सिम्प्लिफाइड स्टोरी-स्वतःवर नियंत्रण

एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्‍याच्‍याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्‍ही कोण आहात. बुद्ध म्‍हणाले,”मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.” मुलाने यावर त्‍यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्‍हणाले,”जो धनुष्‍यबाण वापरतो त्‍याला त्‍याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्‍याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्‍वत:वर नियंत्रण ठेवतो,” मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्‍हणाले, ” जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्‍यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्‍य तर स्‍वत:ला नियंत्रणात ठेवण्‍याचे असते.

— ज्‍यांना स्‍वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्‍याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परि‍स्थितीत आपल्‍याला आनंदी ठेवतो.

सकाळी एक स्पर्धा परीक्षा उमेदवाराने msg केला “Sir me घरीच अभ्यास करतो ,
& एकटा च असतो
Smartphone sobat असल्या कारणाने खूप distraction hoty
मला याची जाणीव आहे की हा खूप मोठा खड्डा आहे तरीही phone काही सुटत नाही
अभ्यास संबधी video pahanysthi YouTube start केला की मी थोड्या वेळातच comedy video पाहणे start करतो हे automatic होते maybe YouTube Che Algorithm …
Sir मला खरच या खड्यातू न बाहेर पडायचे आहे
Solution सांगा please 🙏🏼Thodya vela me swtch uthun phone swich on karto
Basically *self control* nhi aahe mazykde”

स्वतःवर सेल्फ कंट्रोल करणं खूप महत्वाचे झालाय..आपल्याला जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत आपण सावरत नाही परंतु खूप वेळ निघून गेलेली असते..त्यामुळे वेळीच स्वताला सावरा..स्वतःचा पराभव टाळा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat