राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी महत्वाच्या टिप्स

अभ्यासासाठी टिप्स
— जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे
— दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये
— मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका
— तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका
— जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व सोशल मीडिया बंद करून अभ्यास करा
— परीक्षेचा अभ्यास कसा करावा यासाठी दिवसभराच्या सेमिनार साठी कुठेही वेळ घालवू नका
— या पुस्तकातून अगोदर अभ्यास केला आहे त्याच पुस्तकाचा सतत अभ्यास करा
— या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयामध्ये कोर अर्थशास्त्र विचारले जात नाही त्यामुळे अर्थशास्त्राची विशेष तयारी करण्यासाठी वेळ घालवू नका दारिद्र्य रोजगार विकास सर्वसमावेशक विकास शाश्वत विकास लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्‍न विचारले जात असल्या कारणामुळे जास्त वेळ देऊ नका
–CSAT मध्ये गणित या विषयावरती मागील पाच वर्षात पाच ते सात प्रश्न विचारले जातात त्यासाठी जास्त वेळ वाया घालू नका त्यासाठी स्पेशल क्लास लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही मागील परीक्षेमध्ये चे प्रश्न विचारले गेले आहेत त्याचाच सराव करा तुमच्या लक्षात येईल की बऱ्यापैकी प्रश्न रिपीट होत आहेत
— उताऱ्यावरील प्रश्न यासाठी मागील आयोगाच्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि दररोज तीन ते चार उतारे सोडवा आणि त्यामध्ये आपण कुठे चुका करतोय त्याच्यावरती काम करा
— बुद्धिमत्ता मध्ये पंधरा ते सतरा प्रश्न विचारले जातात त्याची विशेष तयारी करा कोणतेही पुस्तक वापरा त्यातील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये किमान दहा ते बारा प्रश्नांची उत्तर येऊन जातील जोपर्यंत स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही केले तर त्याला काहीच फरक पडत नाही सध्या मार्केटमध्ये बुद्धिमत्ता चे चांगली पुस्तके आहेत. या सर्व पुस्तकांमध्ये प्रश्न सोडवण्याच्या चांगल्या क्लुप्त्या दिलेल्या आहेत आणि ही पुस्तके अतिशय स्वस्तात बाजारात मिळतात त्यामुळे आणखी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही ती पुस्तकेच जर तुम्ही व्यवस्थित पणे सोडवली तर तुमची भीती कायमची दूर होऊ शकते.
— सामान्य विज्ञान या विषयावरती जास्त प्रश्न परीक्षा मध्ये विचारले जातात त्यामुळे या विषयाचा अभ्यास आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे या दोन बाबी होणे गरजेचे आहे सामान्य विज्ञान विषयासाठी क्रमिक पुस्तकांमधील 60 ते
70 टक्के प्रश्न येतात या विषयांमध्ये मुलांना मार्ग कमी का पडतात कारण या विषयावरची असलेली भीती आणि रिविजन न करणे हे आहे त्यामुळे या विषयांची जास्तीत जास्त रिव्हिजन करायला हवी.
— इतिहास या विषयाचा राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये अभ्यास जास्त आहे आणि विद्यार्थी या विषयालाच सर्वाधिक वेळ देतात आणि परीक्षेमध्ये प्रश्न असे असतात ज्यांची उत्तरं ज्यांनी भरपूर अभ्यास केला आहे त्यांनाही देता येत नाहीत त्यामुळे एकच चांगलं पुस्तक वापरा आणि शालेय क्रमिक पुस्तके वापरा त्याचीच सतत सतत रिविजन करा प्रश्न सोडवा .कमीत कमी वेळ द्या.
— चालू घडामोडी या विषयासाठी मागील जानेवारी 2018 पासून चालू घडामोडी चा अभ्यास करा
— भूगोल आणि पर्यावरण या विषयांमध्ये आपणास हमखास चांगले मार्क मिळू शकतात यासाठी क्रमिक पुस्तके त्यासंदर्भातल्या चालू घडामोडी आणि कोणतेही पुस्तक वाचा जास्त प्रश्न आहे प्राकृतिक भूगोल व भारत आणि जगाच्या भूगोलाचा संदर्भात विचारले जातात याचाही जास्तीत जास्त सराव करा
— राज्यघटना आणि लोकाभिमुख धोरण कायदे या संदर्भामध्ये बेसिक राज्यघटनेचा अभ्यास चांगला झाला पाहिजे जो पुढे जाऊन तुम्हाला मुख्य परीक्षेलाही उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर शासनाची महिला कमकुवत घटक आणि विविध बाबी जसे की शिक्षण आरोग्य व्यवसाय रोजगार यासंदर्भात मधील शासनाचे धोरण याबाबत प्रश्न विचारले जातात.
— जर प्रायोरिटी ठरवायचे म्हटलं तर सर्वाधिक जास्त प्रायोरिटी या परीक्षांमध्ये CSAT, सामान्य विज्ञान राज्यघटना भूगोल चालू घडामोडी
पर्यावरण अर्थशास्त्र आणि इतिहास या क्रमाने द्यायला हवी.
— लक्षात घ्या हा अभ्यास सर्व तुम्हालाच करावयाचा आहे कोणीतरी तुम्हाला मदत करेल या आशेने स्वतःला फसवू नका आणि घरच्यांनाही फसवू नका
— आज पर्यंतचा इतिहास परीक्षेचे अभ्यासक्रम जास्त असल्याने त्याच प्रमाणे कॉम्पिटिशन जास्त असल्याकारणामुळे जो हार्ड आणि स्मार्ट दोन्ही वर काम करेल तसेच आत्मविश्वास सातत्य आणि स्वतःला पारंगत ठेवेल तोच हा गड जिंकेल.
— फालतू च्या बिनकामाचा ज्या आपल्या करिअरमध्ये काहीही महत्वाच्या नाहीत अशा गप्पा अभ्यास करताना सोशल मीडियावर करण्यात वेळ घालू नका लक्षात ठेवा 2019 ही लढाई तुमची पण आहे त्यामुळे दुसऱ्याच्या लढाईबद्दल गप्पा मारण्यात वेळ वाया घालू नका.
— यश मिळेपर्यंत समाजकारण-राजकारण या गोष्टीपासून दूर राहा स्वतःचे हित कशात आहे हे पहा
— ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तोच ही लढाई पार करू शकतो ज्याचा विश्वास नाही ते आधी मध्ये कधीतरी या स्पर्धेतून बाहेर फेकले जातील.
— कोण काय म्हणते याच यावर तुमचे यश अवलंबून नाहीये यश तुमच्या जवळ आहे प्रयत्न तुमच्याजवळ आहेत चांगला विचार करणे तुमच्या हातात आहे नकारात्मकता टाळणे तुमच्या हातात आहे.

राज्यसेवा परीक्षा 2019 नियोजन

नमस्कार मित्रांनो

Study Simplified च्या माध्यमातून “राज्यसेवा पूर्व परिक्षा २०१९/ संयुक्त पूर्व परिक्षा २०१९” साठी अभ्यासक्रम व उपघटकानुसार आखलेल्या नियोजनानुसार सर्व विषयांचे सविस्तर अभ्यास व उजळणी 90 दिवसाचे Study Simplified या उपक्रमाचे नियोजन खालील प्रमाणे असेल-

दि-12 Nov To 26 Nov भूगोल(15 दिवस)
27 Nov भूगोल टेस्ट
दि-27 Nov To 11 Dec राज्यघटना(15 दिवस)
12 dec राज्यघटना टेस्ट
दि-12 Dec To 15 Dec पर्यावरण(5 दिवस)
16 dec पर्यावरण टेस्ट+ csat टेस्ट
दि-16 Dec To 22 Dec अर्थशास्त्र(7 दिवस)
23 dec अर्थशास्त्र टेस्ट
दि-23 Dec To 11 Jan सा.विज्ञान(20 दिवस)
12 jan सामन्य विज्ञान टेस्ट
दि-12 Jan To 26 Jan इतिहास(15 दिवस)
27 इतिहास टेस्ट
दि-27 Jan To 31 Jan me चालू घडामोडी(5 दिवस)

1 फेब फुल्ल टेस्ट पेपर 1+पेपर 2

REVISION

दि-01 Feb To 03 feb भूगोल
दि-04 Feb To 06 Feb राज्यघटना
दि- 07 Feb पर्यावरण
दि-08 Feb To 09 Feb अर्थशास्त्र
दि-10 Feb To 12 Feb सा.विज्ञान
दि- 13 Feb इतिहास
दि- 14 Feb चालू घडामोडी
दि- 15 To 16 Feb Last Revision

ऑल द बेस्ट

अजित थोरबोले

t.me/mpscsimplified

21 comments

 1. Sir, CSAT negative marks eka prashnala 0.83 ahet mg tumhi tumchya CSAT booksmadhe tumhi adhi 0.83 n mg 2.5 + 0.83 = 3.33 sangitalay te kas deduct hotat te kalal nahiy. 2.5 ka add karayche?

  Please calculate karun sangu shakal ?

 2. Thank you sir

 3. Thank you so much sir

 4. Thank u so much sir..

 5. Thank u so much sir…

 6. Thank you sir for giving valuable guidance.

 7. Thank you sir

 8. Thanks sir

 9. Thank you sir..

 10. Thanks sir

 11. Thank you sir…..!

 12. chan niyojan karun dilay sar tumhi. thanks.

 13. Thank you so much sir!!

 14. So much precious guidance, thank you very much sirji.

 15. This study strategey help for all student . And getting direction of study approach and reference book

 16. Sanjay Changdeo Shirsath

  Thank You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat