राज्यसेवा परीक्षा 2018 नियोजन

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 पुढील 6 महिने अभ्यासाचे नियोजन कसे असावे.आणि स्पर्धा परीक्षा
१)साधारणता:मार्च-एप्रिल 2018 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल.परीक्षेला जेमतेम 6 महिने राहिले आहेत.आणि त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी ५ महिने कालावधी मिळतोच.तरी आता पूर्व परीक्षेवर भर द्यायला हवा.कारण मुख्य परीक्षेचा बऱ्यापैकी भाग मुख्य परीक्षेत आहे.मुख्य परीक्षेतील काही महत्वपूर्ण विषय जसे HRD, HR, विज्ञान हे विषय हे चालू घडामोडीवर जास्त आधारित असतात आणि त्यांचा आता अभ्यास करण्याऐवजी पूर्व परीक्षेनंतर अभ्यास करायला हवा.जर तुमचे मराठी आणि इंग्लिश हे विषय जर चांगले नसतील तर या विषयाची ग्रामर ची तयारी आता करा.आणि त्याला दररोज 1 तास याप्रमाणे जानेवारी महिना संपेपर्यंत वेळ द्या.पूर्व परीक्षा ही basic knowledge ची कसोटी असल्याने त्यावर जास्त भर द्या.

२) अभ्यासाचे फेब्रुवारी end पर्यंतचे नियोजन करून अभ्यास पूर्ण व्हायला हवा.म्हणजे परिक्षेअगोदारच्या शेवटच्या दिवसात revision करता येईल.माझ्या मते उमेदवारांनी mpsc अथवा upsc या दोन्हीपैकी कोणती तरी एक परीक्षा द्यावी.दोन्ही परीक्षेचा syllabus वेगवेगळा आहे.आणि परीक्षांचे स्वरूप पण भिन्न आहे.महाराष्ट्रात मुले सर्वच परीक्षा देत बसतात त्यामुळे लवकर यश मिळत नाही.कोणतीतरी एक परिक्षेवर concentrate करा.अगोदर कोणती तर एक परीक्षा crack करावी.आपली घरची परिस्थिती पाहून पोस्ट लवकर कोणती मिळेल याचा विचार करून तयारी करावी.

३)पुढील 150 दिवसांच्या नियोजनात सर्व विषय पूर्ण करावयाचे असल्याने आपआपल्या विषयावरिल command चा विचार करून प्रत्येक विषयाला वेळ द्यायला हवा.जसे कोणाचे अर्थशास्त्र हा विषयावर पक्कड नसेल तर त्यावर जास्त लक्ष द्यावे लागेल.अजून खूप कालावधी आहे कोणताही विषय optional टाकू नका.आपण सर्वच विषयात पारंगत असायला हवे. पूर्व परीक्षा ही basic knowledge ची कसोटी असल्याने त्यावर जास्त भर द्या.
पुढे जाऊन प्रशासनात आल्यानंतर आपल्याला सर्व प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे,माघार घेता येणार नाही.त्यामुळे सर्व विषय चांगले करा.खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आहे जर स्वतःला तयार नाही केले तर तुम्ही पाठीमागे फेकले जाल.
४)साधारणत; पेपर १ मध्ये चालु घडामोडी सोडून ६ विषय आहेत.म्हणजेच प्रत्येक विषयासाठी २५ दिवस मिळतात.यात कमी-जास्त करुन तुमचं अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा.माझ्या मते एक विषय संपल्यानंतरच पुढिल विषय घ्या.जर एक विषय वाचन करून कंटाळा आलातर,तुम्ही चालू घडामोडी अथवा CSAT अथवा मागील पूर्ण केलेल्या विषयाची revision करु शकता.आणखी एक बाब म्हणजे अभ्यास करताना एकेक topic, syllabus प्रमाणे घ्या.जसे समजा तुम्ही १८५७ चा उठाव हा topic करत असाल तर प्रथम त्या टॉपिक वर आजपर्यंत आलेले प्रश्न पहा.प्रश्न कसे विचारले जातात ते पहा.त्यानंतर तो topic शालेय पुस्तकातुन करा आणि त्यानंतर कोणत्याही एका संदर्भ पुस्तकमधुन तो टॉपिक करा.त्यानंतर विविध sources मधून त्या topic वर आधारित प्रश्न सोडवा.हे करत असताना शॉर्ट मध्ये नोट्स काढा.नोट्स मध्ये तुम्हाला जी माहिती माहित आहे ती माहिती लिहू नका.जी माहिती विचारली जाऊ शकते अथवा ज्या फॅक्टस लक्षात नाही राहणार त्या नोट्स मध्ये असुद्या.जर नोट्स काढण्यात वेळ जात असेल तर पुस्तकामध्येच underline करा.आणि काही महत्वाचे असेल तर vimp असे लिहा.

मी अभ्यास करताना मोबाईल चा वापर केला होता.समजा मी जर 11 वीचे इतिहासाचे पुस्तक वाचत आहे.तर पुस्तकातील syllabus wise अभ्यास करून सर्व पुस्तकातील महत्वाचा भाग underline केले.त्यानंतर प्रत्येक पानावरील underline केलेल्या पानाचे फोटो काढले.असे एकत्र समजा 100 फोटो झाले.त्याचा एक फोल्डर तयार केला आणि त्याला 11th history असे नाव दिले आणि त्यामध्ये ते सर्व 100 फोटो transfer केले.त्यानंतर समजा मी ग्रोव्हर पुस्तक वाचले आणि त्यामध्ये अशाच प्रकारे फोटो काढून फोल्डर तयार केला आणि त्याला ग्रोव्हर असे नाव दिले.आता हे दोन्ही फोल्डर मी इतिहास नावाचा एक फोल्डर तयार करून त्यात ट्रान्सफर केले.असे प्रत्येक विषयाचे फोल्डर तयार झाले आणि माझ्या मोबाइल मध्ये 3000 पेक्षा जास्त फोटोस झाले.मग मी व्हाट्सअप्प अथवा फेसबुक यांचा वापर करण्याऐवजी मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा,हे फोटो पाहायचो आणि वारंवार revision करायचो त्यामुळे माझ्या खूप वेळा revision झाल्या.त्यामुळे माझे परीक्षेत कधीही confusion झाले नाही.असा प्रयत्न तुम्ही करा.तुम्हाला निश्चित फायदा होईल.

त्याचबरोबर मी google keep या अँप वरती काही factual माहिती नेट वरून कॉपी पेस्ट केली होती.त्यासाठी वेगवेगळ्या website वापरल्या जशा gktoday, mrunal, pib, gov websites etc.
आणि ती माहिती हि परीक्षेला उपयोगी पडली.
५)चालु घडामोडी साठी मात्र दररोज ठराविक वेळ द्या.साधरणपणे एप्रिल 2017 पासूनचे चालू घडामोडी करायला हवे.बदलत्या स्वरूपानुसार चालू घडामोडीचा अभ्यास करायला हवा.काही विषयाचा संबंध हा चालु घडामोडीवर आधारित असतो.त्यामुळे त्या विषयाला चालू घडामोडीचा touch द्यायला हवा.जसे कि पर्यावर्णमध्ये पॅरिस परिषेदेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो.सोबत चालू घडामोडीचे कोणतेही एक पुस्तक आणि मागील 8-9 महिन्याचे चालू घडामोडी कोणतेही मासिक सोबत ठेवा.समजा तुम्ही पेपर 1 मधील पर्यवरण टॉपिक वाचत असाल तर लागलीच यातुन पर्यावरण या भागावरील चालू घडामोडी लेख वाचन करा.आणि त्याच्या नोट्स काढा.असे सर्व विषयासाठी करावे.

६)जो अभ्यास तुम्ही daily करता,त्याची त्याच दिवशी revision करा.आणि जेव्हा पण तुम्ही group मध्ये एकत्रित याल तेव्हा तुम्ही जॊ अभ्यास केला आहे तॊ SHARE करा.इतर फालतू गप्पागोष्टी पेक्षा ते कधीही चांगलेच.

७)study करताना तुमचे मन हे free असने गरजेचे आहे,त्यामुळे इतर problm निपटून अभ्यासाला लागा.अभ्यास एक burden म्हणून नका करू.जर असे असेल तर तुम्ही प्रशासनात पण काम करताना burden म्हणून काम कराल. नुकताच महेंदसिंह धोनी चित्रपट आला त्यामध्ये बिहार विरुध पंजाब match मध्ये बिहार ने 357 रन केले.match च्या तिसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री बिहार चे खेळाडू युवराज सिंह ला पाहतात आणि कसला भारी प्लेअर आहे म्हणतात.धोनीच्या मते आम्ही match त्याच क्षणी हरलो.आणि युवराजने 358 रन केले.त्याचप्रमाणे जर हा अभ्यास burden वाटत असेल,खूप अवघड वाटत असेल अथवा खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही लढाई तेथेच हरली असणार.
८)आपले आईवडिल खुप कष्ट करून आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही पडणार याची काळजी घेतात,मग आपले पण कर्तव्य ठरते कि,त्यांच्या कष्टाला जागुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवावे.यासाठी प्रयत्न करा.१००% द्या यश हातात आहे.आपल्या आईवडिलांना वाटत असते की,आमच्यावर जी परिस्थिती आली ती तुमच्यावर येऊ नये.पण आपण ज्याप्रमाणे ते कष्ट करतात तसा अभ्यास करतो का?काही जण शेतावर कर्ज काढून शिकत आहेत.पण हे पण विचार करा.किती दिवस पुण्यात राहणार?(पैसा,वेळ वाया जातो)काही जण खूप कष्ट करण्याची तयारी आहे अथवा मला फक्त अंगावर वर्दी पाहायची आहे यासाठी आले आहेत.आपण काय करतो आहे याची जाणीव असू द्या.जर या खूप वर्ष प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर दुसरा मार्ग निवडा.स्वतःला आणि घरच्यांना फसवू नका.त्यांना यातले कळत नाही ,ते पैसे पाठवतात आणि त्यांना अशा असत पोरग अधिकारी होईल पण तुम्ही स्वतःमध्ये काहीच बदल करत नाही.आपण कुठे कमी आहे याचा विचार करत नाही.कमकुवत बाजू स्ट्रॉंग करत नाही.आणि सतत परीक्षा fail होताहोत.विचार करा.धन्यवाद

११)प्रत्येक topic नंतर प्रश्न सोङवा कारण हि objective प्रकाराची परीक्षा आहे.जेवढे जास्तीतजास्त प्रश्न सोडवाल तेवढा तुमचा confidence वाढेल.मला एवढे एवढे मार्क मिळायलाच हवेत तर च मी पास होईल हा विचार काढून टाका.cut off किती लागेल याचा विचार अत्ताच नका करू.चांगला performance कसा देता येईल याचा विचार करा.
१२)दररोज average 6-8 तास अभ्यास पुढील 5. महिने पुरेसा राहिल.काहि दिवशी तुमचा काहीच अभ्यास विविध कारणांमुळे होणार नाही तरी तुम्ही tension अजिबात घेऊ नका.सकारत्मकपणे विचार करून पुढील दिवशी तो study पूर्ण करा.लक्षात घ्या हि परीक्षा पुस्तके वाचण्याची शर्यत नाही.तुम्ही जो अभ्यास करता तो तूम्ही आत्मसात करायला हवा.फक्त वाचन करून अथवा खूप वेळ अभ्यास करून कोणी पास नाही होणार.या परीक्षेला अभ्यासक्रम दिलेला आहे.तो अभ्यासक्रम पूर्ण करायला हवा.मोठया syllabus चे अथवा प्रचंड स्पर्धेचे अजिबात दडपण घेऊ नका.cool रहा.आत्मविश्वासपणे सातत्यपूर्वक प्रयत्न चालु ठेवा.
१३)अभ्यासाबरोबर मनाची स्थिरता पण असने गरजेचे आहे त्यासाठी दररोज meditation, jogging,exercise करायला हवा.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी संवाद साधायला हवा.जेणेकरून आपल्याला प्रगती करता येईल.लक्षात ठेवा स्पर्धा परीक्षामध्ये खरी स्पर्धा तुमची स्वतःशीच आहे.शक्यतो study दिवसा करा आणि रात्र जागरण टाळा.अवघड विषय जर तुम्ही दिवसा हातळले तर सोपे होऊन जातील.कधीही तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका ( स्पर्धा परिक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परिक्षा आहे )
सकारात्मक , तुमच्या बद्दल चांगले मत असणारे मित्रच तुमच्या परिक्षेचा या शेवटच्या दिवसात सोबत रहातील याची दक्षता घ्या . नकारात्मक विचार करणारे , निंदा करणारे लोक यांचे विचार विश्व मर्यादित असते ते कधीही आयुष्यात यशस्वी झालेले नसतात. इतराना योग्य मार्गावरून परावृत्त करण्याचे प्रयत्न करत असतात, आपण का अपयशी झालो?याचे परिक्षण करण्याऐवजी कितीही अभ्यास केला तरी मिळत नाही . नशिब असेल तरच तू पास होऊ शकतोस? अशा विचार करणार्या लोकापासून दूर रहा .

१४)सध्या मोठया प्रमाणावर facebook आणि whatsapp चा वापर होत आहे.विविध study groups या माध्यमात सक्रिय आहेत.परंतु याचा मर्यादित आणि चांगला वापर होणे गरजेचे आहे.या study group वर अभ्यास कमी आणि इतर गोष्टी जास्त होताना दिसतात.ज्या प्रमाणात वेळ खर्च होतो त्या प्रमाणात output मिळत नाही.कुठून तरी outdated प्रश्न टाकले जातात आणि त्याची दिवसभर उत्तरे काहि जण देत असतात.अशा timepass करणाऱ्या group पासुन दुर राहावा.प्रश्न हे authentic sources मधून टाकले जातात त्यामुळे Internet वरील material पेक्षा authentic पुस्तके वापरा.काही जण तर पुस्तके वाचणे सोडून प्रत्येक विषयाच्या टेलग्राम ग्रुप वरून अभ्यास करत आहेत.असे लोक nonserious प्रकारात मोडतात.जसे की गणिताच्या विषयासाठी टेलिग्राम ग्रुप.ग्रुप एखादा जॉईन करा जेथे timepass नसतो .फक्त परिक्षाभिमुख माहिती असते.(mpsc सिम्पलिफाइड चा टेलिग्राम ग्रुप—telegram.me/mpscsimplified)जर एखादा मुद्दा चांगल्या प्रकारे एखाद्या Website वर दिला असेल तर जरुर त्या website बघा.उदा.mrunal.org,pib.nic.in,wikipedia etc
authentic sources ची सुची
१५)CSAT चा daily सराव करा.यासाठी दररोज 4 passage सोडवा कुठे चुका होतात त्या पहा.आणि त्यावर काम करा.csat वर लेख लवकरच टाकेल.

– पेपर मध्ये भरपूर प्रश्न हे आपण वाचलेल्या पैकी नसतात , परंतु हे कमीधिक परिस्थितीही सर्वाचीच असते आपण जो अभ्यास करतो तो आपला आत्मविश्वास आणि क्षमता वाढविण्यासाठी करत असतो .तुम्ही आजपर्यत केलेला अभ्यास तुम्हाला परीक्षा hall मध्ये तुम्हाला दिलासा देत असतो.

-शेवटच्या महिन्यात Revision कशी करावी
परिक्षे अगोदर केलेल्या अभ्यासाची Revision महत्त्वाची आहे Revision नाही केली तर अगोदरचा केलेला Study न केल्यासारखा आहे . Revision करताना खालील गोष्टी विचारात घ्या
१- Notes काढल्या असतील तर त्याचा वापर करा .
2- Revision करताना प्रत्येक विषयाला 2 ते 3 दिवस या प्रमाणे नियोजन करा
3- Revision करताना चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता चा दररोज अभ्यास करा
४- शेवटच्या ४ते ५ दिवस अगोदर सर्व विषयाची Revision संपायला हवी.नंतर दुसरी Revision सुरु करा.यामध्ये प्रत्येक विषयाला १ दिवस मिळेल.
५- कोणतेही नविन पुस्तक वाचायला नका घेऊ.अगोदर ज्या पुस्तकातुन अभ्यास केला आहे त्याचीच revision करा.समजा नविन पुस्तकात एखादा विषय चांगला दिला आहे म्हणुन ते पुस्तक घेऊ नका.एकाच पुस्तकातुन revison करा.
६.Revision करताना कधीकधि आपण काही तरी नविनच वाचत आहे असा विचार मनात येतो.असा आला तरी tension घ्यायाचे नाही.ही एक common गोष्ट आहे.सर्वांच्या बाबतीत असे घडते,याला कोणी अपवाद नाही.आपण वाचलेलयापॆकी सर्वच आठवत नसते.be confident about your preparation.आणि विसरणे हा माणसाचा एक गुणधर्म आहे.एखादी गोष्ट खुप दिवस recall नाही केली तर विसरते.

आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा खालील भ्रमात राहू नका
1)मी आता सर्व पुस्तकाचे वाचन केले आहे मी पास नक्की होणार(पुस्तके वाचण्याची अथवा संपवण्याची शर्यत नाही)
2)मी अमुक अमुक website follow करतो,एका ऑफिसरला,अथवा फेसबुक पेज ला follow करतो त्यामुळे यश माझे फिक्स आहे(त्याप्रमाणे कृती करून आपल्यात सुधारणा व्हायला हव्यात)
3)मी अमुक अमुक क्लास लावला आहे.आता मला परीक्षेत हमखास यश मिळेल(हि परीक्षा तुमची आहे.क्लास चे काम फक्त दिशा देण्याचे आणि काही विषय सोपे करणे एवढंच मर्यादित आहे.सर्व अभ्यास तुम्हालाच करावा लागतो.)
4.मी अमुक अमुक पुस्तक वाचले आहे आणि त्या पुस्तकातून खूप प्रश्न परीक्षेला येतात.त्यामुळे आता मी पास होणार(हि परीक्षा पुस्तकाची नाही.syllabus चांगला वाचून पूर्ण करावा.आणि त्यावर तुमची कमांड निर्माण व्हायला हवी)
5.माझे काही विषय खूप चांगले आहेत.बाकीचे विषय मी optional ला टाकणार आहे.(जे विषय optional टाकले आहेत त्यातीलच प्रश्न परीक्षेला जास्त असू शकतात)
6.मी दररोज 12 तास अभ्यास करतो मी परीक्षा नक्की पास होणार(हि किती तास अभ्यास केला याची परीक्षा नाही.तुम्ही दिवसभर केलेला किती अभ्यास आत्मसात केला आहे त्याची परीक्षा आहे.)

“Dont be serious but be sencere.”
तुम्हाला study साठी ALL THE BEST!

आपला मित्र,

  1. अजित प्रकाश थोरबोले
    आपले प्रश्न मला विचारा telegram app var Telegram.me/drajit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat