उपजिल्हाधिकारी पदाविषयी

0
6500
Print Friendly, PDF & Email

उपजिल्हाधिकारी पद.

पदाबद्दल

१.राज्यसेवेतील सर्वात उच्च पद असून आजही या पदाबद्दल सर्व परिक्षार्थींना तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रचंड आकर्षण आहे.

२.उपजिल्हाधिकारी म्हणून विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते.
उदा. उपविभागीय अधिकारी(प्रांत अधिकारी),
जिल्हा पुरवठा अधिकारी,
भूसंपादन आणि पुनर्वसन अधिकारी,
निवडणूक उपजिल्हाधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी,
निवासी उपजिल्हाधिकारी, इ.
याशिवाय महाराष्ट्र शासन मध्ये कार्यरत असणाऱ्या विविध महामंडळावर उदा. MIDC, MHADA, MMRDA इत्या. प्रतिनियुक्तीने काम करण्याची संधी उपजिल्हाधिकारी म्हनून मिळते.

३. महसूल विभाग पूर, दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये व्यवस्थापन करणे, निवडणुका, साथीचे आजार नियंत्रण,दंगल नियंत्रण, पुनर्वसन कार्यक्रम, आर्थिक व सामाजिक सहाय्य योजणांची अंमलबजावणी,अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे, राजशिष्टाचार अशी अनेक कामे पार पडतो.
उपजिल्हाधिकारी म्हणून या कामावर ठसा उमटवण्याची संधी मिळू शकते.

४.उपविभागीय अधिकारी(प्रांत अधिकारी) – कामे-
उपविभागीय अधिकारी हे पद जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन यांत दुवा म्हणून महत्वाचे आहे.
अ.उपविभागीय दंडाधिकारी म्हणून उपविभागातील कायदा व सुव्यस्था कायम ठेवणे.
ब. उपविभागातील सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवणे.
क. विधानसभा व लोकसभा निवडणूक वेळी अनुक्रमे निवडणूक निर्णय अधिकारी व सहय्याक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणे.
ड. 7/12 वरील फेरफार बाबत मंडळ अधिकाऱ्यांच्या निर्णयावर अपिलीय अधिकारी म्हणून काम पाहणे.
इ. बॉम्बे पोलीस ऍक्ट 1951 नुसार ताडीपारीचे आदेश काढणे.
ई.वृक्षतोड अधिनियम 1964 नुसार वृक्ष तोडण्यास परवानगी देणे किंवा नाकारणे.
उ.बिनशेती प्रकरणामध्ये चौकशी अहवाल देणे.
ऊ. शासकीय गोदामांची तपासणी करणे आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर पर्यवेक्षण करणे.
ए. रोजगार हमी योजनेतून होणाऱ्या कामांची तपासणी करणे.
ऎ. जलयुक्तशिवार अभियान या योजनेतील उपविभाग स्तरावर काम करणाऱ्या समितीचा अध्यक्ष म्हणून काम पाहणे.

ही सर्व कामे in detail लक्षात राहावीत असे नाही पण उमेदवारांनी किमान कामाचे स्वरूप लक्षात ठेवून मुलाखतीत उत्तरे द्यावीत.
मात्र महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी उदा. तलाठी, लिपिक, नायब तहसीलदार यांना जास्त सखोल विचारणा होऊ शकते.

५. इतर सर्व पदांवर त्या त्या पदानुसार कामे करावी लागतात त्याविषयी..
1. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून जिल्ह्यातील सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे.
2. भूसंपादन व पुनर्वसन उपजिल्हाधिकारी म्हणून जमिनीचे संपादन करणे, मोबदला वितरण करणे, विविध प्रकल्पांना जमिनी दिलेल्या व्यकतींचे पुनर्वसन करणे.
3. निवडणूक उपजिहाधिकारी म्हणून निवडणूक आयोगाकडून केली जाणाऱ्या कामावर नियंत्रण व पर्यवेक्षण करणे. उदा. मतदार याद्या अद्ययावत करणे, ओळखपत्र तयार करणे, वितरण करणे,इत्या.
4.निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रतिजिल्हाधिकारी म्हणून काम पहावे लागते. जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कामात सहाय्य मदत करणे , त्यांच्या अनुपस्थतीत कार्यभार सांभाळणे.
खूप खूप शुभेच्छा.

प्रशांत खेडेकर
उपजिल्हाधिकारी,अहमदनगर

LEAVE A REPLY