सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Asst .RTO)

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Asst .RTO)

*टीप
सदरचे पद गट -ब संवर्गातील असले तरी हे पद गट -अ मध्ये  पदोन्नत करणे प्रस्तावित आहे

*पात्रता
शैक्षणिक – कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदवी(B.E/B.TECH)
किंवा B.Sc (maths)
किंवा B.Sc (Physics)
  यासोबतच विहित केलेली शारीरिक पात्रता

*RTO विभागाची पदतालिका
    ( पदोन्नतीच्या संधी )
  अतिरिकत परिवहन आयुक्त   
           Addl. TC
                  |
      सहपरिवहन आयुक्त 
             Jt.TC
                  |
      परिवहन उपायुक्त 
           DY.TC
                 |
  प्रादेशिक परिवहन अधिकारी 
            RTO
               |
   उप प्रादेशिक परिवहन आधिकारी
           Dy.RTO
                   |
   सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी 
          Asst. RTO   
                   |
      मोटार वाहन निरीक्षक 
             IMV        
                |
   सहायक्क मोटार वाहन निरीक्षक
            ATMV

Asst. RTO हे पद पोलिस विभागातील Dysp पदाशी समकक्ष असून तशाच प्रकारचा युनिफॉर्म  या पदासाठी विहित केलेला  आहे.

*महात्वपूर्ण

– Asst .RTO हे परिवहन (गृह ) खात्यातील जिल्हास्तरीय पद आहे .
– सदर पदाची कार्य प्रशासकीय आणि नियंत्रक प्रकारची आहे
– RTO विभाग हा स्वंतत्रपणे कार्यरत असून  पोलिस खाते / ट्रॅफिक पोलिस यांच्याशी सदर विभाग  संबधित  नाही / त्यांच्या अखत्यारित नाही .
     
  * RTO विभागाची प्रमुख कार्ये

१- ड्रायव्हिंग लायसन्स देणे
२- आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवाना देणे .
३- वाहनाची नोंदणी करणे
४-फ्लाईंग स्कॉडदवारा रस्त्यावर वाहनांची तपासणी
५- आंतरराज्य सीमेवर वाहन तपासणी
६- वायू / ध्वनी प्रदूषण तपासणी / कारवाई
७- वाहन कर / पर्यावरण करांची आकारणी
८ – सुरक्षित रस्ता वाहतुकीसाठी अमलबजावणी

*सकारात्मक बाजू

-युनिफॉर्ममध्ये काम करण्याची संधी
– युनिफॉर्म असला तरी कामाचा ताण नाही 
– समाजात असलेले  मानाचे स्थान
– जिल्हास्तरिय पद असल्याने शहरी भागात नियुकती च्या संधी
-समाजातील प्रत्येक व्यकतीपर्यत पोहचण्याची संधी 
( कारण प्रत्येक व्यक्ती लायसन्ससाठी अथवा वाहन नोंदणीसाठी कार्यालयात येतच
– कुशल वाहनचालक निर्माण करून त्यांना मानाची रोजगार निर्मिती
– अवैध वाहतुक व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन अपघातांचे प्रमाण कमी करण्यास हातभार
– रस्ता वाहतुक  सुरक्षित बनवून देशाच्या प्रगतीस चालना 
– ध्वनि व वायू प्रदूषणावर नियंत्रणाद्वारे पर्यावरण समृदधी 
         अशा प्रकारे ज्यांना  युनिफॉर्मची आवड आहे , लोकांमध्ये मिसळून काम करण्याची आवड आहे ,रस्ता वाहतुक सुरक्षित बनवणे व पर्यावरण समृद्धीकरणास हातभार लावण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी अंत्यत चांगले  पद आहे .
– लोकसहभाग व प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवता येऊ शकतील

*नकारात्मक बाजू

– कामामध्ये वैविध्यता कमी
– प्रतिनियुक्ती / इतर खात्यांमध्ये काम करण्याच्या कमी संधी

अनिरूद्ध करपे,
   ARTO

टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या  हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat