सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजेच CSAT चा पेपर कसा सोडवावा

26
8103
Mpsc csat
Print Friendly, PDF & Email

textgram_1460203606राज्यसेवा पूर्व परीक्षा

सामान्य अध्ययन  पेपर 2 म्हणजेच CSAT चा पेपर कसा सोडवावा

 

#या पापेरमध्ये प्रत्येकी 2.5 गुण असलेले 80 प्रश्न विचारले जातात.बरोबर उत्तराला 2.5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या  उत्तराला 0.83 गुण वजा होतात.जास्तीत जास्त गुण घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते

 

#पेपरला 2 तसाचा अवधी असल्याने वेळ प्रश्नांची कठिण्यपातळी पाहता खूप कमी आहे, म्हणजेच या पेपर मध्ये जास्तीतजास्त मार्क मिळवण्यासाठी वेळ आणि अचूकतेला महत्व देणे गरजेचे आहे.

 

# माझ्या मते पेपरचे आतापर्यंतचे स्वरूप पाहता 55 ते 65 च्या दरम्यानचा attempt हा चांगला attempt राहील.

 

# या पेपर चे आपण विषयानुसार 3 प्रकारात वर्गीकरण करूया

1)प्रकार पहिला– उताऱ्यावर आधारित प्रश्न म्हणजेच आकलनावरील प्रश्न.यावर 50 प्रश्न विचारले जातात

2)प्रकार दुसरा-निर्णय क्षमतेवर आधारित प्रश्न. या प्रश्नांना negtive गुण नसतात.यावर 5 ते 6 प्रश्न विचारले जातात.हे प्रश्न सर्वात सुरवातीला घ्यावेत.

3)प्रकार तिसरा-यामध्ये राहिलेले अंकगणित,बुद्धिमत्ता,लॉजिकल reasoning, माहितीचे पृथकरण इत्यादी प्रश्नप्रकार यामध्ये सांगता येतील.

 

# या पेपर मध्ये एकूण 80 प्रश्न आहेत वेळ 120 मिनिटे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 90 सेकंद याप्रमाणे वेळ मिळतो पण लक्षात असू द्या कि हा पूर्ण पेपर सोडवण्याच्या फ़ंदात पडू नका. समज 65 प्रश्न सोडवायचे म्हटले तरी प्रत्येक प्रश्नाला 110 सेकंद मिळतील.त्यामुळे घाई न करता अचुकतेवर भर द्या.

 

# उतारा सोडाविताना प्रथम उतारा काळजीपूर्वक , एकाग्रचित्ताने वाचा व महत्त्वाच्या शब्दाना , ओळींना , अधोरेखित करा . कोणत्याही परिस्थितीत प्रश्न अगोदर वाचू नका.प्रश्न काळजीपूर्वक वाचा जसे की खालीलपैकी विधान तुम्हाला ‘सत्य’ की ‘ असत्य’ ओळखायचे . त्यामुले त्याखाली अधोरेखित करा घाईघाईत उत्तरे देऊ नका .एकाग्रचित्ताने उतारा व त्याखालील प्रश्न वाचा .CSAT पेपरचे passages हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असतात .परंतु सोडविताना तुम्हाला जी भाषा सोपी वाटते त्या भाषेत उतारा सोडावा . काही वेळेस एखादा शब्द समजत नसेल तर भाषांतराच्या दुसऱ्या भाषेतून पहावा.

 

# गणित,बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक आकडेमोड करा. प्रत्येक विधान काळ्जीपूर्वक वाचा.प्रश्न जो विचारला आहे त्याचेच उत्तर द्या.

# कठिण्यपातळीचा विचार करता प्रश्नांचे 3 प्रकारात वर्गीकरण करता येईल.प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळ्या असू शकतात.

1)प्रकार पहिला-कमी काठिण्य पातळी असलेले प्रश्न.याची उत्तरे लगेच मिळतात.हे प्रश्न चुकायला नको.हे प्रश्न सोडवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.असे प्रश्न प्रश्नपत्रिकेत कमी असतात.

2)प्रकार दुसरा-मध्यम कठिण्यपातली असणारे प्रश्न.या प्रश्नांची संख्या सर्वाधिक असते.हे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.यातील जे प्रश्न वेळखाऊ असतात ते प्रश्न सोडवायला नको.या प्रश्नांपैकी ज्या गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्नांची तुम्ही तयारी केली असेल ते प्रश्न सोडवावेत.ज्या प्रश्नांची तयारी केली नाही ते सोडवू नका.

3)प्रकार तिसरा-जास्त कठिण्य पातळी असणारे प्रश्न.हे प्रश्न वेळखाऊ आणि काठीण असतात.असे प्रश्न सोडवायचे नाहीत. असे 10 ते 15 प्रश्न असतात.ज्यांनी अशा प्रश्नांची तयारी केली असेल अथवा कमी वेळात सोडवू शकतात त्यांनी हे प्रश्न सोडवले तर चालेल.

# हा पेपर 1 अथवा 2 फेरीत सोडवा

1) फेरी क्रमांक 1– या पेपर मध्ये प्रथम निर्णय क्षमतेचे म्हणजेच decision मेकिंग चे प्रश्न प्रथम घ्या.त्यानंतर आकलनाचे उतारे घ्या.कारण असे कि आकालनावर 50 प्रश्न असतात.सर्व आकळणाचे उतारे क्रमाने सोडवा.त्यानंतर गणित बुद्धिमत्ताचे सोपे प्रश्न घ्या.

2) फेरी क्रमांक 2-गणित बुद्धिमत्ताचे थोडे अवघड प्रश्न घ्या.

 

# या पेपर साठी काही महत्वाच्या सूचना

१ :stable mind असायला हवे.

२ : कोणतेही दडपण असू नये

३ : कोणत्याही बाह्य गोष्टी (गोंगाट, परिक्षा हॉलमधील   चर्चा ) या मुळे disturb होऊ नका

४ : प्रथम परीक्षा पेपर सोडवताना decision making व नंतर Comprehension घ्या.

५ :घाई – गडबड न करता शांततेने पेपर सोडवा .

६ : वेळेचे भान ठेवा.

७. Silly  mistake टाळा.

८.सोबत कानात टाकण्यासाठी कापसाचे बोळे घेऊन जावा.

९. पहिला पेपर संपल्यानंतर कसलेही वाचन करू नका.शांत राहण्याचा प्रयत्न करा. थोडीसी विश्रांती घेतली तर आणखी उत्तम. गणिताची सूत्रे पाठ करण्याच्या फंदात पडू नका.

१०.अवघड प्रश्न असेल तर पुढील प्रश्नाकडे जावा.

 

ऑल the बेस्ट 

 

लक्षात घ्या एक – एक मार्क महत्त्वाचा आहे त्यामुळे नाशिबावर सोडू नका . जर एखादया प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुढील प्रश्नाकडे जावा परंतु कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या उत्तराचा पर्याय निवडू नका त्याचप्रमाणे त्या प्रश्नाकडे जो सोडविला नाही त्याकडे परत येऊ नका..

 

डॉ. अजित प्रकाश थोरबोले

 

26 COMMENTS

  1. हि माहिती 100% फायदेशिर, परिक्षा पास होणयात या माहितीचा मोलाचा वाटा असणार आहे़.

  2. Sir congratulations on transfer of site over WordPress and custom domain and Thank you very much for sharing deep information which helps every needy fellow ou there.
    Blessed nandedian :).

LEAVE A REPLY