सिम्प्लिफाइड स्टोरी शांत मन

एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे.
जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भाावनिक मूल्य होते.
बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना. मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल,त्याला बक्षिस मिळेल…..
बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.
नेमके जेंव्हा त्या शेतकर्‍याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्‍याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला.
शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की “बिघडले कुठे…! हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी……..”
शेतकर्‍याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठाराट पाठवले.
थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला.
शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले………!
त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले………….!!
मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केल, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो.त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”

एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.*
तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरीशांतता द्या आणि मग पहा, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचं जीवन कसे सजवते.

–नकारात्मक माणसापासून दूर रहा जी कालवा करतात

—योग्य मार्ग दाखवणार्याचे शांतपणे ऐका आणि आपल्या मनाला शांत ठवून विचार करा

–अभ्यास करताना पण कसलेही tsn असु नये..शांत मन असावे

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat