कसा असावा तुमचा दिवस(स्पर्धा परीक्षा स्पर्धक)

1 दिवसाच नियोजन

–मित्रानो दिवसातून किती तास अभ्यास केला हे महत्वाचे नाही.तो किती effective झाला हे महत्वाचे आहे.
–effective म्हणजे काय? विषय समजणे,त्यावरील प्रश्नची उत्तरे देता येणे.
–नुसत्या वाचण्याने effective अभ्यास होत नाही..
–दिवसातून 5 ते 6 तास effective झाला तर खूप अभ्यास होऊ शकतो

दिवसाच्या नियोजनात काय करावे?
–सकाळचा व्यायाम आणि नाष्टा
–आज काय अभ्यास करायचा आहे त्याचे नियोजन (सिम्प्लिफाइड वरती आजचा अभ्यास पाहू शकता अथवा तुमचा स्वतःचा प्लॅन करू शकता)
–शांत ठिकाणी अभ्यास करणे
–दररोज एकच मुख्य विषय घेणे(इतिहास,भूगोल,विज्ञान, पर्यावरण,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी) घेऊन त्याचा सर्व टॉपिक वर effective अभ्यास पूर्ण करून च नवीन विषय घेणे)
–मुख्य विषयाबरोबर इतर विषय हे दररोज करायचे त्यामध्ये चालू घडामोडी,गणित,मराठी,इंग्रजी,बुद्धिमत्ता यांचा समावेश होतो.
–मुख्य विषयाला दररोज 4 तास वेळ द्यावा
–इतर विषयाला 2 तास वेळ द्यावा
–revision साठी दररोज 2 तास द्यावेत(दररोज करावी)
–जेवण व्यवस्थित घ्यावे.
–अभ्यासाचे कोणतेही दडपण घेऊ नये
–अवघड विषय अगोदर संपवावेत.
–झालेल्या टॉपिक वर त्याच दिवशी प्रश्न सोडवावेत.
–वेळेचा सुदपयोग करावा.
–मुख्य विषय वाचताना कंटाळा आला तर इतर विषयांचा अभ्यास करावा.इतर विषय वरती सांगितलेत
–दिवसभर अभ्यास करताना negative फील होत असेल तर चांगली पुस्तके वाचावी, video पाहावेत,music ऐकावे यासाठी दिवसातून 30 मिनिटे द्यावीत
–शक्यतो अभ्यास दिवसा करावा..रात्री जागरण नको
–ज्या गोष्टीने आपल्या अभ्यासात distraction होईल अशा पासून दूर राहा.
–दिवसातून एकदा तरी आपल्या आई वडिलांशी बोला.
–एक वर्ष प्रामाणिक पणे हे फोल्लो करा..वर्षभर फक्त स्वतःचा विचार करा..आणि स्वतः कसे पुढे जाता येईल ते पहा..स्वतःचे करिअर पाहिले महत्वाचे आहे
–करिअर घडेपर्यंत सामाजिक आंदोलन इत्यादी बाबीपासून दूर रहा.
–जर अभ्यास होत नसेल तर आपण कशासाठी करतोय याची जाणीव ठेवा.
–ज्या बाबीपासून कोणताच निष्कर्षाप्रत पोहचू शकत नाही अशा बाबी बाबत debate करण्यात वेळ वाया घालवू नका उदा.राजकीय चर्चा इत्यादी

थोडक्यात,
मुख्य विषय–४ तास
इतर विषय–2 तास
Revision–2 तास

ऑल द बेस्ट

अजित थोरबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com