CSAT ची तयारी

10
18635
Print Friendly, PDF & Email
CSAT ची तयारी


* राज्यसेवा (पूर्व ) परीक्षेत उमेदवारांची ‘योग्यता ‘तपासण्यासाठी या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे.
* पूर्व परिक्षेत दोन्ही विषयास प्रत्येकी २००मार्कस असतात .परंतु CSAT  परिक्षेचे प्रश्न फिक्स  प्रकारचे असतात परंतु सामान्य अध्ययन  I पेपरमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयात सर्वाधिक मार्क पडू शकतात . त्यामुळे या वर दररोज ठरावीक वेळ देणे गरजेचे आहे.

* CSAT ला मराठीत ‘सामान्य क्षमता चाचणी ‘असेही म्हणतात .पूर्व परिक्षेत या विषयाला २०० मार्कासाठी ८० प्रश्न विचारले जातात.साधारणपणे  १ प्रश्नाला ९० सेंकद मिळतात.त्यामुळे अचुकता आणि वेळ याचा ताळमेळ बसवणे गरजेचे आहे.

Home

* यामध्ये खालील विषय समाविष्ट होतात .
(1) Comprehension (आकलन क्षमता)
(2) Interpersonal skills including communication skills.(परस्पर संवादासह आंतर्व्याक्ती संवाद कौशल्ये)
(3) Logical reasoning and analytical ability. (तार्किक व विश्लेषण क्षमता)
(4) Decision – making and problem – solving. (निर्णय निर्धारण व समस्येचे निराकरण)
(5) General mental ability (सामान्य बौद्धिक क्षमता)
(6) Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level),                           Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc.- Class X level)                                   (पायाभूत अंकगणित & माहितीचे पृथ्थकरण)
(7) Marathi and English Language Comprehension skills (Class X/XII level).(मराठी व इंग्रजी भाषिक आकलन कौशल्य)

Home

* यामधील विषयात Comprehension म्हणजेच ‘आकलन ‘या विषयावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात . मागील तीन वर्षाच्या MPSC च्या पूर्व परिक्षेत ४५ते ५० प्रश्न या विषयावर विचारले गेले आहेत यातून त्यावर सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे .

http://ajitdc.blogspot.in/

* शालेय परिक्षामध्ये passage च्या धर्तीवर हा Comprehension आहे परंतु यांची काठिण्यपातळी व प्रश्नाचा प्रकार वेगळा आहे.

Home

* Comprehension मध्ये विचारले जाणारे passage  हे विविध विषयावर आधारित असतात जसे की , भूगोल , पर्यावरण, समाजशास्त्र ,अर्थशास्त्र , विज्ञान तंत्रज्ञान , तत्त्वज्ञान या विषयावर आधारित असतात . त्यामुळे सामान्य अध्ययन-१चा अभ्यास काळजीपूर्वक केला तर फायदा होतो . त्याच बरोबर विविध मराठी वर्तमानपत्रामधील संपादकीय लेख पुरवण्यामधील या विषयावर आधारित लेख वाचण्याचा नक्कीच फायदा होतो.

Home

*  Comprehension सोडविताना तुमच्या वाचनाची गती अधिक असणे गरजेचे आहे परंतु गतीबरोबर त्या उताऱ्याचे आकलन चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे .सराव केल्याने ‘गती’ व ‘आकलन’ क्षमता वाढवता येऊ शकते यासाठी दररोज ३-४ उतारे सोडविणे गरजेच आहे . आपण कुठे चुकतो हे तपासायला हवे आणि त्यावर कार्य करायला हवे .

* उतारा सोडाविताना प्रथम उतारा काळजीपूर्वक , एकाग्रचित्ताने वाचा व महत्त्वाच्या शब्दाना , ओळींना , अधोरेखित करा . कोणत्याही परिस्थितीत प्रश्न अगोदर वाचू नका.

*  प्रश्न काळजीपूर्वक वाचा जसे की खालीलपैकी विधान तुम्हाला ‘सत्य’ की ‘ असत्य’ ओळखायचे . त्यामुले त्याखाली अधोरेखित करा घाईघाईत उत्तरे देऊ नका .एकाग्रचित्ताने उतारा व त्याखालील प्रश्न वाचा .

* बरेच उमेदवार हे comprehension मध्ये मागे पडतात . काहीचे प्रश्नाची उत्तरे चुकतात , काहीचे वेळेचे नियोजन चुकते तर काही ना उतारा समजत नाही तर त्यांनी उताऱ्याचे वाचन म्हणजेच पर्यायाने आकलन एकाग्रपणे केले तर चुका कमी होतात व accuracy अचूकपणा वाढेल . दररोज सरावाने वेळेचे नियोजन करता येऊ शकते यासाठी वाचनाची गती वाढविणे गरजेचे आहे . उतारा समजण्यासाठी ‘Reading between the lines ‘वाचणे गरजेचे आहे .
उदा : उताऱ्यामध्ये जर कर्नाटकमध्ये वाघांची संख्या मध्ये भारतात पहिला क्रमांक येतो याचा अर्थ असा होतो
१ : इतर कोणत्याही राज्यापेक्षा कर्नाटक मध्ये वाघांची संख्या जास्त आहे .
२ :याचा अर्थ मात्र असा होत नाही की , वाघांची घनता कर्नाटकमध्ये जास्त आहे .
३ :याचा अर्थ असाही होत नाही की नर अथवा मादी वाघांची संख्या कर्नाटक मध्ये जास्त आहे .
४ :याचा अर्थ असाही होत नाही की कर्नाटकातील लोक वाघांची निगा चांगल्या प्रकारे राखतात.
अशा प्रकारे ‘Reading between the lines’ वाचायला हवे .

 

* CSAT पेपरचा सराव करताना passages चे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असतात .परंतु सोडविताना तुम्हाला जी भाषा सोपी वाटते त्या भाषेत उतारा सोडावा . काही वेळेस एखादा शब्द समजत नसेल तर भाषांतराच्या दुसऱ्या भाषेतून पहावा.

* सरावासाठी मागील UPSC, MPSC च्या CSAT च्या पेपरमधील उतारे CDS पेपरमधील उतारे , विविध प्रकाशनाच्या पुस्तकातील उताऱ्याचा आधार घ्या आणि दररोज improvement कर.

*साधारणत: एका उताऱ्यावर 5 प्रश्न विचारले जातात . एक उतारा 8 मिनीटात पूर्ण होणे गरजेचे आहे . त्याचप्रमाणेtimeलावून उतारे सोडवा .

Home

* गणित , बुद्धिमत्ता ,अंकगणित या विषयावर साधारणत 25 ते 3Oप्रश्न विचारले जातात यातील एक – एक विषय घेऊनdaily सराव करा . त्याचबरोबर आणखी 4 महिने कालवधी असल्याने दुर्लक्ष न करता जरी हे विषय अवघड वाटत असले तरी त्यावर सतत प्रयत्न करून हे विषय सोपे बनवता येतील परंतु कसल्याही परिस्थितीत हे विषय optional वर टाकू नका .सरावाने व सकारात्मक विचाराने कृती केली तर कोणताही विषय सोपा होऊ शकतो .

* अंकगणित ,माहितीचे पृथ्थकरण यांची काठिण्य पातळी हे इयत्ता १०वी पर्यतची आहे त्यामुळे कोणतेही भिती न बाळगता त्या विषयाची daily तयारी काही तरी नवीन शिकायला मिळेल या भावनेने त्याचप्रमाणे परिक्षेत यश मिळवायचे आहे या प्रेरणेने करावे

*‘Decision making’ हा एक महत्त्वाचा विषय उमेदवारांना चांगले मार्क देऊ शकतो यावर साधारणत: 5 ते 7 प्रश्न विचारले जातात . याला सरावाने चांगले मार्क पडू शकतात.

* CSAT चे प्रश्न सोडविताना घाई अजिबात करू नका लक्षात घ्या ही पुस्तकाची परिक्षा नसून तुमच्या योग्यतेची परिक्षा आहे . त्यामुळे कोणत्या पुस्तकातून प्रश्न येतात यापेक्षा तुम्ही स्वतःला कशा तयार करता हे महत्त्वाचे आहे .

* CSAT साठी विविध classes तर्फे Test series आयोजित केल्या जातात त्या test series लावा कारण सराव होतो . त्याचबरोबर वेळेचे नियोजन जमते . आपण कोठे मागे पडतो ते माहित होते परंतु या सराव परिक्षेत आपण कुठे कमी पडतो त्यावर परिश्रम करायला हवे

 
* लक्षात घ्या एक – एक मार्क महत्त्वाचा आहे त्यामुळे नाशिबावर सोडू नका . जर एखादया प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पुढील प्रश्नाकडे जावा परंतु कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या उत्तराचा पर्याय निवडू नका त्याचप्रमाणे त्या प्रश्नाकडे जो सोडविला नाही त्याकडे परत येऊ नका..
*CSAT च्या पेपर मध्ये       pre-plan जाऊ नका की , मी परीक्षेत अमुक एवढेच प्रश्न सोडविणार.तर परिक्षेच्या काठिण्यपातळीनुसार तुम्ही प्रश्न सोडवा . मागील ३ वर्षाच्या पश्नपत्रिकेनुसार 50 ते 65प्रश्न दरम्यान जर प्रश्नाचा attempt असला तरी पुरेसा आहे . सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्याची गरज नाही परिक्षेत मात्रsufficient attempt असावा माझ्या मते 60 ते 70 च्या दरम्यान अचूकतेचा attempt योग्य राहील .
#CSATचा पेपर सोडविताना ही काळजी घ्या …
  १ :stable mind असायला हवे.                     
  २ : कोणतेही दडपण असू नये
  ३ : कोणत्याही बाह्य गोष्टी (गोंगाट, परिक्षा हॉलमधील चर्चा ) या मुळे disturb होऊ नका
  ४ : प्रथम परीक्षा पेपर सोडवताना decision making व नंतर Comprehension घ्या.
  ५ :घाई – गडबड न करता शांततेने पेपर सोडवा .
६ : वेळेचे भान ठेवा.
  ७. Silly  mistake टाळा.
  ८.दररोज सराव करा.
All the best!
 
आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.

@या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी
 
 
 
 
 
 
 
SHARE
Previous articleRadio news 12 August 2016
Next articleRadio news 13 August 2016
मी अजित प्रकाश थोरबोले.मी मुळचा माढा,तालुका-माढा,जिल्हा-सोलापुर आहे.२०१४ च्या batch मध्ये माझी उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.सध्या मी नांदेड येथे परी.उपजिल्हाधिकारी या पदावर कार्ययत आहे.

10 COMMENTS

  1. सर प्लिज राज्यसेवा mains साठी इंग्रजी व मराठी या विषयाच्या पेपर साठी संदर्भ पुस्तके सुचवा

LEAVE A REPLY