चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा?

14
20476
Print Friendly, PDF & Email

चालु घडामोडीचा अभ्यास कसा करावा?(महाराष्ट्रात  होणार्या विविध स्पर्धा परीक्षा-राज्यसेवा,Forest,Agricuture,Engineerung PSI,STI,ASSISTANT, तलाठी,पोलिस,ग्रामसेवक आणि विविध  interview साठी उपयोगी 

             

                              

                                   

 •   राज्य सेवेच्या पूर्व,मुख्य आणि मुलाखती या तिन्ही टप्यावर चालु घडामोडीवर प्रश्न विचारले जातात या प्रश्नांना अतिशय महत्व आहे.नुकत्याच झालेल्या upsc पूर्व परीक्षेत 70 टक्के भर हा चालू घडामोडीवर होता

 •  पूर्व परिक्षेच्या सामान्य अध्ययन -1 मध्ये चालु घडामोडी या विषयाचा अंतर्भाव आहे. यावर साधारणतः 8 ते 10 प्रश्न विचारले जातात बऱ्यापैकी यातील प्रश्न आपण वाचलेपैकी असतात.     
 •   राज्यसेवा मुख्य परिक्षेत चालु घडामोडी नावाचा कोणताही विषय अंतर्भित नाही परंतु चारही GS-1, GS-2, GS-3 आणि GS-4 या चारही विषयाच्या अभ्यासक्रमाच्या वरती आयोगाने एक टीप दिली आहे. “उमेदवारांनी खाली नमुद केलेल्या विषयातील/उपविषयातील अद्यावत व चालु घडामोडीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे .

 •   म्हणजेच पूर्व आणि मुख्य परिक्षेत चालु घडामोडीची खुप महत्व आहे. चालु घडामोडीसाठी वर्तमानपत्र, मासिके वेबसाईटसचा वापर करायला हवा. मागील परिक्षेत कशा पध्दतीने यावर प्रश्न विचारले गेलेत याचे विश्लेषण करा.

 •  चालु घडामोडीसाठी एक वेगळी वही करा आणि त्या वहीचे वेगवेगळ्या विभागात वर्गवारी करा.
  • जसे– आर्थिक चालु घडामोडी, राजकीय चालू घडामोडी. पर्यावरण चालु घडामोडी, भौगोलीक चालु घडामोडी इत्यादी.

 • पूर्व परिक्षा आणि मुख्य परिक्षेकरिता वेगळी वही करा.

 

 • चालु घडामोडीसाठी दररोज ठराविक वेळ द्या. 1 तासापेक्षा जास्त वेळ देण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर ग्रुपमध्ये वर्तमानपत्रे, मासिके वाटुन घेतली तर जास्तीत जास्त माहिती उपलब्ध होते. नुकतेच GST विधेयक पारित झाले तर त्या विध्याकातील तरतुदी,अंकी कोणत्या देशात अशी करप्रणाली आहे.प्रथम कोणत्या देशात सुरु झाली.कोणत्या राज्याने प्रथम हे विधेयक पारित केले.इत्यादी

 • चालु घडामोडीचा नोटस्‌ मध्ये बारीकसारीक माहिती असायला हवी. त्याचबरोबर चालु घडामोडीला पाठीमागील व पुढील संदर्भ पण असायला हवे.

(उदा. जागतिक पर्यावरण परिषद यावर्षी पॅरीसमध्ये पार पाडली. तर त्याठिकाणी घेतले गेलेले निर्णय पाठीमागच्या पार पडलेल्या सर्व परिषदांचा थोडक्यात लेखाजोखा पण त्यामध्ये असायला हवे. त्याचबरोबर भविष्यातील होणाऱ्या परिषदाचाही यामध्ये समावेश असावा. )

 •   अचुक आकडेवारी तुमच्या नोटस्‌मध्ये असायला हवी कारण आकडेवरी सतत बदलत असते. यावर तुमचे लक्ष असायला हवे. राज्यसेवेच्या मागील परिक्षेतील अनभवावरून आकडेवारी जास्त विचारली जाते.
  • (उदा. नुकत्याच upsc पूर्व परीक्षेत मंगल ग्रहावर यान पाठवणारा भारत कितवा देश?astrosat किती वजनाचा आहे?भारत आफ्रिका परिषद किटवी?शाश्वत विकास उद्दिष्ट्ये कधीपर्यंत सध्या करायची आहेत? )
 • चालु घडामोडीवर अधारीत विषयावर सुध्दा काही वेळेस इतर विषयात प्रश्न विचारले जाऊ शकतात.
  • जसे -की सध्या नुकतेच GST बिल पारित झाले तर त्या संदर्भात अप्रत्यक्ष काराबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात.कोणते कर येतात?त्याचा वाट किती?सर्वात मोठा अप्रत्यक्ष कर कोणता
 • Objective  प्रकारच्या प्रश्नांध्ये कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर त्यावर अधारित प्रश्न सोडवायला हवेत. ज्यावेळेस तुम्ही चालु घडामोडीचा अभ्यास करत असता त्यावेळेस मनातल्या मनात प्रश्न तयार करून उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे तुमची एकाग्रता राहते


 •  परिक्षेत जे चालु घडामोडीच्या प्रश्न विचारले आहेत ते  जर वाचनात आले नसेल तर ते सोडवायला नको. कारण उत्तर चुकू शकते नकारात्मक गुणपध्दतीमुळे तोटा होऊ शकतो

·         राज्य व केंद्र शासनाच्या वेबसाईटचा आधार घ्या.

1)india.gov.in

2) pib.nic.in

३)mahanews.nic.in

4)newsonair.com

इत्यादी

Mpscsimplified.in

 •         लोकराज्य , योजना ही शासकीय मासिके न चुकता वाचायला हवीत.

 •       मुख्य परिक्षेत प्रत्येक विषयानुरूप चालु घडामोडीची वर्गवारी करा. जसे
 • 1. भुगोल                                    
 • 2. कृषी                             
 •  3.पर्यावरण                                   
 •  4. राज्यघटना                        
 • 5. विविध आयोग                     
 • 6. महत्वाचे कायदे                             
 • 7. धोरणात्मक निर्णय                      
 •    8. राजकीय घडामोडी                    
 •    9. शैक्षणिक                                          
 •   10. आरोग्यविषयक                      
 •  11. मानवी हक्क                              
 •   12. आर्थिक                            
 • 13. अवकाश                                   
 • 14. आपत्ती विषयक                       
 • 15. जैवतंत्रज्ञानविषयक


Mpscsimplified.in

 •  चालु घडामोडीची पुस्तक वाचताना विषयानुरूप वाचन करा जसे. आर्थिक घडामोडीचे पुस्तक वाचताना विषयानुरूप वाचन करा जसे. आर्थिक घडामोडी वाचत असाल तर पुस्तकातील सर्व आर्थिक घडामोडी एकत्र वाचा आणि त्याच्या short मध्ये नोटस्‌ काढा

 •   चालु घडामोडीची मासिके वाचतनाही विषयानुरूप वाचा – परिक्रमा,युनिक बुलेटिन, अथवा ज्ञानदीप एक्सप्रेस  वाचताना जर तुम्ही मागील महिन्यातील मासिके वाचणार असाल. त्यामध्ये राजकीय घडामोडी वाचणार असाल. त्यामध्ये राजकीय घडामोडी वाचणार असाल तर ऑगस्ट 2016 – जुलै 2016 – जून 2016 या क्रमाने पाठीमागील मासीकातील राजकीय घडामोडीची माहिती वाचा. अशाप्रकारे आर्थिक, शैक्षणिक इ. विषय घेऊ शकता म्हणजेच प्रत्येक मासिकातील एक ठराविक विषय घेऊन तो पूर्ण करावा.

 • काही नवीन विषय आल्यास लगेच त्याची माहिती Referance पुस्तकात पहा. यामुळे तुम्हाला त्याबद्दल जास्तीची माहिती मिळेल.उदा-जर रिझर्व्ह bankने रेपो रेट कमी केले आहेत अशी news वाचनात आली कि,संदर्भ पुस्तकातुन त्याबद्दल जास्त माहिती जाणून घ्या.

   

 • बऱ्यापैकी चालु घडामोडीच्या पुस्तकामध्ये माहिती संकलीत केलेली असते. त्याचा फायदा घ्या. जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या नोटस्‌ , ,चालु घडामोडी पुस्तके,authentic source  व मासिक यांचा वापर करा.

Mpscsimplified.in

 •  परिक्षेला शेवटच्या टप्यात Revision साठी चालू घडामोडी घ्या. कारण त्याचा फायदा होतो. कारण प्रश्न हे Fix  प्रकारचे असते.

 • चालू घडामोडीची 3 ते 4 वेळा Revision व्हायला हवी.


 •  चालु घडामोडी मासिके

1. लोकराज्य    

2. ज्ञानदीप एक्सप्रेस

3. योजना     

4. परिक्रमा  

5. युनिक बुलेटीन

 •   चालु घडामोडी पुस्तके

1. लक्षवेध

2. भराटे

3. दत्ता सांगोलकर

4. देवा जाधवर

5. एकनाथ पाटील (तात्या)

6. स्टडी सर्कल

7. कल्पवृक्ष

  • यांची पुस्तके (कोणतेही  एक वापरा.वेगवेगळी पुस्तके group मध्ये study करु शकता)

         पूर्व परीक्षेकरिता एप्रील 2016 पासूनची मासिके वापरा


Mpsc simplified चा telegram ग्रुप वर चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाते.join करण्यासाठी खालील image वर क्लिक करा.

Telegram.me/mpsc_simplified

आपला मित्र,

अजित प्रकाश थोरबोले

परि. उपजिल्हाधिकारी.

http://mpscsimplified.com


14 COMMENTS

 1. सर, MPSC MAIN करिता काणडे सरांनी सांगितलेली आणि चालु घडामोडी करिता कोणती YEAR BOOK वापरायची…..plz reply

 2. Ur suggestion tells us right track. Not only this it gives moral support when we frustrated. it tells u r Just away fom ur goal. thanks a lot

LEAVE A REPLY