रिस्पॉन्ड अँड रिऍक्ट

गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला किस्सा त्यांच्याच शब्दात देत आहे.
एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो. माझ्या जवळच्या टेबलावर एक ग्रुप बसला होता. त्यात काही महिला पण होत्या.

अचानक एक झुरळ उडत उडत येऊन एका महिलेच्या अंगावर बसले. ते झुरळ बघून ती महिला घाबरून किंचाळायला व थयथयाट करायला लागली. तिचा हा थयथयाट मिनीटभर तरी चालू होता. मोठ्या मुष्किलीने तिने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्याच ग्रुपमधल्या दुसर्याल महिलेच्या अंगावर जाऊन बसले. मग त्या महिलेने पण किंचाळायला व थयथयाट करायला सुरवात केली.

तेवढ्यात त्या हॉटेलचा वेटर तेथे आला. त्या दुसर्याथ महेलेने पण मोठ्या मुष्किलीने ते झुरळ झटकून टाकले तर ते झुरळ त्या वेटरच्या अंगावर जाऊन बसले. मला वाटले की आता वेटर पण थयथयाट करणार. पण तसे काही झाले नाही. ते झुरळ अंगावर पडताच तो वेटर स्तब्ध उभा राहीला. अजिबात हालचाल न करता त्या झुरळाच्या मुव्हमेन्ट्स बघत राहीला. योग्य वेळ येताच त्याने ते झुरळ झटक्यात पकडले आणि हॉटेबाहेर फेकून दिले.

मी विचार करू लागलो की जी गोष्ट त्या वेटरला जमली ती गोष्ट त्या दोन महिलांना का जमली नाही?
.
माझ्या लक्षात आले की त्या दोन महिला घाबरून ‘रिऍक्ट’ (React) होत होत्या तर त्या वेटरने ‘रिस्पॉन्ड’ (Respond) दिला होता.
.
त्या दोन महिला झुरळाला घाबरून ‘रिऍक्ट’ होत नव्हत्या तर आपण झुरळाच्या समस्येला तोंड देऊ शकत नाही या विचाराने भितीने गर्भगळीत होऊन ‘रिऍक्ट’ होत होत्या.
.
पण वेटरचे तसे नव्हते. आपण झुरळाच्या या समस्येला तोंड देऊ शकतो याची त्याला खात्री असल्यामूळे त्याने ‘रिस्पॉन्ड’ देण्याचे ठरवले होते.’
.
तात्पर्य
.
पहिली गोष्ट म्हणजे ‘रिऍक्ट’ (React) आणि ‘रिस्पॉन्ड’ (Respond) या शब्दांमधला फरक लक्षात घ्या.
.
आयुष्यात कोणतीही समस्या आली की ‘आपण ही समस्या सोडवू शकत नाही’ या भितीपोटी माणूस ‘रिऍक्ट’ होत असतो. कुठलीही समस्या आली की तिला ‘रिऍक्ट’ होणे हा जरी मनुष्यस्वभाव असला तरी त्यामध्ये आपली कमजोरी दिसत असते. कारण मनुष्य जेव्हा ‘रिऍक्ट’ होतो तेव्हा तो बहुतेकपणे चुकिच्या माहितीमूळे, चुकीच्या विचारांमूळे, चुकीच्या गायडन्स मूळे, आत्मविश्वास नसल्यामूळे किंवा चुकिच्या संगतीने ‘रिऍक्ट’ होत असतो.
.
पण आपण या समस्येला तोंड देऊ शकतो अशी जेव्हा माणसाची भावना होते तेव्हा तो त्या समस्येला ‘रिस्पॉन्ड’ द्यायच्या, म्हणजेच तोंड द्यायच्या प्रयत्नांना सुरवात करतो. मग तो यासाठी योग्य ती माहिती गोळा करतो, योग्य व्यक्तिंचा सल्ला घेतो, योग्य विचार मनात आंणतो, मन शांत आणि खंबीर ठेवतो. शांत चित्ताने पण दृढ निश्चयाने त्या संकटाचा मुकाबला करू लागतो.

–आयुष्यात अनेक समस्या(भीती,विचार,अपशब्द,राग,द्वेष,मत्सर इत्यादि) येत असतात. अनेक झुरळे अंगावर बसत असतात. या समस्यारूपी झुरळांना ‘रिऍक्ट’ होऊन थयथयाट करत बसायचे का ‘रिस्पॉन्ड’ देऊन त्यांना हाकलून द्यायचे हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?

One comment

  1. Nice one

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat