1 ते 8 ऑगस्ट चालू घडामोडी revision

  • द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे 7 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झाले.
  • न्यायमुर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशपदाची 8 ऑगस्ट रोजी शपथ घेतली. त्यामुळे सुप्रीम कोर्टात सध्या काम करणाऱ्या महिला न्यायाधीशांची संख्या तीनवर पोहोचली आहे. ही ऐतिहासिक नोंद असून त्यामुळे आर. भानूमती, इंदू मल्होत्राआणि इंदिरा बॅनर्जी या तीन महिला न्यायाधीश पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाचे कामकाज पाहणार आहेत.न्या. बॅनर्जी यांनी मद्रास उच्च न्यायालयापूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी आणि त्यानंतर तेथेच मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले आहे. बॅनर्जी यांच्यापूर्वी वरिष्ठ अधिवक्त्या इंदू मल्होत्रा या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनलेल्या सातव्या महिला न्यायाधिश ठरल्या होत्या. न्या. मल्होत्रा या पहिल्या महिला न्यायाधिश आहेत ज्यांची थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे.
  • दरम्यान, न्या. फातिमा बीवी यांच्यानंतर सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना प्रकाश देसाई आणि त्यानंतर आर. भानुमती या महिला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बनल्या आहेत.
  • ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे महत्त्वाचे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले आहे.हे विधेयक मंजूर झाल्यावर राज्यांना जातीचा समावेश ओबीसीच्या केंद्रीय सूचीमध्ये करायचा असेल तर तसे ते आयोगाला कळवू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.
  • भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकारपिंगली वेंकैया यांची 2 ऑगस्ट रोजी 142वी जयंती साजरीझाली. याच दिवशी 1876 साली त्यांचा सध्याच्या आंध्रप्रदेश राज्यात असणाऱ्या मच्छलीपट्टम येथील भतलामपेनूमारू येथे जन्म झाला होता.
  • रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक 30 जुलैपासून सुरू झाली. समितीचा व्याजदर बदलाबाबतचा निर्णय 1 ऑगस्ट रोजी जाहीर केला. 2018-19 मधील हे तिसरे व्दिमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित 6.25 टक्के केला होता. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. अपेक्षेनुसार रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली. या वाढीनंतर रेपो दर 6.50 टक्के इतका झाला आहे.
  • भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बँकेमधील हिस्सेदारी 51 टक्‍क्‍यांवरनेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बँकेवर एलआयसीची मालकी प्रस्थापित होणार आहे.
  • अमेरिकेने भारताचा समावेश ‘स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1‘ (एसटीए) यादीत केला असून, त्यामुळे अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान आयात करण्याची प्रक्रिया सुलभ होणार
  • व्यावसायिक अंतराळ यान व कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळात जाण्याच्या पहिल्या मोहिमेसाठी नासाने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्ससह नऊ जणांची निवड केली आहे.
  • पेप्सिको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंदिरा नूयी 12 वर्षांनंतर आपल्या पदावरून पायउतारझाल्या आहेत. कंपनीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. 62 वर्षीय इंदिरा नूयी यांच्या जागी रेमन लॅगार्ट यांची नियुक्तीकरण्यात आली आहे.
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat