Website बद्दल

Print Friendly, PDF & Email

स्पर्धा परीक्षाची तयारी करताना आपण एका नवीन क्षेत्रात प्रवेश करत असतो. हे नवीन क्षेत्र हे आपल्यासाठी एक नवीन दुनियाच असते. आपण जीवनाच्या विविध टप्प्यावर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत असतो अन् जीवनातील काही महत्त्वपूर्ण निर्णय हे आयुष्यामधील “निर्णायक वळणे” (turning points) ठरतात. म्हणून आपण घेतलेले निर्णय यशस्वी बनवण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत असतो.
या प्रयत्नाना कठोर परिश्रम स्मार्टवर्क, योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा आत्मविश्वास पूर्वक सामोरे गेलो तर आपण घेतलेला हा निर्णय आयुष्याला कलाटणी देतो आणि ते एक “निर्णायक वळण” ठरते.
महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर विदयार्थी स्पर्धा परिक्षाची तयारी करत आहेत त्यामधील मुख्यत: MPSC ची तयारी करणारे विदयार्थी जास्त प्रमाणात आहेत. कोणी नोकरीच्या अपेक्षेने, तर कोणी मोठा अधिकारी होण्याच्या प्रेरणेने, तर काही जण घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे या क्षेत्राकडे आकार्षित होतात. UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मोठया प्रमाणावर इंटरनेटवर खूप साऱ्या प्रमाणात वेब साईटस उपलब्ध आहेत,परंतु त्यामानाने MPSC तयारी करणाऱ्या ग्रामीण, दुर्गम आणि ज्यांची ऎपत नाही अशा विद्यार्थ्यासाठी मात्र अशा वेबसाइट त्या मानाने कमी आहेत. ही दरी कमी करण्याचा माझा  हा छोटासा प्रयत्न.
स्पर्धा परिक्षाची तयारी करताना मला आलेल्या थोड्याफार अनुभवातून माझे काही अनुभव share करून  तुम्हाला मार्गक्रमण करण्यासाठी फूल नाही तर फुलाची पाकळी देण्याची ही माझी इच्छा या ब्लॉगच्या माध्यमातून पूर्ण होईल अशी मला आशा वाटते अन यातूनच तुमचा “निर्णायक टप्पा”यशस्वी होण्यासाठी मदत होईल याची मला खात्री वाटते. परंतु खरे प्रयत्न शेवटी तुम्हालाच करायचे आहेत. दूर्दम्य इच्छाशक्तीने पेटलेल्याच्यासाठी हि माझी website मी अर्पण  करत आहे.
 

अजित प्रभावती प्रकाश थोरबोले
उपजिल्हाधिकारी,नांदेड