राज्यात राज्यसेवा परीक्षा 2017 मध्ये राज्यात प्रथम आलेले रोहितकुमार राजपूत यांची मार्गदर्शनपर मुलाखत

A)उमेदवाराचे प्रोफाईल
* नाव : रोहितकुमार राजपूत
* कोणत्या पदी निवड झाली: उप-जिल्हाधिकारी
* मुख्य परिक्षेचा सीट क्रं : MB001059
* वय: 25
* आता पर्यत मुख्य परिक्षा किती वेळा दिल्या .: 3
* शाळेतील माध्यम: इंग्रजी
* महाविदयालयातील माध्यम: English
* मुख्य गाव: यावल, जि. जळगाव
* अगोदरचा काम करण्याचा अनुभव:
–कक्ष अधिकारी
* आणखी कोणत्या स्पर्धा परिक्षेची तयारी , त्यातील मिळालेले यश / अपयश —
–फक्त राज्यसेवा
* कुठे क्लासेस लावलेले का?-एकही नाही
* मॉक मुलाखती दिल्या का ?–एकही नाही
* * पदाचा पसंतीक्रम कोणता होता –उप-जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी वर्ग-1, तहसीलदार
B) शिक्षण
* १०वी ला किती टक्के मार्क—90
* १२ वी ला किती टक्के मार्क –83
* पदवी कोणत्या विषयात अन किती टक्के गुण मिळाले–संगणक विज्ञान, 80%
* महाविद्यालय कुठून —शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय coep, पुणे, 2014
* पदवीत्युर शिक्षण–नाही
* आणखी कोणते व्यावसायिक शिक्षण केले आहे का नाही–नाही
* छंद अथवा अंवातर कौशल्ये –नियमित व्यायाम, जलतरण, नानाविध क्रीडाप्रकार, इ.
C) स्वतःबद्दल थोडक्यात सांगा, कौटुंबिक पार्श्वभूमी
–घरी फोटोग्राफीचा व्यवसाय आहे, सर्वसामान्य आर्थिक पार्श्वभूमी आहे, प्रशासकीय सेवेची पार्श्वभूमी नसलेले कुटुंब आहे
D)स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय कशामुळे घेतला ?
–वैयक्तिक कल आणि आवड च्या आधारे निर्णय घेतला.
E)स्पर्धा परिक्षेची तयारी करताना अनिश्चितता खूप आहे , सुरवात विदयार्थ्याकडून जोरात होते परंतु अभ्यासामध्ये सातत्य मात्र राहत नाही तर तुम्ही हे सातत्य कसे ठेवले ?विदयार्थ्याना तुम्ही याबाबत काय सांगाल ?
-संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित आत्मसात केल्यानंतर अनिश्चितता वाटायला फारसा वाव उरत नाही. पहिल्या रिडिंग मध्ये असलेला उत्साह तिसऱ्या चौथ्या रिडिंग परत टिकला पाहिजे, सर्वसाधारणपणे सुरवातीच्या 6-8 महिन्यात महत्त्वाच्या 7-8 पुस्तकांची 3-4 रिडींग करणे आवश्यक आहे. माझ्या बाबतीत परिस्थिती परीक्षा घेत होती, म्हणून जिद्द आपोआप निर्माण झाली. सातत्य टिकुन राहण्यासाठी ध्येयवादी असणे गरजेचे आहे.
F)मागील प्रयत्नात अपयश येण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या ? मग तुम्ही या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी काय बदल केले ?
–पुर्वीच्या दोन प्रयत्नांत 600 प्रश्नांपैकी तब्बल 200 प्रश्न attempt केले नव्हते, तसेच उजळणी समाधारकरित्या झाली नव्हती. या वर्षी या दोन मुद्द्यांअर काम केले.
f१)जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी आणि अभ्यास यांचा ताळमेळ कसा राखला ?
–गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहे. सकाळी 5 ते 8 आणि सार्वजनिक सुट्ट्या या मर्यादित वेळेत अभ्यास पूर्ण केला. त्यसाठी कमी पण दर्जेदार साहित्याचा वापर आणि नियमित उजळणी वर भर दिला.
G)राज्य सेवा मुख्य परिक्षा चे विषयानुसार गुण सांगू शकाल का ?
GS1- 94,
GS2-109,
GS3-99,
GS4-103,
E/M obj- 87,
E/M descriptive-42,
Interview-65,
Total-599
H)तुमचे राज्य सेवा पूर्व परिक्षा मधील दोनी विषयांचे गुण सांगू शकाल ?
–वेळे अभावी पूर्व परीक्षेचा जास्त अभ्यास करता आला नाही, उपलब्ध वेळेत केवळ मुख्य परीक्षेचाच अभ्यास केला. शेवटच्या एक महिन्यात सी-सॅट घटकावर भर दिला, तसेच पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात सामाईक असलेल्या घटकांवर focus केला. SSM pre 2017- GS1- 116, GS2-140, Total-256; SSM pre 2018- GS1- 136, GS2- 180, Total- 316
I) मुख्य परिक्षेची तयारी करताना कोणती strategy तुम्ही ठेवली होती विषयानुसार सांगितली तरी चालेल ?
–संपूर्ण अभ्यासक्रम cover करणे, गतवर्षीच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण, स्वत:चे मायक्रो-नोटस् काढणे, त्यांची वारंवार उजळणी, परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे, ही core strategy होती.
J) मुख्य पारिक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्नपत्रिकेत प्रश्न सोडविताना संदिग्धता असते ,तर अशा संदिग्ध प्रश्नाची उत्तरे देताना तुम्ही काय काळजी घेतली ?
–अभ्यासाच्या आणि logic च्या आधारे चार पैकी एक किंवा दोन पर्याय eliminate केले. संपूर्ण तयारी दरम्यान accuracy वर भर दिला.
K ) स्वतःचे mind stable ठेवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष प्रयत्न केले ?
–नियमित व्यायाम केला. तसेच अपेक्षांचे ओझे कमी ठेवल्यामुळे ताण-तणाव फारसा जाणवला नाही.
L ) तुमच्या अभ्यासात इंटरनेटचा किती प्रमाणात फायदा झाला ? कोणत्या वेबसाईटचा तुम्ही वापर केला ?मुख्यतः सोशल मीडिया वरील अभ्यासबद्दल काय वाटते?
–इंटरनेटचा मार्यदित व संतुलित वापर खूप फायदेशीर ठरतो. शासकीय विभागांचे/ संस्थांचे व विकिपिडिया संकेतस्थळावरील माहिती चा अध्ययन केला. सोशियल मिडीया, त्यावरील अभ्यास यांना अनावश्यक वेळ देऊ नये.
M)मुख्य परिक्षेपूर्वी किती दिवस अगोदर Revision ला सुरुवात केली ?
–एक महिने.
N )Revision साठी स्वतःच्या नोटस काढल्या का ?त्या नोटस स्वतःच्या हस्तलिखित होत्या की electronic माध्यमाच्या स्वरूपात होत्या?
–स्वतः काढलेल्या हस्तलिखित मायक्रो-नोटस् चा वापर केला
O) मुख्य परिक्षेत जे उपविषय अवघड होते त्याची तयारी तुम्ही कशा प्रकारे केली ?
–मानव संसाधन विकास साठी india year book, शासकीय विभागांचे/ संस्थांचे व विकिपिडिया संकेतस्थळावरील माहिती, इ. चा अभ्यास केला. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या. कायद्यांसाठी थेट bare acts चे अध्ययन केले, कृषी साठी केवळ अरुण कात्यायन व 11, 12 च्या क्रमिक पाठ्यपुस्तकांचे वाचन केले.
P)मुलखतीची तयारी कशा प्रकारे केली ? मॉक मुलाखत दिले होते का? मॉक मुलाखती या प्रत्यक्ष मुलाखती सारख्या असतात की वेगळया ? अशा मॉक मुलाखतीला जाणे कितपत योग्य आपणास वाटते?
–गेल्या दोन वर्षात मी राज्यसेवा साठी दिलेल्या दोनही मुलाखतींपूर्वी एकदाही मॉक मुलाखत दिली नव्हती. तसेचा यंदा ही ऑफिस मुळे मुलाखतीसाठी फारसा वेळ/सुट्ट्या मिळाल्या नाही व मॉक दिली नाही. परंतु पूर्वी प्रत्यक्ष मुलाखत न दिलेल्या विद्यार्थ्यांनी मॉक मुलाखती देणे श्रेयस्कर आहे. मॉक मुलाखती मधील प्रश्न जशेचे तशे प्रत्यक्ष मुलाखतीत विचारले जात नसले तरी त्यांचा orientation मिळण्याकरिता निश्चितच फायदा होतो.
Q)मुलाखतीचे चेअरमन कोण होते ?मुलाखत किती वेळ चालली ?तुमच्या मुलाखतीबददल थोडक्यात सांगा ? जर तुमच्या मुलाखत असेल तर पाठवा
—चेअरमन- मा. सदस्य पटेल सर, 20 मिनिटे, मुलाखतीचा अनुभव चांगला राहिला, चालु घडामोडी, सध्याचा जॉब, पदवीचा विषय, इ. मुद्द्यांवर प्रामुख्याने प्रश्न विचारण्यात आले.
R)तुम्ही जे मुलाखतीसाठी प्रश्न expect केले होते त्याप्रमाणे मुलाखत पार पडली का ?
हो
S)जर समजा तुमचे या परिक्षेतून selection झाले नसते तर तुम्ही plan B तयार केला होता का ? केला असेल तर कोणता ?
–कक्ष अधिकारी पदावर continue केलं असतं
T)परिक्षेत काही प्रश्नाबाबत उमेदवारांकडून ओरड केली जाते ?तुम्ही त्यांना काय सांगाल ?
__
U)जे विद्यार्थी मागील खूप वर्षापासून प्रेपरेशन करत आहेत परंतु थोडक्या मध्ये ते कोणतीच परीक्षा पास होत नाहीयेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल
–यशाचे सूत्र आहे- यश मिळाल्यानंतर अपयश हा इतिहास होतो आणि संघर्ष हा ऐतिहासिक ठेवा. त्यामुळे धीर सोडू नका. तसेच आपल्या पूवीच्या चुकांमधून धडे घेणे व यशस्वी उमेदवारांकडून टीप्स घेणे आवश्यक आहे. Winners don’t do different things, they do things differently, यशस्वीतांच्या व आपल्या अभ्यासाच्या पद्धतीत काय फरक होता हे समजून, स्वत:मध्ये आवश्यक बदल करा. तसेच अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका विश्लेषण वर जास्तीत जास्त मेहनत घ्या कारण once you have understood the requirement of the exam, appearing in the final list is just a matter of procedure and application. वर्षानुवर्षे दिशाहीन अभ्यास करू नका. Precise, practical and to the point अभ्यास करणे अपेक्षित आहे. सर्वांना शुभेच्छा.
V)तुमच्या यशाचे श्रेय तुम्ही कुणाला द्याल
—आई-वडीलांना
W)काही उमेदवाराकडून असा प्रचार केला जातो की फक्त पुणे येथेच अभ्यास केला तर यश मिळू शकते अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल?
–पुण्यात येऊन अभ्यास करणे, अथवा स्पर्धापरीक्षांची तयारीसाठी क्लास लावणे, इ. यश मिळविण्यासाठी पूर्वअट नाही. आपण कोण आहोत, कुठे राहतो, कसे दिसतो, आपली आर्थिक पार्श्वभूमी काय आहे, आपण क्लास लावले आहे की नाही, तयारीसाठी पुण्याला आलो आहोत की नाही, यशाला या कोणत्याच गोष्टीशी देणं-घेणं नाही. आपल्यात गुणवत्ता व कष्ट घेण्याची तयारी असेल तर यश मिळतोच. प्रयत्नात प्रामाणिकपणा आणि सातत्य ठेवा. Wish you all the best!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat