खालील तयारी करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप कठीण जाऊ शकते आणि असे उमेदवार आपली अमूल्य वर्ष वाया घालवत आहेत..

खालील तयारी करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप कठीण जाऊ शकते आणि असे उमेदवार आपली अमूल्य वर्ष वाया घालवत आहेत..

1.जे कुठेच संधी नाही म्हणून आपला मित्र तयारी करतोय म्हणून या क्षेत्रात आलेत.
2.ज्यांना आजपर्यंत स्पर्धा परीक्षा बाबत कोणतेही आवड नव्हती केवळ जे विविध जाहिराती,स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेली उमेदवार यांची भाषणे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांचे विचार ऐकून खूप सोपी आहे परीक्षा असा विचार करून,क्लास लावला की आपण पास होऊ या विचाराने आलेले
3.ज्यांचे बेसिक अभ्यास अतिशय कमकुवत आहे.आणि त्यांना वाटते की,क्लास लावला की माझे संपूर्ण अभ्यास पूर्ण होईल आणि मी अधिकारी बनेल.
4.ज्यांची कोणत्याच विषयात command नाही आणि फक्त अभ्यास करण्याची आवड,खूप मेहनत घेण्याची तयारी,वाचनाचा स्पीड,मी खूप महागडा क्लास लावण्याची ऐपत आहे,घरी खूप श्रीमंती आहे त्यामुळे पुण्यात जाऊन अभ्यास करू शकतो असे
5.जे दिवसभर अभ्यासाच्या नावाखाली दिवसभर टेलिग्राम,फेसबुक,व्हाट्सअप्प सारखे सोशल मेडिया वर अभ्यास करतात आणि इकडून तिकडून माहिती गोळा करून फेकत असतात.
6.सोशल मेडिया वर यशस्वी अधिकारी,नेतेमंडळी,मार्गदर्शक लोक,विविध पक्ष,संघटना,संस्था,आकादम्या ,सोबत तयारी करणारे उमेदवार यांचे गुणगान आणि माप काढण्यात दिवसभर वेळ घालवतात.त्यांचे फोटो वर like आणि कंमेंट करण्यात दिवस घालवतात.
7.ज्यांनी 4-5 वर्ष स्पर्धा परीक्षेत घालवली परंतु आजून कोणतीही पूर्व परीक्षा पण पास झाले नाहीत.अथवा कट ऑफ पेक्षा खूप मार्कने पाठीमागे पडलेत
8. जे उमेदवार अभ्यास बाजूला ठेवून विविध मोर्चे,आंदोलने यामध्ये सहभाग नोंदवून कार्यकर्ता,नेतृत्व बनुन राहतात.
9. जे अभ्यास सोडून मोठ्या शहरात दुसरी कॉलेज लाईफ njoy करत आहेत.
10. जे अभ्यासपासून भरकटलेले आहेत.
11. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.ज्यांनी दरवर्षी नवनवीन मार्गदर्शक बदलले परंतु अभ्यास कसा करायचा हे अजून समजले नाही. असे
12.आपला अभ्यास सोडून इतरांना कसलीही(अभ्यासातील सोडून) मदत करायला,कधीही,आणि केव्हाही तयार असतात असे
13.जे खूप वर्ष झाले तयारी करत आहेत आणि निराशेने ग्रासलेले आहेत
14.आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर सतत फोडणारे..
15.जे यशस्वी झालेलं उमेदवार यांच्याकडून मार्गदर्शन घेत नाहीत अथवा आपल्या चुकातून शिकत नाहीत आणि परत परत त्याच चूका करतात.
16.मला अमुक अमुक परिस्थिती भेटली तरच मी पास होणार असे म्हणणारे
17.पुस्तक हातात घेतले की,अभ्यास नकोसा वाटणारे
18.वाईट संगत असणाऱ्या,नकारात्मक प्रवृत्ती असणाऱ्या, मित्रांच्या सानिध्यात राहण्याने
19.अभ्यासात संकुचित वृती ठेवून आपल्याकडील नोट्स,अभ्यास शेअर करण्यात कचरणारे
20.अभ्यास सोडून इतरांचे आयुष्यात(अधिकारी,अयशस्वी उमेदवार,मार्गदर्शक इत्यादि)काय चालू आहे याबाबत पाठीमागे गॉसिपिंग करून वेळ वाया घालवणारे

जर आत तुम्हाला काही ऍड करायचे असेल तर मला t.me/drajit यावर टेलिग्राम मध्ये message करा.अथवा 9423035088 या व्हाट्सअप्प वर message करा

अजित थोरबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat