तुमच्यातील सर्वोत्तम द्या

तुमच्यातील सर्वोत्तम द्या

वॉरेन बफेट यांनी एके ठिकाणी एक निरीक्षण नोंदवलेले आहे. तो म्हणतो, “तुमच्यापेक्षा तुम्हीच अधिक चांगले बनू शकता. किती सुंदर कल्पना आहे, नाही खरंच तुमच्यासारखे फक्त तुम्हीच, कारण तुमची स्पर्धा ही तुमच्याशीच आहे. त्यामुळे सर्वोत्तमाची भावना मनात
आणा आणि कृतीही सर्वोत्तमाचीच करा. अर्थात काही जण तुमची, तुमच्या जगण्याची नक्कल करतील, पण ती नक्कलच असेल. त्यांचा नेहमीच दुसरा क्रमांक लागेल. आपली बांधिलकी की सर्वोत्तमाची असली पाहिजे. एकूणच मी उत्तमातल्या उत्तमासाठी जगले
पाहिजे. इतकेच नव्हे तर मी, माझी गुंतवणूकही सर्वोत्कृष्टतेतच केली पाहिजे.

प्रत्यक्ष जीवनात सर्वोत्तम गोष्ट करण्यापूर्वी तुम्ही शक्तीस्थानावर व आपल्या चैतन्यावर विश्वास ठेवला पाहिजे, प्रत्यक्ष असामान्य बनण्यापूर्वी तुम्हाला स्वत:ला वाटले पाहिजे की आपण असामान्य आहोत म्हणून. एकूणच बाह्य जीवनात नेत्रदीपक यश मिळविण्यापूर्वी भावनिक-बौद्धिकदृष्ट्या त्याचे एक कल्पनाचित्र तुम्ही तुमच्या मन:पटलावर उमटवले
पाहिजे, तुमच्यातील सृजनशीलतेला आवाहन करा. स्वत:ला चांगल्या गोष्टींनी गौरवा. या चांगल्या गोष्टी तुमच्यातील सर्वोत्तम व सखोल अशा गोष्टींचे दर्शन घडवतील. ‘हेमाझ्यासाठी आहे, मी त्यांच्यासाठी आहे, असा संदेश मग आपोआपच पसरला जाईल.’

स्वत:ला अंतर्मुखतेने प्रश्न विचारा, सर्वोत्कृष्ट चैतन्यानिशी, अस्तित्त्वानिशी प्रत्येक
कणाकणातून मी खच्या अर्थाने जगतो आहे का माझ्यातील नैसर्गिक ऊर्जेचा मी पुरेपूर
उपयोग करतो आहे का प्रांजलता-सद्भाव या सह मोठ्या भलेपणाने मी जगतो आहे

आपल्यातील सर्वोत्तम आज आणि
आत्ताच आविष्कृत करा. कारण हीच
योग्य वेळ आहे.

Robin sharma यांच्या महानतेच्या पुस्तकातून साभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat