नोकरीची संधी-4 (24 जून 2016)

0
909
Print Friendly, PDF & Email

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध पदांच्या १५७ जागा

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये प्रोफेसर-कम-प्रिन्सिपल (नर्सिंग) (१ जागा), ऑफिसर इन्चार्ज (डिस्पेंसरी) (१ जागा), सायंटिफिक ऑफिसर ‘सी’ (सेंटर फॉर कॅन्सर इपीडेमिओलॉजी) (२ जागा), ज्युनिअर पर्चेस ऑफिसर (१ जागा), ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (२ जागा), नर्स ‘ए’ (१३७ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (मायक्रोबायोलॉजी) (१ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (पॅथॉलॉजी) (१ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (बायो-केमिस्ट्री) (१ जागा), स्टेनोग्राफर (१ जागा), ज्युनिअर असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर (४ जागा), ज्युनिअर फायर सुपरवायझर (२ जागा), टेक्निशियन ‘ए’ (मेकॅनिकल) (२ जागा), टेक्निशियन ‘ए’ (इलेक्ट्रिकल) (१ जागा) अशा एकूण १५७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०१६ आहे. अधिक माहिती http://tmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये अनुसुचित जमाती/इमावकरिता विशेष भरती मोहिम (३ जागा)

टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (मेडिकल रेकॉर्डस) (१ जागा), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (रेडिओ डायग्रॉसिस) (१ जागा), स्टेनोग्राफर (१ जागा) अशा एकूण ३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०१६ आहे. अधिक माहिती http://tmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अलिबाग जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयामध्ये कंत्राटी न्युट्रीशन कौन्सिलर (01) आणि वैद्यकीय अधिकारी (01) या पदासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीसाठी 29 जून 2016 रोजी सकाळी 10 वाजता मूळ कागदपत्रासह उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी २१ जून रोजीचा मुंबई सकाळचा अंक पहावा.

ठाणे महापालिकेत विविध पदांच्या 231 जागा

ठाणे महापालिकेत आरोग्य विभागात कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी (07), स्टाफ नर्स (83), एएनएम (69), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (24), औषध निर्माता (14), डाटा इंट्री ऑपरेटर कम अकौटंट (03), अटेंडंट (31) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2016 अशी आहे. अधिक माहितीसाठी www.thanecity.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

बीएसएफमध्ये पॅरा मेडिकलच्या 19 जागा

बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (बीएसएफ) पॅरा मेडिकलच्या स्टाफ नर्स (03), फार्मासिस्ट गुणवत्ताधारक (15) मसालची(01) साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा किंवा 18 जूनचा मुंबई सकाळचा अंक पहावा.

बीएसएफमध्ये विविध पदाच्या 622 जागा

बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (बीएसएफ) सहायक फौजदार (एएसआय)(152) आणि हेड कॉन्स्टेबल (एचसी) (470) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 16 जून ते 15 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.bsf.nic.in आणि http://bsf.nic.in/en/recruitment.html या वेबसाईटवर संपर्क साधावा.

सिडकोमध्ये विकास अधिकारी पदाच्या 25 जागा

सिडको या नगर नियोजन व पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील अग्रगण्य महामंडळामध्ये विकास अधिकारी (10) व सहायक विकास अधिकारी (15) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी 21 जून ते 5 जुलै 2016 असा आहे. अधिक माहितीसाठी www.cidco.maharashtra.gov.in ही वेबसाईट 21 जूनला उपलब्ध होणार आहे.

बृहन्मुंबई महापालिकेत कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या 322 जागा

बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी विभागाच्या आस्थापनेवर कंत्राटी महिला आरोग्य स्वयंसेविकांच्या 322 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. 20, 21, 22, 23, 27 व 28 जून 2016 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत होणार आहे. याविषयीची जाहिरात दि. 15 जून 2016 च्या मुंबई लोकसत्ताच्या अंकात आली आहे.

राज्य आदिवासी विकास सहयोगी पदाच्या 18 जागा

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागात राज्य आदिवासी विकास सहयोगी या पदाच्या (18) जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा दि. 10 जुलै 2016 आहे. अधिक माहिती यशदा व आदिवासी विभागाच्या संकेतस्थळावर शिवाय http://www.geexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY