16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट महत्वाच्या चालू घडामोडी Revision

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन :

 • भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले.
 • भारतीय क्रिकेट संघाच्या प्रतिकूल काळात अजित वाडेकर यांनी 1971 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली होती.
 • वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत विजय मिळवून देणारे वाडेकर हे भारताचे पहिले कर्णधार होते.

ब्रिटीशांकडून स्वातंत्र्यदिनाची भेट परत केली बुद्ध मूर्ती :

 • भारताच्या 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ब्रिटीशांनी 12 व्या शतकातील चोरीला गेलेली ब्राँझची बुद्ध मूर्ती समारंभपूर्वक भारताला परत केली आहे.
 • 1961 साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या बिहार नालंदा येथील संग्रहालयातून ही ब्राँझची बुद्ध मूर्ती चोरीला गेली होती.
 • 1961 साली नालंदा येथील संग्रहालयातून एकूण 14 मूर्ती चोरीला गेल्या होत्या. त्यामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीचा समावेश होता.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी कालवश:

 • भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा (16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट) राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला.
 • माजी पंतप्रधान वाजपेयींच्या जीवनाशी निगडीत काही प्रमुख गोष्टी-

 • 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जन्म झालेल्या वाजपेयी यांचे शिक्षण उत्तर प्रदेशातील कानपूरमधील लक्ष्मीबाई महाविद्यालयातून एमए राज्यशास्त्रात पूर्ण केले.
 • अटलबिहारी यांचे वडील कृष्ण बिहारी वाजपेयी हे कवी आणि शिक्षक होते, मानवीमूल्य आणि राष्ट्रप्रेम हे वाजपेयींच्या कवितांमध्ये आले.
 • स्वातंत्र्याच्या काळात छोडो भारत चळवळीच्या माध्यमातून ते राजकारणाशी जोडले गेले.
 • वाजपेयी यांनी 1939 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) सदस्य म्हणून संघात प्रवेश केला.
 • माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी वाजपेयी यांचे भाषणकौशल्य पाहून ते एकेदिवशी नक्कीच भारताचे पंतप्रधान होतील असे म्हटले होते.
 • वाजपेयींचे वक्तृत्व आणि संघटन कौशल्य हे जनसंघासाठी कायम महत्त्वाचे ठरले.
 • वाजपेयी यांना 1968 मध्ये दीनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर जनसंघाचे प्रमुख म्हणून काम पाहावे लागले.
 • भारतात आणीबाणीच्या काळात (1975-1977) वाजपेयी आणि जयप्रकाश नारायण कारागृहात राहिले.
 • 1996 मध्ये ते पहिल्यांदा 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले, त्यानंतर 19 मार्च 1998 मध्ये 13 महिन्यांसाठी आणि त्यानंतर ते पाच वर्षांसाठी असे भारताचे तीनवेळा पंतप्रधान राहिले.
 • वाजपेयी हे संसदेचे चाळीस वर्षे सदस्य राहिले. लोकसभेत ते दहावेळा, तर राज्यसभेत दोन वेळा खासदार होते.
 • वाजपेयी यांना 2014 मध्ये भारतातील सर्वाच्च भारतरत्न या किताबाने गौरविण्यात आले

मानसिक आजारांनाही मिळणार विमा संरक्षण:

 • विमा क्षेत्राची नियामक ‘आयआरडीएआय‘ने 16 ऑगस्ट रोजी स्पष्ट आदेश जारी केल्यामुळे आता विमा कंपन्यांना मानसिक आजारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
 • मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकटय़ा भारतात सात कोटी मनोरुग्ण आहेत. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या उपचारासाठी लागणारा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जात असतानाही विमा कंपन्यांनी या आजाराला विमा संरक्षण नाकारले होते.
 • मानसिक आरोग्य कायदा-2017 मध्ये त्याबाबत उल्लेख होता. तरीही प्रत्यक्षात कृती होत नव्हती. काही विमा कंपन्यांनी रस दाखविला असला तरी त्या भरमसाट प्रीमियम आकारण्याच्या तयारीत होत्या.

म्यानमारच्या लष्करावर अमेरिकेचे निर्बंध:

 • रोहिंग्यांचे शिरकाण करणे आणि त्यांना बेघर करून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेने 17 ऑगस्ट रोजी म्यानमारच्या लष्करी कमांडर्स आणि दोन लष्करी विभागांवर निर्बंध लादले.
 • म्यानमारच्या राखीन प्रांतात झालेल्या हिंसाचारप्रकरणी
 • या निर्बंधामुळे त्याचे जागतिक आर्थिक आणि व्यापारी संबंध संपुष्टात येणार असून, परदेशातील संपत्ती गोठविली जाणार आहे.

राज्यातील शाळांत होणार ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा:

 • स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा‘ साजरा करणार आहे.
 • स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे. या भूमिकेतून 1 ते 15 सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दिल्या आहेत.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.
 • स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय‘ हे मिशन संपूर्ण देशभरात सुरू आहे. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच महाराष्ट्रातही ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र‘ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन :

.

 • 1962 ते 1974 आणि 1974 ते 2006 इतका प्रदीर्घ काळ ते संयुक्त राष्ट्रात कार्यरत होते.
 • तर कोफी अन्नान यांना 2001 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
 • 1962 मध्ये कोफी अन्नान यांनी WHO या संस्थेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरु केले.
 • तर 1965 ते 1972 या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या अद्दीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते.
 • संयुक्त राष्ट्र संघाच्या सरचिटणीसपदाची धुरा सांभाळणारे ते आफ्रिकन वंशाचे पहिले नागरिक होते. १९९७ ते २००६ या कालावधीत त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीसपद भूषवले होते.
 • १९९७मध्ये कोफी अन्नान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांमध्ये ताळमेळ रहावा म्हणून संयुक्त राष्ट्र विकास समुहाची स्थापना केली होती.

पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांनी घेतली शपथ :

 • तर या सोहळ्याला भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांची हजेरी होती.
 • इस्लामाबादमध्ये झालेल्या सोहळ्यात इम्रान खान यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली आहे.
 • तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे प्रमुख असलेले इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झालीआहे.

इम्रान खान

 • जन्म लाहोर येथे ५ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला. त्यांचे वडील पश्तुन म्हणजे पठाण वंशाचे व नियाझी जमातीचे होते.
 • लाहोरमधील अचिन्स कॉलेज येथे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. त्यानंतर इंग्लंडमधील वुर्सेस्टर येथे रॉयल ग्रामर स्कूल येथे त्यांचे शिक्षण झाले.
 • ऑक्सफर्डच्या कीबल कॉलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान, राजकारण, अर्थशास्त्र या विषयांतून १९७५मध्ये पदवी घेतली.
 • अष्टपैलू खेळाडू असलेलेया खान यांनी १९७१ ते १९९२ दरम्यान पाकिस्तानी क्रिकेट संघात मोठी कामगिरी केली. १९९२मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिला क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
 • १९८२ ते १९९२ या कालावधीत त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या सर्वाधिक यशस्वी खेळाडूंमध्ये त्यांची गणना केली जाते.
 • टेस्ट क्रिकेटमध्ये ३००पेक्षा अधिकबळी मिळविणाऱ्या जगातील ८ अष्टपैलू खेळाडूंपैकी ते एक आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी ३६२ बळी घेतले आहेत.
 • २०१०मध्ये त्यांचा मानाच्या आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. याशिवाय त्यांना १९९२साली हिलाल ए इम्तियाझ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
 • क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी १९९६साली पाकिस्तान तहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाची स्थापना केली. तेहरिक ए इन्साफ याचा अर्थ न्यायासाठी चळवळ असा आहे.
 • सुरुवातीला शरीफ आणि भुत्तोंच्या पक्षांचे पाकिस्तानमधील जनमानसात असलेले वर्चस्व आणि जनरल मुशर्रफ यांची हुकूमशाही राजवट यामुळे त्यांच्या पक्षाला फारसा वाव मिळाला नाही.
 • मात्र २०१३साली खैबर पख्तुनवा प्रांताची सत्ता मिळाल्यानंतर त्याचा पक्ष वेगाने वाढला. जहाल विचार आणि आक्रमकतेमुळे पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांचा इम्रानला छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते.
 • इम्रान खान हे पाकमधील कट्टरतावादी गटांची कायम पाठराखण करत आले आहेत. इम्रान यांच्या कार्यकाळात पाकमधील कट्टरपंथी शिरजोर होण्याची भीती आहे.
 • इम्रान यांच्या या भूमिकांमुळे पाकच्या उदारमतवादी वर्तुळात त्यांना ‘तालिबान खान’ या नावानेही ओळखले जाते.

एड्सचा ‘हेल्पलाइन क्रमांक 1097 टोल पावतीवर :

 • तर एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेली 1097 ही हेल्पलाइन बहुतांशी नागरिकांना अद्याप माहिती नाही़.
 • तर एड्ससाठी जोखीमग्रस्त घटक असलेल्या ट्रक ड्रायव्हर्सना या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती व्हावी यासाठी टोलनाक्यावरील पावतीवर हा हेल्पलाइन क्रमांक असलेली पावती दिली जात आहे़

‘गगनयान’ मोहिमेची धुरा महिला वैज्ञानिक सांभाळणार:

 • अंतराळवीरासह अवकाशात उपग्रह पाठविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केली. आता या मोहिमेची जबाबदारी एका महिलेच्या हाती सुपूर्द करण्यात येणार असून इस्रोच्या या प्रकल्पाचे नेतृत्व डॉ. व्ही. आर. ललिथंबिका
 • गगनयान मोहिमेअंतर्गत पाठविण्यात येणार अवकाशयान चार ते पाच टन वजनाचे असेल, या प्रकल्पासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, या प्रकल्पामध्ये विविध संघटना, तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील मंडळी सहभागी असतील.
 • ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर मानवी अवकाश मोहीम यशस्वी करणारा भारत जगातील चौथा देश ठरणार आहे.
  • व्ही. आर. ललिथंबिका
 • या कंट्रोल रॉकेट इंजिनियर असून त्या मागील ३० वर्षांपासून इस्त्रोमध्ये कार्यरत आहेत.
 • ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक, स्वदेशी स्पेस शटल अशा अनेक मोहिमांत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
 • नियंत्रण अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८८मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनंतपुरम येथून कामास सुरुवात केली.
 • प्रक्षेपकांचे इंधन, त्यांची रचना, स्वयंचलित नियंत्रण हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख भाग आहे.
 • यापूर्वी इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडले, त्यातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती.
 • ललिथंबिका यांना २००१मध्ये इस्रोचे सुवर्णपदक मिळाले असून, २०१३मध्ये इस्रोचा उत्कृष्टता पुरस्कारही मिळाला आहे.

स्वदेशी हेलिना क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी:

 • भारताने 19 ऑगस्ट रोजी राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये हेलिकॉप्टरवरून डागता येणाऱ्या रणगाडाविरोधी हेलिना या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
 • हेलिना हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता अनेक पटींने वाढणार आहे. जैसलमेरच्या चंदन रेंजवर घेण्यात आलेली गाइडेड बॉम्बची चाचणीही यशस्वी ठरली आहे.
 • चीन आणि पाकिस्तान यांच्याविरोधात ही दोन्ही शस्त्रे मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण ठरू शकतात.
 • टेलिमेण्ट्री स्टेशनपासून या क्षेपणास्त्राच्या संपूर्ण प्रवासावर लक्ष ठेवण्यात आले होते. सध्या जगातील हे सर्वात अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.
 • डीआरडीओ आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या चाचणीच्या वेळी हजर होते.

हेलिनाची वैशिष्ट्ये

 • हेलिना हे यापूर्वीच्या नाग या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाइलचे हेलिकॉप्टरमध्ये वापरता येणारे व्हर्जन.
 • ७ ते ८ किमीवरील लक्ष्याला अचूक भेदण्याची क्षमता.
 • एचएएल ध्रुव और एचएएल लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमध्ये वापरू शकणार.

भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश:

 • नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेले पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे नासाने भारताकडून 10 वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-1 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे.

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाचे ऑपरेशन मदद

 • अतिवृष्टी आणि महापुरामुळे उध्वस्त झालेल्या केरळमधील जनतेच्या मदतीसाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन मदद’ लॉन्च केले.

महाराष्ट्रात राबविण्यात येणार पोषण अभियान

 • कुपोषणापासून बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जन्मत: कमी वजन असणाऱ्या बालकांची संख्या खाली आणण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत नवीन पोषण अभियान महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.
 • राज्यात ९७ हजार अंगणवाड्या असून त्यापैकी ८५,४५२ अंगणवाड्यांमधून ही योजना राबविण्यात येणार असून यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
 • अंगणवाड्यांमधील ० ते ६ वयोगटाच्या बालकांमधील खुजेपण तसेच कुपोषणाचे प्रमाण ६ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
 • तसेच ६ ते ९ महिने वयाच्या बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्के एवढे खाली आणणे व जन्मत: वजन कमी असणाऱ्या बालकांचे प्रमाण २ टक्क्यांवर आणणे हे देखील या योजनेचे ध्येय आहे.
 • २०१८-१९ या वर्षात दोन टप्प्यांत ३० जिल्ह्यातील ८५,४५२ अंगणवाड्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. २०१९-२०मध्ये उर्वरित ६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येईल.
 • या योजनेसाठी केंद्र शासन ८० टक्के तर राज्य शासन २० टक्के खर्च करणार असून एकूण योजनेची व्याप्ती ही २४७ कोटी रुपये एवढी आहे.
 • राज्यात २.०७ लाख अंगणवाडी सेविका व कर्मचारी काम करत असून, सुमारे ७३ लाख बालकांना पोषण आहार देण्याबरोबरच या बालकांचे नियमित वजन करणे तसेच सबलीकरणासह आरोग्याची काळजी घेण्याचे काम ते करत असतात.
 • या कामाप्रमाणेच बालकांच्या नेमक्या उपस्थितीचे प्रमाणीकरण करण्यासाठी या नव्या योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 • यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी ८९ हजार अत्याधुनिक मोबाइल घेण्यात येणार आहेत. या मोबाइलद्वारे बालकांना देण्यात येणाऱ्या रोजच्या आहाराचे छायाचित्र काढण्याबरोबर या बालकांची नोंदणी आधारशी जोडण्यात येणार आहे.
 • यासाठी राज्य पातळीवर व गटपातळीवर दोन समित्या करण्यात आल्या असून अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक व विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०१८मध्ये पोषण अभियानाची सुरुवात राजस्थानमधील झुनझुनू येथे केली. यापूर्वी या योजनेचे नाव राष्ट्रीय पोषण मिशन असे होते.
 • गर्भवती महिला, माता आणि बालकांसाठी समग्र विकास आणि पुरेसे पोषण सुनिश्चित करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 • POSHAN : Prime Minister’s Overarching Scheme for Holistic Nutrition
 • घोषवाक्य :सही पोषण – देश रोशन
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat