राज्यसेवा परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 1 सोडवावा

19
17147
Print Friendly, PDF & Email
textgram_1460201059राज्यसेवा पूर्व परीक्षा
सामान्य अध्ययन  पेपर 1 कसा सोडवावा# या पापेरमध्ये 100 प्रश्न विचारले जातात.बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या  उत्तराला 0.66 गुण वजा होतात.जास्तीत जास्त गुण घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते# पेपरला 2 तसाचा अवधी असल्याने वेळ खूप आहे,परंतु या पेपर मध्ये जास्तीतजास्त मार्क मिळवण्यासाठी वेळेपेक्षा अचूकतेला महत्व देणे गरजेचे आहे.

# माझ्या मते पेपरचे आतापर्यंतचे स्वरूप पाहता 65 ते 75 च्या दरम्यानचा attempt हा चांगला attempt राहील.

# साधारणतः या पेपरमध्ये 3 प्रकारचे प्रश्न सांगता येतील.
1) प्रकार पहिला-असे प्रश्न ज्यांची उत्तरे आपल्याला अचूक माहित असतात.अशा प्रश्नांची उत्तरे न चुकता लगेच उत्तरपत्रिकेत चिन्हांकित करावी.
उदा -2014 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पूर्व घाट आणी पश्चिम घाट एकमेकांना कुठे मिळतात याचे उत्तर अचूक माहित असते उत्तर-निलगरी पर्वत
2015 च्या प्रश्नपत्रिकेतील कार्बनमुक्त पहिले राज्य-हिमाचल प्रदेश,सुवर्ण क्रांतीचा संबंध-फुलोत्पादन
हे सोपे प्रश्न मानता येईल.

2016 च्या पेपर मधील पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हा प्रश्न

(प्रत्येकाचे असे प्रश्न वेगवेगळे असू शकतात)

 

2) प्रकार दुसरा-असे प्रश्न ज्यांबद्दल आपण वाचलेलं असते परंतु अचूक पर्याय सांगता येत नाही.अशा प्रश्नात दिलेल्या विधानांपैकी एक विधान माहित असते तर दुसरे विधानाबाबत संदिग्धता (confusion) असते.याची उत्तरे काळजीपूर्वक द्यावी.घाई अजिबात करू नये.या प्रश्नात रिस्क घ्यावी लागते.
उदा-2014 च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न तिज हा सण कोणत्या देवतेस समर्पित आहे हे विधान 10वी च्या भूगोलाच्या पुस्तकात वाचले आहे परंतु पार्वती कि लक्ष्मी यामध्ये संदिग्धता आहे.
2015 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तसुनामी म्हणजे बंदर लाट कि राक्षसी लाट यामधील संदिग्धता 2016 सिंधू संस्कृतीच्या वेळी कोणता पाळीव प्राणी होता

3) प्रकार तिसरा-असे प्रश्न कि ज्याबद्दल आपल्या कधीहि वाचनात आले नाही.त्यांची उत्तर देणे कधीही शक्य नाही.असे 15 ते 25 प्रश्न असतात.असे प्रश्न कधीही सोडवायचे नाहीत.अशा प्रश्नांच्या क्रमांकाला गोल करावे.गोल म्हणजे ‘danger mark’.
उदा.2014 च्या प्रश्नपत्रिकेतील सिलिकॉन व्हॅली बद्दलचा प्रश्न
2015 च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वालचंद उदोगसमूहाने स्वातंत्रपूर्व काळात कोणत्या उदोगसमूहाचि स्थापना केली?
रामन मॅगसेसे कोणत्या वर्षी विमान दुर्घटनेत मरण पावले?

2016यामध्ये विविध वाक्य आणि त्यांचे संदर्भ विचारलं गेले होते

वरील 3 प्रकारे आपल्या प्रश्नपत्रिकेत वर्गीकरण करता येईल.प्रत्येकाची प्रश्नांची वर्गवारीत त्यांच्या अभ्यासानुसार संख्या वेगवेगळी असणार.

# पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यँत पोहचणे याला आपण एक फेरी मानू. पूर्ण 2 तासात अशा किमान 3 फेऱ्या पूर्ण व्हायला हव्या.आता प्रत्येक फेरी मध्ये काय करायचे ते पाहू
1) फेरी क्रमांक 1-यामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे तंतोतंत माहित आहेत त्यांची उत्तरे केवळ चिन्हांकित करा.ज्या  प्रश्नाबद्दल आपण कधीहि काहीही वाचलेलं नाही,त्या प्रश्नांच्या क्रमनकाला गोल करा.असे प्रश्न कधीही सोडवायचे नाहीत.
गोल करणे म्हणजे असे प्रश्नांना कधीही पाहायचे नाही.ज्या प्रश्नबद्दल संदिग्धता आहे असे प्रश्नाची उत्तरे या फेरी मध्ये द्यायची नाहीत.ज्या विधानाबाबत संदिग्धता आहे त्यापुढे ? असे चिन्ह करून पुढील प्रश्नाकडे जावे.
2) फेरी क्रमांक 2-या फेरी मध्ये ज्या प्रश्नबाबत संदिग्धता आहे ते प्रश्न सोडवायचे.या फेरीला रिस्क घेण्याची फेरी पण मानता येईल.पण कुठे risk घ्यायची हे पण कळायला हवे.अतिशय काळजीपूर्वक त्या प्रश्नाबद्दल विचार करून उत्तरे द्यावी.काही प्रश्नात आणखी संदिग्धता असेल तर तो प्रश्न पुढील फेरीमध्ये न्यावा.
3) फेरी क्रमांक 3-शेवटचे राहिलेले संदिग्धता असलेले प्रश्न या फेरीत सोडवावे.जर असे वाटत असेल कि,हा प्रश्न सोडवून उत्तर आपले चुकणार आहे.असे प्रश्नाच्या क्रमांकाला गोल करावे.लक्षात घ्या या फेरीत ज्या प्रश्न क्रमांकाला गोल केले आहे.ते प्रश्न सोडवायचे नाहीत.

# अशा पद्धतीने हा पेपर 3 फेऱ्यामध्ये सोडवावा.हा पेपर सोडवताना खालील बाबी पाळा
1) प्रश्न काळजीपूर्वक वाचा
2) घाईघाईने उत्तर देऊ नका.त्यामुळे silly चूका टाळता येतात.
3) प्रत्येक प्रश्न सोडवताना त्याच प्रश्नावर लक्ष द्या.त्यामुळे उत्तर सापडेल.आणखी माझे खूप प्रश्न राहिले आहेत हा विचार मनात येऊ देऊ नका.
4) एखादा प्रश्न अवघड वाटत असेल तर,पेपर अवघड आहे हा विचार मनात येऊ देऊ नका.कारण तो प्रश्न सर्वांसाठीच अवघड असतो.त्याचा परिणाम पुढील सोप्या प्रश्नावर होऊ शकतो.पेपर चालू असताना 1 सेकंदही आत्मविश्वास गमवायला नको.
5) पेपरच्या अगोदर त्या दिवशी कसलाही अभ्यास करू नका.100 च प्रश्न असतात.मुख्य परिक्षेप्रमाणे  अभ्यासक्रम हा well defined नसल्यामुळे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
6) बाकीचे लोंकानी 100 प्रश्न सोडवतील आणि मी मात्र 70 च  प्रश्न सोडवले आहेत त्यामुळे मी fail होईल मीपण सर्वच प्रश्न सोडवणार असा विचार करू नका.
7) पेपरला वेळेवर पोहचा.
8) मी परीक्षा पहिल्यांदाच देत आहे,माझे कसे होणार असा विचार  मनात येऊ देऊ नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
9) आदल्या रात्री पुरेशी झोप घ्या.
10) परीक्षा केंद्र जर दूर असेल तर तेथे जवळ राहण्याचा प्रयत्न करा.
11) टेन्शन घेऊ नका.सकारत्मक विचार करा.
12) सोबत ओळखपत्र घेऊन जा.

“लक्षात असू द्या परीक्षा हि तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे.”

 
ऑल the बेस्ट 
 
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी तथा अप्पर तहसीलदार,नांदेड

19 COMMENTS

  1. Ajit sir. ….The way u have chosen to guide the mpsc aspirant is far more important /valuable than any other social servant. …….✌👏

LEAVE A REPLY