उपमुख्य कार्य अधिकारी/गट विकास अधिकारी या पदाविषयी

उपमुख्य कार्य अधिकारी/गट विकास अधिकारी

पदाबद्दल थोडक्यात—

हे पद जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्य अधिकारी , सामान्य प्रशासन , ग्रामपंचायत विभाग , स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग , मनरेगा या चार विभागात आहे.
( पूर्वी महिला व बालविकास विभाग मध्ये सुध्दा हे  पद होते परंतु हा विभाग स्थानिक स्वराज्य संस्था कडून वेगळा स्वंतत्र पणे राज्य शासनाच्या माहिला व बालविकास विभागास जोडला आहे . फकत कार्यालये स्थानिक स्वराज्य  संस्था  येथे आहेत

              तसेच गटविकास अधिकारी हे पद प्रत्येक  पंचायत  समिती स्तरावर  आहे . काही वर्षांपूर्वी पंचायत समिती च्या आकारानुसार ( लोकसंख्येनुसार ) गटविकास अधिकारी गट ब पंचायत समिती आणि गट विकास अधिकारी गट अ ( उच्च श्रेणी ) असे दोन पदे होती . परंतु त्यामध्ये बदल करुन प्रत्येक पंचायत समिती ला उच्च श्रेणी गटविकास अधिकारी
( म्हणजेच उपमुख्य अधिकारी समकक्ष ) हे पद कार्यकारी प्रमुख व सचिव असे आहे .व प्रत्येक पंचायत समितीला एक सहाय्यक गटविकास अधिकारी हे पद निर्माण केले गेले आहे.

या पदाबद्दल सकारत्मक बाबी–

* या पदावर काम करताना तुमचे व्यक्तीमत्व कसे आहे त्या गोष्टीचा खूप फरक पडतो , जर तुम्ही ग्रामीण भागातून व बहिर्मुख व्यक्तीमत्त्वाचे , बोलके , लोकांमध्ये जाऊन काम करण्याची इच्छा बाळगणारे असाल तर तुम्हाला हे पद  उत्कृष्ट राहील

   *गटविकास अधि या  पदावर राहून शिक्षण , आरोग्य , महिला व बाल विकास, कृषी , सिंचन , पशुसंवर्धन इ तळागाळाला जाऊन काम करू शकता.

*मानव संसाधन विकासाचे  सर्व अंगे तुमच्या आखत्यारित येऊ शकतात.

* तालुका स्तरावर प्रचंड मोठया  प्रमाणात मनुष्यबळ ( कर्मचारी वर्ग ) यांच्या माध्यमातून लोक सहभागातून विकास कामे घडविता येतात .

*कागदी कामात गुंतून राहण्यापेक्षा लोकांच्या  आयुष्यात थेट बदल घडविण्याची संधी या पदाच्या सेवेतून मिळते

*  चांगले काम केल्यास गरज, ग्रामीण , आदिवासी लोकांचा आशीर्वाद, व काम केल्याचे समाधान गरजूच्या चेहऱ्याकडे पाहिल्यास मिळते

  • शासकीय योजना राबविताना स्वतःचे नवोपक्रम , कल्पना यांना पूर्ण वाव मिळतो .

  या पदाबद्दलच्या नकारात्मक बाबी

* प्रमोशनच्या  संधी खूप कमी आहेत आतापर्यत फकत 4 उपमुख्य कार्य अधिकारी यांना Performance base वर IAS नामांकन  मिळाले  आहे .

* क्वचित भागात लोकप्रतिनिधीच्या अति हस्तक्षेप त्रासदायक वाटतो .( हे त्रासदायक वाटणे आपल्या  स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अंवलबून )

*  या पदावर असतात वैविध्य कमी वाटते ( तोच तो पणा जास्त ) इतर पदावर जसे D. C हे नगरविकास , MIDC ,MSEB इ अनेक विभागात पदावर जाऊ शकतात पण Dy. CEO/BDO हे पंचायत समिती, जिल्हा  परिषद , काही प्रशिक्षण संस्था, आयुकत कार्यालय व मंत्रालय इ ठिकाणी पदावर जाऊ शकतात.

सतिश बुद्धे
परीविक्षाधीन उपमुख्य कार्य अधिकारी
पुणे.

 

टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या  हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat