सिम्प्लिफाइड स्टोरी दरोडेखोर

*अनुभवाच्‍या जोरावर यश*
एका व्‍यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्‍यापार करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍याच्‍या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्‍यापारी म्‍हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्‍याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्‍यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्‍यापा-याने विचार केला, आपण पहिल्‍यांदा जाण्‍यात फायदा आहे, रस्‍त्‍याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्‍या किंमतीवर सामान विकेन. त्‍याने पहिल्‍यांदा जाण्‍याचा निर्णय घेतला. पहिल्‍या व्‍यापा-याला वाटले, या व्‍यापा-याच्‍या जाण्‍याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्‍या खोदलेल्‍या विहीरीचे पाणी प्‍यायला मिळेल. शिवाय चांगल्‍या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्‍यापा-याच्‍या माणसांनी पाण्‍याने भरलेल्‍या घागरी बरोबर घेतल्‍या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्‍यांना भेटले, त्‍या लोकांनी व्‍यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्‍याची गरज नाही. व्‍यापा-याने त्‍यांचा सल्‍ला ऐकला. त्‍या रात्रीच त्‍या व्‍यापा-याचा काफिला लुटला गेला. व्‍यापारीही मारला गेला.एक महिन्‍याने पहिला व्‍यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्‍हा दरोडेखोराच्‍या माणसांनी त्‍यालाही खोटे बोलून भुलविण्‍याचा प्रयत्‍न केला पण पहिला व्‍यापारी त्‍यांच्‍या बोलण्‍याला भुलला नाही. व्‍यापा-याच्‍या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्‍यापा-याला विचारले असता व्‍यापारी म्‍हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्‍यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्‍यापारी पुढे गेला व त्‍याच्‍या धंद्यात अशा छोट्याशा गोष्‍टींमुळे तो यशस्‍वी झाला.
:- अनुभवाने माणूस यशस्‍वी होतो.

असेच शहाणे होणे गरजेचे आहे

जे सोपे आहे त्याला शिकायला लाखो का

आपलयाला लुटू देऊ नका

असेच आपली वाट चुकीची दाखवायला पण खूप जण येतात आणि भरक्तवत्ता त्याच्यापासून दूर रहा

आपल्याला आपलं करिअर करायचंय आणि त्यांना त्यांचा धंदा

⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat