महाराष्ट्रातून राज्यसेवा परीक्षा 2016 मध्ये राज्यात प्रथम आलेले नाशिकचे भूषण आहिरे यांची मुलाखत

महाराष्ट्रातून राज्यसेवा परीक्षा 2016 मध्ये प्रथम आलेले नाशिकचे भूषण आहिरे यांची मुलाखत

1.उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव
भूषण अशोक अहिरे
2. कोणत्या पदी निवड झालीउप जिल्‍हाधिकारी (२०१६)
3. मुख्य परिक्षेचा सीट क्रंPN002343
4.वय२८
5.आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .3
6.शाळेतील माध्यममराठी
7.महाविदयालयातील माध्यमइंग्रजी
8.मुख्य गाव , तालुका , जिल्हागोराणे ता. सटाणा जि. नाशिक
9.अगोदरचा काम करण्याचा अनुभव२०१४ – Section Officer म्‍हणुन निवड पण Join केले नाही.
10. आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयशनाही

फक्‍त राज्‍यसेवा परिक्षा वर Concentration 
11.कुठे क्लासेस लावलेले का ?मॉक मुलाखती दिल्या का ?Unique ला Pre Batch आणि Interview Group
12.पदाचा पसंतीक्रम कोणता होता .1 Dy. Collector

2 Dysp

3 Tahsildar
13.१०वी ला किती टक्के मार्क८१.०६ %
नु.म.वि. भगुर
14. १२ वी ला किती टक्के मार्क७७.७८ %
K.T.M.H. College Nashik
15.पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळालेB.E. I.T. 60 %
16.महाविद्यालय कुठून , कोणत्या वर्षी
पदवी त्युर शिक्षण
MET College Nashik
17.आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे कानाही
18.छंद अथवा अंवातर कौशल्येTrekking, Driving
19.स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पाश्र्वभूमीवडील – प्रा‍थमिक शाळेत मुख्‍याध्‍यापक

आई – Z.P. Nashik शिक्षीका
20. स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?आपली naturality महत्‍वाची. आपण कोण्‍त्‍या क्षेत्रात आपला Natural Performance देवु
शकतो ते आपल्‍याला समजल की कोणत्‍याही प्रकारच्‍या कामाचा तणाव आपणास येत नाही. प्रशासकीय अधिकारी म्‍हणुन आपण चांगल काम करू शकतो याची जाणीव झाली ती Last year ला असतांना काही
अधिका-यांच्‍या संपर्कात आल्‍यामुळे.
21.स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही काय सांगाल ?क्षेत्रातील अनिश्चितता आणि आभ्यासातील सातत्‍य.
४ – ५ लाख मुलं स्‍पर्धा परिक्षांचा आभ्‍यास करतात,
Pre – 5 लाख
Main – 5000
Interview – 1500
Final selection – 50 (Dy Collector / Dysp)
DC or Dysp याच मुलांच्‍या dream post ५ लाखातुन पहिल्‍या ५० मध्‍ये ये‍णे हा प्रवास खडतरआहे मात्र अशक्य नाही. २०१२ ते २०१६ प्रत्‍येक वर्षी एका-एका मार्काने यश हुलकावणी देत असतांना
आभ्‍यासात सातत्‍य आणि आपल्‍या प्रामाणिक प्रयत्‍नांवर विश्वास महत्‍वाचा. प्रमाणिक शब्‍द महत्‍वाचा जर प्रमाणिक प्रयत्‍न केलेले असतील तरच आपला confidence टिकुन राहील आणि आपला performance चांगला होईल. Never give up(सोडु नका) एक-दोन अपयशाने खचुन जाउ नका. जेवढा दिर्घ संघर्ष तीतका
मोठा विजय. १ मार्काने STI , १ मार्काने Dysp व Deputy Education Officer या साध्‍या पोस्‍ट गेल्‍या तेव्‍हा रडत बसलो असतो, आभ्‍यास सोडला असता तर महाराष्‍ट्रात प्रथम येण्‍याच स्‍वप्‍न सत्‍यात
उतरल नसतं.
22.मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?१ मार्क्सने Dysp गेली तेव्‍हा Interview ला ४८ मार्क होते. वेगवेगळ्या पॅनल ला मार्क्‍स

vary होतात. आयोगावर टिका करण्‍यात काहीच अर्थ नाही. म्‍हणुन २०१५ ला main gs चा खुप

आभ्‍यास करण्‍यांच ठरवल आणि Pre कडे दुर्लक्ष झालं व Pre उडाली. पुन्‍हा एकदा निट विचार

करून भोळे सरांच्‍या मार्गदर्शनाखाली आभ्‍यासाची सुरवात झाली. काहीच सोडायच नाही अस ठरवल.

Gs चा असा score करायचा की, Interview नाही दिला तरी क्‍लास वन मिळेल अस ठरवल. Pre ला CSAT व Mains ला मराठी, इंग्‍लीश याच्‍याकडे होणारे दुर्लक्ष अपयशाला कारणीभूत होते.
23.जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?-  2013 चा attempt job करत असताना दिला 
- You must have habbit of stealing the time if you are working and study should be target based and quality oriented.
target-based 
24.२०१६ च्या राज्य सेवा पूर्व परिक्षेबद्दल तुमचे दोन्ही प्रश्नपत्रिकेबाबत प्रतिक्रिया२०१६ च्‍या परिक्षेबाबत (प्रश्‍नपत्रीका) मत १०० पैकी Attempt माझा ८० असायचा कारण वरील २०

प्रश्‍नाची उत्‍तरे कोणालाच येत नाहीत. ८० पैकी ३० Fix ans माहिती असलेली, ३० प्रश्‍न ५० – ५०,

२० प्रश्‍न Risk घेवुन Solve केली. अस combination ठेवल तर Gs – 1 चा score ७०- ८०

येतो. आणि CSAT वर जरा भर दिला तर ९०-१०० score निघु शकतो म्‍हणजेच प्री चा स्‍कोअर

१७०-१८० असा असला तर without any tension Mains वर concentration करता येत.

बेसीक निट करा. त्‍यातील एकही प्रश्‍न चुकता कामा नये. अवांतर वाचनावर जास्‍त भर देण्‍याएैवजी

syllabus ला धरून आभ्‍यास करा. सोपे प्रश्‍न आधि सॉल्‍व करा (CSAT बाबतीत).
25.मुख्य परिक्षेची तयारी करताना Test series लावली होती का? लावली असेल तर कोणती ?Test series Prithvi ची लावली होती. कोण्‍त्‍याही क्लासचा दर्जेदार सराव पेपर द्या.
26.तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा २०१५मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?157
27. राज्य सेवा मुख्य परिक्षा २०१५चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?Gs- 1 – 80,
Gs2- 96,
Gs3- 104,
Gs4- 96
मराठी – ५२ (ग्रामर २५)

इंग्रजी – ४८ (ग्रामर २२)
मुलाखत – ५०

28.मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?Mains ला ५ महिने असतात. पहिल्‍या दोन महिन्‍यात पुर्व साठी वाचलेली पुस्‍तके सोडुन
जिएस ३, Science & Tech, Polity कायदे जे मुख्‍य ला Details आहे ते वाचावे.
पुढील दोन महिन्‍यात पुर्व साठी वाचलेले आणि मागील दोन महिन्‍यात वाचलेल सगळ
revise करा. नविन वाचन्‍याच्‍या मागे लागु नका. पुढील एका महिन्‍यात पुन्‍हा एकदा
सगळ Revise करा. आठवड्याला एक निबंध लिहा मराठी व ईंग्रजीमध्‍ये एकाच विषयावर मराठीत लिहलेल इंग्रजीत भाषांतर करून लिहा. एका विषयावर दहा पाने लिहा. नंतर त्‍याला पाच पानात Convert करा. Precise writing होइल. ग्रामर वर विषेश भर द्या रोज एक
तास. फार scoring topics आहेत.
29.मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?१०० %
५०-५०
Risk
असे प्रश्‍नाचे वर्गीकरण करून प्रश्‍नपत्रीका सॉल्‍व्‍ह करण्‍याचा प्रयत्‍न करा. Attempt हा
प्रश्‍नपत्रीकेचया Difficulty level नुसार ठरवा. माझ्या वैयक्‍तीक मतानुसार Risk घ्‍यावी
काही प्रश्‍नांबाबत.
30.स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?Week मधील एक दिवस फक्‍त स्‍वतः साठी No study, No Books फक्‍त आराम,
झोप आणि एक सिनेमा. त्‍यामुळे बाकीचे सहा दिवस १०० % performance टिकुन
रहायचा. रोज २० मिनिट पायी फीरणे, चांगल्‍या लोकांचया संपर्कात राहा. निगेटीव्‍ह
लोकांपासुन दुर राहा.
31.स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी काय सांगाल ?नव्‍याने प्रवेश घेवु इच्‍छीनारे उमेदवार स्‍पर्धेची तीवृता व जाणिव याचा विचार करूनच या क्षेत्रात उडी

घ्‍या. Financial + social Background याचा विचार करून ठेवा. Patience & passion या

बाबी महत्‍वाच्‍या. सुरूवातीला ज्‍या जोमाने आभ्‍यासाला सुरूवात केली तीच एनर्जी शेवटपर्यंत टीकवुन ठेवा.
32.तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?मर्यादीत वापर महत्‍वाचा.MPSC Simplified या Site चा बराच फायदा झाला.
अजित सरांच्‍या अनेक strategy मी स्‍वतः Follow केल्‍या.
33.मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?दोन रिवीजन्‍स अत्‍यावश्‍यक आहेत. मुख्‍य परिक्षेपुर्वी साधारणतः ३२ दिवस
आगोदर रिवीजनला सूरूवात केली. प्रत्‍येक पेपर साठी ०८ दिवस
34.Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?मर्यादित नाट्सचा वापर. Reguler books च्‍या रिकाम्‍या जागेत संबंधित Topic
बाबत अवांतर माहिती असे Notes चे स्‍वरूप होते.
35.मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?GS -1 –AgrI and environmental – Geography हे दोन Topic
महत्‍वाचे. कोळंबे सरांचे AgrI चे पुस्‍तक आणि सवदी, shankar IAS यांची
पुस्‍तके वापरली.

GS-2- polity कायदे, YCM च्‍या नोटस. चंद्रकांत मिसाळ यांच Human rights.

GS-3- Current of basic syllabus यांच योग्‍य coordination.

GS-4- AgrI, economics - कोळंबे
Biotech – NCERT
36.मुख्य पारिक्षेसाठी मुख्यत: चालू घडामोडी आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले ?परिक्रमा आणि unique bulletin ही दोन मासिके, रविवार चे सकाळ, लोकसत्‍ता,
महाराष्‍ट्र टाइम्‍स पुरवण्‍या आणि MPSC simplified site चा वापर.
37.मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?माननीय मनोहर भोळे सर यांच्‍या interview group 2016-17 ला मी होतो.
Interview हा पुर्णपणे unpredictable part आहे. तुम्‍ही मनात कोणताही
पुर्वग्रह घेवुन जाउ नका. Mock interview सरांकडे दिलेत. तुमचा एक चांगला
approach develop होतो.Communication interaction यांच्‍या सारख्‍या
basic बाबी mock मुळे develop होतात. दोनदा तरी mock द्यावे असे मला
वाटते.
38.मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?मा. व्‍ही एन मोरे सर
39.मुलाखत किती वेळ चालली ?२२.२५ मिनिट
40.तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ?मुलाखत ही corruption वर झाली. काही situation base प्रश्‍न होते. मुलाखतीवर जास्त अवलंबु राहु नका. २० ते १० असे मार्क्‍स vary होतात.
41.तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?Mock मध्‍ये विचारली गेलेली २-३ प्रश्‍न रिपीट झालेत परुंतु माझ्या Interview चे Topics पटपट बदलत होते. एकच Topic फार वेळचालला नाही.
42.जी समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?Already B.E. (IT) पदविधर होतो. म्‍हणजे काहितरी Privet Sector मध्‍ये जॉब मिळालाच असता. राज्‍यसेवा सोडुन एक Plan B म्‍हणुन STI आणि dy
Education officer या दोन परिक्षा दिल्‍या होत्‍या.
राज्‍यसेवा Fail झालो मात्र STI एका मार्काने गेली व Education officer ची
add cancel झाली. म्‍हणजे आपण स्‍पर्ध्‍ेात आहोत याची खात्री होती.
Confidence टिकुन राहण्‍यास या बाबी उपयोगी पडल्‍या.
43.परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?१० % प्रश्‍न असे असतात ते आपल्‍याला केवळ confuse करण्‍यासाठी टाकलेले
असतात त्‍यामुळे तीकडे दुर्लक्ष कराव. Basic syllabus मधील एकही प्रश्‍न
चुकता कामा नये.
44.तुमच्या यशातील भागीदार?आई, वडील यांचा कायम पाठींबा होता. मनोहर भोळे सर यांचे मार्गदर्शन. गौरी सावंत
(Dy collector) यांचा मानसिक आधार.
45.स्‍पर्धा परिक्ष्‍ेाचे वाढते आकर्षण-हे आकर्षण परिक्षेबाबत नसुन पदाच्‍या प्रतीष्‍ठेबाबत वाढतय अस मला वाटतय.
आकर्षण आभ्‍यासाच असाव, पद नक्‍की मिळेल. आभ्‍यासाच्‍या नावाने ,आयागाच्‍या नावाने ओरड करणा-यांसाठी हे क्षेत्र नव्‍हे. आपला आभ्‍यास असेल तरच आपण पास होवु. फेल झालो तर १०० % responsible आपण स्‍वतः आहोत हे मान्‍य करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat