मुख्‍याधिकारी पदाविषयी

0
3066
Print Friendly, PDF & Email

मुख्‍याधिकारी पदाची कार्ये-
नगरपालिका / नगरपंचायत आस्‍थापना विषयक कार्ये, निवडणूकीची कार्ये, विकास कामे, विवाह निबंधक म्‍हणून कार्य पार पाडावी लागतात, तसेच मालमत्‍तेसंबधी फेरफार आता नविन निर्णयाने नगरपालिका हद्दीतील एन.ए. चे कामे पहावी लागतात. थोडक्‍यात मुख्‍याधिकारी यांना सिटी मॅनेजर म्‍हणून काम करावी लागतात. वाढत्‍या शहरीकरणामुळे या डिपार्टमेंट कडे सनराईसींग डिपार्टमेंट म्हणून पाहिले जाते. साहजीकच या पदाला वलयांकित म्‍हणून पाहिले जाते.
पण त्‍याबरोबर आपल्‍याला पदाधिकारी यांच्‍या सोबत काम करावे लागत असल्‍याने ब-याचदा डोकेदुखीही होते. आपल्‍या प्रत्‍येक निर्णयात ढवळाढवळ करण्‍याचा प्रयत्‍न होतो. कर्मचारी वर्गही ठरावाने नोकरीवर लागले असल्‍याने ते आपल्‍यापेक्षा राजकारण्‍यांना प्रामाणिक राहतात. मात्र आशेची बाब ही आहे आता शासन नविन पदभरती करित असल्‍याने संवर्ग कर्मचा-यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे.
थोडक्‍यात सामान्‍य नागरीक, राजकिय नेते आणि कर्मचारी यांना सांभाळत आपण …… सारखे काम करावे लागते. मात्र हे काही प्रश्‍न बाजुला ठेवले तर सामान्‍य नागरिकांच्‍या किंबुहुना संपुर्ण नगरपालिकेच्‍या विकासावर आपण आपला ठसा उमटवु शकतो.
मी प्रत्‍येक योजनेचे यश कुठपर्यंत पोहचले हे बघण्‍यासाठी जातीने लक्ष देते.   तिथे स्‍वच्‍छता, पिण्‍याचे पाणी, नाली साफसफाई किंवा इतर योजना ठिक असेल तर मी माझे कार्य चांगले आहे असे समजते. आजपर्यंत ज्‍यांनी कधीही मुख्‍याधिकारी ला बघितले नाही त्‍यांच्‍या घरापर्यंत मी गेले.आपल्‍या थोडयाशा मदतीने त्‍यांना मिळालेला आधार शब्‍दात मांडता येत नाही.
अजुन महत्‍वाचे म्‍हणजे वर्ग-2 मध्‍ये असे कोणतेच पद नाही जिथे तुम्‍ही एच.ओ.डी. असाल. पण कोणते पद चांगले किंवा वाईट नसते तर ते प्रत्‍येकाच्‍या व्‍यक्तिमत्‍वानुसार तो त्‍या पदाकडे कसे पाहतो यावर ठरते. त्‍यामुळे आपल्‍या आवडीनिवडीनुसार पदांचा प्राधान्‍यक्रम दयावा असे वाटते. तसेच अजुन अभ्‍यास करायचा आहे म्‍हणून इच्‍छा नसतांना लोक म्‍हणतात निवांत पद कोणते हे शोधुन प्राधान्‍यक्रम नका देवु. कारण पुढच्‍या जाहिरात मध्‍ये कोणते पद असतील तसेच आपल्‍याला पेपर कसे जातील याचे आजच ठोकताळे मांडुन आजची असलेली संधी गमावणे चुकिचे ठरते. कोणत्‍याही पदावर असाल तरी रजा तितक्‍याच मिळतात. तसेच राज्‍यसेवेसारख्‍या परिक्षेतुन भरलेली पदे ही कधीच निवांत नसतातच. कृपया याचाही विचार प्राधान्‍यक्रम देताना करावा. सर्वाना शुभेच्छा

नीता अंधारे,
मुख्याधिकारी
उमरी नगरपालिका
जिल्हा-नांदेड

 

टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या  हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत.

LEAVE A REPLY