राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ साठी तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी

9
1304
Print Friendly, PDF & Email
जे उमेदवार MPSC prelium साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी
@या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी
१)सर्वात प्रथम कोणत्याही इतर बाबीकडे लक्ष  न देता आपल्या अभ्यासाकडे लक्ष  द्यायला हवे.वेळ कमी आहे आपण timepass न करता १००% कसे देता येईल  यावर जास्त भर असायला हवा.
२)या वेळी खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत असे बोलाल जात आहे त्याचबरोबर नवीन सेवा पण जोडल्या जाणार  आहेत तरी आलेली संधी दडवता कामा नये(कृपया किती जागा आणि कोणत्या सेवा जोडल्या जाणार आहेत ते विचारु नका.stydy ला जास्त  वेळ द्यावा)
 
http://ajitdc.blogspot.in/
३)CSAT, पेपर बाबत आपणास खूपच भीती असते.ते साहजिक पण आहे.परंतु कोणतेही गोष्ट सरावाशिवाय शक्य नाही आणि त्या सरावाला सातात्य पण असायला हवे.त्यामुळे  Csat ला येथुन पुढे परीक्षेपर्यत दररोज वेळ द्यायला हवा.असा परीक्षा जवळ आली कि मी csat ला १५ दिवस देईल हे घातक ठरेल.म्हणुन त्याची दररोज practice करा
 
http://ajitdc.blogspot.in/
४) आपल्यातील काही उमेदवार प्रथमच या परीक्षेला सामोरे जात  असतील तर त्यांनी कसलीही भीती न बाळगता सामोरे जायला हवे.कोणाशीही तुलना न करता स्वतः ला सख्शम बनवायला हवे.स्वतः मधील कच्चे दुवे शोधून त्यावर काम करायला हवे.जसे कि कोणाला गणित अवघड जाईल तर कोणाला अर्थशास्त्र.यावार जास्त भर द्यायला  हवा.  
५)जे उमेदवार मागच्या परीक्षेत पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यानी मनात कोणतेही नकारत्माक विचार न बाळगता ,आपण ही परीक्षा पास होणार ही खुनगाठ मनाशी पक्की करा.आपण मागच्या परीक्षेत कुठे मागे पडलो यावर मंथन करा.जर तुमचे प्रयत्न १००%नसतील तर अपयश पदरी पङते म्हणून आपले प्रयत्न हे योग्य दिशेने,परिपूर्ण,सकारत्मक,आत्मविश्वासपूर्वक असयाला हवेत.म्हणजे मागचे अपयश विसरून नव्याने सुरवात करायला हवी.स्वतः वर विश्वास ठेवा.
 
http://ajitdc.blogspot.in/
६)परीक्षा  जवळ आले कि अफवाना उत येतो त्याकडे दुर्लक्ष करा.जशा कि परीक्षा  पुढे जाणार, जागा वाढणार नाहीत इत्यादी.
७)पूर्व परीक्षा ही मुख्यतः  तुमच्या पायाभूत अभ्यासाची चाचणी वर आधारित असल्यामुळे तुमचे basic चांगले असायला हवे.त्यासाठी शालेय पुस्तके आणि NCERT books चे वाचन करायला हवे.या परीक्षेत कोणतेही  प्रश्न विचारले जातात तरी जर जास्तीतजास्त अभ्यास आणि त्याची उजळणी पण व्हायला हवी.
८)ही परीक्षा objective प्रकारची असल्याने जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याकडे कल असयला हवा.त्यासाठी अयोगाच्या मागील  प्रश्नपत्रिका,विविध प्रश्नसंच  मधून सराव करा.
 
http://ajitdc.blogspot.in/
९)सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की, स्पर्धा परीक्षा या तुमची गुणवत्तेची कसोटी असते.ही पुस्तके वाचण्याची स्पर्धा नाही.त्यामुळे जे पण तुम्ही वाचा एकाग्रतने आत्मसात करा.जे पण विषय घ्याल त्यासाठी एक refrance, पुस्तक घ्या.उदाहरण भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सवदी अशाप्रकारे.
१०)१ वर्षे स्वतःला झोकून द्या.आणि कसलाही timpass न करता पूर्ण अभ्यासावार लक्ष द्या यश तुमच्या हातत असेल.
११)खुप मोठा अभ्यासक्रमाचा बोझ घेऊ नका.अभ्यास हा entertainment समजून enjoy  करा.
१२)अवघड अथवा नावडते विषय  fresh mind  असताना घ्या,आणि त्याच्याकडे आपल्याला नविन काही तरी शिकायला मिळेल या भावनेने पहा.म्हणजे ते विषयावर पण तुमची पकड येईल.
१३)short मध्ये नोट्स काढण्याची सवय लावा.नोट्स काढल्याने अभ्यास करताना एकाग्रता वाढते आणि revision ला उपयोगी पडते.
 
http://ajitdc.blogspot.in/
१४)अभ्यासाचे नियोजन केलेले कधीही चांगले.ते नियोजन daily,weekly, आणि monthly अधारावर असावे.
 
http://ajitdc.blogspot.in/
१५)परीक्षेपुर्वी साधरणपणे १५ दिवस अगोदर अभ्यासक्रम पूर्ण  असायाला हवे म्हणजे नंतर revision करता येईल.
 
 
 
आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.
http://ajitdc.blogspot.in
@या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी
 

9 COMMENTS

LEAVE A REPLY