नाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…प्रभाव

‘ नाही ‘ म्हणायला शिकलं पाहिजे…

आयुष्यात हो म्हणणं सोपं असतं पण #नाही म्हणणं कठीण असतं… परंतु कठीण प्रवासच यशापर्यंत नेत असतो…
स्पर्धा परीक्षांची तयारी करायला आपण आलेलो असतो म्हणजे काहीतरी उद्दिष्ट समोर ठेवलेले असते. पण बऱ्याच वेळा या वातावरणात आलं की मग ध्येय सोडून इतरच गोष्टींवर चर्चा, वेळ वाया घालवणं होतं आणि मग उमेदीचा काळ निघून जातो… मग जरा अस्वस्थ वाटतं… अन मग सर्वच प्रकारचा ताण वाढायला लागतो.
या ट्रॅप मध्ये जर अडकायचं नसेल तर प्रथमतः ‘नाही’ म्हणायला शिकलं पाहिजे…

कुठे-कुठे अन केव्हा-केव्हा ‘नाही’ म्हटलं पाहिजे?

1) आपण अभ्यासिकेत अभ्यास करत बसलेलो असतो… साधारणतः सकाळी 9 ते 11 आणि 4 ते 6 यादरम्यान कोणीतरी मित्र/मैत्रिण येणार आणि चल चहाला म्हणणार किंवा तसा msg/call येणार (आपणही इतरांना चल म्हणतो)… मग अभ्यासात link लागलेली असली तरी त्यास/तिस ‘नाही’ कसे म्हणावे अन म्हटलेच तर राग वैगेरे येईल…. म्हणून आपण हळूच पुस्तक मिटतो आणि निघतो चहाच्या टपरीकडे… तिकडे किती वेळ जातो याबद्दल जरा विचार करून पहावा… या सगळ्या गोष्टींना #नाही म्हणायला शिकलं पाहिजे… एकट्याने चहा घेतल्याने वेळ कमी जातो अनावश्यक गोष्टींवर चर्चा होत नाही हा माझा self अनुभव आहे…
चहाच्या वेळी अभ्यासाबद्दल चर्चा करणारे खूप कमी लोक आहेत (साधारणतः 0.5%)

2) जेवण करून झाल्यावर चाललेल्या गप्पांत आपण किती गुंतायचे आणि लवकर बाहेर पडून अभ्यासाला लागायचे हे एक प्रकारे ‘नाही’ म्हणण्यासारखे आहे.
ग्रुप मधून लगेच निघून गेलं म्हणजे आपली image negative बनेल, आपल्याला कोण support करणार नाही ही भीती असते म्हणून ‘नाही’ म्हणायला अवघड जातं अन मग अस्वस्थता वाढते…
अहो!! पण चर्चेचा अनावश्यक वेळ तुम्ही अभ्यासात घालवला तर उद्या prelims/Mains clear झाली तर व्यर्थ वेळ घालवणारे लोक तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला येतील…
म्हणून ‘नाही’ म्हणायला शिका.

3) नवीन चित्रपट आला की निघालेच पाहायला… मित्र/मैत्रिणींचा ग्रुप आहे मग जावं तर लागणारच ही मानसिकता बनते. बऱ्याच वेळा जायची इच्छा नसते तरी जावं लागतं…
अभ्यासाच्या काळात नवीन आलेले चित्रपट नाही पाहिले तर आयुष्यात काही मोठा फरक पडत नाही… नंतर नौकरी लागल्यावर पाहू शकता. इथंही ‘नाही’ म्हणायला शिका.

4) मोबाईल ला ‘नाही’ म्हणायला शिका…
भरपूर messages येतात – whatsapp, facebook, telegram, instagram आदी. मग reply नाही केला तर काय म्हणतील (अपवाद खूपच urgent असेल तर) यातच आपण बुडून जातो… वेळ वाया जातो… इथं ‘नाही’ म्हणता आलं पाहिजे…
‘नाही’ हे आपल्या मनाला सांगायचं.

मोबाईल बद्दल अजून दुसरे म्हणजे…
कॉल आपण किती लावतो, receive करतो, missed call ला reply यात किती वेळ बोलतो याचं गणित हवं… खरंच एवढे सगळे calls आपल्याला अभ्यासाच्या काळात महत्वाचे असतात का… मला वाटतं या काळात घरचे लोक सोडले तर इतर calls तेवढे महत्त्वाचे नसतात (जॉब वैगरेचे अपवाद सोडले तर)… उगीच अभ्यासात व्यत्यय आणून मग प्रश्नच जास्त विचारले जातात…
मग कधी आहे परीक्षा?
झाला का अभ्यास?
तू पास कधी होणार?
लग्न कधी करणार?
यावर्षी जागा किती आहेत?
आयोगाबद्दल चर्चा?
गावाकडे कधी जाणार?
……… आदी.

इथं #नाही म्हणता आलं पाहिजे.

5) एक पुस्तक संपत नाही तोच दुसरे पुस्तक घेण्यासाठी ‘नाही’ म्हणता आलं पाहिजे.
कारण एकच पुस्तक सारखं सारखं वाचलं तर पक्के होऊन जातं आता syllabus मधील जो भाग त्या पुस्तकातून cover होत नाही तोच भाग दुसऱ्या पुस्तकातून वाचवा… उगीच same topic वेगवेगळ्या पुस्तकातून वाचायची गरज नाही (इथं value addition साठी overlook करू शकता)
म्हणून हातचं सोडून पळत्याला ‘नाही’ म्हणायला शिकलं पाहिजे.

6) रात्री रूम वर झोपण्याआधी roommates च्या गप्पांत जास्त अडकून राहता कामा नये… इथं #नाही म्हणता आलं पाहिजे… थेट बोललं पाहिजे…
काहींना लवकर झोपायचं असतं आणि असे सांगितले तरी बऱ्याच वेळा खिल्ली उडवली जाते. मोठमोठ्याने गप्पा मारणे चालूच असते… खरंच प्रत्येकाने स्वतःला प्रश्न करावा की त्या गप्पा अभ्यास आणि परीक्षा यांसाठी किती उपयोगाच्या आहेत…
परिणामी उशिरा झोप… मग उशिरा उठणे… चिडचिड वाढते… सगळं schedule बिघडते…
इथं अनावश्यक गोष्टींना #नाही म्हणायला शिका. खूप फरक पडतो प्रयत्न करून पाहा…

एक अनुभव सांगतो मागच्या MPSC च्या interview च्या वेळी माझे दोन roommate मुलाखतीला होते… तर आम्ही उरलेले लोक या दोघांचा दर दोन दिवसांनी रात्री प्रत्येकी 20-25 min mock interview घ्यायचोत… आणि नंतर सर्व जण विविध topic वर discuss करायचो… याचा त्यांना खूप फायदा झाला… त्या दोघांतील एका जणाला post मिळाली… आजही आम्ही याच प्रकारे अवघड topic वर रूमवर चर्चा करत असतो… एकमेकांचे मत घेत असतो…
ग्रुपचा फायदा करता आला पाहिजे एवढंच सांगायचंय यातून.

7) Negative गोष्टी करणाऱ्यांना टाळता आलं पाहिजे. #नाही म्हणता आलं पाहिजे.

8) इंटरनेट surf करताना त्या जास्त अडकायचं ‘नाही’ हे म्हणता आलं पाहिजे आणि तशी कृती केली पाहिजे…
यात आजकाल youtube वर जास्तच वेळ घालवला जातो… बोर झालं तर काहीवेळ entertainment ठीक आहे पण अतिरेक नको. एक video पाहताना खाली इतर videos झळकतात आणि मग काय मोह आवरत नाही…
इथं #नाही म्हणायला शिकलं पाहिजे.
…..
…..
अजूनही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की जिथं #नाही म्हणता आलं पाहिजे…. त्या कोणत्या हे स्वतःलाच विचारा… अन मग #नाही म्हणायला शिका… सुरुवातीला त्रास होईल, नको वाटेल पण पुढचे मार्ग सोपे होतील… भविष्यात प्रशासनात याचा खूप फायदा होईल.

आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली तर सगळंच कसं सोपं होईल ना….

©प्रभाव
(प्रमोद भाऊसाहेब वडवकर)

2 comments

  1. Pawan Madhukarrao Pote

    धन्यवाद सर तुमच्या या लेखामुळे खूप लोकांचे मन परिवर्तन होईल,

  2. It’s true Sir ….
    Saying No is Difficult but Now it can very very important or necessary

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat