खालील इंग्रजी उताऱ्याचे मराठी मध्ये भाषांतर करा

2
2609
Print Friendly, PDF & Email

मराठीत भाषांतर करा

The summer heat is increasing day by day. We were hoping for some respite, instead we are experiencing continual rise in temperature. And in the midst of this came the information that the monsoon will perhaps be delayed by a week, which has added to the worry. Almost the entire country is reeling under the scorching impact of severe heat. The mercury continues to soar. Be it animals, birds or humans…everyone is suffering. These problems have been getting increasingly worse due to environmental degradation. Forest cover has kept receding due to indiscriminate felling of trees. In a way, the human race itself has paved the way for self-annihilation by destroying the environment.
5th June is World Environment Day. On this day, discussions expressing concern on the issue are held all over the world for saving the environment. This time on the occasion of World Environment Day, the United Nations has given the theme “Zero Tolerance for Illegal Wildlife Trade”. This topic will, of course, be discussed, but we also must talk about saving our flora and fauna, conserving water, and how to expand our forest cover. You must have seen in the last few days how forest fires raged in the lap of the Himalayas in Uttarakhand, Himachal Pradesh and Jammu and Kashmir. The main cause of these forest fires was dry leaf littering combined with carelessness, which led to the massive inferno. And so, it becomes the bounden duty of each one of us, to save forests and save water.

भाषांतर खालील लिंक वर पाठवा

1)Telegram.  Telegram.me/ajit_thorbole

2)मेल करा–athorbole@gmail.com

2 COMMENTS

 1. Swiss:
  उन्हाळ्यातील उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सतत होणारी तापमानातील वाढ ही कुठे तरी थांबेल याची आपण आशा करत होतो. तेव्हाच महिन्याच्या मध्यभागी पाऊस सुरू होण्यास अजून एक आठवडा उशीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली, त्यामुळे काळजीत आणखीनच भर पडली.

  जवळजवळ संपूर्ण देश तीव्र उष्णतेच्या तीव्र कडाक्याने होरपळून निघत आहे. पारा वाढतच चालला आहे. प्रत्येकजण दु:खात आहे मग तो पशू, पक्षी किंवा मानव असेल … पर्यावरणाचा निकृष्ट दर्जा यामुळे या समस्या वाढतच आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे वनक्षेत्र कमी होत आहे. एक प्रकारे, मानव स्वतः पर्यावरण नष्ट करून स्वत: चा नाशाचा मार्ग मोकळा करत आहे.

  5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. या दिवशी सदर विषयावर चिंता व्यक्त करण्यासाठी, पर्यावरण जतन करण्यासंबंधी चर्चा जगात सर्वत्र चर्चासत्रं आयोजित केली जातात.

  जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने, युनायटेड नेशन्स ने (संयुक्त संस्थान) “बेकायदेशीर वन्यजीव व्यापारातील शून्य सहिष्णुता” ही थीम दिली आहे. अर्थातच, या विषयावर चर्चा केली जाईल. परंतु आपण देखील आपल्या वनस्पती आणि वन्यजीव संरक्षण, पाण्याची बचत आणि संवर्धन, वनक्षेत्र विस्तृत कसे करता येईल याबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे.

  गेल्या काही दिवसांत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील हिमालयाच्या काही भागात वणवा कसा पसरला हे आपण सर्वानी पाहिले असेलच. याचे मुख्य कारण म्हणजे निष्काळजीपणा. वाळलेली पानांची योग्य विल्हेवाट न लावली गेल्याने त्याचे रूपांतर विनाशकारी वणव्यात झाले.

  त्यामुळे जंगल संरक्षण, वन संवर्धन आणि पाण्याचा योग्य वापर हे आपले प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.

 2. उन्हाळा वाढतच चालला आहे. असे वाटले होते की, त्यापासून थोडी सुटका होईल, पण तापमान वाढतच आहे. नैऋत्य मौसमी पाऊस बहुधा एक आठवडा उशीराने येईल अशी बातमीही मध्यंतरी आली. त्यामुळे चिंता अधिकच वाढली. देशाचा बराचसा भूभाग उष्णतेच्या लाटेने होरपळून निघतो आहे. तापमापकातील पारा जणू आकाशाला भिडला आहे. प्राणी असोत की पक्षी असोत, की माणसे सारेच या उन्हाळयाने त्रस्त आहेत. पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळेच या समस्या वाढत चालल्या आहे. जंगले कमी झाली, वृक्षतोड होत गेली आणि निसर्गाचा विध्वंस करुन जणू काही माणसाने आपल्याच विनाशाला, आत्मनाशाला वाट मोकळी करुन दिली.
  5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. जगभरात पर्यावरण या विषयावर चर्चा होतात, काळजी व्यक्त केली जाते. यावेळी पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी ठरवली आहे ती आहे “झिरो टॉलरन्स फॉर इल्‌लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड” म्हणजे वन्यजीवांच्या व्यापाराला पूर्णपणे आळा” याबद्दल तर चर्चा होईलच पण आपल्याला झाडाबद्दलही बोलले पाहिजे, पाण्याबद्दल बोलले पाहिजे. जंगले कशी वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे.
  याचे कारण म्हणजे आपण हे पाहिले असेल की, उत्तराखंड,हिमाचल, जम्मू-काश्मिर या भागातील हिमालय पायथ्याजवळच्या जंगलांमध्ये नुकताच भीषण वणवा लागला होता. या भीषण अग्नी प्रलयाचे मूळ कारण होते ते म्हणजे वाळलेला पालापाचोळा आणि थोडेसे दुर्लक्ष. परिणाम विनाशकारी वणवा. म्हणून जंगले वाचवणे, पाण्याची बचत करणे हे आपल्या सगळयांचे कर्तव्य ठरते, जबाबदारी ठरते.

LEAVE A REPLY