तहसीलदार पदाविषयी ABOUT TAHSILDAR POST

0
5973
Print Friendly, PDF & Email

तहसीलदार पदाविषयी

#प्रथमतः राज्य लोकसेवा आयोगाची 2015 सालाची मुख्‍य परिक्षा उत्तीर्ण झालेल्‍यांचे अभिनंदन. जे कोणी या मुलाखातीस पात्र ठरले नसतील त्‍यांना भविष्‍यातील परीक्षांसाठी शुभेच्‍छा…

#मुलाखातीस पात्र झाल्‍यानंतर सर्व उमेदवार, अभिरुप मुलाखाती (Mock Interview) स्वतःच्‍या बायोडाटा या सर्वांचा सराव करण्‍यास प्राधान्‍य देतात. या सर्वातील एक महत्वाचा घटक जो दुर्लक्षित रहातो तो म्‍हणजे पद व त्यांचे पसंतीक्रम.

#राज्य सेवेतून वेगवेगळ्या वर्ग-1 व वर्ग-2 च्‍या पदासाठी निवड करण्‍यात येते. अशा वेळेस पदांच्‍या पसंतीक्रम टाकतांना उमेदवारांनी आपली आवड, प्रत्येक पदाचा कामाचा विस्तार, आपल्‍या  भविष्‍यातील योजना या सर्वांचा विचार करणे क्रमप्राप्‍त ठरते. अन्यथा चूकीचा पसंतीक्रम टाकल्‍यावर नंतर पश्‍चाताप शिवाय काहीच हातात उरत नाही.

# सर्वात महत्वाचे म्‍हणजे प्रचलित समजुतीचा विचार करुन उमेदवारांनी पसंतीक्रम टाकु नयेत.

या लेखात मी आपणाला तहसिलदार (गट –अ) या पदाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे.

तहसिलदार या पदाविषयी थोडेसे : 

#तहसिलदार हे पद महाराष्‍ट्र शासनाच्‍या महसूल विभागा अंतर्गत येणारे कनिष्‍ठ वर्ग -1 चे पद आहे. ( पे बँड – 15600 – 39100 ग्रेड पे 5000)
या पदावरील व्यक्‍तीची नेमणूक मुख्‍यत्वे करुन तालुक्‍यातील पदावर होते तसेच त्‍याची नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालयात समकक्ष पदावर होऊ शकते.

#शासनाचा महसूल गोळा करणे व तालुका स्तरावरील सर्व खात्यांचा समन्वय राखणे हे तहसिलदाराचे प्रमुख काम आहे. त्‍याच बरोबर कायदा व सुव्यवस्‍था राखण्‍याची अंतिम जबाबदारी तहसिलदारावर येते.
थोडक्यात महाराष्‍ट्र शासनाचा तालुका स्तरावरील चेहरा म्‍हणजे तहसिलदार.

#तहसिलदार पदावर काम करतांना समोर येणारी आव्हाने :

#सध्‍या एकंदरीत महाराष्‍ट्र शासनाचा व त्‍यात महसूल खात्‍याचा आवाका खुप वाढला आहे व तसेच खात्यांतर्गत रिक्‍त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत त्‍यामुळे सहाजिकच तहसिलदार पदाचा कामाचा व्याप पण वाढला आहे.

#तहसिलदार पद हे थेट जनतेशी संबंधीत असल्‍याने व तसेच अनेक खात्‍याचा, मुख्‍यत्वे कायदा व सुव्यवस्‍थेची जबाबदारी असल्‍याने अनेक संवेदनशिल मुद्दे खुप संयमाने हाताळावे लागतात.

#जे उमेदवार राज्य सेवे बरोबर केंद्रिय लोकसेवा आयोगांच्या परीक्षेचा अभ्‍यास करतात. त्‍यांच्‍यासाठी तहसिलदार या पदावर नियुक्ती झाल्‍यास पुढील अभ्‍यासासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

#ज्यांचा एकंदरीतच स्वभाव हा खुपच सामाजिक, संयमी, सर्वांना बरोबर घेवून चालणारा आहे त्‍यांच्यासाठी तहसिलदार हे पद म्‍हणजे समाजासाठी चांगले काम करण्‍याची चांगली संधी आहे.
थोडक्यात, तहसिलदार हे पद खुप प्रतिष्‍ठेचे, जबाबदारीचे असल्‍याने, त्‍याचा पर्याय टाकण्‍यापुर्वी स्वतःच्‍या आवडी, स्वतःचा स्वभाव याचा काळजीपूर्वक विचार करावा व शेवटी, तुकोबारायांचे ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ या मार्मिक वाक्याने समारोप करतो.

All the best…….!

आनंद देऊळगावकर
तहसिलदार,कोल्हापुर

टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या  हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत.

LEAVE A REPLY