सिम्प्लिफाइड स्टोरी गरुड

एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला.
त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की ‘जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडायला लावील. त्याला सुवर्ण मोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील.’
हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कोणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्याने राजाला विनंती केली. अनेक रथी-महारथी थकले, तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला, पण गरुड उडणे आवश्यक होते, म्हणून त्याने त्याला संमती दिली.
शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारले, “काय रे, उडाला काय गरुड?” तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवले. राजाने बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितले आणि काय आश्चर्य! तो दुसरा गरुड आकाशात पहिल्यापेक्षा उंच भराऱ्या घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला!
त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारले, “अरे, तू हे कसे केलेस?”
तेव्हा शेतकरी म्हणाला, “मी काही फार वेगळं केलं नाही. मी फक्त तो गरुड बसलेला होता, ती फांदी मोडून टाकली! त्याचबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली!!”
–आयुष्यात अनेक जण असेच कोणत्यातरी फांद्यांना चिकटून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेती-वाडीला, कोणी परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या-मोठ्या नोकऱ्यांना! या छोट्या-मोठया फांद्यांना चिकटून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच ते विसरून जात असतात!
मिळेल ती नोकरी धरायची. मग घर घ्यायचं. मुलं झाली की, त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत-करत निवृत्त व्हायचं, बस्स, संपलं आयुष्य! यालाच मध्यमवर्गीय कुपमंडुक मानसिकता म्हणतात!
अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा! आयुष्य म्हणज फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणीही येणार नाही, हे लक्षात असू द्या. तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल, तर तुमची तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी! कधीतरी स्वतःच तोडून तर बघा! तुम्ही जितकं समजताय ना त्याहूनही अधिक करण्यासारखं खूप आहे हो आयुष्यात! जग खूप मोठं आहे. विशाल आहे, पण तुम्हीच स्वतःला पारंपरिक मध्यमवर्गीय मानसिकतेच्या चार भिंतींमध्ये कोंडून घेतलंय आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात!
—माझा एक मित्र मागे म्हणलो होतो स्पर्धा परीक्षेच्या नादात वेडा झाला आह..मागील 8 वर्षांपासून त्याचे डोक्यात फक्त अधिकारी बसला आहे ..त्यामुले तो काहीच करू शकत नाही..रात्री झोप लागत नाही…cdpo ची परिक्षा भीती पास होईल का…बाकीचे मित्राचे लग्न झाले माझे पण व्हायला पाहिज…आता त्याचा स्वभाव घाबरत झाला आहे..मागच्या आठवड्यात माझ्याकडे आला होता..भाऊ 1 करोड ची कंपनी टाकून देतो म्हनयोय परंतु याच्या डोक्यात फक्त अधिकारी..

—मागच्या आठवड्यात माझ्याकडे आलता वडिलांसोबत,मी म्हटले मित्रा काढून टाक डोक्यातून हे सर्व घरी जा सर्व पुस्तके पोत्यात
भर आणि पाहीले स्वतः ची तब्बेत आणी मानसिक स्थिती चांगली कर नन्तर अभ्यास कर..

—जोपर्यंत मनात अधिकारी नावाची फांदी तोडणार नाही तोपर्यंत मनात कोणीच प्रवेश करत नाही..सतत भीती मग मित्र कट म्हणतील?समाज काय म्हणेल?

–आपल्या पडत्या काळात कोण नसते आपल्या सोबत…जोपर्यंत आपल्याकडे पैसे असतात तोपर्यंत आपल्याला बांडगूळ प्रमाणे चिटकायला येतात.

–मित्रानो मी पण तोडलीय फांदी..

–आणखी एक उदाहरण मराठी viral वाला जीवन आगाव स्पर्धा परीक्षा अभ्यास करत स्वतःमधील सुप्त गुन बाहेर काढलेत..मरू नाही दिलेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat