 जून 1890 पासून रविवारची साप्ताहिक सुटी सुरू झाली. त्याला 10 जून रोजी 128 वर्षे पूर्ण झाले आहेत.
 • लोकशाही पद्धतीचा मार्ग लोखंडेंनी त्या काळात अवलंबून कामगारांना न्याय मिळवून दिला होता.
 • अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा केवळ धार्मिकच नव्हे सर्वच प्रकारच्या शोषणाला विरोध होता. त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या अनिर्बंध शोषणाविरोधात आवाज उठवत त्यांचे हक्क, न्यायासाठी लढा उभारला.
 • अनेक दाखले देत लोखंडेंनी रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीसाठी कसा योग्य आहे, हे सरकारला पटवून दिले. लोखंडे यांच्या मागणीला कामगारांचा वाढता पाठिंबा पाहून अखेर 10 जून 1890 मध्ये गिरणीमालकांनी रविवारच्या साप्ताहिक सुटीचा ठराव पास केला आणि कामगारांना साप्ताहिक सुटी लागू झाली.

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


11.IIT मुंबई ठरले देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ :

 • शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी म्हणून ओळख असलेल्या Quacquarelli Symonds (QS) या कंपनीने जगातील विद्यापीठांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील आयआयटी आणि आयआयएस या संस्था उत्कृष्ट विद्यापीठ ठरल्या आहेत.
 • पहिल्या 200 विद्यापीठांच्या यादीत आयआयटी मुंबई 162व्या स्थानावर, आयआयएस बंगळूरू (170) तर आयआयटी दिल्ली 172व्या स्थानावर आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीवर मात केली असून ही संस्था देशातील सर्वोत्कृष्ट संस्था ठरली आहे. 6 जून रोजी हे क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर करण्यात आले.
 • आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीला पिछाडीवर सोडत 17 व्या स्थानाने वर उडी घेतल्याने ती देशातील सर्वात अव्वल रँकची शैक्षणिक संस्था ठरली आहे.
 • तर दुसरीकडे आयआयएस बंगळूरू या संस्थेनेही आयआयटी दिल्लीला मागे टाकले आहे. मात्र, असे असले तरी टॉप 150 मध्ये या संस्थेला स्थान मिळवता आलेले नाही.

12.मानसिक आजारांना विमा संरक्षण नाही :

 • मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने नैराश्य, चिंता आदी विकार आढळत आहेत. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्येचे विचार सतत घोळत असणाऱ्या रुग्णांवर इलेक्ट्रो कन्वल्सिव्ह थेरपी (ईसीटी) म्हणजेच शॉक ट्रीटमेंट प्रभावी असल्याचा मानसोपरतज्ज्ञांचा दावा आहे.
 • तसेच याशिवाय रिपिटिटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक (आरटीएमएस) तसेच थीटा बर्स्ट आदी उपचार उपलब्ध आहेत. मात्र हे उपचार महागडे असतानाही हा सर्व खर्च मानसिक आजारांसाठी असल्याचे कारण पुढे करून विमा कंपन्या दावा अमान्य करतात.

13.आरटीओचे पहिले सेवा केंद्र शिक्रापुरात :

 • प्रादेशिक परिवहन विभाग व राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील पहिले आरटीओ सेवा केंद्र शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सुरू करण्यात आले आहे.
 • शिरूर तालुक्‍यातील प्रत्येक पंचायत समिती गणात एक अशी चौदा आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक अशी चौदा आरटीओ सेवा केंद्र येत्या वर्षभरात सुरू करण्याची घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केली.
 • प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) सेवा या पुणेनिगडी कार्यालयातच मिळण्याची सुविधा होती. मात्र या सर्व सेवा ऑनलाइन करून त्या एकाच केंद्राद्वारे कार्यान्वित करण्याचा प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्य सरकार पातळीवर हाती घेण्यात आला होता. ही सेंटर्स नेमण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सीएससीचा (कॉमन सर्व्हीस सेंटर) पर्याय प्रादेशिक परिवहन विभागाला दिला.

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


14.‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर :

 • प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या नवव्या संसदरत्न पुरस्कारासाठी सात खासदारांची निवड करण्यात आली असून, यामधील पाच खासदार महाराष्ट्राचे आहेत. या सर्व खासदारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चेन्नईत हा पुरस्कार सोहळा पार पडेल.
 • महाराष्ट्रातील ज्या पाच खासदारांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आणि भाजपाच्या हिना गावित यांचा समावेश आहे.
 • खासदारांची हजेरी, चर्चेमधील सहभाग, प्रश्नसंख्या, खासगी विधेयकं यांच्या आधारे ही निवड केली जाते.

15.विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे मुख्यालय नागपुर मध्येच :

 • महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार बघता प्रादेशिक विकासाची घडी निट बसविण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची स्थापना झाली.
 • 1 जानेवारी 1994 मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन झाल्यापासून मंडळाचे मुख्यालय नागपुरात आणि अध्यक्षपद मात्र अमरावती विभागाला मिळाले आहे. प्रा. राम मेघे यांच्या नियुक्तीपासून सुरू झालेली ही परंपरा आमदार चैनसुख संचेती यांच्या नियुक्तीने कायम राखल्या केली.
 • पश्‍चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भ मागासलेला राहिला. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र मंडळांची स्थापना करण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार 1994 मध्ये विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली.
 • पहिले अध्यक्ष होण्याचा मान अमरावतीचे प्रा. राम मेघे यांना मिळाला. त्यांच्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात 1995 मध्ये अमरावतीचेच भाजपचे नेते अरूणभाऊ अडसड यांना अध्यक्षपद मिळाले.
 • युतीचे सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आल्‍यानंतर अमरावतीचेच हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे 1999 मध्ये अध्यक्षपद आले. त्यांच्यानंतर कुणाचीही नियुक्ती न झाल्याने 2004 मध्ये प्रशासक नियुक्त करण्यात आला.
 • नागपूर विभागाचे तत्कालीन आयुक्त शैलेकुमार शर्मा यांच्याकडे प्रभार आला. त्यापाठोपाठ आनंद लिमये यांची नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ 2006 पर्यंत होता.

16.राज्य रस्ते सुरक्षिततेसाठी ‘ब्लूमबर्ग’चे सहकार्य :

 • राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेण्यात आला. न्यूयॉर्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘ब्लूमबर्ग‘चे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक ब्लूमबर्ग यांच्याशी यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
 • मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे कॅनडाच्या दौऱ्यावरून अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आगमन झाले. भारताचे न्यूयॉर्कमधील कॉन्सूल जनरल संदीप चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री न्यूयॉर्ककडे रवाना झाले.
 • राज्यातील रस्ते सुरक्षिततेबाबतच्या उपक्रमांना ब्लूमबर्गचे मोठे पाठबळ लाभले आहे. त्याबाबत या समूहाशी फेब्रुवारी 2015 मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार झालेल्या उपाययोजनांमुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याबरोबरच अशा घटनांमधील जीवितहानीदेखील कमी करण्यात यश आले आहे.

17.विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार प्रदान :

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दिला जाणारा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार अर्थात पॉली उम्रीगर पुरस्कार 12 जून रोजी विराट कोहलीला प्रदान करण्यात आला.
 • कोहलीला 2016-17 आणि 2017-18 या दोन्ही वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला असून विराटला एकूण 30 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
 • तर महिलांमध्ये हरमनप्रीत कौरला 2016-17 साठी आणि स्मृती मंधानाला 2017-18 या मोसमातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला.
 • 12 जून रोजी बेंगळुरु येथील कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • विराट कोहलीला रवी शास्त्री यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

18.जनरल मोटर्सच्या सीएफओपदी दिव्या सूर्यदेवरा :

 • भारतीय वंशाच्या दिव्या सूर्यदेवरा यांची अमेरिकेची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी जनरल मोटर्सच्या मुख्य वित्त अधिकारीपदी (सीएफओ) नियुक्ती करण्यात आली आहे.
 • 39 वर्षीय सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्या एक सप्टेंबरपासून सीएफओ पदाचा कार्यभार स्वीकारतील.
 • मुळच्या चेन्नई येथील असणाऱ्या सूर्यदेवरा या जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मेरी बारा यांना रिर्पोट करतील.
 • मेरी बारा या 2014 पासून कंपनीच्या सीईओ असून ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत.
 • दोन प्रमुख पदांवर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिली कंपनी बनली आहे.

19.नाशिकमध्ये होणार ‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ :

 • संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूर पाठोपाठ नाशिकमध्ये‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ होईल, असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.
 • राज्यात ‘डिफेन्स हब‘ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल 15 जून रोजी चर्चासत्र होत आहे.
 • संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्राशी निगडित उद्योगांमधून 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन होते.
 • उरलेले ‘आउटसोर्स‘ करण्यात येते. त्यादृष्टीने छोटे उद्योजक तयार व्हायला हवेत म्हणून संरक्षण ‘इको सिस्टीम’चे राबवण्यात येते.
 • ‘इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्‍सलन्स‘ योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. योजनेसाठी ‘डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन‘चा निधी दिला जातो, असेही त्यांनी सांगितले

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


20.भार हलका करण्यास आता समूह विद्यापीठे :

 • राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वाढती संख्या तसेच सरकारी विद्यापीठांवर वाढलेल्या संलग्न महाविद्यालयांचा भार हलका करण्यासाठी राज्य सरकार समूह विद्यापीठ कायदा आणणार आहे. यामध्ये मोठा विस्तार असणाऱ्या अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांनाही ‘क्‍लस्टर युनिर्व्हर्सिटी‘ होण्याचा पर्याय उपलब्ध होईल.
 • राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत तीन सरकारी महाविद्यालयांना समूह विद्यापीठ करण्यास मान्यता मिळालीआहे; परंतु त्यासाठी या विद्यापीठाचा कायदा करावा लागेल. या कायद्यात केवळ सरकारी महाविद्यालयांना समूह विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याबरोबरच ही संधी अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांनादेखील द्यावी, यावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे एकमत झाले आहे. त्यादृष्टीने विधेयक तयार करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
 • याबाबत उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने म्हणाले, “मुंबई महाविद्यालयांचे समूह विद्यापीठाचे प्रस्ताव मान्य झाले आहेत. त्यांना ‘रुसा’कडून निधीदेखील मिळणार आहे. संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या, विद्यापीठांचा विस्तार याचा विचार करता अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांचे समूह विद्यापीठ करण्यासंबंधी शासन धोरण निश्‍चित करीत आहे.”

21.संदीप बक्षी आयसीआयसीआय बँकेचे नवे संचालक :

 • व्हिडिओकॉन उद्योग समुहाला दिलेल्या कर्ज प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी आता संदीप बक्षी हे बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक असणार आहेत.
 • आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने 18 जून रोजी बक्षी यांची संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारीपदी नियुक्ती केली. त्यामुळे आता आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले बक्षी 19 जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.

22.सिंधुदुर्गात जीआय टुरिझम सर्किट :

 • सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या पर्यटनाला जीआय (भौगोलीक मानांकन) टूरीझम सर्किटची झालर देण्याच्या दृष्टिने प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबतचा आराखडा बनवण्याच्या दृष्टिने कामही सुरू झाले आहे.
 • दिल्लीत याबाबत नुकतीच उच्चस्तरीय बैठक होवून यात कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांबरोबरच महाबळेश्‍वर, नाशिकमध्ये या दिशेने काम करण्याचा निर्णय झाला.
 • कोकणात कृषी, मासेमारी क्षेत्राबरोबरच पर्यटन विकासासाठी गेली काही वर्ष प्रयत्न सुरू आहेत; मात्र याला अपेक्षित गती आलेली नाही. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा जाहीर करण्यात आला; मात्र किनारपट्‌टी वगळता इतर भागात पर्यटन विकास पोचू शकला नाही.
 • केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी पर्यटनातील बॅकलॉक भरून काढण्यासाठी जीआय टूरीझम सर्किट या संकल्पनेत जिल्ह्याचा समावेश केला जातो.

23.रामदेव बाबांचाही बनणार मेणाचा पुतळा :

 • योगगुरू आणि पतंजली योगपीठाचे कर्तेधर्ते रामदेव बाबा आता जगप्रसिद्ध मॅडम तुसाद संग्रहालयात दिसणार आहेत तर लवकरच त्यांचाही मेणाचा पुतळा दिल्लीतील मॅडम तुसाद संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
 • तसेच रामदेव बाबांचा मेणाचा पुतळा वृक्षासन मुद्रेत असणार आहे.
 • दिल्लीतील मॅडम तुसाद संग्रहालयाचे सात भाग बनवण्यात आले आहेत तर रामदेव बाबांचा पुतळा फन अँड इंटॅरक्टिव्ह विभागातठेवण्यात येणार आहे.
 • तसेच नवी दिल्लीतील संग्रालयात सात विभागांमध्ये इतिहास, क्रीडा, संगीत, चित्रपट आणि राजकीय जगतातील लोकप्रिय 51 प्रभावशाली व्यक्तींचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आले आहेत.
 • सलमान खान, टॉम क्रूझ, राज कपूर, रणबीर कपूर. क्रीडा क्षेत्रातील मेरा कोम, डेव्हिड बॅकहम, मिल्खा सिंग आणि उसेन बोल्ट यांच्याबरोबरच कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांचाही समावेश आहे.
 • इतिहासातील भागात महात्मा गांधी, भगत सिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, एपीजे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश आहे.

24.जीडीपी आणि जीवनमानाचा दर्जा घसरणार :

 • जागतिक बँकेच्या अहवालानुसार हवामान बदलामुळे तापमानवाढ आणि मान्सूनवर परिणाम होऊन देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) मध्ये 2050 पर्यंत 2.8 टक्क्यांनी घटणार असून देशातील अर्ध्या लोकसंख्येच्या जीवनमानात घट होणार आहे.
 • जागतिक बँकेच्या ‘दक्षिण आशिया हॉटस्पॉट : तापमान आणि पर्जन्यमानातील बदलाचा जीवसृष्टीवरील परिणाम‘ या नावाने प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
 • अहवालानुसार भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांना हवामानातील बदलाचा फटका बसणार आहे. मागील सहा दशकांतील सरासरी तापमान वाढीच्या आधारावर बनविण्यात आलेल्या अहवालानुसार 2050 पर्यंत देशाच्या आतील भागातील तापमानात वाढ होणार असून किनारी प्रदेशातील तापमानात घट होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे.
 • तसेच अहवालानुसार मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथील राहण्यास अनुकुल परिस्थितीत 9 टक्क्यांची घट होईल. त्यापाठोपाठ राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक असेल.
 • देशातील अतिउष्ण जिल्ह्यात विदर्भातील 7 जिल्ह्याचा समावेश असेल. यात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, नागपूर, राज नांदगाव, दुर्ग समावेश असेल तर उरलेले 3 जिल्हे छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मधील असतील.

25.दीपिकाने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक :

 • भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत महिला गटात सुवर्णपदक जिंकले आहे.
 • तसेच दीपिकाने अंतिम फेरीत जर्मनीच्या मिशेली क्रोपेन हिला 7-3 असे पराभूत केले.
 • अशा प्रकारे तिने सहा वर्षांनंतर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तर 2011, 2012, 2013 आणि 2015 मध्ये झालेल्या विश्वचषकात तिने चार वेळेस रौप्यपदक जिंकले आहे.

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


26.21व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण :

 • 27 जुलै रोजी 21व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्राचे असेल असेल म्हटले जात आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी 1 तास 34 मिनिटांचा असेल. या काळात चंद्र अतिशय सुंदर अशा लालसर रंगात दिसेल.
 • वैज्ञानिकांनी या चंद्रग्रहणाला ब्लड मून (Blood Moon) असे नाव दिले आहे. हे ग्रहण भारताबरोबरच आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्य़ांना हानीकारक नसते, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
 • तसेच जाणून घेऊया सुपरमून, ब्लड मून आणि चंद्रग्रहणाबद्दलच्या काही खास गोष्टी पुढील प्रमाणे –
 • सुपरमून – चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी असते तेव्हा चंद्र जास्त प्रमाणात चमकतो, त्याला सुपरमून म्हणतात.
 • ब्लड मून – यात चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसतो. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा त्याच्यावर लाल रंगाची सावली पडते आणि तो लाल दिसतो. यालाच आपण ब्लड मून म्हणतो. असे तेव्हाच होते जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो. यातही सूर्याची लाल किरणे चंद्रापर्यंत पोहोचतात.
 • चंद्रग्रहण – जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही. सुर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सुर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सुर्यकिरण सुर्याच्या एका भागातून येतात.

27.सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन :

 • जागतिक बाजारात हळदीचे दर निश्चित करणाऱ्या सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
 • सांगलीच्या हळदीमध्ये असलेले विविध औषधी गुणधर्म, हळदीची इथे असलेली वैशिष्टय़पूर्ण बाजारपेठ, साठवणुकीसाठी नैसर्गिक पेवाचा वापर, रंग, गुणधर्म यामुळे हे भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
 • सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडेक्स:जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी प्रथम 2013 मध्ये मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडे केली होती. त्याचवेळी वर्धा जिल्ह्यतील वायगाव येथील शेतकऱ्यांनी वायगावी हळदीला जीआय मानांकन मिळविण्यासाठीही प्रस्ताव सादर केला होता.
 • वायगाव हे गाव 80 टक्के हळदीचे उत्पादन घेत आहे. त्या हळदीत करक्युमिनचे (औषधी गुणधर्म असलेला घटक) प्रमाण 6 ते 8 टक्के आहे. याच हळदीने इतर वाणांच्या हळदीला मागे टाकून जीआय मानांकन मिळविले होते. त्यामुळे सांगलीच्या हळदीचे जीआय मानांकन हुकले होते. नंतर सांगलीच्या हळदीचा फेरप्रस्ताव सादर झाला.
 • भारतातील 80 टक्के हळदीचा व्यापार सांगलीमधून होतो. देशातील दरही येथील बाजार समितीतील दरावरच अवलंबून असतो. केशरी रंग, पेवातील साठवणूक ही येथील हळदीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे, ‘सांगलीची हळद‘ म्हणूनच भौगोलिक मानांकन (जिऑग्राफिकल इंडेक्स-जीआय) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी मुंबईच्या ‘इंडियन पेटंट’ कार्यालयाकडे पुन्हा केली होती.

28.एकात्मिक जल आराखड्यास मान्यता :

 • राज्यातील महत्त्वपूर्ण अशा कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी खोऱ्यांच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य जल परिषदेच्या पाचव्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
 • राज्यातील सर्वच खोऱ्यांच्या एकत्रित एकात्मिक जल आराखड्याचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.
 • सह्याद्री‘ अतिथिगृहात झालेल्या या परिषदेच्या बैठकीस परिषदेचे उपाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी उपस्थित होते.
 • राज्यात गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्‍चिम वाहिनी नद्या व महानदी या सहा खोऱ्यांचा अभ्यास करून स्वतंत्रपणे जल आराखडे तयार करण्यात आले. यापैकी गोदावरी खोऱ्याच्या जल आराखड्यास 30 नोव्हेंबर 2017 रोजी मान्यता देण्यात आली होती, तर उर्वरित पाच आराखड्यांचे सादरीकरण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले.

29.भारत उपग्रह तंत्रज्ञान इतर देशांना शिकविणार :

 • ज्यांच्याकडे उपग्रह बांधणीची क्षमता व तंत्रज्ञान नाही अशा देशाच्या वैज्ञानिकांना उपग्रह तयार करण्याचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचे भारताने ठरविले आहे.
 • तसेच हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाईल. मात्र ज्यांना प्रशिक्षण द्यायचे त्या वैज्ञानिकांच्या निवडीत भारताची भूमिका असेल.
 • अशा प्रकारे भारताने प्रशिक्षित केलेल्या अन्य देशांच्या वैज्ञानिकांनी भविष्यात तयार केलेले उपग्रहउत्तम व सर्व चाचण्यांमध्ये उतरणारे असतील तर असे उपग्रह ‘इस्रो’ आपल्या अग्निबाणांनी अंतराळात सोडूनही देईल, असेही सिवान म्हणाले आहेत.
 • तसेच ‘अ‍ॅटॉमिक क्लॉक’चा विकास, छोट्या उपग्रहांसाठीची इंधनसामग्री आणि जिओ-लिओ ऑप्टिकल लिंक या संबंधी भारताने काही महिन्यांपूर्वीच इस्राएलश करार केला आहे.
 • तर परग्रहावर याने पाठविण्याच्या कार्यक्रमात सहकार्य करण्याचा करार मार्चमध्ये फ्रान्ससोबत केला गेला आहे.

30.जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट :

 • जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करायला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्यपाल राजवटीचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार होते. पण भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले.
 • राज्यातील इतर कोणत्याही महत्वाच्या पक्षाने सरकार स्थापण्यासाठी पीडीपीला पाठिंबा न दिल्यानेमुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यात सरकार स्थापण होण्याची स्थिती नसल्याने येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात यावी अशा शिफारशीचा अहवाल जम्मू-काश्मीरच्या राज्यापालांनी राष्ट्रपतींकडे पाठवला होता.
 • मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली. मात्र, कोणीही पीडीपीसोबत सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा न दर्शवल्याने अखेर राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवून दिला. यामध्ये त्यांनी राज्यघटनेच्या कलम 92 अन्वये जम्मू आणि काश्मीर राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा


31.शिक्षण, रोजगारासाठी ‘सारथी’ची स्थापना :

 • मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून, त्यानुसार मागासवर्गीय आयोगाची स्थापनादेखील केली आहे. तरीही आरक्षणाशिवाय मराठा समाजाला शिक्षण व रोजगार उपलब्ध करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था‘ अर्थात ‘सारथी‘ची स्थापना केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
 • सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बालचित्रवाणी येथे ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे’च्या दुमजली इमारतीच्या उद्‌घाटनानंतर ते बोलत होते.
 • ‘सारथी‘चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

32.एनएसजी कमांडोंचे ‘मिशन काश्मीर’ :

 • अमरनाथ यात्रेवर असलेले दहशतवादी हल्ल्याचे सावट तसेच जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवाया लक्षात घेऊन ‘ब्लॅक कॅट कमांडो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल सेक्युरिटी गार्ड्सची (एनएसजी) एक तुकडी काश्मिरात रवानाकरण्यात आली आहे.
 • जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून या मोहिमेत खास प्रशिक्षित ब्लॅक कॅट कमांडोंना उतरवण्यात येणार आहेत. या कमांडोंची नियुक्ती काही कालावधीसाठी असेल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.
 • तसेच याबाबतचा निर्णय आधीच केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. काश्मिरात कमांडो पथक दाखल झाल्यानंतर हे सर्वात आधी त्यांना खडतर प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली जाणार आहे. जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्या मोहिमांमध्ये हे पथक भाग घेईल.

33.उत्तराखंडच्या रणजी संघाला बीसीसीआयची मान्यता :

 • आगामी वर्षांत भारतीय स्थानिक क्रिकेटला आणखी एक सदस्य मिळणार आहे. बीसीसीआयने उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता दिली आहे. यासोबत उत्तराखंडची 18 वर्षांची तपस्या अखेर फळाला आली आहे.
 • उत्तराखंडमधील क्रिकेटची प्रगती पाहण्यासाठी बीसीसीआयने 9 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. अलीकडेच पार पडलेल्या बीसीसीआयच्या बैठकीत क्रिकेट प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी उत्तराखंडच्या रणजी संघाला मान्यता मिळण्याबाबतच्या वृत्ताला होकार दर्शवला आहे.
 • तसेच याआधी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड आणि मेघालय या 5 राज्यांनी आगामी रणजी करंडक स्पर्धेत आपला स्वतंत्र संघ उतरवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात रणजी क्रिकेट स्पर्धा रंगतदार होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

34.संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर :

 • मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.
 • अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.
 • 47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. या परिषदेत अमेरिकेला नुकतेच दीड वर्ष पूर्ण झाले होते.

35.देशाचे मुख्य आर्थिक सल्लागाराचा पदावरून पायउतार :

 • देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम हे आपल्या पदावरून पायउतार होत असल्याची मोठी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगच्या माध्यमातून केली.
 • अरविंद सुब्रमण्यम यांनी ऑक्टोबर 2014 मध्ये मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून रघुराम राजन यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला होता. परंतु, सरकारने त्यांचा एक वर्षाचा कालावधी वाढवला होता.
 • जेटली यांनी ‘थँक यू अरविंद‘ या मथळ्याखाली फेसबुकवर ब्लॉग पोस्ट केला आहे. ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार कुटुंबाला पुरेसा वेळ देण्यासाठी अरविंद अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकेला माघारी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
 • The theme this year was “Yoga for Peace”. …
 • Most improved aspirational districts: Dahod (Gujarat, rank: 1st), West Sikkim district (Sikkim, 2nd). Ramanathapuram district (Tamil Nadu, 3rd) and Vizianagaram (Andhra Pradesh, 4th) and YSR Kadapa district (Andhra Pradesh, 5th).

  सिम्पलीफाईड डायरी साठी येथे क्लिक करा

….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat