जैवइंधन सिम्प्लिफाइड

जैवइंधन सिम्प्लिफाइड

☯️जैवइंधनाचे त्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण

1.पहिल्या पिढीचे जैवइंधन म्हणजे बायोइथेनॉल आणि अत्याधुनिक जैवइंधन

  1. द्वितीय पिढीचे इथेनॉल, महापालिकेचा घनकचरा

3.तृतीय पिढीचे जैवइंधन Bio-CNG

☯️ऊसाची मळी, शुगर बीट, स्वीट सोरघम , बटाटे , मका यासह खराब धान्ये, सडका बटाटा यांचा वापर – इथेनॉल निर्मितीसाठी शक्य

☯️शेतकऱ्याकडील अतिरिक्त धान्यसाठ्याचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करता येईल.

☯️जैवइथेनॉलची ब्लेंडिंग पातळी ऑक्टोबर 2008 पासून अनिवार्य

जैविक इंधन वनस्पती

A)जट्रोफा(रान एरंड)

✅जेट्रोफा कारकास आढळ– दक्षिण अमेरिका व पश्चिम आशिया

✅बारमाही वनस्पती — अखाद्य तेल

✅समावेश — युफोर्बियाकी फॅमिलीमध्ये

✅जट्रोफापासून रबरासारखा (लॅटेक्स) पदार्थ स्त्रावत असल्याने प्राणी ह्यास तोंड लावत नाहीत.

✅पाण्याची आवश्यकता कमी

B)शुगरबीट(बीटा वल्गारिस वॅरि. साचारिफेरा एल्.)

✅ समशीतोष्ण वातावरणात येणारे पीक

✅कंदमूळ पीक–साखर प्राप्त

✅शुगरबीट पासून इथेनॉल निर्मित शक्य

✅पेट्रोल अथवा डिझेलमध्ये 10% ते 15% इथेनॉल मिश्रण शक्य

Bio Fuel: These are fuels made from living organism or the waste they produce; by the process of carbon fixation. Bio fuels are categorised into 1st, 2nd and 3rd generation bio fuels. 1st generation bio fuels are made of food crops like corn, 2nd generation from those crops that are not food crops like jatropa and from food crops unfit for consumption like waste vegetables etc. 3rd generation is made from algae.

Bioethanol, biodiesel and biogas are a class of Bio Fuels.

a) Bio ethanol: It is produced from fermentation of carbohydrate and cellulosic material of crops and other plants and grasses. It is generally used as an additive to increase octane number of fuel.

b) Bio Diesel: It is a methyl or methly ester of fatty acids produced by trans esterification of oils and fats obtained from plants and animals. It can be directly used as fuel.

c) Bio gas: Biogas is methane produced by anaerobic digestion of organic material by anaerobes. It can be produced either from biodegradable waste materials or
by the use of energy crops fed into anaerobic digesters to supplement gas yields.

⚛️भारताचे ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण–2018⚛️

☯️उद्दिष्ट— 2030 पर्यंत 20% इथेनॉल-ब्लेंडिंग आणि 5% बायोडीझेल-ब्लेंडिंग करणे

☯️ठळक वैशिष्ट्ये:-

🍏जैवइंधनाचे त्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. यात पहिल्या पिढीचे जैवइंधन म्हणजे बायोइथेनॉल आणि अत्याधुनिक जैवइंधन; द्वितीय पिढीचे इथेनॉल, महापालिकेचा घनकचरा; तसेच तृतीय पिढीचे जैवइंधन म्हणजे, बायो-CNG इत्यादी. या वर्गीकरणामुळे प्रत्येक प्रकारातील इंधनाला योग्य आर्थिक मदत किंवा सवलत देणे शक्य होईल.

🍏कृषी उत्पादने जसे की, ऊसाचा रस, बीटामधील साखर, शलगमसारख्या कंदमुळातील साखर, बटाटे, मका यातील स्टार्च, यासह खाण्यायोग्य नसलेल्या कृषी उत्पादनांचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करता येईल.

🍏शेतकऱ्याकडे असलेल्या अतिरिक्त धान्यसाठ्याचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करता येईल. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समितीची मान्यता लागणार.

🍏अत्याधुनिक आणि सुधारित जैवइंधन निर्मिती या दृष्टीने द्वितीय पिढीचे इथेनॉल शुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्र शासन येत्या सहा वर्षात 5000 कोटी रुपये निधी खर्च करु शकणार.

🍏जैवइंधन निर्मितीपासून ते पुरवठ्यापर्यंतची एक साखळीच तयार केली जाऊ शकेल.

🍏जैवइंधन निर्मितीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या हेतूने त्याच्याशी संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या भूमिकाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

🍏या धोरणामुळे देशाचे पेट्रोल-डीझेल सारख्या इंधनावरील अवलंबित्व कमी होईल आणि इंधनाची बचत होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही तसेच सेवनातून मानवी आरोग्यासही जैवइंधन फायद्याचे आहे. ह्या इंधनाची निर्मिती ग्रामीण भागात होणार असल्याने ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती होईल. तसेच घनकचरा व्यवस्थापनामुळे कचऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल.

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat