AS0, STI, PSI COMMON PRELIMINAY 2017 पेपर कसा सोडवावा?

3
6692
Print Friendly, PDF & Email

Assistant Section Officer, Sales Tax Inspector, Police Sub Inspector, Group-B (Non-Gazetted) (Common Preliminay)

पेपर कसा सोडवावा?

#या पापेरमध्ये 100 प्रश्न विचारले जातात.बरोबर उत्तराला 1 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या  उत्तराला 0.25 गुण वजा होतात.जास्तीत जास्त गुण घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते

पेपरला 1 तसाचा अवधी असल्याने वेळ तुलनेने कामींआहे,परंतु या पेपर मध्ये जास्तीतजास्त मार्क मिळवण्यासाठी वेळेबरोबर अचूकतेला महत्व देणे गरजेचे आहे.वेळ आणि अचुकता याचे गणित जुळायला हवे.

माझ्या मते पेपरचे आतापर्यंतचे स्वरूप पाहता 75 ते 85 च्या दरम्यानचा attempt हा चांगला attempt राहील.(कट ऑफ ओपनचा 45  ते 55 च्या दरम्यान लागला आहे अगोदरच्या परीक्षांमध्ये)

गणित आणि बुद्धिमत्ता यावर 15 प्रश्न विचारले जातात.जर या विषयावर तुमची पकड असेल तर हे प्रथम सोडवा अन्यथा बाकीचे प्रश्न प्रथम घ्या.जे प्रश्न जास्त वेळ घेतात ते प्रश्न सोडवू नका.उदाहरणार्थ-जर तुम्ही कॅलेंडर वरील प्रश्नांची तयारी केली नसेल तर ते प्रश्न सोडवू नका. गनित बुद्धिमत्ताला जास्तीतजास्त 15 मिनिटे वेळ द्या.

#जो प्रश्न बघता क्षणी तुम्हाला वाटतोय कि,आपण वाचले नही तर तो प्रश्न पूर्ण न वाचता पुढील प्रश्नाकडे जावा.
उदा.तुम्हाला माहित असते कि,सायमन कमिशनला काळे झेंडे का दाखवले? परंतु सायमन कमिशनच्या तरतुदी विचारल्या तर येणार नाहीत.जर असा प्रश्न विचारला तर पूर्ण न वाचताच सोडून द्या.

साधारणतः या पेपरमध्ये 3 प्रकारचे प्रश्न सांगता येतील.

1) प्रकार पहिला-असे प्रश्न ज्यांची उत्तरे आपल्याला अचूक माहित असतात.अशा प्रश्नांची उत्तरे न चुकता लगेच उत्तरपत्रिकेत चिन्हांकित करावी.
उदा -2016 च्या प्रश्नपत्रिकेतील ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्यासाठी कमीतकमी किती वय असावे लागते?कलम ४० कशाशी संबधित आहे? हे सोपे प्रश्न मानता येईल.(प्रत्येकाचे असे प्रश्न वेगवेगळे असू शकतात)

2) प्रकार दुसरा-असे प्रश्न ज्यांबद्दल आपण वाचलेलं असते परंतु अचूक पर्याय सांगता येत नाही.अशा प्रश्नात दिलेल्या विधानांपैकी एक विधान माहित असते तर दुसरे विधानाबाबत संदिग्धता (confusion) असते.याची उत्तरे काळजीपूर्वक द्यावी.घाई अजिबात करू नये.या प्रश्नात रिस्क घ्यावी लागते.
उदा-2014 च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न गमपंचायतीच्या ग्रामसभा 4 अनिवार्य असतात हे माहित असते परंतु विषय समित्या किती आहेत ते माहित नसणे.२०१६ मध्ये ब्रिटीशांची वेगवेगळ्या सुधारणा कोणकोणत्या वर्षी झाल्या?सेंद्रिय राज्य कोणते?

3) प्रकार तिसरा-असे प्रश्न कि ज्याबद्दल आपल्या कधीहि वाचनात आले नाही.त्यांची उत्तर देणे कधीही शक्य नाही.असे 10 ते 20 प्रश्न असतात.असे प्रश्न कधीही सोडवायचे नाहीत.अशा प्रश्नांच्या क्रमांकाला गोल करावे.गोल म्हणजे ‘danger mark’.
उदा.2014 च्या प्रश्नपत्रिकेतील दुष्काळी आयोगाच्या नियोक्तीचा क्रम याबाबतचा प्रश्न या भागात मोडतो.२०१६ साली जुन्या मागील चालू घडामोडी वर आधारित प्रश्न

 

वरील 3 प्रकारे आपल्या प्रश्नपत्रिकेत वर्गीकरण करता येईल.प्रत्येकाची प्रश्नांची वर्गवारीत त्यांच्या अभ्यासानुसार संख्या वेगवेगळी असणार.

पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यँत पोहचणे याला आपण एक फेरी मानू. पूर्ण 1 तासात अशा किमान 2 फेऱ्या पूर्ण व्हायला हव्या.आता प्रत्येक फेरी मध्ये काय करायचे ते पाहू

1) फेरी क्रमांक 1-यामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे तंतोतंत माहित आहेत त्यांची उत्तरे केवळ चिन्हांकित करा.ज्या  प्रश्नाबद्दल आपण कधीहि काहीही वाचलेलं नाही,त्या प्रश्नांच्या क्रमनकाला गोल करा.असे प्रश्न कधीही सोडवायचे नाहीत.
गोल करणे म्हणजे असे प्रश्नांना कधीही पाहायचे नाही.ज्या प्रश्नबद्दल संदिग्धता आहे असे प्रश्नाची उत्तरे या फेरी मध्ये जेवढी योग्य वाटतात तेवढी सोडवायची.ज्या विधानाबाबत अतिसंदिग्धता आहे त्यापुढे ? असे चिन्ह करून पुढील प्रश्नाकडे जावे.
2) फेरी क्रमांक 2-या फेरी मध्ये ज्या प्रश्नबाबत अतिसंदिग्धता आहे ते प्रश्न सोडवायचे.या फेरीला रिस्क घेण्याची फेरी पण मानता येईल.पण कुठे risk घ्यायची हे पण कळायला हवे.अतिशय काळजीपूर्वक त्या प्रश्नाबद्दल विचार करून उत्तरे द्यावी.

# अशा पद्धतीने हा पेपर 2 फेऱ्यामध्ये सोडवावा.हा पेपर सोडवतानाखालील बाबी पाळा
1) प्रश्न काळजीपूर्वक वाचा
2) घाईघाईने उत्तर देऊ नका.त्यामुळे silly चूका टाळता येतात.
3) प्रत्येक प्रश्न सोडवताना त्याच प्रश्नावर लक्ष द्या.त्यामुळे उत्तर सापडेल.आणखी माझे खूप प्रश्न राहिले आहेत हा विचार मनात येऊ देऊ नका.
4) एखादा प्रश्न अवघड वाटत असेल तर,पेपर अवघड आहे हा विचार मनात येऊ देऊ नका.कारण तो प्रश्न सर्वांसाठीच अवघड असतो.त्याचा परिणाम पुढील सोप्या प्रश्नावर होऊ शकतो.पेपर चालू असताना 1 सेकंदही आत्मविश्वास गमवायला नको.
5) पेपरच्या अगोदर त्या दिवशी कसलाही अभ्यास करू नका.100 च प्रश्न असतात.मुख्य परिक्षेप्रमाणे  अभ्यासक्रम हा well defined नसल्यामुळे कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात.
6) बाकीचे लोंकानी 100 प्रश्न सोडवतील आणि मी मात्र 70 च  प्रश्न सोडवले आहेत त्यामुळे मी fail होईल मीपण सर्वच प्रश्न सोडवणार असा विचार करू नका.
7) पेपरला वेळेवर पोहचा.
8) मी परीक्षा पहिल्यांदाच देत आहे,माझे कसे होणार असा विचार  मनात येऊ देऊ नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
9) आदल्या रात्री पुरेशी झोप घ्या.
10) परीक्षा केंद्र जर दूर असेल तर तेथे जवळ राहण्याचा प्रयत्न करा.
11) टेन्शन घेऊ नका.सकारत्मक विचार करा.
12) सोबत ओळखपत्र घेऊन जा.

“लक्षात असू द्या परीक्षा हि तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे.”
ऑल THE बेस्ट

डॉ.अजित प्रकाश थोरबोले

3 COMMENTS

LEAVE A REPLY