परीक्षेची तयारी बाबत मला आजपर्यंत विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे

sir, y.na.kadam yanche Adhunik bhartacha itihas he book Rajysewa pri + mains sathi useful/ sufficient ahe ka?

ही पुस्तके संपवण्याची परीक्षा नाही
अमुक अमुक पुस्तके वाचले की झाला अभ्यास असे काही नाही
परीक्षेसाठी तयारी करा ऑल द बेस्ट

मला पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढायची आहे.मला कमी वयातच पोस्ट मिळवायची आहे.माझी घरची परिस्थिती ठीक नाही मला कसेही करून याच वर्षी पोस्ट मिळवायची आहे.मला पहिल्याच प्रयत्नात राज्यात पहिला क्रमांक मिळवायचा आहे.मी वाटेल तेवढे कष्ट करायला तयार आहे पण मला याच वर्षी पोस्ट काढायची आहे.जर या वर्षी मला पोस्ट नाही मिळाले तर माझे खरे नाही.
आशा सर्व प्रश्नसाठी

—आपण जी स्पर्धा परीक्षा देत आहोत हे अमुक अमुक मार्क मिळाले की आपल्याला नक्की यश मिळेल अशी स्पर्धा नाही.तुम्हाला इतरांबरोबर स्पर्धा करून काही ठराविक पहिल्या क्रमांकत यायचे आहे.त्यामुळे स्वतःवर burden घेऊन अभ्यास करू नका.
–अशातून जर यश नाही मिळाले तर खूप निराशा होते आणि पुढे कशी वर्ष निघून जातात कळत नाही.
–जागा खूप कमी भरल्या जातात.फक्त अभ्यास या एकमेव बाबीवर तुमचे यश अवलंबून नाही.याचबरोबर स्वतःवर कंट्रोल,मनाची स्थिरता,आत्मविश्वास,अभ्यासातील एकाग्रता आणि सात्यत,प्रत्येक विषयावर पकड,अभ्यास करताना तुमचे स्वतःचे सर्व प्रकारच्या समस्या पासून दूर असणे,सतत आपल्याला काय करायचे आहे याची जाणीव,बिन कामाच्या गोष्टीपासून स्वतःचा बचाव,आपले परिपूर्ण व्यक्तिमत्व,परीक्षा काळात स्वतःवर विश्वास,त्या 2-3 तासात चांगल्या प्रकारे पेपर ला सामोरे जाणे,योग्य वेळी योग्य मार्गदर्शन,चांगले मित्र,चांगल्या सवयी,सकारत्मक विचाराची संगत,भरकटवणाऱ्या विचारापासून स्वतःला परावृत्त करणे,अपयशाने खचून न जाणे,आपले सर्व कमकुवत बाजू चांगल्या करणे,अभ्यास हे ओझे वाटू न देणे आणि थोड्या प्रमाणात नशिबाची साथ पण महत्वाची ठरते.
–यशसाठी सर्व बाबी जुळून येणे गरजेचे आहे.
–अभ्यास हा njoy करणे गरजेचे आहे
–आणि जर यश नाही मिळाले तर पुढे आयुष्यात काय करायचे याचा प्लॅन ब पण तयार असायला हवे.
–आयुष्यात एखादी गोष्ट लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करायचा विचार नाका करू.हे आयुष्य जगा.आपल्याला कोणतेही घाई नाही.
–पण योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय पण घ्यायला हवा.जर आपल्याला नाही होणार तेव्हा यशस्वी माघार पण घ्यायला हवी.
–आपल्या घरच्या परिस्थितिची जाणीव ठेवुन निर्णय घ्यायला हवेत.
–कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे जाळ्यात ओढण्यासाठी तुमच्या शोधात आहेत.तेव्हा काळजीपूर्वक आपण स्वतःचा बचाव करा.

–ऑल द बेस्ट

Sir me mahesh
me 2012 la abhyas chalu kela asun 2012-14 ya period madhe rajyseva mains 2014, psi main -2013,2014 ani forest main -2014 dili aahe pan yash milale nahi parantu 2014 la mpsc madhun jr clerk ya padasathi nivad zali ani me join zalo pan tya veles pasun abhyasachi gati kami zali ya veles rajyseva pre la 1st key ne 173 v final key ne 183 score ala hota mhnun me 4 month sathi sutti takli hoti parantu result n alyane khup depression ale kay karave kalat nahi parat sutti takne shakya nahi so pls guide me

–तुमच्याकडे ऑलरेडी कोणत्यातरी नोकरी आहे..इतरांकडे तर नोकरी पन नाही त्यामुळे डिप्रेशन मध्ये तुम्हाला पोसिटीव्ह राहण्यासाठी ही गोष्ट मदत करेल.
–आपण खूप महत्वकांक्षी असतो आणि त्यामुळे आपण स्वतःपुढे काही उद्दीष्ठे ठेवतो.ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो.पण हे करताना आपण पर्वा सांगितल्याप्रमाणे मनाची स्थिरता etc गोष्टी पन महत्वाच्या..
–आणि अगोदर तुम्ही काही मेन्स परीक्षा दिल्या आहेत म्हणजेच तुम्ही पाठी नाहीत..सतत स्वतःला समजावा माझे आयुष्यात चांगलेच होणार आहे
–दडपण घालवा

ऑल द बेस्ट

Manoj Yekale:
Sir, me rajyaseva mains cha abbhyas kartoy
Pan jeva mains che question papers pahto teva ek gosht janavtey ki me kuthetari chuka kartoy
For example
History che question papers pahilyavar tyatil nimmya peksha jast prashnanchi uttare yet nahit
History sathi me grover & kolambe, jay singh pawar he pustake changlya revision sahit vachli ahet
Tarihi barechshe question che answer answer key shivay milat nahit
Ase ka???
History sathi please ajun 1-2 reffernce books sangavet

प्रत्येक परीक्षेत इतिहास विषयात प्रश्न वेगवेगळ्या source मधून विचारले जातात.त्यामुळे आपण कुठून प्रश्न आलं शोधत असतो.आणि हे फक्त इतिहास या विषयातच जास्त होते.इतर विषयाचे source आढळतात.
–आपल्याला पण किती वाचायचे याचे लिमिट आहे.त्यामुळे सगळे पुस्तके वाचण्याच्या फंदात नका पडू.
–खूप अभ्यास केल्यानंतर तो आत्मसात पण होणे गरजेचे आहे.
–सर्व प्रश्नांची उत्तरे आली पाहिजेत असे नाही.
–तुम्ही चांगला अभ्यास केला आहे आणि तो प्रश्न जर अभ्यास केलेल्या पैकी नसेल तर 100 पैकी 1-2 उमेदवारांना त्याचे उत्तर माहीत असणार आहे.त्यामुले असे प्रश्न न सोडवणे उत्तम.
–जो अभ्यास करणार त्याची जास्त वेळ revision आणि प्रश्न भरपूर सोडवा

ऑल द बेस्ट

Suhas:
Sir I have worked with Bank of Baroda as an Officer for 3 years and I left it to commence preparations for UPSC and MPSC. I am facing difficulty to grasp the data underwent which is in marathi. I am preparing in marathi so that I will get prepared to face Marathi subject in MPSC and UPSC but it is very difficult to remind it. Please suggest an idea to resolve this issue.

–तुम्ही शॉर्ट मध्ये नोट्स काढा
–जे वाचलेलं आहे त्याची त्याच दिवशी revision करा
–त्या टॉपिक वर प्रश्न सोडवा
–आपण जे वाचले ते इतर मित्रांना सांगा म्हणजे तुमच्या पक्के लक्षात राहील.
–आपण जे वाचले त्याचे मोबाईल मध्ये फोटो काढा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यातून अभ्यास करा

Avinash Lodhe:
I had given upsc and mpscmains this time but because of both exam i couldnt give justice to any of them. Im still confuse how to stdy both exam together. plz give me some suggetion

–मित्रानो एकच परीक्षा चांगली करा
–mpsc or upsc
–दोन्ही परीक्षांचा exam पॅटर्न वेगळा आहे

ऑल द बेस्ट

Tushar Patil:
आदरणीय सरजी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतांना सातत्य हे खूप महत्वाचे आहे..पण माझ्या बाबतीत अस होत की, सुरवातीचे काही दिवस चांगल्या प्रकारे अभ्यास होतो म्हणजे 10-15 दिवस अभ्यास केला की नंतर बाकीचे दिवस अभ्यासच होत नाही.7-8 दिवसांचा गॅप पडायला लागतो त्यामुळे अभ्यासात सातत्य राहत नाही तर अभ्यासात सातत्य ठेवण्या साठी काय करू शकतो…

–आपल्या अस्तित्वाची जाणीव

ऑल द बेस्ट

Shiv:
me mpsc student aahe gelya 3 yr pass nahi hot aata maza score yeto pn gharchi economic conditions nahi te pune study nahi teu shkat n gharcj climate bolkul chan nahi etha study nahi hot me khup abhyasa sati tayr aahe pn ghari maza study nahi hot etha javalpass lib pn nahi .sir kay karu sangta ka ka study bandh ķaru

–जर स्वतःवर विश्वास नसेल
–जर मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कुठेही अभ्यास होऊ शकतो
–चांगली परस्थिती असेल वातावरण असेल तर माझ अभ्यास छान होणार आहे असे मत असेल तर कधीच यशस्वी होणार नाहीत
–वेळीच शहाणे व्हा

ऑल द बेस्ट

Amit:
सर मी सहा महिन्यांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. मला काही प्रश्न पडतात ते म्हणजे पोस्ट मिळाल्यानंतर काही लोकांमध्ये बदल का होतात? माझा एक मित्र जो आता माझा रूममेट आहे त्याला मागील वर्षी क्लास 1 पोस्ट मिळाली आहे. पण हा आम्हाला motivate करण्याऐवजी demotivate करत आहे. म्हणजे तो कसा हुशार आहे आणि आम्हाला हे जमू शकणार नाही असं बोलून दाखवतो किंवा आम्हा बाकीच्या रूममेट ना कमी लेखतो. लायब्ररी मधून रूम मध्ये आलो की टेंशन येत.
अशा situation मध्ये काय करावे समजत नाही. या बद्दल काही उपाय सांगु शकता का.

–नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर राहा
–स्वतःला स्पर्धेला तयार करा
–आपल्यातील कमकुवत बाजू चांगल्या करा
–आशा बाबीकडे दुर्लक्ष करा.ज्यात आपला आत्मविश्वास कमी होईल.
–सतत स्वतःला सांभाळा

ऑल द बेस्ट👍

Siddant Khandke:
Namste sir,
आज स्पर्धा परिक्षा बाबतीत अनेक विद्यार्थी जागरूक झाले आहेत.त्यामुळे आज बहुतेक सर्व जिल्हाच्या ठिकाणी परिक्षेचे आवश्यक साहित्य उपलब्ध होत आहेत.सराव चाचण्या पण उपलब्ध होत आहेत,सोशल मीडिया वर आपल्या सारख्या अनेक expert लोकांचे मार्गदर्शन होत असतांना अनेक जणांना परिक्षेसाठी पुण्याला जायची काय हौस आहे? आपली आर्थिक परिस्थिती नसताना देखील मुलं तिथं जाण्याचा हट्ट का करतात?

…. actually he is right…
If u are giving your 100% for ur goal. Then there is no need to go anywhere .
….पूणे हि फक्त मोहमाया आहे …पूणे हे फक्त आकर्षक आहे….यापलीकडे काहि नाहि……..this is my personal opinion… because i am also experienced Pune..

According to me if your family background is good enough n u have no idea about the mpsc n it’s competition n all then you should go to Pune
But If u are economically poor then u should give guidance form Dr. Ajit Sir and start studying at home.
Going to Pune has only one advantage u come to know about the competition and your compititiors and here sources are easily available than other places

Suraj Jadhav:
कोणत्याही विद्यार्थ्याने प्रथम ज्या क्षेत्रात जायचे त्याची इत्यंभूत माहिती घ्यावी…

यात त्या परीक्षा..त्यांचा अभ्यासक्रम..सर्व तपशील तपासावेत

स्वयंप्रेरणेने स्वयंनिर्णय झाला कि कुटुंबाशी बोलावे…सर्व यशापयशाच्या शक्यता लक्षात घेऊन निर्णय घ्यावा

या सर्व कामी इंटरनेट चा यथायोग्य वापर..
e.g upsc mpsc च्या websites समजून घेणे..
विजयपथ सारखे मार्गदर्शक पुस्तक वापरावे.

आता मुलभुत तयारी झाली की प्रश्न उरतो कशी आणि कोठे तयारी करायची…

पुण्याबद्दल बोलू…
स्वानुभवावरून सांगतो
क्लास लावावा का? हो चालू शकेल
क्लास लावावा’च’ का? गरज नाही.

या वयात स्पर्धापरीक्षेचा आवाका लक्षात घेता मार्गदर्शनाची गरज नक्की भासते मात्र स्वयंअध्यनाने प्रश्न सुटू शकतात.

पुण्यात रहाणे, खाणे, पुस्तके, क्लास, स्टेशनरी, झेराॅक्सेस, मासिके..
आपला जन्म क्लासवाल्यांची (काही संस्था प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.)आणि पर्यायाने पुण्याची economy चालवण्यासाठी झालेला नाही .

syllabus आणि old question papers हे दोन मोठ्ठे गुरू….

पुस्तके (मजेत,मस्तीत (चांगल्या अर्थाने) आणि भरपूर) हे साधन..

मदतीला गरजेचे आणि नित्याचे एक national english daily एक मराठी सहाय्याला…

English चा बाऊ काढून टाका..
त्याच्याशी मैत्री करा..

जे वाचतोय उदा. history – renaissance- आयुष्यात rationalisation- reason- humanism approach आणा…

परीक्षार्थी आहोत..विद्वान बनायच नाहीए असल्या भुक्क्ड अपप्रचाराला बळी पडू नका…(पण म्हणून कोणतही, भरमसाठ, irrelevant वाचत बसायच नाही…

ह्या अभ्यासक्रमातून नवीन दृष्टी मिळते ती वापरा…make your canvas large..
keep eyes, ears, senses open …embibe…observ…capture..note it down..
use it….मजा आहे…

मुठी आवळा आहात तिथे (जमीन विकून रहाण्या-खाण्या- क्लास चे पैसे पुस्तकांना वापरा..)जोमाने तयारीला लागा

सिंहावलोकन करत रहा…स्वतःशी प्रामाणिक असा…

ता.क NCERTS ani एक प्रत्येकी std refrance book basic वाचणे मला must वाटते.

बाकी मुठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची….


Shrikant chothe:
पूर्वी लोक अधिकारी व्हायचं म्हणलं की अभ्यास किती व कसा करायचा हा प्रश्न पडायचा
पण आता mpsc करायचा निर्णय घेतला की सर्वात प्रथम परीक्षेचा स्वरूप व अभ्यासक्रम जाणून घ्यायच सोडून लोक कोणता क्लास चांगला हा शोध घेत बसतात

मी विटा (सांगली) मध्ये यशवंतराव चव्हाण अभ्यासिकेत गेले 2 वर्ष अभ्यास करत आहे. मला अजून कोणतेही यश मिळाले नाही परंतु आमच्या अभ्यासिकेत अभ्यास करून आमचा एक विद्यार्थी गेल्या राज्यसेवेत राज्यात 6 वा आला.

सांगायचे एवढेच आहे की आपली मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही ठिकाणी राहून योग्य ती पद्धतीने अभ्यास केला तर कोणतंही पद आपण मिळवू शकतो


Nitesh Suryawanshi:
Back up Plan

आज ची परिस्थिती पाहता…… Back Up Plan खुप महत्वाचा आहे…..

कोणताही एक नौकरी मिळवून पुढील MPSC UPSC तयारी सुरू ठेवने हे शहाण्या माणसाचे लक्षन……
याला काही अपवाद असतील 1% असतील….

कोंचीग क्लास वाले कधीही सत्य परिस्थिती भाष्य करताना दिसत नाहीत…….
तो त्याचा धंदा झाला आहे….

आपण साधा विचार आपण करू
MPSC 5 YEAR Total seats App. = 2000
total students exam Appare in 5 year App. = 10 to 12 lakh……

अधिकारी न झालेल्या काही विद्यार्थी Class सुरू करून विद्यार्थ्यांनी त्याच मार्गदर्शन घेतले अधिकारी होणारच अशी Advertisement करतात….
काही होतीलही .

लगेच ते 1 student 4 Class मुळे कसा अधिकारी झाला हे वर्तमानपत्रातून दिसतच. बाकीच्या student काय करायच….

मला एकच आपल्या बांधवांना सांगायच

आपला Study Multispeciality/Multidimensional आसला पाहिजे…..
जो SSC MPSC UPSC PSI STI ADO talathi clear etc exam साठी उपयोगी आला पाहिजे….

Marathi English Math Resoning तयारी हे स्पर्धा परीक्षा तयारीच्या सुरूवाती पासून करावे .

कधी कधी आपण Marathi English खुप उशीरा सुरू करतो….

धन्यवाद

आपला बांधव

नितेश सुर्यवंशी. ( 8446222927 )

telegram.me/niteshpharmaस्पर्धा परीक्षेच्या पलीकडे

–स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनणे हेच फक्त जीवन नाही.
–स्पर्धा परीक्षेतून सनदी अधिकारी बनल्यावर आयुष्यचे सर्व प्रश्न संपत नाहीत
–माझा मुलगा/मुलगी याची काही जर आवड असली तरी त्यांनी सनदी अधिकारीच बनायला हवे.त्यासाठी मी कितीही खर्च करायला तयार आहे असे ज्या पालकांना वाटते त्यातून पालकांचा पैसे आणि पाल्याची महत्वाची वर्ष वाया जातात आणि त्याचे आवडते क्षेत्र यापासून मुकावे लागते
–सनदी अधिकारी बनण्यासाठी मी नोकरी सोडून तयारी करणार आहे.खूप चुकीचे ठरेल कारण जागा कमी,अनिश्चितीता जास्त आणि स्पर्धा जास्त.
–मला 12 वीला खुप मार्क आहेत पण मी सनदी अधिकारी बनण्यासाठी BA ला ऍडमिशन घेणार आहे.काळजीपूर्वक निर्णय घ्या.
–स्पर्धा परीक्षेतून “सनदी अधिकारीच”बनायचे आहे.बाकीचे किरकोळ पोस्ट मला नको हे अतिशय चुकीचे ठरेल
–स्पर्धा परीक्षेत अपयश मिळाले तर आपले आयुष्य खूप अंधकारमय होणार आहे असे वाटत असेल तर आपले पूर्वज कोणतेही स्पर्धा परिक्ष न देता आपले आयुष्य कसे जगले.
–स्पर्धा परिक्षेतून सर्वाना पोस्ट मिळत नाहीत.परंतु ते करताना आपल्या व्यक्तीमत्वात प्रगती होते हे बरोबर आहे पण त्या व्यक्तीच्या attitude कसा आहे यावर पण ते अवलंबून आहे.
–स्पर्धा परीक्षा म्हणजे upsc आणि mpsc एवढेच मर्यादित नाही त्यात ssc,बँकिंग,रेल्वे,पोस्टल आदी परीक्षांचा पण समावेश होतो
–स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी 3-4 वर्ष द्यावेच लागतात हा गैरसमज आहे.हा attitude सुरू करताना असेल तर नक्कीच तेवढी वर्ष लागतील.
–स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जे नॉलेज मिळाले आहे त्याचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात जर केला तर तुम्ही खूप पुढे जाल.

-अजित थोरबोले


आजचा प्रश्न
प्रश्न-गणित या विषयाची तयारी कशी करावी?

उत्तर-या विषयाला सराव महत्वाचा आहे.या विषयाची भीती मनातून काढा.सुरवात बेरीज वजाबाकी पासून करा.एक एक टप्पा पार करत अवघड विषयाकडे वळा.जास्तीतजास्त प्रश्न सोडवा.या विषयासाठी कोणतेही एखादे चांगले पुस्तक वापरा.online अभ्यास करण्याचा हा विषय नाही.व्हाट्सअँप आणि telegram वर याबाबतीत खूप ग्रुप आहेत त्या पासून दूर राहावा.ते फक्त timepass ग्रुप आहेत.कधीकधी चुकिचे प्रश्न पण टाकले जातात.पास व्हायचे नसेल तर खुशाल जॉईन करावे.पुस्तकसूची website(mpscsimplified.com) वर टाकली आहे.
ऑल THE BEST

अजित थोरबोले


Omkar Patil:
Sir me Omkar
Mi atta bsc first year la aahe…mi pudhe jaun mpsc chi exam denar aahe…tar aatapasunch kay kay karu…

स्वतःची personality अधिकारी कसा असतो त्यासारखी बनवा
बेसिक चांगले करा
–विविध स्पर्धात भाग घ्या
–कॉलेजमध्ये नेतृत्व कौशल्य निर्माण करा
–प्रत्यक बाबीत तुम्ही उठून दिसायला हवेत
–स्वतःला स्पर्धेला तयार करा


dinkar sargar:
time tar khup kami ahe,,prelim cha study karu ki main cha study

–pre करा
–मेन्स मधील hr,hrd,eco चा काही भाग,geo चा काही भाग हे सर्व प्रश्न current related असतात..त्यावर आता वेळ खर्च करण्यात अर्थ नाही..हा अभ्यास पूर्व नंतर करावा..विज्ञान खूप कमी अभ्यास आहे
–इतिहास,भूगोल,polity,पर्यावरण,कृषी, अर्थशास्त्र चालू घडामोडी हा अभ्यास पूर्व ला केल्यामुळे मुख्य चा 40℅ भाग पूर्ण होतो
–पूर्व पास झाले तरच मुख्य देत येते

ऑल द बेस्ट


Arti Kulkarni:
Psi sti assistant chya exam dnyasathi current affairs kdhi pasun che vachayche

1 वर्ष अगोदर परीक्षेच्या


Xp 19:
Namaste sir,
Majhe vay 30 varsh purn aahe(OBC). Mi magil 3 mahinya pasun abhyas kartoy. Ithe anekjan 4 te 5 varsh jhali abhyas kartay. Vayacha vichar karta mi chuk kartoy ka ? Dvidha manahsthithi jhali aahe.

AJIT THORBOLE:
–चूक नाही काही
–1-2 वर्ष अभ्यास करा.पण आपल्याला जमत असेल तर आनि इंटरेस्ट असेल तर करा.नाहीतर इतर मुलांनी ज्या पद्धतीने 4-5 वर्ष लागली आहेत तशी जायला नको.100% द्या.त्यांना 4-5 वर्ष त्यांच्या चुकांमुळे लागली आहेत.तुम्ही त्या चूका करू नका.वेळेतच योग्य निर्णय घ्यावा.आणि प्लॅन ब पण तयार ठेवा.
–बी positive
ऑल द बेस्ट


Ganesh Govind:
सर वेगवेगळ्या 4-5 विषयांचा अभ्यास 2-2 तासांच्या slot मध्ये करणं चांगलं आहे का 2-3 विषय दर दिवशी करावेत.?? आणि एखादे 300 पानी पुस्तक संपायला सामान्यतः किती दिवस या वरील पद्धतीने लागायला हवेत.??
धन्यवाद.

AJIT THORBOLE:
–एकच विषयाचा अभ्यास करावा..एक एक विषय चांगला करावा.2 तासाच्या अभ्यासात कोणताच टॉपिक परफेक्ट होत नाही.त्यामुळे एक टॉपिक चांगला करून पुढील टॉपिक घेणे योग्य राहील.आणि बोर झालंयनंतर चालू घडामोडी किंवा गणित,csat अथवा अगोदर केलेल्या टॉपिक ची revision अथवा प्रश्न सोडवणे योग्य राहील.जो अभ्यास केला त्याची लगेच revision करायची जेणेकरून विसरण्याची भीती राहणार नाही.
–पुस्तके संपवण्याची नादात पडू नका.फास्ट पुस्तक वाचण्याची स्पर्धा नाही ही.समजून उमजून अभ्यास करा.

ऑल द बेस्ट👍


Vikas Kundarge:
Good evening sir
Thanks a lot
Objective type question daily sodvayla pahije ka sir
Exam madhe khup simple simple mistakes hotat
Daily revision sathi kiti vel dyayla pahije
Karan syllabus khup jast aaslyamule revision khup important aahe
Tumchyamule khedyadil garib mulana khup fayda hoto
Again thanks sir
From vikas kundarge

AJIT THORBOLE:
–दररोज सोडवावे..ज्या टॉपिक चा अभ्यास केला आहे त्या टॉपिक चे
–2 तास revision 6 तास अभ्यास

ऑल द बेस्ट


Karan Shekatkar:
सर एक शंका आहे मी आपल्या वेब साईटवर इतिहास या विषयाच्या शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२ अशी यादी आहे यातील हे ११,१२ ची पुस्तके इंटरनेट वर उपलब्ध नाही आहेत व आपल्या simplified या चॅनेल वर ही पुस्तके कोणी शेयर केली नाहीत

माझा थोडा गोंधळ उडत आहे की ११,१२ इतिहास या विषयाची पुस्तके आहेत की नाहीत …?

AJIT THORBOLE:
–सर्व ऑनलाइन अभ्यास करण्याचाच आठ्ठअस कधी आपण या स्पर्धेतून बाहेर पडलो गेलो समजणार पण नाही.
–पुस्तके विकत घेऊन अभ्यास करा

ऑल द बेस्ट


Aaradhya L:
Good morning Sir
I am Shweta. Done with BCA
Apla Chanel kup Right direction cha aahy. So kup chan guidance Milty tasadi lot of thanks
Sir maza Pershan Asa aahy ki mala Kharch Prashanat kaam karchy. N me MpSC 2017 pasun start keli… But me Job pn Karty travels la kup veil joto n job pn 9 hrs asto so proper rajeseva study hot nahi
N study n hard work shivay option nahi.. Maza kup veil jato.. Job quite Karch Boly tar Aai baba boltat MPSC ch kahi kar nast kup veil jato
Atta Mazay age 25 aahy so they worried about me.. But Kody tari internally Vaty Sarv sodun only study karva Karen HA time n opportunity Nahi yenar shivay me SC cast Madhy Yeto
Sir please Sagan ka me job sodny risky hoein ka ek Sadi Swathala deu only study karnasadi pN part job Karachi tayari pN aahy
Please sir help Me.
Thank you

AJIT THORBOLE:
जॉब सोडू नका.
जेवढा वेळ मिळतो तेवढा अभ्यास करा


mahesh:
Sir roj Loksatta vachto me

Pn tyala 2hrs vel jato

Kahi newspaper analysis video pn pahto

Daily he sgla garjeche ahe ka

AJIT THORBOLE:
–mpsc ला जास्त करंट ला दररोज 30 मिन्स पेक्षा जास्त वेळ देऊ नका.
–चालू घडामोडी आणि विविध magazine मध्ये खूप अगोदर तुमचे कष्ट कमी केले आहेत.त्यामुळे नोट्स काढण्याच्या फंदात पण पडू नका.खूप वेळ revise करा.
–mpscsimplified ग्रुप वर न्युजपेपर underline केलेले असतात तेवढे च करा आणि सिम्प्लिफाइड डायरी

ऑल द बेस्ट


Ajay Suryabhan Maindad:
Sir MI Mpsc study 2 year pasun karto. Atta Psi mains LA 85 marks padle . Majha problem ha ahe ki Mala 2 option barobar vattat. Majhi acuricy kashi vadhau. MI tumhi sangitleli book 10 veles vachliy. MI shevat 1 month revision Karato etar veles purn book vachto. Yat kahi badal karu ka. Pls help me sir

AJIT THORBOLE:
–वाचण्याची स्पर्धा नाही
–उमजून समजून अभ्यास करा
–कोणताही टॉपिक वाचण्यापूर्वी प्रश्न कसे आले ते पहा
–अभ्यास करताना मनातल्या मनात प्रश्न तयार करा
–शॉर्ट नोट्स काढा
–एखादा टॉपिक संपला की लगेच नोट्स काढा
–दररोज रात्री 9 नंतर नवीन कोणताही टॉपिक वाचायला घेऊ नका..दिवसभर केलेली अभ्यास किती आठवतोय ते पहा
–भरपूर प्रश्न सोडवा
–म्हणजे परीक्षेत गोंधळ होणार नाही
t.me/mpscsimplified
ऑल द बेस्ट👍


Siddant Khandke:
Gm सर
आता आम्ही चर्चा करत असताना एक जण मनाला की आयोग आपल्या सोशल मीडिया च्या अकाउंट वर पण लक्ष देतय आणि मुलाखती दरम्यान अपल्याला त्या संबंधी प्रश्न विचारताय? हे कितपत खरं आहे?

AJIT THORBOLE:
no


Siddharth Taware:
Sir beginner ne konte vishay survatila vachale pahijet study la survat Keli pahije

AJIT THORBOLE:
आपले weak subject


Rupesh:
Sir general science chi strategy kay asli pahije…. maz Engineering background aahe so kontya NCERT & state board book MUST aahet.. kiti weightage deu … Sir plz guide

AJIT THORBOLE:
–राज्यसेवा करताना जास्त प्रश्न येतात
–महाराष्ट्र स्टेट बुक वापरा
–मार्केट मधील कोणते पण एक पुस्तक वापरा
–भरपूर सराव करा
–या विषयाकडे दुर्लक्ष नको
–संकल्पना समजून घ्या
–सोपे आहे
–शॉर्ट मध्ये नोट्स काढा


A. Vanjari:
SIR, How one can relate current issues with including all subjects in MPSC ?

AJIT THORBOLE:
–अभ्यास करताना तुमचा syllabus पाठ असणे गरजेचे आहे.
–त्यासाठी दररोज syllabus वाचणे
–त्यामुळे कोणतेही चालू घडामोडी बद्दल आलेली बातमी त्या अभ्यासक्रमात relate करता येते
–त्यांनंतर त्याचे शॉर्ट मध्ये एक वहीत नोट्स काढा

ऑल द बेस्ट👍


$@nt@:
Dear Sir, Mi All India che Sarv Exams deto. Mla Vatate ki All India Competitive Examsche Like Banking, Insurance, Mpsc, Upsc etc. Syllabus he same Aahe mag Ase Asel tr Aatapryant jya khi mi exams Dilo tyaat Ajun tri mla yash yet nhi Sir. Daily mi 4-5 hour Study krto Sir. Kuthehi class Join kelo nhi YouTube war Quant, Reasoning etc. Che Tricks pahaych and Mobilewar Test Series solve krych Asa dinkram aahe Sir. 3-4 Varsh zale sir exams Continue Dene Chalu Aahe tr mi aata yapudhe kontya goshtivar Concentrate Kru jene Krun Lavkarat lvkr Spardha Prikshet yash milel?

AJIT THORBOLE:
–प्रथमतः जास्त इंटरनेट चा वापर नको
–कुठे आपण चुकतो त्यावर लक्ष द्यावे
–त्यात improve करणे
–प्रत्येक टॉपिक वर कमांड असायला हवी
–भरपूर सराव
–अभ्यासाचे योग्य नियोजन
–आत्मविश्वास ढळू देऊ नये

ऑल द बेस्ट👍


4 comments

  1. सर मी यवतमाळ मंध्ये लहानश्या गावात राहतो तिते मी आदिवासी विधार्ती आहे. मी २०१५ पासूनअभ्यास करत आहे पण दररोज [अशक्य] आहे मी आता मुक्त नाशिक ycm sy b.a ला आहे यशस्वी माहिती मिलेक का घरी पान टपरी दुकान आहे ग्रामीण विभाग वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करतो दररोज करण्याचा प्रयंत्न करोतो सर यश मला लवकर यश मिळू शकेल का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat