सिम्प्लिफाइड स्टोरी-मूर्ख गवई

एका मनुष्याचा आवाज अगदी खराब होता. परंतु त्याची गाणे शिकण्याची जागा चांगली सजवलेली होती. तेथे बसून तो आपला गाण्याचा अभ्यास करीत असे. एकदा त्याला वाटले की आपण आता छान गातो तेव्हा आपल्या गाण्याचा जाहीर कार्यक्रम करावा. त्याने जाहिरात देऊन आपले गाणे नाटकगृहात ठरविले. जाहिरात वाचून पुष्कळ लोक नाटकगृहात आले. परंतु, गाणे इतके भिकार झाले की लोकांनी टाळ्या पिटून आणि काठ्या बडवून त्याची हुर्यो केली व त्यास हाकलून लावले.

— आपल्या गुणांची किंमत आपणच ठरविणे हा मूर्खपणा होय. लोक जेव्हा त्या गुणांची तारीफ करतील तेव्हाच तो गुण खरा आहे असे समजावे.

—स्पर्धा परीक्षेत पण सतत स्वताला improve करत रहा

—mpsc अथवा upsc करतोय म्हणून बडेजाव करू नका

— स्वतःचाच बडेजाव करत असतात असे आपण तयार होऊ नका

—आपल्या पेक्षा दुसरे चांगले असू शकतात याची जाणीव असावी

—पैसे,ज्ञान,पद, जात,धर्म याचा कधीच गर्व करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat